Skip to main content

कला

सहज सुचलं म्हणून

लेखक कंजूस यांनी शुक्रवार, 20/12/2024 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

सांगलीचे कर्णमधूर लेझीम

लेखक स्वधर्म यांनी सोमवार, 30/09/2024 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
आधी ढोल ताशा पथके की वेठबिगारी ? या लेखाला प्रतिक्रिया लिहीली होती, पण खालील दुवे आधिक लोकांनी पहावेत असे वाटले, म्हणून सांगलीच्या लेझीम परंपरेचे दुवे छोटा लेख म्हणून देत आहे. बाकी लयदार, कर्णमधुर तरीही कमालीचा कस लागणार्या लेझीमशी ढोल ताशाच्या कर्कश्य गोंगाटाबरोबर तुलनासुध्दा करवत नाही. ज्यांनी लेझीम खेळलंय, अनुभवलंय, त्या माझ्यासारख्यांना ढोल ताशा अगदी सहन होत नाही. अवघ्या पाच मिनिटांचा लेझीमचा डाव असा घाम काढतो की कितीही दमसासाचा गडी असला, तरी विश्रांती घेतल्याशिवाय पुढे खेळूच शकत नाही. पुण्यात मिरवणुकांना जाणं कधीचंच बंद केलंय.

भयंकर प्रामाणिकपणे काम करणारा कलासाधक: संकर्षण कर्‍हाडे

लेखक मार्गी यांनी रविवार, 15/09/2024 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
✪ ‘व्हायफळ' गप्पा पॉडकास्टवर उलगडत जाणारा संकर्षणचा प्रवास ✪ ओळखीच्या चेहर्‍याच्या मागे असलेल्या दिलदार माणसाचा परिचय ✪ परभणी, अंबेजोगाई, औरंगाबादच्या आठवणी व लहानपणीच्या खोड्या ✪ प्रशांत दामले, श्रेयस तळपदे व सिनियर्सकडून त्याचं शिकणं आपण शिकावं असं! ✪ “स्टेजवरचा माज खाली दाखवलास तर तो स्टेजवर उतरवला जाईल!” ✪ “तुला मनलं होतं‌ ना तुला बक्षीस द्यायचं हाय, रताळ्या!” ✪ “Soak the pressure and be there!” ✪ पुस्तकं‌ व माणसं वाचणारा अवलिया संकर्षण कर्‍हाडे! बस नाम ही काफी है! घराघरात पोहचलेला चेहरा! कलाकार, नाटककार, अभिनेता, सूत्र संचालक, लेखक आणि कवी!

|| उत्कीर्ण विनायक ||

लेखक चौथा कोनाडा यांनी गुरुवार, 12/09/2024 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
"काय नाव आहे म्हणे?" मी उत्सुकतेने विचारल. तो : उत्कीर्ण ! "काय? उत्कीर्ण? हे असलं कसलं म्हणे नाव? उत्तीर्ण वै ऐकलंय.. पण हे उत्कीर्ण वेगळंच काही तरी दिसतंय!" तो : "अरे, उत्कीर्ण म्हणजे खोदून किंवा कोरून तयार केलली कलाकृती" कोरलेलं .. अर्थात उत्कीर्ण Praf001a अच्छा असं आहे तर! माझ्या वाचण्या ऐकण्यात हा शब्द आला नव्हता.

परभणीतील भरतनाट्यम अरंगेत्रम- नृत्य योग सोहळा!

लेखक मार्गी यांनी रविवार, 28/07/2024 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
✪ अरंगेत्रम- शिष्याची परीक्षा व जगामध्ये प्रवेश करण्यापूर्वीचा 'अंतिम पग' ✪ अनुभवावेत असे शब्दम्, वर्णम्, किर्तनम्, तिल्लाना आणि मंगळम् ✪ सुंदर ते ध्यान आणि ओंकार स्वरूपा! ✪ वर्षानुवर्षाच्या मेहनतीचं- दृढसंकल्पाचं प्रेरणादायी उदाहरण ✪ परभणीच्या वैष्णवीची मोठी स्वप्ने आणि झेप ✪ कडक गुरू- वरी घालतो धपाटा आत आधाराचा हात ✪ नृत्य आणि संगीत- विचार थांबवणारा अनुभव ✪ स्नेहीजन व गुरूजनांचा मेळा When a disciple is ready, Guru appears. When the disciple is really ready, the Guru disappears! नुकतीच गुरूपूर्णिमा होऊन गेली आहे.

'रमलप्रतिमा (भाग २) अर्थात नवीन काही AI चित्रे ( Prompt सह)

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 17/06/2024 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीच्या सांजशकुनाच्या रमलप्रतिमा: एक नवाच उद्योग (भाग-१) दिलेल्या चित्रांनंतर गेल्या काही दिवसात आणखी बरेच प्रयोग केले, त्यापैकी काही चित्रे: चित्र १. . चित्र २. . A cinematic view of a picturesque landscape featuring an ancient castle in greek architectural style.

याझिदींसाठी प्रार्थना करा कि स्वप्नात त्यांना बायबलमधील देव भेटो!

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 13/06/2024 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
इसीसच्या आत्मा आढळून आल्याची अधून मधून वृत्ते असतात तरीही त्यांच्या इराक मधील याझिदी मुर्तीपूजकांवरील जुलमांचे मुख्यपर्व संपल्याला जवळपास दहा वर्षे झाली. त्यांच्यावरील छळ काळात मिपावर एक धागा लेख लिहिला होता. इसीसचा हेतु याझिदी कुराणमधील देव स्विकारत नाहीत तो पर्यंत चक्कचक्क पराजित याझिदींचा गुलाम म्हणून वापर करणे होता, याझिदी स्त्रीया आणि कुटूंबांचे पुढे काय झाले?

आतुरतेने वाट पाहत आहे तो चित्रपट

लेखक चौकस२१२ यांनी शुक्रवार, 10/05/2024 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
आतुरतेने वाट पाहत आहे तो चित्रपट प्रकाश नारायण संत यांचं लंपन कादंबरीवर दिग्दर्शन निपूण धर्माधिकारी "लंपन" https://www.youtube.com/watch?v=Urf8cvCo5Ws झलक बघून फक्त एक शंकेची पाल मनात चुकचुकली ती म्हणजे लंपन जिथे वाढतो ते महाराष्ट्र्र कर्नाटक सीमेचं भागातील गाव आणि तेथील भाषा या चित्रपटात कितपत तशीच उतरली आहे ??

द लेडी ऑफ शालॉट : (भाग १) चित्र, कविता आणि 'आई'चा मराठी तर्जुमा.

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 03/05/2024 03:14 या दिवशी प्रकाशित केले.
. चित्रकारः John William Waterhouse. (1888) Oil on canvas (72 in × 91 in) Location: Tate Britain, London गेल्या महिन्यात लंडनमधे दहा दिवस राहून तिथली कलासंग्रहालये बघितली. लहानपणापासून पुस्तकांमधे बघितलेली अनेक उत्तमोत्तम चित्रे प्रत्यक्ष बघण्यातली मजा भरपूर अनुभवता आली.

एक अचानक मिपाकट्टा : चिंचवड

लेखक चौथा कोनाडा यांनी शुक्रवार, 19/04/2024 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रगुप्त, बबन तांबे आणि मी अर्थात चौथा कोनाडा यांचा अचानक ठरलेला पाषाणचा मिनी कट्टा झकास झाला होता. कट्टा संपताना मी चित्रगुप्तांना चिंचवडच्या मोरया गोसावी समाधी मंदिर आणि सुमारे तीनशे वर्ष जुन्या अशा मंगलमूर्ती वाड्याबद्दल माहिती सांगितली. माहिती त्यांना खूपच रोचक वाटली. ते म्हणाले "योग जुळून आले तर एखादा दिवस मंगलमूर्ती वाडा पाहायला नक्की येईन" मला या शनिवारी सुट्टी होती त्यामुळे माझी शनिवारची सकाळ मोकळीच होती. आदल्या रात्री चित्रगुप्तांशी संपर्क साधला आणि उद्या जमेल का असा विचारलं…. आणि चित्रगुप्त यांनाही वेळ होता. योग जुळून आले !