बायको

बाप्पू's picture
बाप्पू in जनातलं, मनातलं
26 May 2019 - 12:14 pm

आजकाल गावाकडे कित्येक मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे दुरापास्त झाले आहे. कित्येक मध्यम वर्गीय मुले विशेषतः शेतकरी कुटुंबातील मुले चाळीशी ओलांडली तरी अजुन मुलगी न मिळाल्याने अविवाहित आहेत. हि समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अगदी प्रत्येक गावात नसले तरी ज्या ज्या गावात मी फिरलो त्यापैकी 90% गावात अश्या कितीतरी स्टोरीज सापडल्या. काही प्रसंग अत्यंत गमतीशीर होते तर काही अत्यंत वेदनादायक.. पण दिवसेंदिवस अश्या ह्या "सिंगल" मुलांची संख्या वाढतच चाललीये.. त्यावरच प्रकाश टाकणारी हि छोटीशी कविता..

आस्सं कस्सं झालं भाऊ
काही समजत नही
डोक्याचा झाला भुगा
पन उमजत नही

शेतीबाडी बैलगाडी
पैसा कमी नाही
चाळिशीचा झालास तरी तुला
बायको मिळत नाही

सर्वांना हवी नोकरी,
गाडी, बंगला आणि आरामाची भाकरी,
यांच्या अपेक्षा तरी किती,
इकडे मात्र बिन लग्नाचे राहण्याची भीती..

याचे शाळेतले प्रेम, डॉकटर, इंजिनियर ने नेले
कॉलेज मधले सेटिंग, दुसऱ्याबरोबर पळून गेले
हातात राहिला फक्त तिचा फोटो
त्याच फोटोचा हा झोपताना मुका घेतो.

आता तर एजंट हि सुटले मोकाट..
पन्नास हजारात देतात मुलीचा हात,
असे हे किती दिवस चालणार
दुष्काळी भागातील मुली, अजुन किती जणांना पुरणार?

गावाकडं येऊन बघ भाऊ
किती चाळिशीतले नवरदेव तुला दावू.
चिंता त्यांनी कोणापाशी सांगावी?
दहापैकी पाच पोरे होतील गोसावी

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

28 May 2019 - 9:52 am | ज्योति अळवणी

आपली कविता वाचल्यानंतर अशाच एका गावातल्या एका पन्नाशीतल्या आईचं मन कदाचित असं म्हणेल

केवळ नोकरी, घर, बंगला,
इंजिनियर-डॉक्टर नवरा
सुख आराम देणारं घर
असं नसतं माझ्या मनात...

मेहेनतीन राहीन...
नवऱ्याच्या बरोबरीनं राबिन
घेतलेल्या शिक्षणाचा मान ठेवून
ना धोका देईन... ना पळून जाईन...

म्हणाली असती माझी लेक
जर जन्मली असती या जगात
मारली तिला तिच्या वडिलांनी
आजी-आजोबा आणि इतरांनी

मन माझं टाहो फोडत होतं
लेकाकडे बघून म्हणत होतं
तुला बहीण जरी नाही मिळाली
पत्नी मात्र जरूर मिळुदे... बहिणीच्याच वयाची!

ज्योति अळवणी's picture

28 May 2019 - 9:53 am | ज्योति अळवणी

आपली कविता वाचल्यानंतर अशाच एका गावातल्या एका पन्नाशीतल्या आईचं मन कदाचित असं म्हणेल

केवळ नोकरी, घर, बंगला,
इंजिनियर-डॉक्टर नवरा
सुख आराम देणारं घर
असं नसतं माझ्या मनात...

मेहेनतीन राहीन...
नवऱ्याच्या बरोबरीनं राबिन
घेतलेल्या शिक्षणाचा मान ठेवून
ना धोका देईन... ना पळून जाईन...

म्हणाली असती माझी लेक
जर जन्मली असती या जगात
मारली तिला तिच्या वडिलांनी
आजी-आजोबा आणि इतरांनी

मन माझं टाहो फोडत होतं
लेकाकडे बघून म्हणत होतं
तुला बहीण जरी नाही मिळाली
पत्नी मात्र जरूर मिळुदे... बहिणीच्याच वयाची!

जालिम लोशन's picture

28 May 2019 - 11:55 am | जालिम लोशन

+1