सलामी
अगं, कसली तुझी ती स्वप्नांची गाठोडी,
कसल्या तुझ्या त्या शब्दबंबाळ राती,
कसली तुझी ती आठवणींची नाती,
मी कधीच पाचोळ्यात भिरकावली होती.
नुकत्याच वाहुन गेलेल्या तपाला,
ही एक माजुरडी सलामी होती.
मी उदास होतो, हताश होतो,
निष्प्रभ प्रांगणात ,
माझे दु:ख उगाळून घेतो.
तुझ्या डोळ्यांतील चांदणे,
मी टिपांत गाळून टाकतो.
चाललेल्या या विषण्ण तपाला,
ही एक टोचरी सलामी देतो.
तुझ्या स्वप्नांचे शिंतोडे,
घरादारात हुंदडत राहो.
तुझ्या अल्लड रातींची पाखरे,
आभाळभर उडत राहो.
तुझ्या वैराग्याच्या खपल्या,
रानोमाळी झरून जावो.
येणाऱ्या आव्हानी तपांना,
ही सलामी जिव्हारी जावो.
वेल, वेल, वेल! भारी आहे ही
धन्यवाद स्वॅप्स...!! :)
मस्तच
थैक्स...!
आवडली कविता. :)
नोप्स, राग कशाला मानू हो..!
वाह !
मिपाकरानी