वर्ल्डकप क्लासिक्स - २००७ - आयर्लंड विरुद्ध झिंबाब्वे
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about वर्ल्डकप क्लासिक्स - २००७ - आयर्लंड विरुद्ध झिंबाब्वे
- Log in or register to post comments
२००७ चा वर्ल्डकप हा वेस्ट इंडीजमध्ये झालेला पहिला वर्ल्डकप. वेस्ट इंडीजमधल्या बार्बाडोस, जमेका, गयाना, त्रिनिदाद - टोबॅगो, अँटीगा - बर्बुडा, ग्रेनेडा, सेंट कीट्स - नेव्हीस आणि सेंट लुशिया या आठ देशांत वर्ल्डकपच्या मॅचेस खेळवण्यात आल्या होत्या. वर्ल्डकपच्या मॅचेससाठीच्या सुरक्षा नियमांमुळे आणि वेस्ट इंडीयन प्रेक्षकांच्या रसिकतेचं अविभाज्यं अंग असलेल्या ड्रम्स आणि इतर वाद्यांवर बंदी घालण्यात आल्याने वेस्ट इंडीजच्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच नाराजी होती. त्याचबरोबर मॅचच्या तिकीटांच्या किमतीही सामान्यांच्या आवाक्याबाहेर होत्या.