लोकभ्रम- गूढचिकित्सामंडळ
मला माझ्या ज्योतिषछंद जोपासताना एक वाईट सवय आहे. एखाद्या संदर्भ वा माहिती साठी त्याच्या मागे हात धूवुन लागण्याची. तसे ही अनुत्तरीत प्रश्न मला अस्वस्थ करतात त्यामुळॆ मी त्या प्रश्नांच्या मागे लागतो. . तेव्हा मी मुंबईला नोकरीला होतो. मी पॅंटच्या मागच्या खिशात एक छोटी डायरी ठेवत असे. त्यात मी माहिती, संदर्भ असे संकीर्ण टिप्पण ठेवत असे.ग्रंथालयात गेलो वा एखाद्या भाषणाला गेलो व तिथे काही दुर्मिळ माहिती मिळाली की मी ती डायरीत लिहित असे. अगदी आता आता पर्यंत ती सवय होती. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात जुने ग्रंथ चाळताना एकदा मला रा.ज.