नियती

Primary tabs

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
26 Aug 2015 - 10:22 am

आयुष्य मागते काहीं
रखरखाट तप्त कुठेसा
त्या रस्त्यावरती ओला
तो थेंब शुष्क रुधिराचा

भिरभिरति नकळत डोळे
शोधी आधार छताचा
ते खांब चारच होते
ना मागमुस भिंतीचा

सुकलेल्या ओष्ठांना हलके
स्पर्श तप्त अश्रुंचा
थांबले गालांवर मोती
ओघळला श्वास कोरडासा

त्या श्वासांमधले अंतर
मोजण्यापल्याड असते
मी फ़क्त मोजतो श्वास
अन्तरही फसवे असते

जगणे बुभुक्षिताचे
भूक संपता संपत नाही
ते स्वप्न शोषिती माझे
शोधती सत्य आभासी

ते दिवे दूर जाताना
सावली सोडते साथ
बांधू पाहतो नशिबा
पाठीवर बांधुनी हात

ते दिवस कोडगे होते
रात्री लाजिरवाण्या
स्वप्नांचे इमले इतुके
विश्वास बाटगा होता

ती हलके हलके हसते
ते नकळत मीही जगतो
ते जगणे सुगंधी होते
मी जगण्यावरती हसतो

विशाल

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

26 Aug 2015 - 10:25 am | जव्हेरगंज

:-)

पैसा's picture

26 Aug 2015 - 9:57 pm | पैसा

छान! मात्र या वेळी वृत्तबद्ध नाही वाटली. "मुक्त कविता" लिहिलंस, पण विशालकडून अशा कवितेची सवय नाही!

विशाल कुलकर्णी's picture

27 Aug 2015 - 10:42 am | विशाल कुलकर्णी

म्हणलं जरा मुक्तछंदसुद्धा हाताळून पाहावा :)

पैसा's picture

28 Aug 2015 - 10:47 am | पैसा

यातली कल्पना खूप सुरेख आहे, पण काही ओळी पूर्ण वृत्तात आहेत आणि कुठे एखाद दुसरी मात्रा कमी जास्त वाटतेय. पूर्ण मुक्तछंदात लिहिलंस तरी ते खटकत नाही, छानच वाटेल. पण यात जरा गोंधळल्यासारखं वाटलं. म्हणजे कवितेची सुरुवात वृत्तबद्ध आहे, आणि नंतर ती बदलत गेलीय.

एक एकटा एकटाच's picture

27 Aug 2015 - 6:51 am | एक एकटा एकटाच

ती हलके हलके हसते
ते नकळत मीही जगतो
ते जगणे सुगंधी होते
मी जगण्यावरती हसतो

मस्त

अत्रुप्त आत्मा's picture

27 Aug 2015 - 7:48 am | अत्रुप्त आत्मा

सुंदर!

वृत्तबद्ध नसली तरी शब्द भावना तितक्याच ताकदीने पोहोचवताहेत. दुःखाची गडद गहिरी छटा आवडली.

विशाल कुलकर्णी's picture

27 Aug 2015 - 5:38 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद मंडळी !
धन्यवाद मांत्रिक _/\_

मदनबाण's picture

28 Aug 2015 - 10:42 am | मदनबाण

सुरेख...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aashiqui Mein Teri... ;) :- 36 China Town