मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एका रेषेत सहा ग्रह?

मार्गी ·

कंजूस Sat, 02/28/2026 - 12:03
माझा आवडता छंद होता तो आता सोडावा लागला. आकाश पाहायचं कुठून हा मोठा प्रश्न पडला आहे. जवळच्या आणि चांगल्या जागांवरही लखलखाट झाला आहे. तुम्ही कुठून पाहता?

सागर Sat, 03/07/2026 - 02:36
आकाशात सध्या काही स्पष्ट दिसणार्‍या ग्रहांसोबत पूर्ण चन्द्राचे देखील दर्शन होळी पौर्णिमेच्या (दुसर्‍या दिवशी) जास्त छान झाले.

मार्गी Sat, 03/07/2026 - 11:33
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! @ कंजूस जी, शहरापासून ४०-५० किमी लांब गेल्यावर मिळतं चांगलं आकाश. पुण्याच्या बाहेर असलेल्या फार्म हाऊसेसवरून किंवा कधी अशा इतर ठिकाणी गेल्यावर दिसतं. क्वचित शहरातूनही स्वच्छ आकाश असतं. @सागर जी, हो! ग्रहणही दिसलं थोडा वेळ.

लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ "प्लॅनेट परेडची" सत्य स्थिती ✪ आत्ताचे ग्रह कसे व कुठे बघता येतील? ✪ सूर्य मावळल्यानंतर तेजस्वी शुक्र दिसेल ✪ शुक्र, शनि व तेजस्वी गुरू हे तीन ग्रह सहजपणे बघता येतील ✪ पुढचे दोन- तीन दिवस नितांत स्वच्छ आकाश ✪ नितळ निळा रंग- आकाशाचा रंग निळा का असतो? ✪ ३ मार्चला चंद्रग्रहण- पण चंद्र उगवताना ग्रहण संपत असेल ✪ पायथागोरसचे प्रमेय आणि तमिळ गणितज्ञाचं निरीक्षण नमस्कार. गेले काही दिवस एका रेषेत सगळे ग्रह येणार अर्थात् "प्लॅनेट परेड" होणार अशा पोस्टस आल्या आहेत. ग्रहांची सद्यस्थिती कशी आहे व कुठले ग्रह कसे बघता येतील त्याबद्दल बोलण्याआधी थोडा विचार करूया.

मंगळावरील मुरुमातील मुंग्यांचा मुरांबा.

गवि ·

कंजूस Fri, 01/16/2026 - 17:36
डोकेबाज पाककला. शुक्रावरील शेवाळाची उसळ*>> घावणे म्हणायचे आहे का? शुक्र ढगांत हरवलेला असतो.

युयुत्सु Fri, 01/16/2026 - 17:44
अनेक वर्षांपूर्वी पुण्यात य० गो० जोशी 'प्रसाद' नावाचे मासिक चालवत असत. त्यात एकदा "फोलकटांचा चिवडा" अशी पाकृ प्रसिद्ध झाली होती आणि बरीच गाजली होती. तसंच पंचतत्रातला एक श्लोक याच धर्तीवर आहे - यस्य कस्य तरोर्मूलं येनकेनापि मर्दितं| यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति|| तातपर्य- वेदांत (वि० अ थर्व वेदात अशा पाकृ भरपूर सापडायची शक्यता आहे)

In reply to by टर्मीनेटर

गवि Fri, 01/16/2026 - 17:58
हा हा हा... पण तिथल्या थंडीत ती लगेच गार होते. "गुरु"वरच्या गुळवेलीचा गुळांबा टाकायचे मनात होते. पण त्यामुळे जायंट ग्यास होतो म्हणतात. म्हणून तेही टाळले.

**मंगळावरील मुरुमातील मुंग्यांचा मुरांबा : एक प्राचीन-आधुनिक-वैज्ञानिक पाककृती** --- कालच घरच्या मागच्या अगण्णात मुंग्यांची रांगा दिसली आणि मन भूतकाळात गेल. माझ्या लहानपणी आमच्या गावी लाल मुंग्यांची दिसत असत. आमची आत्या त्या मुंग्यांची चविष्ट चटणी बनवत असे. मी विचार केला की आपण मानवजातीच्या विकासासाठी भविष्यकालात इतर ग्रहांवर देखिल खाता येऊ असा मुरंबा का बनवू नये.

गडद अंधार, धुमकेतू आणि तारेच तारे

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ लेमन धुमकेतूचं दर्शन- अविस्मरणीय अनुभव ✪ आकाशगंगेचं पिठुर चांदणं आणि देवयानी आकाशगंगेचा झगमगाट ✪ सौर डाग बघताना सूर्यावरून जाताना दिसलेलं विमान! ✪ डोंगराआडून वर येणारे तारे ✪ जणू विमानाने केलेला कृत्रिम उपग्रहाचा पाठलाग ✪ निबीड अंधारात जणू सावली पाडू शकेल इतकं चमकणारं तेजस्वी ISS ✪ विशेष धुमकेतू आणि उल्का वर्षाव सत्राचं १४- १५ नोव्हेंबरला आयोजन तुम्ही अशा ठिकाणी आहात जिथे कोणत्याच दिव्याचा प्रकाश येत नाही. आणि हळु हळु रात्र होते आहे. सूर्य मावळून गेला आहे. संधीप्रकाश कमी होतोय. दूरवर दिसणारा तिकोना आणि इतर डोंगर हळु हळु फिकट होत आहेत. अगदी डोंगराच्या मधोमध असलेली ही जागा.

गूढ उपरे पाहुणे

निनाद ·

In reply to by सुधीर कांदळकर

निनाद गुरुवार, 09/18/2025 - 10:26
सध्या आपल्या सूर्यमालेत सध्या एका मागून एक असामान्य घटना घडत आहे. आपल्याकडे दोन आंतर तारकीय वस्तू किंवा धूमकेतू आहेत. हे पूर्णपणे वेगवेगळ्या दिशांतून आले आहेत. दोन्ही जवळपास एकाच वेळी आपल्या सूर्याच्या जवळून जात आहेत. यापैकी एक, 3I Atlas आपण आधी या लेखात उल्लेख केलेली पाहिली आहे, पण आता तिच्यापेक्षा १०० पट मोठी आणि तेजस्वी 'C/2022 R2 Swan' ही नवीन वस्तू किंवा धूमकेतू अचानक दिसला आहे. ११ सप्टेंबर २०२५ रोजी, 'SWAN' उपकरणाच्या प्रतिमांमध्ये 'C/2025R2' नावाचा एक धूमकेतू दिसला. हा तेजस्वी धूमकेतू हौशी खगोलशास्त्रज्ञही पाहू शकतात. याला 'Swan R2' असे नाव दिले आहे. सगळ्यात चमत्कारिक गोष्ट ही आहे की, दोन्ही गोष्टी ऑक्टोबर २०२५ मध्ये सूर्यावर एकत्र येणार आहेत. अ‍ॅटलस २९ ऑक्टोबरला सूर्याच्या सर्वात जवळ जाईल, तर स्वान आर २ चा प्रवास २१ ऑक्टोबरला पृथ्वीच्या सर्वात जवळून होईल. दोन्ही धूमकेतू(?) पृथ्वीवरून बरोब्बर पाहता येणार नाहीयेत असे म्हणतात. स्वान आर २ आपल्या सूर्याला भेट देण्यासाठी दर २२,५५४ वर्षांनी परत येत असतो असा अंदाज आहे.

अनन्त्_यात्री Tue, 09/16/2025 - 14:26
ओउ मुआमुआ यांस. स न वि वि: A shape unseen, from suns unknown, You tumbled through our lonely zone. A visitor, a fleeting guest, On cosmic currents, you were pressed. Did you carry sights of distant stars? Of worlds that know no earthly scars? Of physics bent and skies unknown, A different gravity, a different tone? We chart your path, our senses strain, A rocky form, a metallic stain. Or something more, a coded thought? A message that our planet sought? You break the mould, a mystery, A question mark in history. A sign that we are not alone, On this small, spinning, pale blue home. Your journey, an unfinished tale, Beyond our grasp, beyond the veil. We send this poem, a fragile plea, From a small Earth, to you, far free.

गामा पैलवान Sat, 09/20/2025 - 19:17
चंद्रही असाच बाहेरून आलेला गोळा आहे. तो एका विशिष्ट आकारात बनवलेला आहे. त्याची कक्षा जवळपास वर्तुळाकार आहे. इतर ग्रहांची असते तशी लंबवर्तुळाकार नाही. यावरून चंद्रास यान मानावं का? -गा.पै.

मार्गी Sun, 09/21/2025 - 11:43
खूप छान लिहीलंय! खरं आहे. आपल्याला वाटतं विज्ञानाला सगळं कळतं. पण खरं विज्ञान तर आपल्याला नतमस्तक करतं. आपण किती छोटे, किती नगण्य आहोत, ही जाणीव करून देतं. खूप गूढ गोष्टी आहेत ह्या. लेखात मांडलेल्या शक्यतांशी सहमत.

गेल्या काही वर्षांपासून खगोलात काही नाविन्यपूर्ण घटना घडत आहेत. म्हणजे आपल्या सूर्यमालेत बाहेरून येणाऱ्या काही वस्तू. २०१७ पासून, आपल्याला फक्त तीनच अशा वस्तू माहीत झाल्या आहेत ज्या दूर अंतराळातून आपल्या सूर्यमालेत आल्या आहेत. पहिली होती ओउ मुआमुआ एक विचित्र, लांबट वस्तू, (धूमकेतू नव्हता कारण शेपूट नव्हती) जिचे स्वरूप समजून घेणे खगोलशास्त्रज्ञांसाठी एक मोठं आव्हान होतं. दुसरी वस्तू 'बोरिसोव्ह' होती, जी एका सामान्य धूमकेतूसारखीच होती. आणि सर्वात नवीन, ३ आय/अ‍ॅटलस '3I/ATLAS', एक मोठा आणि वेगळा धूमकेतू आहे.

आकाशात तार्‍याचा स्फोट- ल्युपस तारकासमूहामध्ये सुपरनोव्हा

मार्गी ·

सुधीर कांदळकर Tue, 06/24/2025 - 13:31
वा! असामान्य घटना. जवळजवळ ९७१ वर्षांनंतर अशा घटनेची नोंद होते आहे. हा तारकासमूह सुमारे ४६०प्रकाशवर्षें दूर आहे हे ध्यानात घेतले तर सुमारे १५६५ साली घडलेले आतां दिसते आहे असे म्हणता येईल. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता नवनवीन माहिती उजेडात येईल. उदा. लोह या धातूपेक्षा जास्त अणुक्रमांक असलेली मूलद्रव्ये कां व कशी तयार होतात हे कळले तर जाणून घ्यायला मजा येईल. ध्यानीमनी नसलेली आणखी काही माहितीही उजेडात येईल. बहुमोल माहितीबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

मार्गी Tue, 06/24/2025 - 17:55
@ सुधीर कांदळकर सर, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! पण पंधराव्या शतकातही शर्मिष्ठा तारकासमूहात ठळक सुपरनोव्हा बघितला गेला होता. आणि नंतरही छोटे- मोठे दिसतातच. आणि तारकासमूहाचं अंतर जरी ४६० प्रकाशवर्षं असलं तरी "त्या तार्‍याचं" अंतर तेच असेल असंही नाही. संशोधनाच्या संदर्भात असं म्हणतात की, जे जड मूलद्रव्य आहेत, ते तारकास्फोटातून बाहेर येतात.

In reply to by कंजूस

मार्गी Sat, 06/28/2025 - 18:57
पुण्यातून आणि कधी कधी बाहेरच्या प्रकाश प्रदूषण नसलेल्या लांबच्या गावांमधून. जिथे निरभ्र आकाश असेल तिथे बायनॅक्युलरने हा सुपरनोव्हा दिसू शकेल. आणि खूपच जास्त अंधारं आकाश असेल, तिथे अगदी रेअर स्थितीमध्ये नुसत्या डोळ्यांनी दिसू शकेल.

स्फोटामुळे 50 लाख पट तेजस्वी झालेला तारा डोळ्यांनी दिसू शकेल सुपरनोव्हा (अति नवतारा) म्हणजे तार्‍याचा स्फोट होण्याची स्थिती. तार्‍यांच्या जीवनक्रमामध्ये शेवट होण्याची एक शक्यता असा स्फोट ही असते. तार्‍यांचं युगुल (पेअर) असेल व एक तारा खुजा (ड्वार्फ) असेल किंवा तार्‍याचं वस्तुमान जास्त असेल तर असा स्फोट होतो. स्फोट झालेला तारा दक्षिणेकडच्या वृक म्हणजे ल्युपस (Lupus) तारकासमूहातला +22.3 प्रतीचा तारा होता. त्याचा स्फोट झाल्याचं 12 जूनला लक्षात आलं.

सृष्टीआड दृष्टी

कुमार जावडेकर ·
एक मुलाखत: “नमस्कार जयंतराव. सुरुवातीलाच मला सांगावंसं वाटतं की आपण फार मोठे खगोलशास्त्रज्ञ आहात! ... आणि अकलेचे तारे तोडणं या शिवाय माझा आकाशाशी संबंध आलेला नाहीये. तसं पाहता, शाळा सोडल्यापासून, विज्ञान या विषयाचा मला राग येत नाही. विज्ञान-वादी असणं म्हणजे काय ते बहुधा कळतं; पण मी विज्ञान-संवादी नाही. त्यामुळे ही मुलाखत घेणं मला जरा अवघडच वाटतं आहे.” पु. लं. नी सुरुवात केली. “पु. ल., तुम्ही विनोदी लेखक आहात. मी विज्ञान अभ्यासक आहे. पण मला वाटतं आपल्या विचारांचा ‘वि’ हा या दोन्हींतला समान घटक आहे.” जयंत नारळीकर म्हणाले. “हा आपला विनय आहे.

50 दिवसांसाठी 50 गमती आणि प्रयोग!

मार्गी ·

मार्गी Tue, 05/06/2025 - 18:03
मागच्या दिवसांमध्ये पोस्ट केलेले काही प्रयोग व गमती: माठ कशामुळे गार होतो? खेळाच्या मैदानात तुमची पाण्याची बाटली गार कशी ठेवणार? तेच पाणी, पण वेगळा अनुभव पंखा कसा काम करतो? सायकल हळु चालवण्यातली गंमत ओल्या पृष्ठभागावरून घसरणे! आडवा होणारा हात सांडणारं पाणी सगळे प्रयोग व गमती इथे वाचता येतील. धन्यवाद.

मार्गी Fri, 05/09/2025 - 20:30
प्रयोग 9. पाण्यावर वस्तु का तरंगतात? पाण्यावर वस्तु का तरंगतात ह्यावर तुम्ही कधी विचार केला आहे का? एक सोपी गोष्ट करू. कागदाची एक छोटी नाव बनवू व ती बादलीभर पाण्यात सोडू. तरणशक्ती किंवा प्लावकता (buoyancy/ upthrust) ह्या गुणधर्मामुळे वस्तु तरंगतात. तरणशक्ती हे त्या द्रवाचं बल असतं जे त्यावर पूर्णत: किंवा अंशत: बुडालेल्या वस्तुच्या वजनाला विरोध करतं. वस्तुचा तरंगण्याचा गुणधर्म ते दर्शवतं. जेव्हा लाकडासारखी एखादी गोष्ट पाण्यावर तरंगते, तेव्हा लाकूड हे समान वजनाच्या पाण्याच्या तुलनेत कमी पाण्याचे विस्थापन करत असते (कारण त्याची घनता पाण्याहून कमी असते). जी वस्तु पाण्याच्या वजनापेक्षा कमी वजनाला विस्थापित करते, ती तरंगते. विचार करा- आपण जमिनीवर उभे राहू शकतो, कारण आपण आपल्या वजनाच्या जमिनीला फार कमी प्रमाणात विस्थापित करतो. परंतु कल्पना करा की, एकदम एखादी मोठी इमारत जमिनीवर उभी राहिली, तर तिच्यामुळे समान वजनाच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात विस्थापन होईल व त्यामुळे इमारत जमिनीवर उभी राहू शकणार नाही तर आत जाईल. गंमत 9. तुमच्या होडीचे प्रवासी! आता तुमच्याकडे पाण्यावर तरंगणारी छोटी नाव आहे. ती तरंगू शकेल अशा प्रकारे तुम्ही त्यात काय काय ठेवू शकता? एखादं छोटं रबरबँड? एखादं छोटं इरेझर ती नेऊ शकेल? किंवा छोटं चॉकलेट? आणि समजा एखादं सॉफ्ट टॉय पाण्यावर तरंगत ठेवायचं असेल तर किती मोठी नाव लागेल? विचार करा! प्रयत्न करा! आणि अशा स्टीलच्या तीन वस्तु सांगा ज्या पाण्यावर तरंगतात! होय! सगळे प्रयोग व गमती इथे वाचता येतील. - निरंजन वेलणकर

मार्गी Sat, 05/17/2025 - 11:12
50 दिवसांसाठी 50 गमती आणि प्रयोग! नमस्कार. आजपर्यंत 17 प्रयोग व 17 गमती पोस्ट केल्या आहेत. गेल्या काही दिवसांमधले प्रयोग व गमती अशा आहेत: ज्योत किती‌ वेळ चालेल? ऑक्सीजन आपल्यासाठीही आवश्यक असतो! पत्त्यांसोबत खेळण्याची वेगळी पद्धत! तुम्ही हे चॅलेंज घ्याल का? चमचा कसा तरंगेल? तरंगणारे फळ व भाज्या पाणी इकडून तिकडे नेणे! तुमच्या मित्रांची नावे वापरून शब्दकोडं बनवा! रंगांसोबत शिकूया! स्ट्रॉ व छोट्या नळीचा वापर तरंगणारा बटाटा! सोबत महत्त्वाची! बटाट्याचे लांब जाणारे कोंब बेशिस्त अक्षरे! इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.

मार्गी Sat, 05/24/2025 - 18:56
नमस्कार. आजपर्यंत 24 प्रयोग व 24 गमती पोस्ट केल्या आहेत. मला त्या पोस्ट करतानाच खूप मजा येते आहे. इतके ते प्रयोग व गमती इंटरेस्टिंग आहेत. काही उदाहरणं- प्रयोग 21. आपोआप फुटणारे फुगे आपण फुग्यांसोबत थोडं खेळूया. त्यासाठी एक ट्रिक करूया. एक संत्र किंवा लिंबू घ्या. त्याची साल कापा व सालीवर दाब देऊन त्यातल्या द्रवाचे थोडे थेंब गोळा करा. हे थेंब फार महत्त्वाचे आहेत. जेव्हा तुम्ही असा एक थेंब फुग्यावर सोडता, तेव्हा लगेचच फुगा फुटतो. तुम्हांला बोटसुद्धा ठेवावं लागत नाही किंवा जोर द्यावा लागत नाही! फक्त त्या द्रवाचा एक थेंब फुग्यावर सोडा, बस्स! मित्रांसोबत हे करा व हात न लावता फुगे फोडण्याची तुमची ट्रिक त्यांना दाखवा! पण हे का होतं? हे होण्याचं कारण म्हणजे त्या द्रवामध्ये फुग्याचं रबर लगेचच विरघळतं व फुग्यामध्ये एक बारीक छिद्र तयार होतं व तो फुटतो! प्रयत्न करा, हे करा व इतरांनाही दाखवा! आणि स्पर्श न करता फुगा फोडण्याचे इतर कोणते मार्ग आहेत का, ह्यावरही विचार करा. गंमत 19. एकाच भाषेत बोलायचं एक मिनिट एकाच भाषेत बोलायचं. हे वाटतं तितकं सोपं नाहीय. कोणतीही भाषा घेऊन प्रयत्न करून पाहा. एक मिनिट म्हणजे 60 सेकंद. फक्त एक भाषा. एकही शब्द दुस-या भाषेचा आला नाही पाहिजे! सोपं वाटतंय? करून पाहा. हवं तर मित्रांसोबत हा खेळ खेळा. एक जण बोलेल व इतर जण तपासतील! हा एक खेळ होऊ शकतो. जितके शब्द दुस-या भाषेतले बोलाल ते नोट करा! सगळ्यांत कमी जो असे शब्द वापरेल तो जिंकेल! बघा, मीसुद्धा दुस-या भाषेतले किती शब्द लिहीलेत इथे! इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.

मार्गी Sun, 06/01/2025 - 16:51
नमस्कार. आजपर्यंत 32 प्रयोग व 32 गमती पोस्ट केल्या आहेत. गेल्या काही दिवसांमधले प्रयोग व गमती अशा आहेत: तरंगणारी पेन्सिल  दृष्टी भ्रम (Eye- illusions)! ओढलं जाणारं पाणी विजेच्या मदतीने आवाजाचा वेग मोजा! चंद्राच्या कला तयार करा ग्रहांच्या कला अंधार व प्रकाशाचा खेळ बटाट्यात आरपार जाणारा स्ट्रॉ स्ट्रॉ, कागद आणि पुठ्ठा  तीन काड्यांचं संतुलन सी- सॉ मागचं विज्ञान वाहणारं आणि थांबणारं पाणी सगळ्यांनी मिळून सांगायची गोष्ट चुंबक तयार करा खेचले जाणारे केस इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील. - निरंजन वेलणकर (आकाश दर्शन, ध्यान, फिटनेस व फन- लर्न)

मार्गी Mon, 06/09/2025 - 17:58
नमस्कार. आजपर्यंत 40 प्रयोग व 40 गमती पोस्ट केल्या आहेत. आजचं अपडेट-  प्रयोग 40. तुमचे होकायंत्र (कंपास) बनवा!   तुम्हांला होकायंत्र माहिती आहे का? होकायंत्र म्हणजे कंपास. तो नाही जो तुम्ही शाळेत नेता. कंपास किंवा होकायंत्र म्हणजे असं यंत्र जे उत्तर व दक्षिण दिशा दाखवतं. तुम्ही दूर कुठे असताना म्हणजे डोंगरात फिरत असाल किंवा समुद्रात जहाजामधून जात असाल तेव्हा दिशा निश्चित करण्यासाठी व रस्ता शोधण्यासाठी ते उपयोगी असतं. आपण एक होकायंत्र बनवूया! त्यासाठी तुम्हांला एक मोठं चुंबक, एक छोटी सुई व रबराचा किंवा थर्मोकॉलचा तुकडा लागेल (अशी हलकी वस्तु जी सहजपणे पाण्यावर तरंगते). एक ताटली घ्या. तिच्यात पाणी ओता. पाण्यात रबर किंवा थर्मोकॉल टाका. ते तरंगेल.  गरज असेल तर कोणाची मदत घेऊन ताटलीच्या बाजूला उत्तर व दक्षिण दिशांची खूण करा. उत्तरेला उ किंवा N आणि दक्षिणेला द किंवा S लिहा. आता सुईला चुंबकावर एकाच दिशेमध्ये 50 ते 60 वेळेस घासा. त्यासाठी 2 मिनिटे लागतील. पूर्ण सुई एकाच दिशेने घासा. त्यामुळे सुईमध्ये तात्पुरते चुंबकत्व तयार होईल. आता चुंबक झालेली सुई रबरावर किंवा थर्मोकॉलवर ठेवा. ती‌ थोडा वेळ हलेक आणि मग एकाच स्थितीमध्ये स्थिर होईल. सुईचा दक्षिण ध्रुव पृथ्वी नावाच्या विशाल चुंबकाच्या उत्तर ध्रुवाकडे आकर्षित होईल! तुम्ही तिला हलवलं तरी ती परत उत्तर- दक्षिण अशीच स्थिर होईल. सुईचं चुंबकत्व टिकेपर्यंत हे राहील. इथे तुम्ही पाण्याचा एक माध्यम म्हणून व रबराचा एक पाया म्हणून कसा वापर केला, ह्याचंही निरीक्षण करा! गंमत 40. संगत का असर! वरच्या प्रयोगामध्ये सुईला चुंबकत्व मिळालं, कारण ती काही वेळ चुंबकाच्या सोबत राहिली. त्यामुळे सोबत म्हणजे कंपनी महत्त्वाची असते. चांगली सोबत- अच्छी संगत नेहमी उपयोगी असते! काही रोग हे संसर्गजन्य (contagious) असतात, हे तुम्हांला माहिती आहे. पण आरोग्य किंवा गुणसुद्धा तसेच असतात व ते संगतीने वाढतात. हे लक्षात ठेवा. आता आपण ह्याचा संबंध आकाशातल्या ता-यांशी जोडू. आपण ता-यांना एकमेकांच्या सोबतीने ओळखू शकतो. म्हणजे सोबत असलेले तारे व ता-यांच्या ग्रूपनुसार त्यांना ओळखू शकतो. आपण त्यांचे पॅटर्न्स किंवा आकारही लक्षात ठेवू शकतो. आता एक प्रश्न पाहा. तुम्ही रात्री जेव्हा बाहेर असाल- जंगलात किंवा डोंगरात तेव्हा तुम्ही उत्तर दिशा कशी शोधाल? कोणते तारे तुम्हांला त्यासाठी मदत करतील? ह्याचं उत्तर द्या. तुमचे मित्र किंवा मोठ्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. चांगल्या व्यक्तींच्या संगतीमध्ये असणं उपयोगीच पडतं! इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.

मार्गी गुरुवार, 06/19/2025 - 18:06
प्रयोग 50. हवेचा विरोध तुम्ही हे अनुभवलं असेल. जेव्हा आपण एखादी पाण्याची बाटली रिकामी करतो, तेव्हा पाणी हळु हळु बाहेर पडतं व बुडबुडे तयार होतात. हवेच्या विरोधामुळे हे होतं. हवा बाटलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करते व पाण्याला मुक्तपणे पडू देत नाही. आपण एक छोटा प्रयोग करू. पाण्याने पूर्ण भरलेली एक बाटली घ्या. तुमच्या रोपांजवळ जा व बाटली रिकामी करून पाणी द्या. बाटली उलटी केल्यावर हळु हळु ती रिकामी‌ होईल. तुम्ही ह्याचं निरीक्षण केलं असेलच की, ती जर एकदम उलटी केली तर पाणी खूप हळु पडतं. ती जर तिरपी ठेवली तर पाणी तुलनेने लवकर पडतं. आता एक लांब स्ट्रॉ घ्या, तो बाटलीमध्ये टाका व बाटलीच्या झाकणाजवळ त्याचं टोक दुमडून ठेवा. आता हीच कृती परत करा. ह्यावेळी‌ पाणी वेगाने बाहेर पडेल, कारण हवेला बाटलीमध्ये जाण्याचा वेगळा मार्ग आपण दिला आहे. गंमत 50. 1+ 2 + 3 + 4 +….+ 50 =? ही आपली 50 वी गंमत आहे! हे अगदी‌ सोपं गणित आहे. जेव्हा आपण 1 + 2 + 3 + 4 +..... + 50 अशी बेरीज करतो, तेव्हा आपल्याला कोणती संख्या मिळते? नाही, कॅल्क्युलेटर वापरायचा नाही. प्रत्यक्ष बेरीजही करू नका. त्याला वेळ लागेल. ह्या संख्यांचं निरीक्षण करा. 1 ते 50 अशा त्या आहेत. त्या सर्वांची‌ बेरीज. त्या संख्यांच्या तुम्हांला काही जोड्या करता येतात का? उदाहरणार्थ, 1आणि 50, 2 आणि 49, 3 आणि 48, 4 आणि 47 व अशाच इतर? प्रत्येक जोडीचे मूल्य 51 आहे व अशा एकूण 25 जोड्या आहेत. म्हणून उत्तर हे असेल 25 X 51 = 25 X 50 + 25 = 1250 + 25 = 1275. अगदी ह्याच प्रकारे, तुम्ही ही‌ बेरीजही करू शकता- 1 + 2 + 3 + 4.... + 100. इथे, आपल्याला अशा जोड्या मिळातील- 1 आणि 100, 2 आणि 99, 3 आणि 98 व पुढे. प्रत्येक जोडीचे मूल्य 101 आहे व अशा 50 जोड्या. म्हणजे बेरीज ही‌ असेल- 50 X 101 = 50 X 100 + 50 = 5050. आकड्यांसोबत थोडी मैत्री केली की ते किती गमतीदार आहेत हे लक्षात येतं. तर आपले 50 प्रयोग व 50 गमती पूर्ण झाल्या आहेत. सर्वांना happy learning!

नमस्कार! मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यांचा वेळ कसा जाणार ही‌ पालकांची चिंता आहे. मुलांसाठी 50 गमती व प्रयोग मी आणत आहे. दररोज मी माझ्या ब्लॉगवर एक प्रयोग व एक गमतीची कृती पोस्ट करेन. ह्या प्रयोगांसाठी घरामध्ये असलेल्या गोष्टीच लागतील! हे सर्व प्रयोग व गमती करायला अगदी सोप्या आहेत. वय 8 पासून पुढची व मोठेही त्याचा आनंद घेऊ शकतात. हा पहिला प्रयोग. प्रयोग 1. पाणी कसं पडत नाही? हा आश्चर्यकारक प्रयोग मला माझ्या मुलीने- अद्विकाने करून दाखवला! एक ग्लास पाण्याने पूर्ण भरा. एक ग्लासच्या आकारापेक्षा मोठा पुठ्ठा घ्या. ग्लासपेक्षा थोडा मोठा आकार कापून घ्या.

रामानुजनचे वारस: गणिताचा आनंद घेणार्‍या मुलांना भेटण्याचा सुखद धक्का!

मार्गी ·

श्रीगुरुजी Sun, 12/22/2024 - 20:45
१५३, ३७०, ३७१ व ४०७ ह्या संख्यांमध्ये एक गणिती गंमत आहे, ती कोणती? सर्व संख्या या त्या संख्येतील तीनही अंकांच्या घनाची बेरीज आहे. मी स्वतः एका आय आय टी जे ई ई प्रशिक्षण संस्थेत गणित शिकवितो. तसेही अंकांची आकडेमोड मला थोडी लवकर जमते. त्यामुळे उत्तर सुचलं.

✪ मुलांचं गणित शिकणं व शिकवणं! ✪ शिकण्याची अशी "प्रक्रिया, "स्पेस" आणि "मिती" ✪ गणित अवघड असतं ह्या भ्रमाला "पूर्ण छेद" ✪ कठिण गोष्टी सोपं करणं इतकं सोपं! ✪ पालकांसाठी व मुलांसाठी सोपं गणिती कोडं ✪ तुमच्या वाढदिवसाला तुम्हांला किती चॉकलेटस मिळायला हवेत? नमस्कार. आज २२ डिसेंबर म्हणजे जगातला विलक्षण गणितज्ज्ञ असलेल्या श्रीनिवास रामानुजन ह्यांची जयंती व त्यामुळे आज राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. ह्या दिवसानिमित्त मुग्धाताई नलावडेंच्या "प्रक्रिया को-लर्निंग स्पेसद्वारे" आयोजित एका सुंदर उपक्रमाचा अनुभव घेता आला.

सहज सुचलं म्हणून

कंजूस ·

चित्रगुप्त Sun, 12/22/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

मुक्त विहारि Sun, 12/22/2024 - 10:42
सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti Sun, 12/22/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र Mon, 12/23/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti Fri, 03/21/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस Mon, 12/23/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti Mon, 12/23/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

मुक्त विहारि Mon, 12/23/2024 - 08:20
हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 09:41
बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

श्रीरंग_जोशी Mon, 12/23/2024 - 10:18

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 11:47
होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 17:26
ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 17:45
कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

मुक्त विहारि Mon, 12/23/2024 - 18:30
विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस Fri, 12/27/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि Fri, 12/27/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर Fri, 12/27/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि Fri, 12/27/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस Fri, 12/27/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर Sun, 12/29/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

श्रीरंग_जोशी Sun, 12/29/2024 - 01:44
गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस Sun, 12/29/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti Sun, 12/29/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस Sun, 12/29/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस Tue, 12/31/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस Fri, 01/03/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि Fri, 01/03/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस Fri, 01/03/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस Fri, 01/03/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि Fri, 01/03/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस Fri, 01/03/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस Fri, 01/03/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ Sun, 01/05/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti Sat, 01/04/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar Mon, 01/06/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti Sat, 01/04/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा Sun, 01/05/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस Sun, 01/05/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस Mon, 02/24/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस Wed, 03/12/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस Wed, 03/12/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस Wed, 03/19/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा गुरुवार, 03/20/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख Fri, 03/21/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख Fri, 05/09/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा Fri, 05/09/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें

सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

द सेकंड स्पार्क - भाग २ - उत्तरार्ध

प्रसाद गोडबोले ·

In reply to by मुक्त विहारि

कथा वाचल्याबद्दल धन्यवाद मुवि! कथा विज्ञानाशी आणि त्यातही गहन अशा विषयांशी संबंधित असल्याने बरीच किचकट आहे. तथापि मी जमेल तितके सोपीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या प्रतिसादाच्या निमित्ताने सर्वच वाचकांच्यासाठी काही रोचक व्हिडिओजच्या लिंक देत आहे. हे पाहिल्यावर कथेचा शेवट कळण्याची शक्यता नक्की वाढेल! परत एकदा धन्यवाद ! https://www.youtube.com/watch?v=J0KHiiTtt4w https://www.youtube.com/watch?v=pmcrG7ZZKUc&t=23s https://www.youtube.com/watch?v=yGfTDcHJHSI

In reply to by प्रसाद गोडबोले

चिर्कुट Tue, 07/16/2024 - 23:12
मला जे समजलं ते असं, की हे तीन लोक स्वतःच एका सिम्युलेशन मध्ये आहेत. आणि सेकंड स्पार्क त्या सिस्टिमचा नसून त्या तिघांचा आहे. हे बरोबर आहे, की काही चुकतंय?

In reply to by चिर्कुट

एक्झ्यॅक्टली. ते तिघेही एका सिम्युलेशन मध्ये आहेत आणि सेकंड स्पार्क म्हणजे त्या तिघांना लक्षात येते की आपण स्वतःच एक सिम्युलेशन आहोत.

माफ करा गोडबोले साहेब, कथेमध्ये कथा काहीच नाही. नुसतीच चर्चा चालली आहे. तुमच्या तांत्रिक ज्ञानाबद्दल काही वादच नाही. पण तुम्ही जरा अजून वातावरण निर्मिती करायला पाहिजे. नुसतेच डायलॉग झालेत ते पण एककेकांना नुसत्या तांत्रिक गोष्टी समजावून देणार्‍या. एक सजेशन ते म्हणजे, कथा प्रथम पुरुषात लिहून पाहा. तुमच्या ज्ञानाबद्दल कोणतीही टीका नाही. फक्त एक वाचक म्हणून मला हे जाणवले.

थ्री बॉडी प्रॉब्लेम, दि डार्क फॉरेस्ट आणि सर्वात भारी म्हणजे दि डेथ्स एंड या कादंबर्‍या वाचून पाहा. तुम्हाला आवडतील. शिवाय एकदम अवघड गोष्ट कशी सांगावी याचा एक अभ्यास पण होईल. तुम्ही खूप उत्तम सायफाय लिहू शकता. तुमच्यात तो 'फर्स्ट स्पार्क' आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/13/2024 - 00:21
धन्यवाद !
थ्री बॉडी प्रॉब्लेम, दि डार्क फॉरेस्ट आणि सर्वात भारी म्हणजे दि डेथ्स एंड या कादंबर्‍या वाचून पाहा.
नक्की प्रयत्न करतो :)

टर्मीनेटर गुरुवार, 06/13/2024 - 09:56
साय-फाय कथा आवडली 👍 प्रोफेसर गोडससेंच्या "पाणी सुंदर आहे." वरील निरूपणापासून खडबडीत रस्ता सुरु झाल्यावर तोपर्यंत सुसाट वेगात सुरु असलेलया माझ्या वाचनाच्या गाडीचा वेग मंद मंद होत आता सर्व 'स्पार्क' प्लग्स एकाचवेळी उडून आचके-गचके देउ लगलेली माझी वाचनगाडी बंद पडते कि काय? असे वाटू लागले होते, पण "An intelligent being who is conscious about its own consciousness." ह्या १० शब्दांत सर्व काही स्पष्ट करणाऱ्या वाक्यापर्यंत पोचल्यावर "अरेच्चा, बायपासचा वापर करून तो खडबडीत रस्ता टाळून आपण स्मुथली इथपर्यंत पोहोचू शकलो असतो कि!" हा विचार मनात आला 😀 अवांतर: काही वर्षांपूर्वी गुगलच्या 'क्वांटम कॉम्प्युटर' विषयी वाचले होते तेव्हा त्याच्या काहीच दिवस आधी वाचलेला 'ओरॅकल'ने एक हजार साठ Raspberry Pi's चा वापर करून तयार केलेल्या 'सुपर कॉम्प्यूटर' बद्दलचा लेख आठवून आपणही 'IBM' चे तीन शक्तिशाली सर्व्हर्स + पाचशे 'Raspberry Pi's' चे क्लस्टर, 'Cisco' किंवा 'Netgear' चे अत्याधुनिक स्विचेस Illuminated पॅच कॉर्ड केबल्स वगैरेंचा वापर करून एक एनर्जी इफिशिअंट, इकॉनॉमिक असा क्वांटम/सुपर कॉम्प्यूटर तयार करावा हा विचार मेंदू पोखरू लागला होता. त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज घेतला तेव्हा तो सुमरे ५० ते ५५ लाख रुपयांच्या घरात भरला होता त्यामुळे अर्थातच तो विचार बाजूला पडला हा भाग वेगळा 😀 पण उद्या असा क्वांटम/सुपर कॉम्प्यूटर पदरी बाळगण्याची व्यावसायिक गरज निर्माण झाली तर त्यासाठीचे १० X १० चौ. फु. जागेत, 'कुलिंग सिस्टीम' साठी केवळ दीड ते दोन टन क्षमतेचा एक एसी आणि दोन होम/ऑफिस वॉटर कुलर्स चा वापर करून दिसायला सुंदर आणि शक्तिशाली 'झुंबर' टाईप क्वांटम/सुपर कॉम्प्यूटरचे प्रोटोटाईप मॉडेल डोक्यात तयार आहे! प्रत्यक्ष निर्मिती प्रकल्प हाती घ्यायचा झाल्यास 'मी', प्रोडक्ट डिझाईनसाठी मिपाकर 'चौकस २१२', नेटवर्क महर्षी 'प्रचेतस' बुवा आणि घरातच उपलब्ध असलेला लिनक्स, पायथन मधला एक 'किडा' अशा संभाव्य टीम मेंबर्सची प्रथमिक यादी देखील तयार आहे 😀 असो, अशा साय-फाय कथा आपल्याकडून नियमित येउद्यात, वाचायला आवडतील! धन्यवाद.

In reply to by टर्मीनेटर

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/13/2024 - 10:31
मनःपुर्वक धन्यवाद टर्मिनेटर ! ते "पाणी सुंदर आहे" हा खरेच एक खुप गहन विचार आहे, खोल तत्वज्ञानाचा विषय आहे. मी तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटम कॉम्प्युटिंग मध्ये गुंफायचा प्रयत्न केला आहे त्यामुळे त्यावर जास्त सविस्तर लिहिता आले नाही. बर्‍याच जणांना तो बोरिंगही वाटेल पण मध्यंतरी हिमालयात गेलो होतो तेथील एका स्वामींना मी हा विचार ऐकवला त्यावर ते म्हणाले - ज्याला तुम्ही पाणी म्हणत आहात, अचेतन गोष्टींचे प्रतिक म्हणत आहात ते अचेतन आहे कशावरुन ? ते सुषुप्त अवस्थेत नसेल कशावरुन ? कॉन्शसनेस तर सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे मग ते अचेतन आहे असे कसे ? मुळात सचेतन अचेतन अशी सीमारेषाच आपल्या कल्पनेतील आहे, भास आहे . असो. ( पुढे ती चर्चा सत्चिदानंद ब्रह्म आत्मन् वगैरे अजुन गहन विषयात गेली. ते इथं लिहित बसलो असतो तर फार विषयांतर झाले असते =)) ) बाकी क्वांटम कॉम्प्युटरची सर्वसामान्य लोकांना गरज पडणार नाही, कारण आपले सध्याचे सी.पी.यु कैक पटीने प्रगत आहेत . क्वांटम कॉम्प्युटर चे अ‍ॅडव्हान्टेज येते जेव्हा एकच रीपीटेटिव्ह काम करायचे असते तेव्हा . जसे की सिम्युलेशन्स ! अर्थात क्वांटम कॉम्प्युटर्स हे अति प्रगत जी.पी.यु सारखे काम करतील असा माझा अंदाज आहे. अर्थात तुम्ही आर.एस.ए. टोकन सिस्टिम ब्रेक करणे किंवा बिटकॉईन चे इन्क्रिप्शन ब्रेक करणे असे काही काम करणार असाल तर नक्कीच तुम्ही क्वांटम कॉम्प्युटर वापरु शकाल. असे काही करणार असाल तर आम्हाला नक्की सहभागी करुन घ्या , ही अत्यंत नम्र आणि कळकळीची विनंती ;) पुनश्च एकवार मनःपुर्वक धन्यवाद !

Bhakti गुरुवार, 06/13/2024 - 10:54
पण ती सिंग्युलॅरीटी , तो सेकंड स्पार्क कधी येईल किती वेळ लागेल हे काहीच प्रेडिक्ट करता येणे अशक्य आहे
_/\_ खुपचं अप्रतिम कथा लिहिली आहे.फर्स्ट -सेकंड स्पार्क,अचेतन-सचेतन मस्तपणे समजले.

नठ्यारा Fri, 06/14/2024 - 20:09
प्रसाद गोडबोले, विज्ञानकथेत विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान रंजकपणे मिळून मिसळून यायला हवं. कथेत अगदी झक्कासपणे जमलंय. डोस्कं लई भंजाळून गेलंय. विचारचक्र जाम गरागरा फिरू लागलंय. सविस्तर प्रतिसाद सवडीने देईन. -नाठाळ नठ्या

मनःपुर्वक धन्यवाद ! सर्व वाचकांचे आणि प्रतिसाद देणार्‍यांचे मनःपुर्वक आभार ! इथे प्रतिसाद पाहुन हुरुप येतो. ही कथा जवळपास एक वर्षापुर्वी सुचलेली, मात्र लिहायला वेळच होत नव्हता , हिमालयातील ट्रिप च्या निमित्ताने लिहुन काढु शकलो. :) बाकी प्रो. जैन आणि प्रो. चौहान ह्यांचा सोबत झालेल्या अनेक चर्चा अतिषय उपयुक्त ठरल्या कथा लिहायला, त्यांची कथेवर काय प्रतिक्रिया आहे हे अजुन कळलेले नाही. :)) ( अवांतर : ते अजुन हिमालयातच आहेत , त्यांची ट्रिप अपेक्षेपेक्षा जास्त अ‍ॅडव्हेंचरस झालेली असल्याचे कळले. =)))) ) परत एकदा धन्यवाद :)

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/25/2024 - 01:49
The Truman Show https://en.wikipedia.org/wiki/The_Truman_Show The film is the story of Truman Burbank (played by Jim Carrey), a man who is unaware that he is living his entire life on a colossal soundstage, and that it is being filmed and broadcast as a reality television show which has a huge international following. All of his friends and family and members of his community are paid actors whose job it is to sustain the illusion and keep Truman in the dark about the fiction he is living.

" पण इतकी काँपुटिंग पॉवर किंव्वा स्पेसच नाहीये ह्या जगात ! मला नाही वाटतं की जगातील सर्वच्या सर्व कॉम्प्युटर्स एकत्र केले तरी इतकी माहीती प्रोसेस करता येईल ! राईट ? मग ज्या गावाला जायचे नाहीच , त्याची चौकशी का करा ? नाहीच आहे येवढी कॉम्प्युटेशनल पॉवर तर मग हे सगळे कल्पनेचे घोडे नाचवण्यासारखे च नाही का ? आपल्याला कधी कळाणारच नाही की तुम्ही ज्याला ए.आयची सिंग्युलॅरिटी कशी असेल ते." .... " लेट मी इंट्रोडुस - ओळख करुन देतो - प्रो.