The Man Who Knew Infinity

नागेश कुलकर्णी's picture
नागेश कुलकर्णी in जनातलं, मनातलं
16 May 2016 - 1:37 pm

सिनेमा ह्या दृकश्राव्य माध्यमामध्ये बरीच ताकद आहे. दिग्दर्शक आपल्या प्रतिभेतून अजरामर अशी कलाकृती निर्माण करू शकतो, जी इतर माध्यामापेक्ष्या प्रेक्षकांना विचार करायला जास्त प्रवृत करते. सिनेमा आपल्याला प्रेक्षक न ठेवता, प्रत्यक्ष कथेचं एक पात्र बनवतो.

asdf

असाच एक सिनेमा पाहण्यात आला "The Man Who Knew Infinity". थोर भारतीय गणिततज्ञ रामानुजन ह्यांच्या जीवनाचा आणि कार्याचा हा प्रवास. गोष्ट सुरु होते मद्रास मध्ये एका नोकरीसाठी वणवण फिरणाऱ्या तरुणापासून. गणितामध्ये अतिशय हुशार असणाऱ्या ह्या तरुणाकडे कोणतीही पदवी नाही प्रत्यक्षात त्याला गणित सोडून दुसर्या कशातच रस नाही. पहिल्या महायुद्धाच्या काळातील ब्रिटीश साम्राज्यात एका पदवी नसलेल्या तरुणाचे नोकरी मिळवताना कशे हाल होतात ह्याच छान सादरीकरण दिग्दर्शक Matthew Brown ह्यांनी केल आहे. अतिशय हालाकीत दिवस काढणाऱ्या या युवकाला शेवटी एक आशेचा किरण दिसतो, Sir Francis Spring ह्या भारतात काम करणाऱ्या ब्रिटीश सिव्हिल इंजिनियरच्या एका कारकुनाला ह्या तरुणाविषयी आत्मीयता वाटते आणि तो ह्याची शिफारस स्प्रिंग यांच्याकडे करून त्याला नोकरी मिळवून देतो, मात्र एका अटी वरती. ती अट म्हणजे तरुणाने म्हणेजच रामानुजनने आजपर्यंत गणितामध्ये केलेले काम त्या कारकुनाला समजून सागणे. रामानुजन ह्याला तयार होतो. यथावकाश तो कारकून रामानुजनची आणी त्याच्या परिवाराची रहायची व्यवस्था करतो. आपली आई आणी बायकोला मद्रासला घेऊन आल्यानंतर रामानुजन मान्य केल्याप्रमाणे त्या कारकुनाला त्याने आत्तापर्यंत केलेले कार्य दाखवतो ते अर्थातच त्या काराकुनासाठी समजण्यास खूप अवघड असते. मात्र एक भारतीय अशाप्रकारे काही करू शकतो ह्याचा त्याला अभिमान वाटतो आणी तो रामानुजनला हे पब्लिश करायचा सल्ला देतो. ह्यासाठी ते मी. स्प्रिंगला विचारणा करतात. मी. स्प्रिंग त्यांना Trinity कॉलेजचे प्राध्यापक आणि गणितज्ञ प्रा. हार्डी ह्याचाशी संपर्क करण्याचा सल्ला देतात.
रामानुजन प्रा. हार्डीना एक पत्र लिहितो, त्यात तो करीत असलेल्या "Infinite Series" वरील संशोधनाचा काही भाग पाठवतो आणी त्यांच्या सल्ल्याविषयी विचारतो.
जेंव्हा हे पत्र प्रा. हार्डीना मिळते तेंव्हा प्रथमतः त्यांना यात काही विशेष वाटत नाही, पण जेंव्हा ते परत एकदा रामानुजनच पत्र पाहतात तेंव्हा त्यांना रामानुजांच्या कामाचे वैशिष्ट लक्षात येत. ते रामानुजनला Cambridge ला बोलावतात. इथून सुरु होतो दोन गणित वेड्या मित्रांचा प्रवास. भारतीय असल्यामुळे रामानुजांना सोसावा लागणारा त्रास, त्यांच्या पाठीशी खंबीरपने उभा राहणारे प्रा. हार्डी आणी त्यांचे मित्र लिटिलवुड ह्याच सुरेख चित्रण ह्या चित्रपटात आहे.
कोणालाही सहज जवळ न करण्याची ब्रिटीश वृती, पण एकदा व्यक्तीमधील गुणाची पारख झाली की त्याच्यासाठी ठामपणे समाजाशी लढण्याची तयारी असणारी मानसिकता दिग्दर्शकाने सुरेख मांडली आहे.

ह्या मैत्रीसाठी आणी प्रत्येक गोष्ट सिद्ध करण्याचा ब्रिटीश सवयीसाठी हा चित्रपट अवश्य पाहावा.

मला प्रकर्षाने आवडलेली गोष्ट म्हणजे ब्रिटीश आणी भारतीय व्यक्तीच्या विचार करण्याच्या पद्धतीत असणारा फरक.
कित्येकवेळा रामानुजन अफलातून फ़ोर्मुले हुडकून काडतात पण हे तू सिद्ध कशे करशील असे विचारल्यावर त्याची गडबड उडते. एका संवादात तर प्रा. हार्डी म्हणतात " I don't believe in god because I cannot prove it"
प्रा. हार्डी मात्र आपल्या मित्राला ह्यातून बाहेर काढतात आणी प्रत्येक गोष्ट सिद्ध करायची सवय लावतात.

हा चित्रपट पाहिल्यानंतर उगीचच अस वाटत कि कदाचित हा सिद्ध न करण्याचा गुण कितीतरी भारतीय शोधांना मारक तर ठरला नसेल ?

रामानुजनयांना गणिताची इतकी आवड असते कि एकदा लिटिलवुड म्हणतात " Ramanujan has special friendship with integers".

कलाकारानी आपापले काम खूप छान केले आहे.

asdf

देव पटेलने रामानुजनची भूमिका छान निभावली आहे.

asdf

Jeremy Irons मात्र प्रा. हार्डीच्या भूमिकेत खूपच उठून दिसतात. अनुभव आल्याशिवाय विश्वास न ठेवणारी सत्याच्या बाजूने ठाम उभे राहाणारी व्यक्तिरेखा त्यानी खूपच छान साकारली आहे.

asdf

सगळ्यात भाव खाउन जातात ते Toby जोनेस, लिटिलवुड हे प्रा. हार्डीच्या समोर काहीसा झाकळलेलि , नेहमी चेष्टेचा विषय बनणारी ही व्यक्तिरेखा अतिशय उत्कुष्ट साकारलेली आहे.

asdf

कलामाध्यमवेध

प्रतिक्रिया

जेपी's picture

16 May 2016 - 1:52 pm | जेपी

छान ओळख..
सिनेमा पाहीन

छान ओळख करून दिली आहे चित्रपटाची. फोटोप दिसत नाहीत मात्र.

नागेश कुलकर्णी's picture

16 May 2016 - 2:18 pm | नागेश कुलकर्णी

धन्यवाद.
फोटोसाठी काय करावे?

सतिश गावडे's picture

19 May 2016 - 11:51 pm | सतिश गावडे

आता फोटो दिसायला हरकत नसावी.

तुम्ही जालावरील फोटोंच्या "गुगल सर्च" युआरेल टाकल्या होत्या. त्यामुळे फोटो दिसत नव्हते. मिपावर फोटो दिसण्यासाठी त्या फोटोची थेट युआरेल द्यावी लागते.

नागेश कुलकर्णी's picture

20 May 2016 - 9:10 am | नागेश कुलकर्णी

धन्यवाद सतीशजी

राजाभाउ's picture

16 May 2016 - 2:25 pm | राजाभाउ

सुंदर ओळख.

जव्हेरगंज's picture

16 May 2016 - 5:56 pm | जव्हेरगंज

मस्त ओळख !

अत्रन्गि पाउस's picture

16 May 2016 - 6:01 pm | अत्रन्गि पाउस

सिद्ध न करण्याचा गुण कितीतरी भारतीय शोधांना मारक ठरला असेलच ....
कित्येक ज्ञानशाखा तशाच राहिल्या असाव्यात किंवा कालौघात नष्ट झाल्या असाव्यात ...
एकूणच एका स्वतंत्र लेखाचा विषय ...

या चित्रपटाबद्दलचं हे तिसरं कौतुक ऐकण्या-वाचण्यात आलं. छान लिहिलं आहे तुम्ही. चित्रपट पाहायला कधी जमतंय ते बघते.

नागेश कुलकर्णी's picture

18 May 2016 - 11:41 am | नागेश कुलकर्णी

जेपी,एस ,राजाभाउ,जव्हेरगंज,अत्रन्गि पाउस,आतिवास धन्यवाद !!!!!

केव्हाचा बघायचाय हा सिनेमा.आमच्या जवळ कुठेच लागलेला दिसला नाही.

सिद्ध न करण्याचा गुण कितीतरी भारतीय शोधांना मारक ठरला हे सत्य आहे. आयुर्वेद मागे पडण्याचे कारण पण हेच आहे. त्या शिवाय आपल्या धर्माविषयी लोकाना माहिती नसण्याचे एक कारण म्हणजे कोणताहि विधी का करतात हे कोणि सान्गत नाही.

बाबा योगिराज's picture

19 May 2016 - 11:34 pm | बाबा योगिराज

बघणार जरूर बघणार.
पण कुठे बघायला मिळणार???

शोधक
बाबा योगीराज

स्रुजा's picture

20 May 2016 - 3:46 am | स्रुजा

अरे वा, नक्की बघेन. परिचय आवडला आणि तुमची टिप्पणी पण.

बघायचा आहे हा सिनेमा. परीक्षण आवडले.