भयंकररस:१
सारा जन्म पोरी फिरवण्यात गेला
पोरींचा गराडा त्यास सदा पडलेला
दरवर्षी एखादी तरी पोरगी गटवतोच
असा त्याचा लौकिक आता झालेला
सहकारी शिक्षिकांवरही त्याचा तसा
नेहमीच अन् डोळा हा राहिलेला
जरा कुठे ओढणी हलली, पदर ढळला
लगेच त्वरे तिकडे तो पाहू लागला
विद्यार्थिनीप्रिय शिक्षकाचा शिक्का त्यावर
तरीही उजळमाथ्याने वावर त्याचा राहिला
नैतिकतेवर जेव्हा भाषण देई मंचावरुनी
भयानकच ते अगदी सारे वाटे मजला!