सलामी
अगं, कसली तुझी ती स्वप्नांची गाठोडी,
कसल्या तुझ्या त्या शब्दबंबाळ राती,
कसली तुझी ती आठवणींची नाती,
मी कधीच पाचोळ्यात भिरकावली होती.
नुकत्याच वाहुन गेलेल्या तपाला,
ही एक माजुरडी सलामी होती.
मी उदास होतो, हताश होतो,
निष्प्रभ प्रांगणात ,
माझे दु:ख उगाळून घेतो.
तुझ्या डोळ्यांतील चांदणे,
मी टिपांत गाळून टाकतो.
चाललेल्या या विषण्ण तपाला,
ही एक टोचरी सलामी देतो.