सासुरवाशीण
झालेय आता सासुरवाशीण तरी आई तुझ्याकडे यायचंय
आई तुझ्याकडे यायचंय , मला परत लहान व्हायचंय
नाही सहन होत ग आता जबाबदारीच ओझ
तुझ्या कुशीत शिरून मला खूप खूप रडायचंय
नाही इथे कुणालाच माझ ऐकायचंय
मनात साठलेलं तुलाच फक्त सांगायचंय
पुन्हा तुझी आळशी मुलगी मला बनायचंय
पुन्हा मला उशिरा पर्यंत लोळायचय
तुझ्या हातच गरमगरम जेवायचंय
इथे कुणाला माहीतही नाही मला काय आवडत,
सासुरवाशिणी साठी नसतो हा नियम जाणलंय मी
तरीही आई मला तुझ्याकडे यायचंय
मला तुझ्याकडे यायचंय आई, मला पुन्हा लहान व्हायचंय .
होईल का ग हे शक्य नाही ना !!!!
