काहीच्या काही कविता

(फेंदारलेल्या मिशा....)

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
12 Oct 2016 - 9:27 am

अत्यंत सुंदर अर्थवाही रचनेचे विंडंबन करणे जीवावर आले होते,पण नंतर लक्ष्यात आले ही कलाकृती विडंबन नसून चाल तिथून घेऊन केलेली स्वतंत्र वाट्चाल आहे.

दसरा मेळावा होऊन गेल्याने ही कवीता येणे आवश्यक होते.

मूळ कवींनी (राजेंद्र देवी) मोठ्या मनाने माफ करणे.

पाहून स्वप्ने सत्तेची
बोकाळली आहे संराशा
आता कोठे होऊ लागल्यात
पाठवणी जराश्या

का करीशी भणभण
या वखवखलेल्या सत्ताबाजारात
आता कोठे मिळविल्यात
खुर्द्यात चवल्या जराश्या

विनोदमौजमजाअविश्वसनीयआता मला वाटते भितीकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलरतीबाच्या कविताहास्य

कधी तरी पुन्हा आपण भेटायला हवं..

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जे न देखे रवी...
22 Sep 2016 - 6:10 pm

कधी तरी पुन्हा आपण भेटायला हवं..
ओळखीचं हसून बोलायला हवं..

किती ती धूळ गैरसमजांची,
मनाला स्वच्छ झाडायला हवं..

कुठंतरी आत सलतंय का काही?
समजूतीचं मलम तिथं लावायला हवं..

जे झालं ते झालं, ते होणारच होतं
अपराधीपणाचं ओझं फेकायला हवं..

पूलाखालून खूप पाणी वाहून गेलंय
आनंदानं जीवन आता जगायला हवं..

अर्ध्यावर सोडू नये, गोष्ट किंवा नातं
एकदा वेळ काढून ते संपवायला हवं..

प्रेमकाव्यकाहीच्या काही कविता

मी बी बियर बार काढीन म्हणतो : सामान्य मानव

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जे न देखे रवी...
20 Jul 2016 - 11:51 am

हजारांच्या नोटेची चमक पाहीन म्हणतो
मी बी बियर बार काढीन म्हणतो...!!

बियरला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
पिणार्‍यांच्या मनांत
असल्या भूक्कड गोष्टी येतच नाय
मी पण थोडे फार कमवीन म्हणतो
मी बी बियर बार काढीन म्हणतो...!!

पिणार्‍यांना नशा
चढली काय, न चढली काय
पिणार्‍यांना भरपुर रिचवायची सवयच हाय
मी पण थोडे फार कमवीन म्हणतो
मी बी बियर बार काढीन म्हणतो...!!

विडंबनविनोदअविश्वसनीयकाहीच्या काही कविताजिलबीभूछत्रीरतीबाच्या कविता

रे गझलाकारा, आवर तुझे दुकान...

मोदक's picture
मोदक in जे न देखे रवी...
19 Jul 2016 - 1:36 am

गेले काही दिवस सरसकटीकरणाचा तडका आणि अभंग वाचून आमच्या शहरी असंवेदनशील मेंदूच्या झुडुपाला एक कवितेची डहाळी उगवली. ती डहाळी त्याच्यासोबतच्या पालापाचोळ्यासकट येथे चिकटवत आहे... गोड मानून घ्यावी.

***********************

तुमचे शेतकरी नेते, तुमच्याच तोंडास पुसती पाने | दोष सगळे मात्र, असंवेदनशील शहरी लोकांचे |
शेतीतून मंत्र्यास होती, कोटींचा फायदा | तुला नाही वावडे, अशा दांभिकपणाचे |
रे गझलाकारा, आवर तुझे दुकान | गेले ते दिवस, फुकट सहानुभुती मिळवण्याचे ||

नाट्यगझलविनोदअभय-काव्यअभय-गझलअभय-लेखनकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडनागपुरी तडकाभूछत्रीमराठी गझलवाङ्मयशेती

त्याची आठवण,

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
2 Jul 2016 - 10:50 am

त्याची केव्हाही आठवण आली तरी,
सर्वांगावर सरकन् काटा येतो,
डोक्यावरचा केस न केस उभा रहातो,
आणि थंडीच्या दिवसातही दरदरुन घाम फुटतो,

अंधारलेल्या डोळ्या समोर, नाचतात आकृत्या भेसुर,
जिभेला पडते कोरड आणि काना मधून निघतो धुर,
कित्येकांना याने लाचार बनवले, भिकारी बनवले,
याच्या दहशती मूळे कित्येक पापभिरु दूराचारी झाले,

तो आहेच असा भितीदायक,
आता पर्यंत भेटलेला सर्वात मोठा खलनायक,
मी मी म्हणणा-यांची त्याच्या पुढे टरकायची,
नुसत्या आठवणीने कित्येकांची बोलती बंद व्हायची,

धर्मइतिहासप्रेमकाव्यउखाणेसुभाषितेऔषधोपचारकृष्णमुर्तीkelkarprayogअदभूतअविश्वसनीयआगोबाआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडचिकनजिलबीनागद्वारप्रेम कविताभूछत्रीमार्गदर्शनरोमांचकारी.शृंगारकरुण

( एका पावसात सगळ्यानी अडकायचं )

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जे न देखे रवी...
22 Jun 2016 - 11:09 am

काल सकाळी आमची जीवन वाहिनी अडकली आणि आम्ही या गाण्यात कसे अडकलो कळलंच नाही
( चाल: एका पावसात दोघांनी भिजायचं)
----------------------------------------
मध्य पश्चिम हार्बरने जायायच
एका पावसात सर्वानी अडकायचं

तशी दिसेना लोकल केंव्हा पासून
गर्दी जाहली ठाण्याला तेंव्हापासून
आता तिकीट कशाला काढायचं
एका पावसात सर्वानी अडकायचं

वाशी लोकल लागेल स्टेशनाला
तेंव्हा शोधूया जागा शिरायला
हात सोडून तसेच सावरायचं
एका पावसात सर्वानी अडकायचं

समाजकाहीच्या काही कविता

निशाण

म्हसोबा's picture
म्हसोबा in जे न देखे रवी...
29 May 2016 - 10:17 pm

तू मला हसायला शिकवलंस
कधी धड रडलोही नव्हतो त्या आधी मी
तू मला उभं राहायला शिकवलंस
कधी धड पडलोही नव्हतो त्या आधी मी

आठवांचा पूर येतो कधी
या एव्हढ्याशा दोन डोळ्यात माझ्या
कधी वाटते लोटली युगे आता
कधी वाटतात त्याच आठवणी ताज्या

तुझा हात सुटला तो क्षण
कोरला आहे मनावर लेण्यातील शिलालेखासारखा
त्याचीही पडझड होईल कधीतरी
याच आशेवर जगतोय आता मी चातकासारखा

मिटून जातील मग निशाण सारे
तू तर नाहीसच आता इथे, मी ही नसेन तेव्हा
काय होईल याची आता क्षिती कशाला
काळ आपल्या फटकार्‍याने सारे मिटेन हे जेव्हा

रेखाटनकाहीच्या काही कविता

हिरवीन

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
24 May 2016 - 12:53 pm

आमचे एक मिपाकर परममित्र आणी त्यांच्या हिरवीनीला समर्पित! :)
______________________________________________

अरे हटाव बाजू, हिमालया
आन फेअर ॲन्ड लवलीच्या
कापूसभरल्या भावल्यांना
    तूच माझी खरी हिरवीन ग!
    एकच बावनकशी ब्युटी ग!

झालो तर्राट आन लैच्च सैराट
खुळा झालोय, सकाळ संध्याकाळ
लोकं बघणार कायबाय बोलणार,
    तरीबी, तुझच ध्यान काढीत बसणार ग!
    आता ही येवढीच माझी ड्युटी ग!

कविताप्रेमकाव्यमुक्तकमौजमजाअविश्वसनीयकविता माझीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडप्रेम कविताफ्री स्टाइलभावकविताभूछत्रीमुक्त कविताशांतरस

<मी टाकलेल्या एकूण (धागा)पिंका>

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
21 May 2016 - 9:37 am

मी टाकलेल्या एकूण (धागा)पिंका
एकोणवीस
शोधण्यात खूप वेळ जातो

काथ्याकुटात एक धागा हुकला आहे
त्याच्या जरासं खाली
एक किडा वळवळतोय
दुर्लक्षण्यात खूप वेळ जातो

टंकाळा आल्यावर मी
एखादा प्रतिसाद लिहायला घेतो
अर्थ?
समजण्यात खूप वेळ जातो

तोल सुटलाय मिपावरचाही
रोज उठून कोण साव्ररणार त्याला?
सल्ला,
मागण्यातही तूचभेळ खातो

मुक्तकविडंबनऔषधोपचारराशीमौजमजाdive aagareggsअनर्थशास्त्रकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीजिलबीफ्री स्टाइलहास्यअद्भुतरस

गेले मोदी कुणीकडे

anilchembur's picture
anilchembur in जे न देखे रवी...
17 May 2016 - 11:54 pm

स्वप्नांचा पाऊस पडे सारखा
महागाईलाही पूर चढे
विमान उडवीत चहूकडे
गं बाई .... गेले मोदी कुणीकडे

शिक्षण खोटे पदवी खोटी
मंत्रीणबाई तुळशी झाली
केजरीवालची पडता बिजली
दचकून तीचा ऊर उडे
गं बाई .... गेले मोदी कुणीकडे

पैसा काळा आणू म्हणुनी
ठोकूनी भाषण दाही दिशांनी
चाय - गाय पे चर्चा करूनी
मनकी बाता देश बुडे ,
गं बाई ...... गेले मोदी कुणीकडे

चीनमध्ये झोपाळ्यावरुनी
दाढीवाले बिंब बघूनी
हसता संघ भगव्या रानी
धर्म अफूचे ऊन पडे
गं बाई .... गेले मोदी कुणीकडे..

= = = = = = = = =

संस्कृतीसंगीतइतिहासमुक्तकविनोदसमाजvidambanइशाराकविता माझीकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलबालसाहित्यभावकवितामुक्त कवितारोमांचकारी.हास्य