आयुष्य
आयुष्य
आपले आयुष्य हे मेणबत्ती सारख असत,
जळता जळता आठवणींच मेण जमत असत.
आयुष्य
आपले आयुष्य हे मेणबत्ती सारख असत,
जळता जळता आठवणींच मेण जमत असत.
वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , त्या कचऱ्याचा , तू मला सोडण्याचा ,
वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , पर्वा न करता तोडलेल्या वचनांचा
वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , प्रेमाविना तुझ्या लालासलेल्या शरीराचा
वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , तू तोडलेल्या तुझ्या बोलांचा , रागाचा
घेऊन जा , तुझी हरएक चिज़,
घेऊन जा , दिलेल प्रेमाच बीज....
कस विसरू तुझ ,लाख वेळाच झूट,
कितीदा न कशी देऊ पून्हा तीच ती सूट …।
मनाला गॅलरी आपली आपली
गॅलरीतले आपण, आपले आपले.
गुलाब काढा, मोगरा लावा
मोगरा काढा, मरवा लावा,
मरवा काढा, सुगंध ठेवा
मनाला गॅलरी आपली आपली
गॅलरीतला सुगंध आपला आपला.
खुर्ची काढा, झोपाळा लावा,
झोपाळा काढा, चटई टाका,
चटई काढा, मोकळीच ठेवा
मनाला गॅलरी आपली आपली
गॅलरीतली स्पेस आपली आपली.
काचा काढा, गज लावा
गज काढा, पडदे लावा,
पडदे काढा, उघडीच ठेवा
मनाला गॅलरी आपली आपली
गॅलरीतला प्रकाश आपला आपला.
पेरणेमधल्या हळूवार भावना या कवितेतही जपायचा प्रयत्न केला गेल्या आहे. तरी सुध्दा अतिसंवेदनाशील वाचकांनी कृपया खालील काव्य वाचू नये. होणार्या परीणामास मंडळ जबाबदार रहाणार नाही.
घरात् सोय नव्हती, म्हणुन माळरानात गेला,
पाच दहा मिनिटा मधे, मोकळा होउन आला,
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
स्वप्नात झाले होते
पटाईत आमचे (पटाईतांची पटाईतपणे माफी मागून!)
पंतप्रधान मोदींचे सचीव !! :)
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
त्यांनी विचारले गेले
वर्ष भर काय केले ?
ओबामां फोनु आला
डू यु नो अँड व्हॉट दे सेड ?
हॅप्पी न्यू यीअर !!
ओह मिपाकरांना आमचा
निरोप द्या
ओह मिपाकर
हॅप्पी न्यू यीअर !! बरं का !
हॅप्पी न्यू यीअर !!
श्री न. गोळे ह्यांच्या कविते ला मिळालेल्या प्रतिसादातून हा विषय घेऊन येण्याची परवानगी असावी.
कविता कुणाची असते , हा प्रश्नच मनास विचलित करून गेला , ह्या सर्व प्रतिसादांमधून.
हे प्रश्न मी कविते च्याच माध्यमातून विचारतो आहे. सर्वांनी कृपया जोड द्यावी.
विडंबन, जोड , सर्व काही - आपल्या सर्वांची कविता :)
कविता कुणाची
कवीच्या भावनेच्या अथांग समुद्रातून
अमृत स्वरूपात आलेली
ती कविता
कुणाची?
एक सूर्य
चांदण्या रात्री संथ जलाशयात
खड़े मारत बसलेला दिसला
'रस्ता चुकलायस का मित्रा?'
त्याच्या शेजारी बसत, हसत विचारले
म्हणाला ...
कंटाळा आला राव !
रोज रोज पूर्वेकडे उगवायचं
स्वत:लाच जाळत मावळतीकड़े जायचं..
रोजचा जन्म आणि रोजचाच मृत्यु
ते काय म्हणता तुम्ही?
संपृक्तता की काय, तशी स्थिती आलीय बहुदा
काहीतरी नवीन..
काही वेगळं करावंसं वाटतय मित्रा
एखादी हळुवार कविता ऐकावी
एखाद्या चित्रात संध्याप्रकाश व्हावं
अगदीच काही नाही तर
गेलाबाजार एखाद्या आमराईत मस्त ताणून द्यावी
आणि मग...
चविली जीभ माझी आज माझ्याच दातांनी
कापली बोटे माझी आज माझ्याच हातांनी -
जायचे होते कुठे? भरकटलो मी कुठे?
आणले कुठे मला आज माझ्याच पायांनी
यातना दिल्या ना कधी मी कुणाला
ऐकवले काय आज हे मला माझ्याच कानांनी
तेच झाले परके, समजले होते ज्यांना आपले
फसविले आज मला माझ्याच लोचनांनी
जगलो मी खरा यांनाच जगविण्यासाठी
मलाच मारायचे योजिले या सार्यांनी
सारेच बेईमान झाले, इमान आपले विकुनी
घेतला जीव माझा आज माझ्याच श्वासांनी
शिवकन्या यांची माफी मागून..
============================
कुंठीत धाग्यात्,कोण रिंगणात?
थुई थुई नाचे मोर्,पिसारा पुढे,मागे बाकी काही नाही!
नाचर्या पावसात, कोण रस्त्यात?
थांबते गाडी, रिकामी सीटे, बाकी प्रवासी कुणी नाही!
चेहरा मनात, कोण आरश्यात?
अलवार हसू, खुलते ध्यान, बाकी याद कसली नाही!
गमेना मित्रांत, कोण दिवसा स्वप्नांत?
लटका राग, मोहक हसू , बाकी ठावे काही नाही!
तपत्या उन्हात, कोण उरात?
गम्मत गुज,आठवण शिरशिरी, बाकी मग कुणी नाही!
चांदोबा असतोच तसा आजन्म उपाशी
तुपात पडलीयेना त्याच्या माशी !
तुपरोटी तो कसला खातो
चिरेबंदी गाण्यातली अंगाई ऐकत
मामा होऊन भटकत राहतो !
निंबोणीच्या झाडात गंधर्व होऊन
विराणी कुठलीशी गात राहतो.
बाबा ?, की आईनेच चांदोबाचा भागाकार केला,
म्हणूनतर नाही ना चांदोबा निंबोणीमागे लपला ?
* माझ्या उपरोक्त विडंबनास खरे तर एका पेक्षा अधिक शीर्षके सुचत होती, तुम्हाला काही चपखल शीर्षक सुचलेतर प्रतिसादातून जरुर नोंदवा.
* उपरोक्त विडंबन खालील बडबड गीताचे आहे :
चांदोबा चांदोबा भागलास का
निंबोणीच्या झाडामागे लपलास का