काहीच्या काही कविता

लाल करा ओ माझी लाल करा

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
3 May 2018 - 1:48 pm

लाल करा ओ , माझी लाल करा

येता जाता लाल करा

पुसा मला तुम्ही येता जाता

पुसूनि पुरते हाल करा ,

लाल करा ओ लाल करा

येता जाता लाल करा

भजा मज तुम्ही भाई दादा

तुमचाच राहीन , हा पक्का वादा

गॉड बोलुनी बेहाल करा

लाल करा ओ माझी लाल करा

येता जाता लाल करा

समजू नका मज ऐरागैरा

नीट बघून घ्या माझा चेहरा

या गोंडस, लोभस मित्रासाठी

प्रेमाची पखाल करा

लाल करा ओ माझी लाल करा

येता जाता लाल करा

नका कटू कधी बोलत जाऊ

बनेन मग मी शंभू न शाहू

धोरणमांडणीमुक्तकसमाजजीवनमानतंत्रआईस्क्रीमआरोग्यकालवणखरवसपौष्टिक पदार्थमत्स्याहारीmiss you!काहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलमाझी कवितामार्गदर्शनमुक्त कविता

(साहेब असेच) ठोकत राहा

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
2 May 2018 - 1:20 pm

ठोकत राहा

घडत जाईन

बोलत राहा

ऐकत जाईन

येऊन दे मनातले बाहेर सारे

कल्पनेला अनाहूत बळ मिळेल

शब्दपंखानी उडत जाईन

पोहोचेन सत्वर कवींच्या गावा

सुंदर कविता लिहीत जाईन

रांगतोय सध्यातरी असं वाटतेय

हळूहळू तुमच्या जवळ येत जाईन

प्रेमाने प्रेमाला जोडत जाईन

ठोकत राहा असेच

हळूहळू घडत जाईन

शोधत राहा स्वतःमध्ये मला

इथेच पुढे असेन तुमच्यासमोर

जवळ येता जरा , दूर दूर जात राहीन

बनायचंय थंडगार बर्फ़ावानी

माया करा मजवर आपुल्या लेकरावानी

कल्पनेच्या जगात रमतो मी

धोरणमांडणीमुक्तकसमाजजीवनमानआईस्क्रीमऔषधी पाककृतीऔषधोपचाररेखाटनअविश्वसनीयइशाराकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलमाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कविता

बाई पलंगावर बसून होती

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
26 Apr 2018 - 5:16 pm

बाई पलंगावर बसून होती

गुलाबराव मस्त मळत होते

मळता मळता बघत होते

बाईकडं गिधाडावानी

बाई टाकत व्हती ऊसाश्यावर उसासे

कधी येतायत गुलाबराव आणि काढतायत एकदाची पिसे

मळता मळता थाप मारली

राळ उडालेली नाकात बसली

शिंकेवरती शिंक आली

शिंकण्यातच सारी रात गेली

आवाजाने गावाला जाग आली

बाई जाम उखडली

वाहून शिव्यांची लाखोली

चरफडत चोरपावलांनी निघून गेली

रात बी गेली अन बाई बी

थापा मारण्यातच वेळ गेली

{{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}}

समाजआईस्क्रीमओली चटणीअविश्वसनीयआता मला वाटते भितीकाहीच्या काही कवितामाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कविता

एकदा टारझन अंगात आला

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
24 Apr 2018 - 1:09 pm

एकदा टारझन अंगात आला

काढून टाकले कपडे सर्व

पायपुसण्याचा लंगोट केला

अन जंगल प्रवास सुरु झाला

कुणीही ओळखू नये

म्हणून हेल्मेट घातले

बाहेर येताक्षणी घराच्या

भरपूर सारे कुत्रे मागे लागले

वाट मिळेल तिकडे धावत सुटलो

पारंब्या अन वेली शोधू लागलो

नव्हत्या त्या म्हणून गाड्यांवरून

उड्या मारू लागलो

आरोळ्या ठोकून ठोकून घसा सुकला होता

कुत्रांचा झुंड काय पाठ सोडता नव्हता

स्टेमिनापण संपत आला होता

टारझन अंगातून कधीच निघून गेला होता

लंगोट मागे पडून , दिगंबर अवतार सुरु झाला होता

मांडणीविनोदअविश्वसनीयकाहीच्या काही कवितागरम पाण्याचे कुंडचिकनजिलबीमाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कविता

दोन भिकारी भीक मागती, पुलाखाली करिती वस्ती

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
21 Apr 2018 - 7:27 pm

दोन भिकारी भीक मागती

पुलाखाली करिती वस्ती

नेहेमी नेहेमी करुन याचना

भुलवी फसवी पांथस्थांना

एके दिवशी सांज वेळी

अशीच होती रीती झोळी

कोसुनी त्या चंद्रमौळी

करिती याचना भरण्या झोळी

धूर प्रकटला, डोळे दिपले

शिवशंभोने दर्शन दिधले

दोघांसी तीन अंडे दिले

इच्छा धरुनी फोड तयासी

इप्सित मिळेल त्वरित तुम्हांसी

दोघेही ते खुश जाहले

परतीच्या प्रवासा निघाले

दोघांच्याही दोन वेगळ्या वाटा

जाण्यापूर्वी गळाभेटा

वर्षानंतर भेटू पुन्हा आपण

देऊ यथेच्छ एकमेका आलिंगन

धोरणमांडणीअविश्वसनीयइशाराकाहीच्या काही कवितागरम पाण्याचे कुंडछावाजिलबीमाझी कवितामार्गदर्शनमुक्त कवितारतीबाच्या कविता

शीर्षक नाही

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जे न देखे रवी...
21 Apr 2018 - 5:31 pm

कृष्णा करु आता काय
लागे अबलांची हाय
शील प्राण आता जाय
नका करु आता गय दुर्जनांचे

पुन्हा कौरव मातले
कृष्णे करीतसे धावा
देवा आता तरी पावा
ज्योतिलाही तेल आता आसवांचे

पुन्हा देवा घे अवतार
कर पुन्हा चमत्कार
तूच देशी न्याय भार
आण तुला आता आहे रगताचे

कविताकाहीच्या काही कविता

तिच्या कपाळावरचा घामाचा थेम्ब , ओघळून हळुवार हनुवटीपर्यंत आला

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
20 Apr 2018 - 4:24 pm

तिच्या कपाळावरचा घामाचा थेम्ब

ओघळून हळुवार हनुवटीपर्यंत आला

आधीच फिल्डिंग लागली होती

पण कॅच मी केला

कित्येकांनी हाय खाल्ली

बऱ्याच जणांनी माघार घेतली

सर्वांदेखत चाटून पार फस्त केला

गड्या , मी पहिला टप्पा पार केला ॥

दुसऱ्या टप्प्यात दाखल झालो

मैत्रिणींच्या कळपात आलो

दोन फारच जिवलग होत्या, तिच्या

नकळत त्यांचा लाडका भाऊराया झालो

बघता बघता सेमीला गेलो ॥

सेमीत गाठ होती तिच्या क्रूर भावांशी

नीट खेळलो नाही तर जाणार होतो जीवानिशी

एकुलती एक बहीण होती त्यांची

मांडणीकविता माझीकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलमुक्त कवितारतीबाच्या कविता

सलमान भाईचे तुरुंगातील गाणे

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जे न देखे रवी...
6 Apr 2018 - 6:44 am

(सलमान भाई चे तुरुंगातील आज रात्रीचे गाणे)

केव्हा तरी पहाटे निसटून निज गेली
सुजले रडून डोळे रडवून रात गेली

कळले मला न केव्हा सुटली गोळी जराशी
कळले मला न तेंव्हा सोडोनी 'साथ' गेली

सांगू तरी कसे मी वय माझें झाले लग्नाचे
उसवून शर्ट माझा फसवून कैफ गेली

उरलें कर्णात काही ते नाद का ळविटाचे
आवाज काजव्याचे, डसून डांस गेली

दिसल्या मला न तेंव्हा माझ्याच दंत पंक्ति
मग आस जामीनाची सूचवून रात गेली

विडंबनकाहीच्या काही कविता

II तिने पेन मागितलं, मी हात दिला II

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
3 Apr 2018 - 6:20 pm

तिने पेन मागितलं

मी हात दिला

तिने शिवी घातली

मी स्माईल दिली

ती धावून आली

मी मिठीत घेतली

ती शांत झाली

हळूच प्रेमात पडली

आधी मी वेडा होतो

आता ती पण झाली

माझी गांधीगिरी

प्रेमात कामी आली

आता ती हात मागते

मी पेन देतो

मी शिवी घालतो

ती स्माईल देते

मी धावून जातो

ती मिठीत घेते

प्रेम हे असं गड्या

हळूहळू होते

सिद्धेश्वर विलास पाटणकर

कविताकाहीच्या काही कविता

लग्नाआधी लिटमसची चाचणी करून घ्यावी

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
26 Mar 2018 - 2:06 pm

लग्नाआधी लिटमसची चाचणी करून घ्यावी

निर्व्यसनी असाल तर वाईट सवय लावून घ्यावी

व्यसनांनुसार टाकावा एकेक थेम्ब लाळेचा

लिटमस पेपरवरी

जर सामू आला सात

लग्नास नसावी काही बात

त्यामध्ये असेल चढउतार

घ्यावी सरळ माघार , लग्नकार्यातूनी

सवयीनुसार सामूची वर्गवारी

तंबाखू असे तीनवरी

सुपारीसहित तोच बैसे पाचावरी

सोडामिश्रित आठवरी तर

ऑन दि रॉक्स ती दहावरी

देशीसाठी नसे चाचणी

देशी असे जनावरी

लक्षात ठेवा नवरोबानो

अर्धांगिनी पण लिटमस परी

सुटणार नाहीत नाद कुणाचे

धोरणकाहीच्या काही कविता