मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रीडा

वर्ल्डकप क्लासिक्स - २०१५ - आयर्लंड विरुद्ध झिंबाब्वे

स्पार्टाकस ·
७ मार्च २०१५ बेलरीव्ह ओव्हल, होबार्ट ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया बेटावरच्या होबार्टमधल्या बेलरीव्ह ओव्हलवर पूल बी मधली आयर्लंड आणि झिंबाब्वे यांच्यातली मॅच होणार होती. क्वार्टरफायनलमध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही मॅच अत्यंत महत्वाची होती. आयर्लंडने वेस्ट इंडीज आणि संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध विजय मिळवला असला तरी दक्षिण आफ्रीकेविरुद्धं त्यांना तब्बल २०० रन्सनी पराभव पत्करावा लागला होता. झिंबाब्वेने संयुक्त अरब अमिरातीविरुद्धची मॅच जिंकली असली तरी दक्षिण आफ्रीका, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानने त्यांना धूळ चारली होती.

वर्ल्डकप क्लासिक्स - २०१५ - ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड

स्पार्टाकस ·
२८ फेब्रुवारी २०१५ इडन पार्क, ऑकलंड न्यूझीलंडच्या उत्तर बेटावरच्या ऑकलंडच्या ईडन पार्कच्या मैदानात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन यजमान देशांतली पूल ए मधली मॅच रंगणार होती. न्यूझीलंडने श्रीलंका, इंग्लंड आणि स्कॉटलंड यांचा पराभव करुन आपल्या पहिल्या तीनही मॅचेस जिंकल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या मॅचमध्ये इंग्लंडला आरामात धूळ चारली होती, पण बांग्लादेशविरुद्ध ब्रिस्बेनच्या दुसर्‍या मॅचवर पाऊस पडला होता, त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने ही मॅच विशेष महत्वाची होती. ही मॅच जिंकल्यास क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश मिळवणं ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने सुकर होणार होतं.

वर्ल्डकप क्लासिक्स - २०१५ - अफगाणिस्तान विरुद्ध स्कॉटलंड

स्पार्टाकस ·
२०१५ चा वर्ल्डकप हा १९९२ च्या वर्ल्डकपनंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेला दुसरा वर्ल्डकप होता. २०११ च्या वर्ल्डकपप्रमाणेच ग्रूपमधल्या मॅचेसनंतर क्वार्टरफायनल, सेमीफायनल आणि फायनल अशा पद्धतीने मॅचेस खेळवण्यात येणार होत्या. २०११ च्या वर्ल्डकपप्रमाणेच १४ संघांचा या वर्ल्डकपमध्ये समावेश करण्यात आला होता. २०११ च्या वर्ल्डकपप्रमाणेच या वर्ल्डकपसाठीही ब्रँड अँबॅसेडर म्हणून सचिन तेंडुलकरची नेमणूक करण्यात आली होती.

वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - फायनल - भारत विरुद्ध श्रीलंका

स्पार्टाकस ·
२ एप्रिल २०११ वानखेडे, मुंबई भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडीयममध्ये वर्ल्डकपचे संयुक्त यजमान असलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यात वर्ल्डकपची फायनल रंगणार होती. वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दोन आशियाई संघ समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ होती. सेमीफायनलमध्ये श्रीलंकेने कोलंबोला न्यूझीलंडचा पराभव केला होता तर भारताने मोहालीला पारंपारीक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमधलं आपलं रेकॉर्ड ५-० असं पुढे नेलं होतं.

वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - सेमीफायनल - भारत विरुद्ध पाकिस्तान

स्पार्टाकस ·
३० मार्च २०११ पीसीए, मोहाली चंदीगडमधल्या मोहालीच्या मैदानात 'Mother of all contests' - भारत आणि पाकिस्तान या पारंपारीक कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधली दुसरी सेमीफायनल रंगणार होती. क्वार्टरफायनलला भारताने सलग ३ वेळा वर्ल्डकप जिंकणार्‍या ऑस्ट्रेलियाला बाहेरचा रस्ता दाखवला होता तर पाकिस्तानने वेस्ट इंडीजचा अक्षरशः खिमा केला होता. या सेमीफायनलमधील विजेत्या संघाची फायनलमध्ये मुंबईला वानखेडेवर श्रीलंकेशी गाठ पडणार होती. क्वार्टरफायनलमध्ये दक्षिण आफ्रीकेला धूळ चारणार्‍या न्यूझीलंडचा श्रीलंकेपुढे मात्रं निभाव लागला नव्हता.

वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - क्वार्टरफायनल - दक्षिण आफ्रीका विरुद्ध न्यूझीलंड

स्पार्टाकस ·
२५ मार्च २०११ शेरे बांगला, मीरपूर बांग्लादेशची राजधानी असलेल्या ढाक्क्यातल्या मीरपूरच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडीयममध्ये दक्षिण आफ्रीका आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्डकपची तिसरी क्वार्टरफायनल रंगणार होती. आदल्या दिवशीच महेंद्रसिंग धोणीच्या भारतीय संघाने क्वार्टरफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाची वर्ल्डकपमधली सद्दी संपुष्टात आणल्यामुळे १९९९ नंतर प्रथमच ऑस्ट्रेलिया सोडून दुसर्‍या संघाला वर्ल्ड चँपियन होण्याची संधी मिळणार होती. ऑस्ट्रेलियानंतर या वर्ल्डकपचा प्रमुख दावेदार म्हणून अर्थातच दक्षिण आफ्रीकेकडे पाहिलं जात होतं.

वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - इंग्लंड विरुद्ध आयर्लंड

स्पार्टाकस ·
२ मार्च २०११ चिन्नास्वामी, बँगलोर बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडीयममध्ये ग्रूप बी मधली इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातली मॅच रंगणार होती. अवघ्या ३ दिवसांपूर्वी याच स्टेडीयमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टाय झालेल्या मॅचची धुंदी अद्याप बँगलोरच्या प्रेक्षकांवरुन उतरलेली नव्हती. हॉलंडविरुद्धं पहिली मॅच कण्हतकुंथत जिंकल्यावर आणि भारताविरुद्धची मॅच टाय झाल्यामुळे इंग्लंडच्या दृष्टीने ही मॅच महत्वाची होती. २०१५ च्या पुढल्या वर्ल्डकपमध्ये टेस्ट स्टॅटस न मिळालेल्या संघांची संख्या मर्यादीत करण्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे आयर्लंडच काय पण इतर असोसिएट संघांमध्येही नाराजी पसरलेली होती.

वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - भारत विरुद्ध इंग्लंड

स्पार्टाकस ·
२०११ चा वर्ल्डकप हा १९८७ आणि १९९६ च्या वर्ल्डकपनंतर भारतीय उपखंडात झालेल्या तिसरा वर्ल्डकप. या वर्ल्डकपचं यजमानपद भारत - पाकिस्तान - श्रीलंका आणि प्रथमच बांग्लादेशला बहाल करण्यात आलं होतं, पण २००९ मध्ये श्रीलंकन क्रिकेट संघावर लाहोरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे यजमान म्हणून पाकिस्तानची हकालपट्टी करण्यात आली आणि पाकिस्तानमध्ये होणार्‍या मॅचेस उरलेल्या ३ देशांत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. अपेक्षेप्रमाणेच पाकिस्तानने बराच थयथयाट करुन पाहिला, अगदी आयसीसीला कोर्टाची नोटीसही पाठवली, पण आयसीसीने त्याला अजिबात भीक घातली नाही.

वर्ल्डकप क्लासिक्स - २००७ - वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंड

स्पार्टाकस ·
२१ एप्रिल २००७ केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन बार्बाडोसच्या ब्रिजटाऊनमधल्या केन्सिंग्टन ओव्हलच्या मैदानात सुपर एटमधली वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यातली मॅच खेळली जाणार होती. वेस्ट इंडीज आणि इंग्लंड या दोन्ही संघांचं आव्हान संपुष्टात आलं असल्याने सेमीफायनलच्या मुकाबल्यावर या मॅचच्या निकालाचा काहीही परिणाम होणार नव्हता. पण वेस्ट इंडीज आणि इंग्लंड या दोघांच्या दृष्टीने मात्रं ही मॅच महत्वाची होती.

वर्ल्डकप कासिक्स - २००७ - इंग्लंड विरुद्ध श्रीलंका

स्पार्टाकस ·
४ एप्रिल २००७ सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडीयम, नॉर्थ साऊंड अँटीगाच्या नॉर्थ साऊंडमधल्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडीयममध्ये सुपर एटमधली इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातली मॅच रंगणार होती. हे स्टेडीयम २००७ च्या वर्ल्डकपसाठी मुद्दाम बांधण्यात आलेलं होतं आणि त्याला व्हिव्हियन रिचर्ड्सचं नाव देण्यात आलं होतं. सुपर एटमधल्या ६ मॅचेस या मैदानात खेळवण्यात येणार होत्या. श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातली मॅच ही या मैदानात खेळवण्यात येत असलेली पाचवी मॅच होती.