मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रो कबड्डी - सिझन ५ - ले पंगा

धर्मराजमुटके ·

पी. के. 27/07/2017 - 16:44
आपले खूप खूप आभार आणि शुभेच्या. आपले वार्तांकान खूप वाचनीय असते पण वेळे अभावी रोज प्रतिसाद देऊ शकत नाही आणि हीच अवस्था माझ्यासारख्या बाकीच्या मिपाकरांची असेल. या वर्षी काशिनाथ आडके आणि नितीन मदने यु मुंबा कडून खेळणार त्यामुळे आणखी मझ्या येईल.

शुभां म. 27/07/2017 - 16:49
मागील सारे सीझनचे सर्वच सामने अतिशय मजेदार आणि उत्तम होते. सर्व खेळाडूंना उत्तम खेळासाठी ऑल दि बेस्ट आणि भारतीय प्रेक्षकांकडून याही सीझन ला उत्तम प्रतिसाद मिळेल हीच अपेक्षा. प्रो कब्बडी जुलै २०१७ ले पंगा .....( घेऊन टाक........)

सपे-पुणे-३० 28/07/2017 - 08:50
दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षीही प्रो कबड्डी च्या सिजन बद्दल उत्सुकता आहे. ह्यावर्षी संघांमध्ये बरेच बदल झालेत. मुंबईत राकेश कुमार नाहीये, पुण्यात मनजीत छिल्लर नाहीये... पण झटपट होणाऱ्या ह्या मॅचेस बघायला मजा येते.

दिवस पहिला : सामना क्र. १ : तेलूगु टायटन्स वि. तमिळ थलैवाज ( स्थळ : गच्चीबावली इनडोअर स्टेडिअम, हैदराबाद) 'कामावरुन घरी यायला उशीर झायला, वाट बघतोय तमिळ थलैवा वाट माझी बघतोय तमिळ थलैवा' असे गाणे मनातल्या मनात गुणगुणतच घरी पोहोचलो तो प्रो कबड्डी ५ व्या मोसमाचा उद्घाघटनाचा सोहळा संपून सामना सुरु झाला होता. टिव्हीचा रिचार्ज संपला होता तो मारुन 'एचडी' चे अ‍ॅड ऑन घेता घेता तेलुगु संघाचे ३ तर तमिळ थलैवाजचे २ गुण झाले होते. आमच्या टीव्हीच्या कंट्रोलची अजुनच गंमतशीर गोष्ट आहे. मुलाने रोज कार्टुन बघू नये म्हणून मी फक्त शनिवार आणि रविवारी २० रु. चे रिचार्ज मारतो. बाकी दिवस टिव्ही म्हणजे नुसता डब्बा असतो. आता बापालाच ३ महिने सामने बघायचे म्हणजे मुलाला ३ महिने कार्टुन बघू देणे आलेच . असो तर या मोसमात तमिळ थलैवा हा नवा संघ दाखल झालाय. त्याचे मालक आहेत सचिन थलैवा (सॉरी तेंडूलकर ) आणि मा टिव्ही चे चेअरमन निम्मागड्डा प्रसाद. पहा ना काय योगायोग तमिळ चित्रपटसृष्टीचा थलैवा रजनिकांत आणि एकेकाळचा क्रिकेटचा थलैवा आणि आत्ता कबड्डी संघाचा मालक दोघेही मराठी ! छाती ५६"ची झाली ना ? :) आजच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याने राष्ट्रगीत गाऊन केली. सामना बघायला अक्षय, सचिन, राणा दगुबत्ती, चिरंजीवी, आलु अर्जुन, पी.व्ही. सिंधु, पुलेला गोपीचंद अशी खाशी मंडळी हजर होती. पहिल्या सामन्यात अक्षय ने बरीच पकपक केली त्यामुळे सामन्याचे काही महत्त्वाचे क्षण टिव्हीवर दिसले नाहित. तमिळ थलैवाजचा कप्तान आहे 'अजय ठाकूर' (माजी पुणेरी पलटणवासी). अजय ठाकूर, के. प्रपंजन आणि अमित हुड्डा वगळता सगळे नवखे खेळाडू आहेत त्यामुळे सध्या या संघाकडून जास्त अपेक्षा ठेवायला नको असे वाटले. तेलुगु टायटन्सचा कप्तान राहुल चौधरी हा मागील सिझनचा एक श्रेष्ठ खेळाडू आहे. तेलुगु संघात राहुल चौधरी, निलेश साळुंखे, राकेश कुमार (एक्स यु मुंबा), अमित छिल्लर, सोमवीर, रोहित राणा असे एक से बढकर एक खेळाडू आहेत. त्यामुळे सध्या यांचा संघ चांगलाच तगडा वाटतोय. कबड्डी हा सांघिक खेळ असला तरी काही खेळाडू असे आहेत हे एकहाती सामना जिंकून देऊ शकतात. अनुप कुमार, रोहित कुमार, मनजित छिल्लर, राहुल चौधरी, निलेश शिंदे, दिपक हुड्डा, संदिप नरवाल, प्रदिप नरवाल, प्रदिप मोंडल ही काही नावे ! अपेक्षेप्रमाणे पहिला सामना तेलुगु टायटन्सने जिंकला. राहुल चौधरी ने चढाईत तब्बल १० गुणांची कमाई केली. दोन्ही संघात सुरुवातीपासुनच ७-८-१०-१२ गुणांचा फरक होता. मात्र तमिळ थलैवाने नवीन असुनसुद्धा चांगली टक्कर दिली. दोन संघामधील गुणांतील अंतर ७ किंवा त्यापेक्षा कमी असेल तर हरणार्‍या संघास देखील एक गुण मिळतो. चढाईत राहुल ने १० गुण तर पकडीत विशाल भारद्वाजने ५ गुणांची कमाई करत बक्षीसे पटकावली. तमिळ थलैवाज कडून के. प्रपंजन ने ७ गुणांची कमाई केली. निकाल : तमिळ थलैवाज (२७ गुण) वि. तेलुगु टायटन्स (३२ गुण) तेलुगु टायटन्स : ५ गुणांनी विजयी. -------------------------------------------------------------------- सामना क्र. २ : यु मुंबा वि. पुणेरी पलटण पुण्यात कुठलीही निवडणूक असो, एक पोष्टर नेहमी बघायला भेटते ते म्हणजे 'पुण्याचा कारभारी बदला' अगदी कलमाडी काळापासून बघतोय मी. मात्र कितीही कारभारी बदलले तरी पुण्याचे नशीब बदलत नाही हे एव्हाना पुणेकरांच्या लक्षात आले असेलच :) वन मॅन आर्मी मनजित छिल्लर यावर्षी पुण्याच्या संघात नाही हे वाचून मी थोडासा रिलॅक्स झालो होतो. त्याजागी दिपक हुड्डा यंदाच्या पुणे संघाचा कप्तान आहे. त्याने पहिल्याच सामन्यात यु मुंबाला चारी मुंड्या चीत केले. (म्हणजे पुण्याचे नशीब बदलले नाही तर ! मनजीत ने लावलेली विजया ची सवय आता त्यांचे व्यसन बनू पाहणार बहुधा ! यु मुंबाला अगदी छु मुंबा करुन टाकले. बघा कुणी मुंबईला नावे ठेवली की आम्ही मुंबईकर त्याला त्याच्यापेक्षा जास्त नावे ठेवतो :) :) दिपक हुड्डा च्या जोडीला संदिप नरवाल उतरला तेव्हाच मी समजुन चुकलो की हा सामना जिंकणे यु मुंबासाठी अवघड आहे. संदिप नरवाल म्हणजे बचाव आणि पकड फळीतील अभेद्य किल्लाच जणू ! चढाई करणार्‍यांची त्याला पकडण्याची छातीच होत नाही. यंदा पुणेरी पलटणीत दिपक, संदिप, धर्मराज चेलारथन, राजेश मोंडल हे चार खतरनाक खेळाडू आहेत. त्यामुळे अंतिम फेरीत जाण्याची यांना संधी आहे. मुंबई संघात अनुप कुमार, शब्बीर बापू, काशिलिंग आडके, नितिन मदने, कुलदिप सिंह सारखे मातब्बर खेळाडू आहेत पण त्यांचा एकमेकांशी ताळमेळ दिसून आला नाही. मुळात अनुप कुमार कॅप्टन कुल असल्यामुळे आक्रमक होऊन खेळत नाही. आजच्या खेळात एकटा अनुप सोडला तर बाकी कोणाचीही मात्रा चालली नाही. शब्बीर बापू, काशिलिंग आडके, नितिन मदने आणि बचाव फळी पुर्णपणे निष्प्रभ वाटली. सुरुवातीपासूनच पुढे असलेल्या पुणे संघाने आपली बाजू मजबूत करत मुंबईला तब्बल १२ गुणांनी मात दिली. पुण्याचा दिपक, संदिप, धर्मराज यांनी नेत्रदिपक कामगिरी केली. मुंबई १२ गुणांनी पिछाडल्यामुळे हरल्यावर मिळणारा १ गुणही मिळवू शकले नाही. निकाल : यु मुंबा वि. (२१ गुण) वि. पुणेरी पलटण (३३ गुण) पुणेरी पलटण १२ गुणांनी विजयी. -------------------------------------------------------------------- विजेत्या संघांचे अभिनंदन ! परत भेटूया शुभरात्री !!

दिवस २ रा : सामना क्र. ३ : जयपुर पिंक पॅंथर्स वि. दबंग दिल्ली जयपुर पिंक पॅंथर्स मागील वर्षी अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. त्याउलट दिल्लीच्या नावे भरपुर सामने हरण्याचा पराक्रम होता. या वर्षी दोन्ही संघात बरेचसे बदल झालेत. जयपुर पिंक पॅंथर्सचा मागील वर्षाचा कप्तान बदलून मनजित छिल्लरला ते पद देण्यात आले. मनजित छिल्लर, भुतपुर्व कप्तान जसबीर सिंह, पवन कुमार, सेल्वामणी, तुषार पाटील, सोमवीर शेखर अशी तगडी टीम दिल्लीला सहज मात देईल असे वाटले होते. पहिल्या सत्रात जयपुरचाच वरचष्मा राहिला. जसवीर ने त्याच्या ३ ही चढायांमधे यशस्वी होत पहिल्या सत्रातच दिल्ली ला सर्वबाद केले. दुसर्‍या सत्रात मात्र खेळ पुर्णपणे पालटला. दिल्लीचा इराणी कर्णधार मिराज शेख याने अफलातुन खेळ करत जयपुरला दोन वेळा सर्वबाद केले. मिराज ने २० चढायांमधे ७ गुणांची कमाई केली. मागच्या वेळी बंगालचा कर्णाधार असणारा निलेश शिंदे यावेळी दिल्लीकडून खेळतोय. त्याने पकडफळीत उत्तम कामगिरी करत हाय फाय (पकडीत ५ गुण) मिळविले. 'निलेश शिंदे ला तुम्ही टांग देऊ शकत नाहि' असा वाक्प्रचार मागेपुढे रुढ झाला तर आश्चर्य वाटायला नको. त्याचा 'अँकल होल्ड' खरोखरीच अफलातून आहेत. जयपुरकडून पवन कुमार ने चढाईत ७ गुण तर सोमवीर ने पकडीत ३ गुण घेतले. जसबीर सिंहचा खेळ ठीक ठाक तर मनजित आणि तुषार म्हणावा इतका प्रभाव पाडू शकले नाहीत. एकंदरीतच हा सामना उत्कंठावर्धक झाला. कालच्या सामन्यांच्या तुलनेत हा सामना खुपच उजवा होता. निकाल : जयपुर पिंक पॅंथर्स (२६ गुण) वि. दबंग दिल्ली (३० गुण) दबंग दिल्ली : ४ गुणांनी विजयी. ----------------------------------------------------- दिवस २ रा : सामना क्र. ४ : तेलुगु टायटन्स वि. पटणा पायरेटस कालच्या सामन्यात तेलुगु टायटन्सच्या राहुल चौधरी ने सुपर १० केले होते (चढाईत १० गुण म्हणजे सुपर १०). त्यामुळे आज त्याच्याकडून अपेक्षा वाढलेलया होत्या. शिवाय ते घरच्या मैदानावर खेळत असल्याचा फायदा होता. मात्र त्यांच्या समोर गत २ मोसमाचे विजेते पटणा पायरेटसचे कडवे आव्हान होते. हे आव्हान पेलण्यास तेलुगु टायटन्सचा संघ दुसर्‍या सत्रात अपयशी ठरला आणि पटणा पायरेटसने आपल्या किर्तीला जागत हा सामना आपल्या खिशात टाकला. पटणा पायरेटसचा कप्तान परदीप नरवाल हा अष्टपैलु खेळाडू आपल्या उत्कृष्ट चढायांसाठी ओळखला जातो. त्याला 'डुबकी मास्टर' ची पदवी का मिळाली हे जाणून घ्यायचे असेल त्यांनी एकदा तरी त्याचा खेळ नक्कीच पहावा. गतसाली बंगालकडून खेळणारा मोनू गोयत, मुंबईकडून खेळणारा विशाल माने हेच तिघे नावाजलेले खेळाडू पण काल म्हटल्याप्रमाणे काही खेळाडू असे असतात की एकटे विजय खेचून आणतात. परदीप नरवाल हा असाच खेळाडू आहे. त्याने आज २० चढायांमधे तब्बल १५ गुणांची कमाई केली. ५ व्या मोसमातला आतापर्यंतचा हा एक विक्रम आहे. हा विक्रम या मोसमात कोणी मोडेल याची शक्यता वाटत नाही. कदाचित परदीप च ते करु शकेल. पहिल्या सत्रापर्यंत आणि दुसर्‍या सत्राची जवळपास १० मिनिटे दोन्ही संघात पकडापकडीचा खेळ चालू होता. गुणतालिकेत दोन्ही संघ १-२ गुणांच्या फरकाने वरखाली होत होते. नंतर एका चढाईत परदीप ने अशी डुबकी मारली की चार गुण घेऊनच तो परत आला. तिथून पुढे जो सामना फिरला तो पटणाच्या बाजुनेच राहिला. राहुल चौधरीच्या नावे प्रो कबड्डीत सगळ्यात जास्त चढाई गुणांचा विक्रम आहे. आज ५०० चा आकडा गाठून तो नवीन विक्रम प्रस्थापित करणार होता पण पटणाने त्याला ४९९ वरच जखडून ठेवले. मला वाटते ५०० चा जादुई आकडा गाठण्याच्या दबावाखाली राहुल दबला गेला तो शेवटपर्यंत त्यातुन बाहेर पडू शकला नाही. त्याला १ गुण मिळवून ५०० गुणांचा विक्रम करण्यासाठी अजुन १ दिवस थांबावे लागणार आहे. टायटन्सकडून चढाईत राहुल ने ७ गुण, निलेश साळुंके ने ६ गुण, विकास ने ५ गुण, तर विशाल भारद्वाज ने पकडफळीत हाय फाय (पकडीत ५ गुण) मिळविले. निलेश साळूंके काल आणि आज दोन्ही दिवशी चांगला आणि सातत्यपुर्ण खेळला. विकास काल चमकला नाही पण आज चांगला खेळला. विशाल भारद्वाज ने काल आणि आज दोन्ही दिवशी 'हाय फाय' चा विक्रम केला. पटणा : परदीप : १५ गुण (चढाई), मोनु गोयत ८ गुण, विशाल माने ३ गुण,सचिन शिंगाडे आणि विष्णू प्रत्येकी १ गुण. एकंदरीत आजचे दोन्ही सामने एक से बढकर एक होते. मजा आला ! निकाल : तेलुगु टायटन्स (२९ गुण) वि. पटणा पायरेटस (३५ गुण) पटणा पायरेटस : ६ गुणांनी विजयी. ------------------------------------------------- उद्याचे सामने : यु मुंबा वि. हरियाणा स्टिलर्स तेलुगु टायटन्स वि. बंगळुरु बुल्स --------------- विजेत्या संघांचे अभिनंदन ! उद्या परत भेटूया शुभरात्री !!

यु मुंबा वि. हरियाणा स्टिलर्स सामन्यात शेवटला २९-२८ अशी परिस्थिती असताना शेवटच्या २० सेकंदाची चढाई उ मुंबा कडे आली. तेंव्हा हरियाणाची ६ ची कवर उभी होती. आणि अनुप कुमार चढाई वर आला होता. तेंव्हा त्याने २० सेकंड वेळ काढत १ गुणांची आघाडी कायम ठेवली. आणि हरियाणा शेवटच्या चढाईची वाट बघत बसली. तोवर हूटर वाजून गेला. जर अनुपच्या शेवटच्या चढाईच्या वेळी हरियाणाच्या कवर क्रॉस लावली असती तर? टच लाईन तर अनुप ला झक मारून पार करावी लागली असती. तसे ना करतो तर तो स्वता बाद झाला असता आणि हरियाणा बरोबरीत आली आता. आणि जर अनुप ने अटेंम्प्ट केला असता राईड व्यालीड करायचा तर हरियाणाला चान्स होता त्याला पकडायचा.अनुपच्या उंची मुळे कदाचित तो बचावलासुद्धा असता, पण की हरियाणाच्या रिस्क घेतली पाहिजे होती. शेवटच्या राईडची वाट पाहायला नको होती.

दोन दिवस मेहनतीने टाईप केलेले प्रतिसाद काही तांत्रिक अडचणींमुळे प्रकाशित झाले नाहित. इतर धाग्यांवरील प्रतिसाद देखील हवेत गायब झाले. त्यामुळे थोडा हिरमोड झालाय. बघुया आजपासून पुन्हा परत कसे जमते ते !

कोणीतरी या धाग्यावर येतयं हे पाहून आनंद झाला. कामाच्या व्यस्ततेमुळे सध्या मॅचेस बघणे होत नाहिये. बाकी यावेळी मुंबईच्या आशा सोडलेल्या आहेत. फायनल मधे बहुधा पटणा पायरेटस, युपी योद्धा आणि गुजरात फॉर्च्युनजायंटस यापैकी दोघे असतील. मोदींच्या नामप्रतापे की काय कोण जाणे गुजरात टीम फॉर्च्युनेट पण आहे आणि जायंटस पण आहे.

लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी, प्रो. कबड्डीच्या चौथ्या मोसमाचे मी जवळपास संपुर्ण महिनाभर वार्तांकान केले होते. जवळपास ३३ दिवस ! मागील वर्षापेक्षा या ५ वर्षाच्या सामन्यांची सुरुवात जवळपास एक महिना उशीराने सुरुवात होत आहे. उद्या २८ जुलै २०१७ पासुन सामने सुरु होतील. ३ महिने सलग वार्तांकन करणे हे माझ्यासाठी मोठेच आव्हान असणार आहे. सगळे सामने बघून मगच त्यावर लिहायचा विचार आहे. मागील वर्षी देखील सामना पाहुन झाल्यानंतर लगेच वार्तांकन लिहून इथे प्रसिद्ध करण्याचा संकल्प केला होता तो सुफळ झाला. असो. तुणतुणे पुरे ! मागील वर्षांपेक्षा या वेळचे वेगळेपण म्हणजे तब्बल १२ संघ आणि जवळपास ३ महिने हे सामने चालणार आहेत.

RAAM - रेस अॅक्रॉस अमेरिका सायकल शर्यत विजेत्यांचा सत्कार समारंभ

अजित पाटील ·

डॉ श्रीनिवास आणि डॉ अमित या दोन्ही विजेत्यांचे, त्यांच्या सहकार्‍यांचे, त्यांच्या कुटुंबियांचे आणि त्यांना हा विजय मिळविण्यासाठी प्रोत्साहित करणार्‍यांचे मनापासून अभिनंदन !

उपाशी बोका 13/07/2017 - 00:14
अशी खडतर शर्यत पूर्ण केल्याबद्दल दोघांचे अभिनंदन. शीर्षक थोडे चुकले आहे, हे विजेते नाहीत, त्यांनी केवळ शर्यत पूर्ण केली आहे. (११ दिवस १८ तास ४५ मिनिटे आणि ११ दिवस २१ तास ११ मिनिटे वेळात) खरा विजेता आहे क्रिस्टॉफ स्तासर ज्याने ही शर्यत ८ दिवस ९ तास ३४ मिनिटात पूर्ण केली. http://raceacrossamerica.org/raamx/rcracer.php?s_N_Year_ID=41&s_N_Entry_ID=3497 अर्थात शर्यत पूर्ण करणे हे सुद्धा कौतुकास्पद आहे.

जुइ 13/07/2017 - 02:36
या दोन्ही स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन!! या स्पर्धेविषयी माहिती दिल्या बद्द्ल आभारी आहे.

नमस्कार

Indo Cyclist Club

महिला क्रिकेट वर्ल्ड कप - २०१७

मुक्त विहारि ·

In reply to by उपेक्षित

एकाच विषयाला अनेक पैलू असतात. झूलन गोस्वामीच्या गोलंदाजीपेक्षा मला ऑस्ट्रेलियाच्या पेरीची गोलंदाजी आवडते, पण कदाचित दुसर्‍या व्यक्तीला ते मत पटणार नाही, म्हणून आधीच असे खुलासे केलेले बरे..... शिवाय, माझेच म्हणणे खरे, असे आम्हाला तरी वाटत नाही.

In reply to by मुक्त विहारि

उपेक्षित 07/07/2017 - 18:11
बरोबर आहे तुमचे म्हणणे, असो मला फ़क़्त इतकेच वाटले कि वरच्या सध्या आणि सरळ लिखाणाला डिस्क्लेमरची गरज नव्हती. पण दुर्लक्षित अशा महिला क्रिकेट वर धागा काढल्याबद्दल धन्यवाद देवा.

In reply to by उपेक्षित

बरेच रिपू ह्यामूळे दूर आहेत. जाहीराती न बघता, हा खेळ बघता येतो.पुरुषांच्या मॅचच्या प्रक्षेपणाच्या वेळी, एखाद्या ओव्हर मधल्या शेवटच्या बॉलला चौकार/ षटकार/किंवा आऊट झाला की लगेच जाहीराती सुरु. इथे मात्र तसे होत नाही...... "महिला क्रिकेट वर धागा काढल्याबद्दल धन्यवाद देवा." माझे धन्यवाद मानू नका, कारण खेळांवरील चर्चा मला आवडतात (मला चेस खेळणे जमत नसले तरी चतुरंगांनी काढलेले चेस मधली चर्चा आवर्जून वाचतो.) कुणीतरी धागा काढेल म्हणून वाट बघत होतो. पण परवाची इग्लंड वि साऊथ आफ्रिका मॅच बघीतल्या नंतर मात्र रहावले नाही.

विशुमित 07/07/2017 - 15:54
कालच वाटले होते श्रीगुरुजींनी महिला वर्ल्ड कप वर धागा काढायला हवा. ते काम तुम्ही केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. या धाग्यावर गुरुजी चारचाँद लागवतील आणि आमच्या ज्ञानात भर टाकतील, ही आशा करतो.

आधी लिहिल्या प्रमाणे "साउथ आफ्रिका , न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे तिन्ही संघ फार व्यावसाइक वृत्तीने खेळतात.इथे चुकांना क्षमा नाही." असेच घडले.... असो,

श्रीगुरुजी 08/07/2017 - 22:53
आज भारताला द. आफ्रिकेने ११५ धावांनी हरविले. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने ५० षटकांत २७३ धावा केल्यानंतर भारताची एक वेळ १ बाद ४७ अशी बरी परिस्थिती होती. परंतु नंतरच्या ८ षटकात केवळ १८ धावा करताना भारताने ६ बळी गमाविल्यामुळे अवस्था ७ बाद ६५ इतकी दारूण झाली व तिथेच सामना जवळपास संपला. आता ५ सामन्यानंतर भारताचे एकूण ८ गुण असून भारत ८ देशांच्या या स्पर्धेत दुसर्‍या क्रमांकावर आहे. श्रीलंका (४ सामने), वेस्ट इंडिज (४ सामने) आणि पाकिस्तान (५ सामने) यांचे अजूनही शून्य गुण असून त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. भारताला उपांत्य फेरीत जाण्याची बरीचशी संधी आहे. अजून १ सामना जिंकला किंवा अनिर्णित राहिला तरी भारताचे उपांत्य फेरीतील स्थान नक्की होईल. अर्थात भारत उपांत्य फेरीचा अडथळा पार करून अंतिम फेरीत जाण्याची शक्यता खूप कमी आहे.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद... खरे तर ह्या विषयावरील आपला अभ्यास मोठा...मीच चोंबडेपणा केला..... दुसरी गोष्ट अशी की, भारतीय संघात जिंकण्याची कॅपॅसिटी आहे...फक्त थोडी मेहनत आणि कचकाऊ वृत्ती सोडली तर हा संघ उत्तम कामगिरी अद्यापही करू शकतो.असे माझे मत. अज्ञान दूर केल्यास उत्तमच.

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी 08/07/2017 - 23:25
खरे तर ह्या विषयावरील आपला अभ्यास मोठा...मीच चोंबडेपणा केला..... कसचं कसचं . . . भारतीय संघाच्या तुलनेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व द. आफ्रिकेच्या महिलांचे संघ खूपच तगडे आहेत. जरी भारताने इंग्लंडला हरविले असले तरी तो संघ खूप तगडा आहे. भारत या ३ संघांच्या बरोबरीने नक्कीच उपांत्य फेरीत येईल. परंतु त्यानंतरच खरी परीक्षा आहे. सध्या न्यूझीलंडचा संघ सुद्धा पहिल्या पाचात असला तरी तो संघ बहुतेक उपांत्य फेरीत येणार नाही असे वाटते. उर्वरीत ३ संघ केव्हाच बाहेर पडले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

न्युझीलंड आणि साऊथ आफ्रिकेची मॅच पावसाने वाया घालवल्यामुळे ह्या पुढील एक जरी (अर्थात चान्सेस फक्त "न्युझीलंड" पुरतेच) सामना जिंकला तरी खूप. ऑस्ट्रेलियाच्या पेरीच्या फॉर्म पुढे आपली डाळ शिजणे जरा कठीणच.

श्रीगुरुजी 09/07/2017 - 19:17
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया - इंग्लंड ५० षटकांत ८ बाद २५९, ऑस्ट्रेलिया ८ षटकांत बिनबाद ३१. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर ऑस्ट्रेलियाचे १० गुण होऊन त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश नक्की होईल. इंग्लंडने जिंकला तर ५ सामन्यात इंग्लंडचे ८ गुण होऊन ऑस्ट्रेलिया, भारत व इंग्लंड या तिघांचे समान ८ गुण असतील. परंतु निव्वळ धावगतीमुळे ऑस्ट्रेलिया प्रथम क्रमांकावर राहील व त्यापाठोपाठ इंग्लंड दुसर्‍या क्रमांकावर असेल.

श्रीगुरुजी 12/07/2017 - 20:55
ऑसीजविरूद्ध भारत पराभवाच्या मार्गावर आहे. भारताच्या २२६/७ चा पाठलाग करताना ऑसीज ३७ षटकांत १७९२ इतक्या मजबूत स्थितीत आहेत. दुसरीकडे आफ्रिकेने लंकेला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश नक्की केला आहे. तिसरीकडे इंग्लंडच्या २८४ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड ३४.४ षटकांत ६ बाद १५९ अशा अडचणीत आहे. इंग्लंड हा सामना बहुतेक जिंकेल अशी चिन्हे आहेत. म्हणजे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व आफ्रिका यांचा उपांत्य फेरीत प्रवेश नक्की आहे. भारताचा शेवटचा सामना न्यूझीलंडबरोबर आहे. या सामन्यातील विजेता हा उपांत्य फेरीत प्रवेश करणारा चौथा संघ असेल. हा सामना अनिर्णित राहिला तरी भारत उपांत्य फेरीत जाईल.

In reply to by अभिदेश

असो. तुम्ही जर ह्या वर्ल्ड कप मधील सगळ्या मॅचेस बघीतल्या असत्या तर हा प्रश्र्न तुमच्या मनांत नसता आला. अर्थात. पुणेकरांना शंकाच फार....(आमच्या बाबा महाराजांच्या मते पुणेकर म्हणजे एक नंबरचे आस्तिक....त्या आस्तिकांत (आमच्या भाषेत पुणेकरांत) तुमच्यासारखे शंकेखोर पण आलेच.)

In reply to by मुक्त विहारि

अभिदेश 20/07/2017 - 21:59
त्यामुळे नो कंमेंट्स ...बाकी तुमचा चालू द्या ..एक सल्ला ... इकडे कोण पुणेकर , तुमच्या भाषेत आस्तिक/नास्तिक आहे ते शोधण्यापेक्षा चांगले वाचन करा . गरज आहे त्याची तुम्हाला.

भारतिय महिला क्रिकेट संघ सद्या चांगली कामगिरी करत आहे. पुरुष क्रिकेटमध्ये इतका पैसा (आणि त्यामुळे मिळालेले महत्व) आहे की त्यामुळे केवळ महिला क्रिकेटच नाही तर इतर सर्व खेळ झाकोळले गेले आहेत. त्यामुळे हा धागा काढल्याबद्दल मुविंचे खास अभिनंदन !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कृपया, माझे अभिनंदन करू नका. कारणे, १. जेम्स वांड सारखे डू आय डी शत्रू होतात. २. काही पुणेकरांच्ता (आमच्या गुरुजींच्या भाषेत "आस्तिकांच्या" पोटात दुखते.) ३. आस्तिकांच्या मते तुम्ही पण पार्शालिटी करता असे मनांत येवू शकते. (तसे ते अजया ताईच्या बाबतीत झालेले आहे.) मिपा सदस्यांसाठी इशारा : आमच्या विचारांना सहमती देणे धोकादायक होवू शकते. जेम्स वांड सारख्या पुणेकरांची शिकार होवू नका.

श्रीगुरुजी 15/07/2017 - 14:35
आज भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना न्यूझीलंड बरोबर आहे. न्यूझीलंडचा सुद्धा हा शेवटचाच सामना आहे. भारताचे ८ गुण असून न्यूझीलंडचे ७ गुण आहेत. भारताला हा सामना जिंकायला हवा. अगदी बरोबरीत सुटला किंवा अनिर्णित राहिला तरी चालेल.

श्रीगुरुजी 15/07/2017 - 20:51
न्यूझीलंडविरूद्ध भारतीय महिला संघ विजयाच्या मार्गावर आहे. भारताच्या ५० षटकांतील २६५ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची २२ षटकांत ७ बाद ६२ अशी दारूण अवस्था झालेली आहे. भारताचा विजय जवळपास नक्की झाल्याने भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेशही जवळपास नक्की झाला आहे.

श्रीगुरुजी 20/07/2017 - 15:34
आज भारत वि. ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीचा दुसरा सामना आहे. इंग्लंड आधीच अंतिम फेरीत पोहोचले आहेत. आजचा सामना पावसामुळे अजून सुरू झालेला नाही. सामना रद्द झाला तर सरस गुणांमुळे ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत जाईल. आज सामना सुरू होऊन पावसामुळे अर्धवट अवस्थेत थांबला किंवा आज पावसामुळे सामना सुरूच झाला नाही तर सामना उद्या खेळविला जाईल.

श्रीगुरुजी 20/07/2017 - 19:20
पावसामुळे ४२ षटकांचा सामना खेळला जातोय. भारताची प्रथम फलंदाजी आहे. आतापर्यंत १६ षटकांत २बाद ५७ धावा झाल्या आहेत. मिताली राज अजून खेळत आहे. ४२ षटकांत किमान २२५ धावा व्हायला हव्यात.

श्रीगुरुजी 20/07/2017 - 21:26
४२ षटकांच्या सामन्यात भारत ४२ षटकांत ४ बाद २८१. हरमनप्रीत कौरने तुफान फलंदाजी करताना २० चौकार व ७ उत्तुंग षटकार मारून केवळ ११५ चेंडूत नाबाद १७१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला ६.७१ प्रतिषटक धावगतीने ४२ षटकात २८२ धावा कराव्या लागतील. भारताला सामना जिंकून अंतिम फेरीत जाण्याची उत्तम संधी आहे. आज हरमनप्रीत कौरची फलंदाजी बघून असे वाटत आहे की भारतीय पुरूष संघातल्या एखाद्या खेळाडूच्या जागी तिला घ्यावे.

एस 21/07/2017 - 00:42
भारतीय संघाला अंतिम सामन्यासाठी भरभरून शुभेच्छा! लॉर्ड्सवर विश्वचषक उंचावण्याचा बहुमान मिताली राजला मिळावा ही प्रार्थना!

श्रीगुरुजी 24/07/2017 - 14:21
मुली चांगल्या खेळल्या. थोडासा अनुभव कमी पडला. १९१/३ वरुन १९६/५ झाल्यानंतर उरलेल्या सर्व जणी गडबडून गेल्या. विजय हातातोंडाशी आहे. संयम ठेवला तर व्यवस्थित जिंकू हे लक्षात न घेताच एकदम पॅनिक होऊन घाईगडबड केली. वेदा कृष्णमूर्ती आक्रमक खेळत होती. परंतु ती दोन वेळा वाचली होती. एकदा यष्टिरक्षकाला चेंडू नीट पकडता न आल्याने ती यष्टिचित होताहोता वाचली, तर दुसर्‍यांदा तिचा अगदी सोपा झेल सुटला. तरीसुद्धा ती चेंडू उचलून मारतच होती. २-३ वेळा उचललेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेला. थोडासा खाली असता तर झेल गेला असता. परंतु तिने संयम दाखविला नाही. दिप्ती शर्माने तीच चूक केली. ती खूप चांगली फलंदाज आहे. तिची सर्वाधिक धावसंख्या १८८ आहे. ती असताना शेवटच्या १८ चेंडूत १४ धावा हव्या होत्या व ७ गडी बाद झाले होते. फक्त स्ट्राईक रोटेट करीत १-१ धाव घेण्याची गरज होती. परंतु तिनेसुद्धा चेंडू उचलून मारून झेल दिला. इंग्लंडची फलंदाजी सुरू असताना ४४ षटकांत ६ बाद १८८ धावा होत्या. परंतु उर्वरीत ६ षटकात त्यांनी ४० धावा करताना चेंडू क्वचितच निर्धाव जाऊन दिला. त्यांचे फलंदाज जवळपास प्रत्येक चेंडूवर किमान १ धाव तरी घेत होते. भारताने शेवटी तसेच करायला हवे होते. ४२ चेंडूत फक्त ३८ धावा हव्यात आणि फक्त ३ गडी बाद अशा अवस्थेत सामना हरणे ही जवळपास अशक्यप्राय गोष्ट होती. परंतु मुलींनी ती अशक्य गोष्ट शक्य करून दाखविली. सामना जिंकता आला नसला तरी संपूर्ण स्पर्धेत मुली खूप चांगल्या खेळल्या. कालच्या सामन्याचे प्रक्षेपण २०० देशात केले गेले होते. यानिमित्ताने महिला क्रिकेटचे महत्त्व अधिक वाढो हीच सदिच्छा!

In reply to by श्रीगुरुजी

रुपी 25/07/2017 - 01:55
खरंय. काही काळापूर्वी महिला क्रिकेटबद्दल फार काही माहीत नसायचे. आता सामने पाहिले जात आहेत, इतक्या खेळाडूंची नावे माहीत आहेत, सगळीकडे इतकी चर्चा होत आहे यासुद्धा खूप सुखद बाबी आहेत. काल पूनम राऊत आणि हरमनप्रीतही चांगल्या खेळल्या. हरमनप्रीतने आल्यावर संथ सुरुवात केली, पण तेव्हा विकेट जाऊ न देणेही महत्त्वाचे होते.

डिस्क्लेमर : खालील लेखातील काही टीका-टिप्पणी ही माझी वैयक्तिक मते आहेत.अशा लेखात "मी आणि माझी मते", होणे स्वाभाविकच आहे.तस्मात माझ्या ह्या मतांकडे दूर्लक्ष करावे, ही विनंती. कुणीतरी ह्या विषयावर धागा काढेल असे वाटत होते पण..... एक श्रीलंकेविरूद्धचा सामना सोडला तर आजपर्यंत तरी भारतीय महिलांनी ह्या वेळी चांगली कामगिरी केली आहे. मिताली राज स्वतः एक अप्रतिम फलंदाज आणि एक उत्तम संघनायक तर आहेच पण ह्यावेळी स्मृती मंधाना आणि पूनम राऊत ह्यांच्यामुळे एक उत्तम ओपनिंग पण मिळत आहेच.

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

BANFF माऊंटन फिल्म फेस्टिवल (११ जुन २०१७ - पुणे)

मोदक ·

कंजूस 12/06/2017 - 07:49
डौनलोड करून पाहीन. )BANFF माऊंटन फिल्म फेस्टिवलचा ट्रेलर. L:https://youtube.com/watch?v=KvnyQau0yBc 1)Doing it Scared - L:https://youtube.com/watch?v=nncujMVkUz8 २) Locked in - L:https://youtu.be/cdcohQQcyIs L:https://youtube.com/watch?v=cdcohQQcyIs ३) Ruin and Rose - L:https://youtu.be/f2aJwydaF9Y L:https://youtube.com/watch?v=f2aJwydaF9Y ४) The Rocky Mountain Treverse - L:https://youtu.be/Ik0G0b3YZTY L:https://youtube.com/watch?v=Ik0G0b3YZTY ५) Metronomic - L:https://youtu.be/wq74jXacPFE L:https://youtube.com/watch?v=wq74jXacPFE ६) Ace and tte Dessert Dog - L:https://youtu.be/TIcMHDhOys4 L:https://youtube.com/watch?v=TIcMHDhOys4 ७) Poumaka - L:https://youtu.be/dFEcljP_g84 L:https://youtube.com/watch?v=dFEcljP_g84 ८) The Trail To Kazbegi - L:https://youtu.be/tmpMEBwnfQg L:https://youtube.com/watch?v=tmpMEBwnfQg ९) Young Guns - L:https://youtu.be/1mWxEfDQmZo L:https://youtube.com/watch?v=1mWxEfDQmZo १०) Danny MacAskill’s Wee Day Out - L:https://youtu.be/K_7k3fnxPq0 L:https://youtube.com/watch?v=K_7k3fnxPq0

मनापासून धन्यवाद.... मोदकाचा धागा उघडला की सहसा निराशा होत नाही, हे धाग्याला पण लागू पडले.... वाखूसा.... कंजूस ह्यांनी लिंक्स बद्दल त्यांचे पण आभार...

व्हिडीओ तर सगळे डाउनलोड करुच. पण एका बाबतीत मदत हवी होती. व्हिडीओ मि.पा. वर कसा अपलोड करायचा ? माझ्या धाग्यात मी केला होता, पण जमल नाही.

In reply to by दुर्गविहारी

मोदक 12/06/2017 - 18:40
१) व्हिडीओ वर राईट क्लिक करा.. २) कॉपी एम्बेड कोड ऑप्शनवर क्लिक करा (तो कोड कॉपी होईल) ३) मिपावर सरळ पेस्ट करा (हवे असेल तर विड्थ आणी लेंथ अ‍ॅडजस्ट करा) शिंपल हाये...

. नमस्कार मंडळी.. "BANFF माऊंटन फिल्म फेस्टिवल" बघण्याचा रविवारी योग आला. अचाट साहस आणि चिकाटीने पूर्ण केलेल्या १० वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमांवरील शॉर्ट फिल्म्स दाखवल्या गेल्या. आणखी फारसे वर्णन न करता सरळ फिल्म आणि त्यासंबंधी माहिती देतो. तसेच, या धाग्यामध्ये खूप व्हिडीओ द्यावे लागणार आहेत - धागा लोड होण्यास वेळ लागू शकतो.

विंटर स्पोर्ट - स्कीईंग...भाग१

इडली डोसा ·

स्रुजा 04/05/2017 - 17:16
अरे वा ! डिटेल माहिती. तुमचं सिमोर बरंच प्रसिद्ध आहे स्किईंग साठी. आमच्या पहिल्या स्किईंग नंतर जी काही वाट लागली होती ती आठवुन आज ही हसायला येतं. पण व्यक्तिश : मला आईस स्केटिंग जास्त आवडलं. आमच्या शहरात तर आख्खा कनाल फ्रीझ होतो त्यामुळे मिळेल तो वीकांत स्केटिंग करायला सोपं आणि तुलनेने स्वस्त पण पडतं

रुपी 05/05/2017 - 02:15
अरे वा! मस्त आम्हिती आणि छान फोटो. एक-दोन वेळा आइअसस्केटींग करताना दणकून मार खाल्ल्यामुळे आता स्कीइंगचीही भीती वाटायला लागली आहे. पण मुलांना शिकवायचं तर बहुतेक स्वतः करायचीही मनाची तयारी करावी लागेल.

सस्नेह 05/05/2017 - 16:33
रोचक प्रकार आहे ! ऐन उन्हाळ्यात बर्फातले फोटो बघून जीव गार गार झाला !!

विंजिनेर 06/05/2017 - 03:14
छान. आता "पिझा" ते हॉकी-स्टॉप हा प्रवास, बनी स्लोप वरून ब्लू आणि मग ब्लॅक डायमंड स्लोपवरचे असे सर्व अनुभव येउदे. जाता जाता - ट्रेनिंग सेशन मध्ये खाऊ पण म्हंजे बरच परवडेण्बल दिसतंय तुमचं स्की रिसॉर्ट. इथे तर चक्क लुटतात :(

गेल्या सहा सात वर्षात थंडीचे चार सहा महिने घराबाहेर पडायला अगदीच कमी वाव असायचा. थंडीचे विकेंड म्हणजे कोणाच्या तरी घरी जमून गप्पा गोष्टी, पॉट लक किंवा फार फार तर कुठेतरी इनडोअर ठिकाणाला भेट यापेक्षा जास्त इतके दिवस काही केलं नव्हतं. या वर्षी व्हॅंकुवरला शिफ्ट झाल्यामुळे लोकप्रिय विंटर स्पोर्ट असलेल्या स्किईंगचा अनुभव घेता आला. घरापासून ३० ते ५० मिनिटांच्या ड्राईव्हवर ३ स्की रिसॉर्ट असल्यामुळे आधी एखाद्य ठिकाणी जाऊन कसे वाटते ते बघू आणि मग पुढे शिकायचे कि नाही ते ठरवू असं ठरवलं.

द अंडरटेकर रिटायर्स

वेल्लाभट ·

अद्द्या 04/04/2017 - 15:55
आता खरोखर मोठे झालोय याचा भास होतोय साला . wwe बघणे केव्हाच सोडून दिलं. पण अधून मधून युट्युब वर suggested मध्ये यायचा अंडरटेकर .. जबरदस्त एंटरटेनर..

मला अजुनही कळालेलं नाही की ही मारामारी बघण्यात नक्की काय मजा आहे.. नवरा मात्र भक्त आहे. एकवेळ ते ही ठिकच.. पण हाईट म्हणजे माझ्या सासुबाईंना अंडरटेकर आवडायचा म्हणे.. आता बोला!

In reply to by पिलीयन रायडर

वेल्लाभट 04/04/2017 - 20:25
हााहााहा ज्याला आवडतं त्याला आवडतं! सासूबाईंचं नवल आहे. आवडण्याबद्दल नाही तर मागील पिढीतलं असून आवडण्याबद्दल. She seems to be ahead of time here.

Ranapratap 04/04/2017 - 21:01
अंडरटेकर ची मॅच पाहायला मजा येते. मी अजूनही wwe पाहतो. छान लेख आवडला.

आमचा केबलवाला काही वायर इकडे-तिकडे करायला किंवा बिलं घ्यायला आला कि आम्ही ५-६ वर्षाचे त्याला सांगायचो, "ओ अंकल अंडरटेकर-योकोझुना फ़ाईट जास्ती लगावो". काय मज्जा यायची त्या जापानी जाड्या आणि त्या प्रेतासारख्या दिसणाऱ्या अंडरटेकरला बघायला.

सावत्या 04/04/2017 - 23:32
रेस्टलिंगचा प्रचंड फॅन अजूनही.... मला आठवतंय ९/१० वि च्या दरम्यान प्रचंड क्रेझ होती आमच्या शाळेत. मधल्या सुट्टीत वर्गाचा दरवाजा लावून रेस्टलिंगचा खेळ चालायचा. रॉयल रम्बल, स्मॅक डाउन,रॉ, रेस्टल मॅनिया आणि काय काय.... बरं ह्या मॅचेस दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपण कंटिन्यू व्हायच्या. रेस्टलिंग कार्ड्स गेम तर चालू तासालापण चालायचा. ब्रेट हार्ट, त्याचा भाऊ ओवेन हार्ट, क्रश, डिझेल, टटॅन्का, योकोझुणा, लेक्स लुगर, केन, रेझर रेमोन, ट्रिपल एच आणि कितीतरी... पण माझा सर्वात आवडता होता तो शॉन मायकल..... खुरटी दाढी, लांब सोनेरी केस, सतत चुईंग गम चंगळणारा ,सहजासहजी न हरणारा... आणि दुसरा होता रॉक.. can you smell what the rock is cooking ... मस्त लेख.... परत त्या दिवसांची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद......

In reply to by वेल्लाभट

जगप्रवासी 05/04/2017 - 15:53
लहानपणापासून रॉकच्या दंडावर असणाऱ्या टॅटूच आकर्षण होत आणि मोठं होऊन कमावत झाल्यावर तो माझ्या दंडावर देखील कोरला गेला. अंडरटेकर बद्दल नेहमीच भीती वाटायची. लहानपणीच्या आठवणी जाग्या केलात.

भटक्या चिनु 05/04/2017 - 00:18
वेल्लाभाऊ, लेख जबरीच. दोन्ही घटना खूप खेदजनक. एकीकडे शास्त्रीय संगीताचा सूर हरपला तर दुसरीकडे आपले बालपण. अंडरटेकरचे खरे नाव Mark William Colaway. त्याच्याएवढी प्रसिद्धी व लोकांचे प्रेम क्वचितच काहींना मिळाले असणार. एका अ-मृत युगाचा अस्त. आता फार काही मजा नाही Wrestlemania बघण्यात.

In reply to by अप्पा जोगळेकर

हो स्क्रिप्टेड असतात ह्या मॅचेस. काहीही खरे नसते. लेखाने जुन्या आठवणी ताज्या झाल्या. लहान असताना केवळ अंडरटेकर ह्या व्यक्तीमुळे WWE ची गोडी लागली. ह्या फाईट खऱ्या असतात असेच तेव्हा वाटायचे. तो भूत होता, त्या बाटलीत त्याचा आत्मा होता, तो तीनवेळा मरून जिवंत झाला आहे अशा बऱ्याच गोष्टी तेव्हा खऱ्या वाटायच्या.

In reply to by अप्पा जोगळेकर

वेल्लाभट 05/04/2017 - 10:59
स्क्रिप्टेडच. कोरिएग्राफ्ड. अक्शयकुमारची मॅच तर खिलाडियोंका / इंटरनॅशनल खिलाडी मधली होती. बॅालिवुड. म्हणजे more than scripted.

In reply to by वेल्लाभट

तो खरा अंडरटेकर न्हवताच.. त्याच्यासारखा दिसणारा कोणीतरी दुसराच रेसलर होता. रेसलमानिया ३० मध्ये ब्रॉक लेसनरने २१-० स्ट्रिक मोडल्यावर जेवढे दुःख झाले न्हवते तेवढे या वर्षीची रेसलमानिया बघून झालं. मॅच हरल्यानंतर कोणताही गाजा-वाजा न करता रेसलिंग गिअर्स काढून रिंग मध्ये ठेवायचा क्षण तर एकदम भारीच. WWE च्या क्रिएटिव्ह टीम ला सलाम... पण वेळीच निवृत्त झाला, तसं पण रेसलमानिया ३० पासूनच वाघ आता म्हातारा झालाय हे जाणवत होतंच. त्यात त्याला काँकशन झालेलं, त्यामुळे शरीरावर अजून काही परिणाम व्हायच्या आधी निवृत्त झाला हे चांगलंच झालं. माझं बालपण मात्र संपलं आता. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी #ThankYouTaker #Phenom #Legend

In reply to by प्रसन्न३००१

वेल्लाभट 05/04/2017 - 12:40
तो खरा अंडरटेकर न्हवताच.. त्याच्यासारखा दिसणारा कोणीतरी दुसराच रेसलर होता.
अर्थातच ! पण वाटला ना? बास :) हो तो म्हातारा झालाच होता. डब्ल्यू डब्ल्यू ई च्या क्रिएटिव टीमला खरंच सलाम. काँकशन बद्दल माहिती नव्हतं. तुमचा प्रतिसाद वाचून तेही शोधलं गूगलवर. नवीन माहिती कळली. #मिसयूटेकर फॉर शुअर. देअर विल बी ओनली वन अंडरटेकर. ओनली वन.

In reply to by वेल्लाभट

खिलाडीओं का खिलाडी मधली अंडरटेकर - अक्षय कुमार फाईट बघताना तेव्हा अजून एक गोष्ट जाणवायची कि शॉन माइकल्स हा एका साईड ने अक्षय कुमार सारखा दिसतो :D

In reply to by प्रसन्न३००१

वेल्लाभट 05/04/2017 - 13:10
हो ! हे लक्षातच नव्हतं आलं. पण शॉन मायकल्स चं ट्रिब्यूट चं गाणं जाम आवडतं. काटा आणतं बा अंगावर ऐकताना. टेल मी अ लाय, से दॅट यू वोन्ट गो. जरूर ऐका. "Tell Me A Lie (Hbk Tribute)" Lyrics WWF Superstars I've known you all my life At least thats how it seems Never known my own way Livin' out of dreams Now I know you're leaving me And I'll never understand Before I let you walk away I have one last demand Tell me a lie, and say that you wont go Look in my eyes, and hold me even though I realize you have to walk away No more yesterday... You always were my angel Flying high above Always lookin out for me Angel that I love Now my dreams are fading Like age-old photographs They hurt too much to look at now Reminds Me Of Our Past Tell me a lie, and say that you wont go Look in my eyes, and hold me even though I realize you have to walk away No more yesterday... Maybe we could stay together Maybe it could last forever Maybe if you'd just tell me a lie Maybe then we'll never say goodbye जाऊदे. हार्ट ब्रेक किड वर एक धागा लिहिणं आलं आता. :(

In reply to by वेल्लाभट

चांगलं आहे ट्रिब्युट सॉंग... पण हे फॅन-मेड आहे का WWE चं ऑफिशिअल ट्रिब्यूट व्हिडीओ आहे. १९९९ मध्ये दुखापतींना, नशेबाजी मुळे आणि त्यातून आलेल्या नैराश्याला कंटाळून शॉन ने निवृत्ती घेतली होती, तेव्हाचा हा व्हिडीओ वाटतोय. Shawn Michaels Tribute Video हा ट्रिब्यूट व्हिडीओ बघा, मस्त आहे :)

किसन शिंदे 05/04/2017 - 14:24
डब्लू डब्लू एफच्या फाईट्स त्या केवळ हल्क हॉगन आणि हिटमॅनमुळे पाहायला सुरुवात केल्या होत्या. यथावकाश अंडरटेकर, बिग शो, द रॉक, रे मिस्टेरियो ही मंडळीही आवडली होतीच.

आज सकाळी एकीकडे किशोरी ताईंच्या निधनाची बातमी वाचली आणि दुसरीकडे अंडरटेकर पुन्हा कधीच रिंगमधे येणार नसल्याची. किशोरी ताई निवर्तल्या, अंडरटेकर निवृत्त झाला. एकीकडे सूर, तर दुसरीकडे WWE मधला असुर. इकडे सम, तर तिकडे दम. दोनही गोष्टी 'आता पुन्हा नाहीत' हे मात्र साम्य होतं. कदाचित बरेच जण रेस्लिंग किंवा WWE बघणारे नसतील, पण अंडरटेकर हे नाव तरीही त्यांनी ऐकलेलं असेल. कारण त्याचा करिश्माच तसा होता.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९७५ ते २०१५ - आणखीन काही... (अंतिम भाग)

स्पार्टाकस ·

गॅरी ट्रुमन 15/03/2017 - 09:54
१९९९ च्या वर्ल्डकपमध्ये सौरभ गांगुली श्रीलंकेच्या बॉलर्सवर तुटून पडला होता तेव्हा सुनील गावसकर समालोचन करताना म्हणाला होता---"This is amazing. This is magnificent. This is fantastic. This is simply superb." स्पार्टाकसरावांच्या या लेखमालेविषयीही नेमके असेच म्हणावेसे वाटत आहे.

गॅरी ट्रुमन 15/03/2017 - 10:00
"बडे मियां तो बडे मियां, छोटे मियां सुभान अल्ला"
हो हे अगदी कालपरवा घडल्यासारखे लक्षात आहे. भारताच्या त्या डावातील शेवटच्या ८ ओव्हर्सच बघण्यासारख्या होत्या. मुंबईतील सेमीफायनलमध्ये परत एकदा किरण मोरे असा काहीतरी चमत्कार करेल अशी वेडी आशा होती. पण तसे काही झाले नाही :( कॉमेन्टेटर रवी चतुर्वेदींच्या आणखी दोन अदा आठवतात. पहिली अदा म्हणजे सवालजबाब आणणे. म्हणजे "जबतक टेस्ट क्रिकेटका सवाल है सुनील गावसकरने सबसे ज्यादा रन्स बनाये है" (त्या काळी) अशाप्रकारे ते जबतक इसका सवाल है, जबतक उसका सवाल है वगैरे सवालजबाब कॉमेन्टरी करताना आणत असत. दुसरी अदा म्हणजे "संघर्षमय क्रिकेट चल रहा है, भारत के बल्लेबाजोंकी अच्छी बल्लेबाजी, ऑस्ट्रेलियाके गेंदबाजोंकी अच्छी गेंदबाजी के बीच का संघर्ष चल रहा है" अशाप्रकारे काहीसे बोलायचे.

तुफान फटकेबाजी केलीत तुम्ही स्पार्टाकस राव अप्रतिम लेख 1992 पर्यंत ची तर काहीच माहिती नव्हती आणि त्यानंतर च्या तर आठवणी.. त्या तुम्ही जाग्या केल्या..वहाब रियाझ च्या बॉल वर वॉटसन च्या सुटलेल्या कॅच चं वर्णन वाचून हसून हसून बेजार झालो .. सुंदर लेखमालेबद्दल शतश: धन्यवाद

श्रीगुरुजी 15/03/2017 - 15:22
चांगली लेखमाला. बर्‍याच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि बर्‍याच नवीन गोष्टी समजल्या. विश्वचषक स्पर्धेबद्दल लिहिण्यासारखे खूप काही आहे. सर्वच अनुभव एकाच व्यक्तीच्या लक्षात असणे शक्य नाही. या लेखात न आलेले मी माझे काही अनुभव सांगतो. १) २०१५ ची स्पर्धा - पाकड्यांविरूद्ध विंडीज प्रथम फलंदाजी करताना ४० षटकांनंतर विंडीजची धावसंख्या ४ बाद १९५ होती. परंतु नंतर डॅरन सॅमी (२८ चेंडूत ३०), लेंडल सिमन्स (४६ चेंडूत ५०) आणि आंद्रे रसेल (१३ चेंडूत ४२) यांनी पुढील १० षटकांत ११५ धावा करून धावसंख्या ३१० पर्यंत नेली. पाकड्यांची फलंदाजी सुरू झाल्यावर जेरमी टेलरच्या पहिल्या षटकाच्या दुसर्‍याच चेंडूवर नासिर जमशेद शून्यावर बाद झाला (१ बाद ०) व सहाव्या चेंडूवर युनिस खान बाद झाला (२ बाद १). जेसन होल्डरचे दुसरे षटक निर्धाव गेले. डावाच्या तिसर्‍या व टेलरच्या दुसर्‍या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हॅरिस सोहेल बाद झाला (३ बाद १). पुढच्याच होल्डरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अहमद शहझाद बाद झाल्याने ३.१ षटकांनंतर पाकड्यांची अवस्था ४ बाद १ इतकी भयंकर झाली होती. हा सामना अर्थातच विंडीजने १५० धावांनी जिंकला. २) याच स्पर्धेत भारत वि. बांगला हा उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरू असताना भारत प्रथम फलंदाजी करीत होता. रोहीत शर्मा ८० च्या आसपास खेळत असताना त्याला एक चेंडू कंबरेपाशी फुल्टॉस आल्याने पंचांनी तो नोबॉल जाहीर केला. शर्माने तो मिडविकेट सीमारेषेजवळ उचलल्यावर त्याचा झेल घेतला गेला. परंतु नोबॉल जाहीर केल्याने त्याला बाद न देता फ्रीहिट मिळाली. रिप्लेमध्ये तो चेंडू कंबरेच्या किंचित खालीच असल्याचे दिसले. परंतु आधीच नोबॉल दिल्याने आता निर्णय फिरविता येणार नव्हता. भारताने ५० षटकात एकूण ३०३ धावा केल्या होत्या. नंतर बांगलाची फलंदाजी सुरू असताना महंमदुल्लाने स्क्वेअरलेगला उंच मारलेला चेंडू शिखर धवनने सीमारेषेजवळ अचूक झेलला. रिप्लेमध्ये त्याचा पाय सीमारेषेवरील जाहिरात फलकांचा अगदी जवळ असल्याचे दिसत होते. अनेक वेगवेगळ्या कोनातून रिप्ले पाहूनसुद्धा त्याचा पाय फलकाला लागला आहे का नाही याचा निर्णायक पुरावा मिळत नव्हता. त्यामुळे त्याचा पाय सीमारेषेला लागला असे खात्रीलायक सांगता येत नसल्याने पंचांनी महंमदुल्लाला बाद ठरविले. हा सामना बांगला हरल्यानंतर बांगला खेळाडूंनी व बांगला देशातील प्रेक्षकांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया व संताप व्यक्त केला. बांगलादेशात सर्वत्र जोरदार निदर्शने झाली. बांगलाच्या म्हणण्यानुसार त्या सामन्यात पंचांनी १२-१३ चुका केल्या होत्या व त्या सर्व बांगलाविरूद्ध होत्या. बांगलाला ठरवून हरविण्यात आले अशी त्यांची समजूत झाली होती. बांगलाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देखील पंचगिरीविरूद्ध तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यावेळी आयसीसीचे अध्यक्षपद बांगलाकडे होते (त्यांचे नाव आठवत नाही). त्यांनी संतापून अंतिम सामन्यावर बहिष्कार टाकल्याने विजेत्या ऑसीज संघाला करंडक भारताच्या श्रीनिवासन यांच्या हस्ते देण्यात आला होता. एकंदरीत बांगला खेळाडूंना पराभव अजिबात सहन होत नाही. स्वतः लिंबूटिंबू असले तरी आपण कोणतरी महान संघ आहोत अशा आविर्भावात ते असतात. ३) १९९२ ची स्पर्धा पाकड्यांनी केवळ नशिबाने जिंकली होती. पहिल्या सामन्यात विंडीजकडून पराभव पत्करल्यानंतर पाकड्यांनी दुसर्‍या सामन्यात झिंबाब्वेला हरवून २ गुण मिळविले.तिसर्‍या इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकड्यांना सर्वबाद फक्त ७४ धावा करता आल्या होत्या. पाकड्यांचा पराभव नक्की होता. पाकड्यांच्या सुदैवाने नंतर दिवसभर पाऊस आल्याने सामना रद्द करण्यात आला व पाकड्यांना सामना अनिर्णित राहिल्याने १ गुण मिळाला. त्यानंतरचे दोन सामने (भारत व आफ्रिकेविरूद्ध) पाकडे हरल्याने ५ सामन्यानंतर पाकड्यांकडे फक्त ३ गुण जमा होते (१ विजय व १ अनिर्णित). पाकड्यांनी पुढील तीनही सामने जिंकले (ऑस्ट्रलिया, श्रीलंका व न्यूझिलंड विरूद्ध) व आपली गुणसंख्या ९ वर नेली व ऑस्ट्रेलियापेक्षा फक्त १ गुण जास्त असल्याने त्यांना ४ थ्या क्रमांकाचा संघ म्हणून उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला. ऑस्ट्रेलियाचे ८ गुण होते व जर पाकड्यांना इंग्लंडविरूद्ध नशीबाने १ गुण मिळाला नसता तर दोन्ही संघांचे समान गुण होऊन सरस धावगतीवर ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत आले असते. ४) जावेद मियांदाद व सचिन यांनी सर्वाधिक म्हणजे ६ विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला आहे. त्याखालोखाल पाँटिंग, मुरलीधरन व चंदरपाल यांनी ५ स्पर्धात भाग घेतलेला आहे. बहुतेक केनयाच्या थॉमस ओडोयोने सुद्धा ५ स्पर्धात भाग घेतलेला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

स्पार्टाकस 15/03/2017 - 20:33
त्यावेळी आयसीसीचे अध्यक्षपद बांगलाकडे होते (त्यांचे नाव आठवत नाही). त्यांनी संतापून अंतिम सामन्यावर बहिष्कार टाकल्याने विजेत्या ऑसीज संघाला करंडक भारताच्या श्रीनिवासन यांच्या हस्ते देण्यात आला होता.>>>>>> आयसीसीचा अध्यक्ष होता बांग्लादेशचा मुस्तफा कमाल. रोहीत शर्माला नॉटआऊट देण्यावरुन या कमालनेच बराच गदारोळ केला होता. अंपायर्सच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेण्यापर्यंतही त्याची मजल गेली होती. धमाल म्हणजे नो बॉल देणारा अंपायर होता पाकिस्तानचा आलिम दर! फायनलनंतर ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप देण्यासाठी मुस्तफा कमाल ऐवजी श्रीनिवासनला बोलावण्यात आल्यावरही त्याने असाच थयथयाट केला होता. आयसीसीचा अध्यक्ष म्हणून आपल्याला वर्ल्डकप देण्याचा अधिकार आहे असा त्याचा दावा होता, पण त्याला कोणी भीक न घातल्याने त्याने राजिनामा दिला. जावेद मियांदाद व सचिन यांनी सर्वाधिक म्हणजे ६ विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला आहे. त्याखालोखाल पाँटिंग, मुरलीधरन व चंदरपाल यांनी ५ स्पर्धात भाग घेतलेला आहे. बहुतेक केनयाच्या थॉमस ओडोयोने सुद्धा ५ स्पर्धात भाग घेतलेला आहे.>>>>>> ५ वर्ल्डकप्स खेळणारे बरेच खेळाडू आहेत . पाकिस्तान - इमरान, अक्रम, इंझमाम, आफ्रिदी श्रीलंका - रणतुंगा, अरविंदा, जयसूर्या, मुरली, जयवर्धने वेस्ट इंडीज - लारा, चँडरपॉल ऑस्ट्रेलिया - पाँटींग दक्षिण आफ्रीका - कॅलीस केनिया - स्टीव्ह टिकोलो, ओडोयो न्यूझीलंडचा डॅनियल व्हिटोरी २००३, २००७, २०११, २०१५ मध्ये प्रत्यक्ष खेळला. १९९९ च्या वर्ल्डकपमध्ये तो स्क्वाडमध्ये होता पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.

In reply to by श्रीगुरुजी

चावटमेला 16/03/2017 - 00:19
एकंदरीत बांगला खेळाडूंना पराभव अजिबात सहन होत नाही. स्वतः लिंबूटिंबू असले तरी आपण कोणतरी महान संघ आहोत अशा आविर्भावात ते असतात.
अगदी अगदी

चिनार 15/03/2017 - 16:54
खरोखर जबरदस्त लेखमाला... स्पार्टाकसभाऊ..प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया देणे शक्य झाले नसले तरी ही त्या सगळ्या लेखांवरची पोचपावती समजा.. तुमचा क्रिकेटचा व्यासंग थक्क करणारा आहे. एक सच्चा क्रिकेटप्रेमीच हे करू शकतो. या अप्रतिम लेखमालेसाठी शतश: धन्यवाद !!!!

श्रीगुरुजी 15/03/2017 - 20:39
या लेखमालेमुळे मला प्रचंड पडझड अर्थात ग्रेट कोलॅप्स या विषयावर लेख लिहावासा वाटत आहे. मागच्याच महिन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताचा डाव ३ बाद ९४ वरून सर्वबाद १०५ असा कोसळला होता. पूर्वी पाकिस्तानविरूद्ध एका कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव ३ बाद ३०५ वरून सर्वबाद ३१० असा कोसळला होता. १९९६ च्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेविरूद्ध भारत १ बाद ९८ वरून ८ बाद १२० अशा दयनीय अवस्थेत कोसळला होता. सामन्याला कलाटणी देणार्‍या अशा पडझडींवर एक लेख लिहायचा विचार आहे.

In reply to by श्रीगुरुजी

स्पार्टाकस 15/03/2017 - 21:57
ऑस्ट्रेलियाची ३०५ /३ वरुन ३१० मध्ये कोसळलेली इनिंग्ज म्हणजे सर्फराज नवाजने १ रनमध्ये ७ विकेट्स घेतलेली मॅच ना?

In reply to by श्रीगुरुजी

गॅरी ट्रुमन 16/03/2017 - 09:45
अशाप्रकारेच १९९६ च्या दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौर्‍यातील अहमदाबादच्या पहिल्या टेस्टमध्ये सचिनने अनपेक्षितपणे श्रीनाथला बॉलिंग करायला दिली. १७५ (?) रन्सचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका ४ बाद ९५ अशा त्यामानाने ठिक स्थितीत होती. त्यावेळी कुंबळे किंवा अन्य कोणा स्पिनरला बॉलिंग दिली जाईल अशी अपेक्षा होती. पण अनपेक्षितपणे सचिनने बॉलिंग दिली श्रीनाथला. आणि श्रीनाथच्या त्या खतरनाक स्पेलमध्ये दक्षिण आफ्रिकेची दाणादाण उडाली. अवघ्या १० रन्समध्ये उरलेल्या ६ विकेट्स पडल्या आणि १०५ मध्ये सगळा संघ ऑल आऊट झाला.

श्रीगुरुजी 15/03/2017 - 22:53
बरोबर. १९७९ मधील सिडनेतील त्या सामन्यात ऑसीज विजयासाठी ३८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ३ बाद ३०५ अशा सुस्थितीत होते. बॉर्डर २०५ व किम ह्यूज ८४ धावांवर खैळत असताना सर्फराझ नवाझने एक भन्नाट स्पेल टाकून केवळ ३३ चेंडूत १ धाव देऊन ७ बळी घेऊन ऑस्ट्रेलियाचा डाव ३१० मध्ये सपविला होता. त्या डावात त्याने ८६ धावांत ९ बळी घेतले होते.

In reply to by प्रसाद_१९८२

श्रीगुरुजी 16/03/2017 - 14:41
या स्पेलची चित्रफीत उपलब्ध आहे. परंतु ती अत्यंत खराब असल्याने (१९७९ मधील चित्रीकरण) गोलंदाजीच्या भेदकतेची अजिबात कल्पना येत नाही. सर्फराज नवाझसारखाचे एक भेदक स्पेल कर्टली अ‍ॅम्ब्रोसने १९९३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध टाकला होता. ऑस्ट्रेलियाचा डाव २ बाद ८५ वरून सर्वबाद ११९ असा कोसळला होता त्यात अ‍ॅम्ब्रोसने केवळ १ धाव देऊन ७ बळी घेतले होते. यातील एकाचा झेल एक्स्ट्रा कव्हरमध्ये उडाला होता. बाकीचे सहा जण यष्टीरक्षक किंवा स्लीपमध्ये झेल देऊन बाद झाले होते. या स्पेलची बर्‍यापैकी दिसणारी चित्रफीत - https://www.youtube.com/watch?v=a5G4pqb4nns

गामा पैलवान 27/03/2017 - 02:02
स्पार्टाकस, तुमच्या व्यासंगाची आणि संयमाची कमाल आहे. न थकता इतकं लिहायचं, प्रतिसाद मिळोत वा ना मिळोत. यासाठी मनापासून आवडच असली पाहिजे. आ.न., -गा.पै.

१९७५ ते २०१५ या चाळीस वर्षांमधल्या ११ वर्ल्डकप्समधल्या अविस्मरणीय आणि थरारक अशा ४२ मॅचेसनंतर आणि वर्ल्डकपमधल्या जायंट किलर्स ठरलेल्या मॅचेसबद्दल लिहील्यावर विचार करताना असं जाणवलं की अद्यापही बरंच काही बाकी राहीलेलं आहे. एखाद्या बॅट्समनची अप्रतिम इनिंग्ज, एखाद्या बॉलरचा अचूक आणि तितकाच घातक स्पेल, अप्रतिम आणि अविश्वसनीय फिल्डींग, एखाद्या कॅप्टनची कल्पनेपेक्षाही यशस्वी ठरलेली चाल किंवा बूमरँगप्रमाणे उलटलेला निर्णय अशा कित्येक गोष्टी वर्ल्डकपमध्ये घडल्या आहेत.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९७५ ते २०१५ - जायंट किलर्स

स्पार्टाकस ·

तुम्हाला जेवढी क्रिकेट ची माहिती आहे तेवढी क्रिकेट क्षेत्रातील रवी शास्त्री ,हर्षा भोगले गावस्कर वगैरे तज्ज्ञांना सुद्धा नसेल

समलोचकांवर लेख होऊ शकेल का कारण काही समालोचक उदा इयान स्मिथ ,डेविड लॉईड, माईक हेसमन, मायकल स्लेटर, नासिर हुसेन,रवी शास्त्री आपल्या समलोचनाने रटाळ मॅचमध्ये हि जान आणतात आणि संजय मांजरेकर ,इयान चॅपल, टोनी कोझीएर , लक्ष्मण शिवरमकृष्णन यांचा आवाजही ऐकवत नाही

In reply to by किसन शिंदे

होय कि खरं.. टोनी ग्रेग ला मी कसकाय विसरलो शारजा मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सचिन ने केलेल्या बॅटिंग चे जबरदस्त वर्णन टोनी ग्रेग ने केले होते कासप्रोव्हिच ला सरळ मारलेला तो षटकार.. oh this is high... what a six..what a six..way down the ground..

In reply to by लोनली प्लॅनेट

श्रीगुरुजी 14/03/2017 - 14:50
डेव्हिड लॉईड, रवी शास्त्री, शिवरामकृष्णन्, रसेल अर्नॉल्ड, इयान चॅपेल हे अत्यंत कंटाळवाणे व रटाळ समालोचक आहेत. मांजरेकर, नासिर हुसेन तुलनेने बरे आहेत. गावसकर, हर्षा भोगले, शेन वॉर्न इ. चे समालोचन ऐकायला आवडते. पूर्वी बॉयकॉट चांगले समालोचन करायचा. आजारपणामुळे तो आता नसतो.

श्रीगुरुजी 14/03/2017 - 15:06
चांगला लेख. २००३ च्या वर्ल्डकपमध्ये ५ विकेट्स घेणारा पहिला बॉलर कोण? बहुतेक सर्वांचं उत्तर इंग्लंडविरुद्ध ७ विकेट्स काढणारा अँडी बिकल किंवा ६ विकेट्स घेत इंग्लंडलाच उध्वस्तं करणारा आशिश नेहरा हे असेल! स्मृतीला आणखीन ताण देणार्‍यांना बिकलने इंग्लंडची धूळधाण करण्यापूर्वी ग्लेन मॅकग्राथने लिंबूटिंबू असलेल्या नामिबियाविरुद्ध ७ विकेट्स घेतल्याचंही आठवेल. पण ऑस्टीन कॉडरिंग्टन हे नाव कोणाच्या स्वप्नाततरी येईल असं निदान मला तरी वाटत नाही. पण मूळचा जमेकन असलेल्या या ऑस्टीन कॉटरिंग्टननेच या वर्ल्डकपमध्ये सर्वात प्रथम ५ विकेट्स उडवल्या होत्या त्या बांग्लादेशविरुद्धं! http://www.espncricinfo.com/ci/engine/current/match/65243.html २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेच्या चामिंडा वासने बांगलादेशविरूद्ध सामन्याच्या पहिल्याच षटकात पहिल्या ३ चेंडूत हॅटट्रिक घेतली होती. त्याच षटकातल्या ५ व्या चेंडूवर त्याने ४ था बळी घेतला होता. त्या सामन्यात त्याने एकूण ६ बळी घेतले होते. बांगलाच्या डावाचे पहिलेच षटक असे पडले. पहिला चेंडू - हन्नन सरकार त्रिफळा वास ० (बांगला १ बाद ०) दुसरा चेंडू - महंमद अश्रफुल झेल व गोलंदाज वास ० (बांगला २ बाद ०) तिसरा चेंडू - एहसानुल हक झेल जयवर्धने गोलंदाज वास ० (बांगला ३ बाद ०) चौथा चेंडू - संवर हुसेनचा चौकार (बांगला ३ बाद ४) पाचवा चेंडू - वाईड (बांगला ३ बाद ५) पाचवा चेंडू - संवर हुसेन पायचित वास ४ (बांगला ४ बाद ५) सहावा चेंडू - अलोक कपालीने नुसताच खेळून काढला. पहिले षटक संपल्यानंतर बांगला ४ बाद ५, चामिंडा वास १-०-५-४. बांगलाचा ५ वा फलंदाज अल सहरियार ५ व्या षटकात वासच्याच गोलंदाजीवर बाद झाला. एखाद्या सामन्यातले पहिले पाचही बळी एकाच गोलंदाजाने घेण्याची ही बहुदा पहिलीचे वेळ असावी. तसेच डावाच्या पहिल्याच षटकातील पहिल्या ३ चेंडूंवर हॅटट्रिक घेण्याचा हा एकमेव प्रसंग असावा. या सामन्यात बांगलाने सर्वबाद १२४ धावा केल्यानंतर (वासचे ६ बळी) श्रीलंकेने २१.१ षटकात नाबाद १२६ धावा करून एक जबरदस्त विजय मिळविला होता.

वर्ल्डकपच्या इतिहासात अनेक अविस्मरणीय आणि थरारक मॅचेसबरोबरच काही कमालीच्या कंटाळवाण्या आणि एकतर्फी मॅचेसही अनेकदा झालेल्या आहेत. खासकरुन टेस्ट दर्जा असलेल्या संघांबरोबरच आयसीसीने क्रिकेटचा प्रसार करण्याच्या हेतूने टेस्ट दर्जा नसलेल्या संघांचाही वर्ल्डकपमध्ये समावेश करण्यास सुरवात केल्यावर हे प्रमाण वाढलेलं दिसून येतं, इतकं की २०१९ चा इंग्लंडमधला वर्ल्डकप हा १० देशांमध्येच खेळवण्याचा आयसीसी ने निर्णय घेतला आहे! हा निर्णय काहीसा वादग्रस्तं असला तरी निरर्थक मॅचेसची संख्या कमी होण्यास हातभार लावणारा आहे हे देखिल तितकंच खरं.

वर्ल्डकप क्लासिक्स - २०१५ - सेमीफायनल - दक्षिण आफ्रीका विरुद्ध न्यूझीलंड

स्पार्टाकस ·

माझी अत्यंत आवडती मॅच, न्यूझीलंड चा मी कायमस्वरूपी पाठराखा असल्यामुळे ( हो अगदी भारताविरुद्ध सुद्धा) सुरुवाती पासूनच प्रचंड टेन्शन आले होते या ए बी डिव्हिलियर्स ज्याप्रमाणे बॅटिंग करत होता ते सहज 350 करतील असे वाटत होते ब्रेंडन मॅककल्लूम ने प्रचंड दडपण असताना त्यांची जी धुलाई केली त्याला तोड नाही कोरी अँडरसन ची खेळी हि विसरता येणार नाही दक्षिण आफ्रिकेबद्दल बोलायचे झाले तर ते जोपर्यंत कोटा पद्धत चालू ठेवतील तोपर्यंत एकही ICC स्पर्धा जिंकू शकणार नाहीत इलियट चा कॅच डुमिनी आणि बेहर्दिन या डॉन कोटा वाल्यानीच सोडला आणि दक्षिण आफ्रिकेच्या पदरी पराभव पडला

ह्या सामन्यानंतर रडणारे आफ्रिकेचे खेळाडू पाहून १९९६ ची श्रीलंकेविरुद्धची सेमीफायनल गमावल्यावर रडणारा विनोद कांबळी आणी मी स्वत: आठवले होते.

२४ मार्च २०१५ इडन पार्क, ऑकलंड ऑकलंडच्या इडन पार्कवर यजमान न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात वर्ल्डकपची पहिली सेमीफायनल रंगणार होती. क्वार्टरफायनलमध्ये मार्टीन गप्टीलच्या २३७ रन्सच्या इनिंग्जमुळे न्यूझीलंडने वेस्ट इंडीजला १४३ रन्सनी धूळ चारली होती तर श्रीलंकेविरुद्धची क्वार्टरफायनल आरामात जिंकून दक्षिण आफ्रीकेने सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता. १९९२ मधल्या आपल्या पहिल्या वर्ल्डकपपासून अखेर ७ व्या वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रीकेने नॉकआऊट स्टेजमध्ये आपली पहिली मॅच जिंकण्यात यश मिळवलं होतं. न्यूझीलंडची ही ७ वी सेमीफायनल तर दक्षिण आफ्रीकेची ४ थी!