Skip to main content

kathaa

नंदनवनात सिद्धू भाग २

लेखक भागो यांनी गुरुवार, 28/08/2025 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
“बाबा, आपण सिद्धूच्या घरी जाउया, त्याच्या बाबांची बदली झाली आहे. उद्या तो निघून जाईल, त्याच्यासाठी गिफ्ट घेऊया. “ मला कुठेही जायची इच्छा नव्हती. पण आरुने हट्ट धरला. बायकोला बोललो, “जायचे तर काहीतरी घेऊन जायला पाहिजे. मोकळ्या हाताने जाणे चांगले दिसणार नाही. आपल्या खिशाला परवडेल अशी काहीतरी. तुला ह्या गोष्टी बरोबर समजतात, विचार करून सांग.” शेवटी हजार एक रुपये टाकून ड्राय फ्रुट बॉक्स घेतली. सिद्धूचा फ्लॅट म्हणजे काहीच्या काही होता, मी असा फ्लॅट आयुष्यात प्रथमच बधत होतो. एकेक गोष्ट नजरेत सामावून नोट करत होतो. विचार केला वेळ आली तर एखाद्या कथेत टाकता येईल. माझ्या धुवाधारला मी असा फ्लॅट देईन.

नंदनवनात सिद्धू भाग १

लेखक भागो यांनी बुधवार, 27/08/2025 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
माझं नाव अच्युत भिडे. माझं नाव तुम्हाला माहित असणार नाही म्हणून थोडी ओळख करून देतो. मी रहस्य कथा लिहितो. तुम्ही अर्थात छावा, स्वामी ययाति आणि काय ते रायगडाला जेव्हा जाग येते किंवा सध्याचे विद्रोही साहित्य असे मर्मभेदी वाचणारे लोक, तुम्हाला माझे नाव माहित नसणार ह्यात नवल ते काय. पण एकदा कधी तुम्ही रिक्षात बसलात तर रिक्षावाल्याला विचारा की अच्युत भिडेची ताजी कथा वाचलीत काय हो? म्हणजे तुम्हाला समजेल. मी आहे ना, धुवाधार नावाचा , सॉर्ट ऑफ सुपर हिरो निर्माण केला आहे. माझ्या वाचक वर्गाला तो प्रचंड भावला आहे. आता ह्या क्षणी मी त्याचीच एक कथा लिहिण्यात गर्क आहे.

मूक चित्रपट

लेखक भागो यांनी शनिवार, 21/06/2025 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसात चार मूक चित्रपट बघितले. १ A Trip To The Moon. 2 The Last Laugh 3 The Cabinet of Dr. Caligari (1920) 4 Metropolis प्रत्येक सिनेमा साठी स्वतंत्रपाने लिहावे लागेल. आत्ता फक्त A Trip To The Moon. बद्दल लिहितो. ही फिल्म जॉर्ज मेलीएसने दिग्दर्शित केली आहे. जॉर्ज मेलीएस हा एक प्रसिद्ध जादुगार होता. ही film १९०२ बनवली होती. त्या आधीचे "सिनेमे" दोन तीन मिनिटांचे असत. ही film तब्बल साडे बारा मिनिटांची फीचर film आहे. म्हणजे ह्या सिनेमाला कथा आहे. वर ही पहिली वहिली Sci Fi film मानली जाते. ज्युल्स व्हर्न च्या कथेच्या कल्पना ह्यात वापरल्या आहेत.

नको रे मना मत्सरू..(शतशब्दकथा)

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 06/03/2025 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
षड्रिपुंवरच्या माझ्या पाच शतशब्दकथांना मिळून जितके प्रतिसाद नाहीत त्याहीपेक्षा जास्त प्रतिसाद त्या महामायेच्या एकमेव शशकाला? प्रतिभेची पारखच नाही कुण्णाला उरलेली. काय नाहीये माझ्या पाच शशकांत? माझी "काम" शशक वाचून खजुराहोची मैथुनशिल्पं पेन्शनीत जातील. "क्रोध" वाचून शिवशंभू तृतीयनेत्र गॉगलवतील. "लोभ" वाचून कवडीचुंबकही लंगर उघडेल, "मोह" वाचून भस्मासूर मोहिनीअट्टम विसरेल.

माझ्या मिपावरील लेखांचं इंग्रजी पुस्तक We are the Quarry, Fate is the Hunter

लेखक स्वीट टॉकर यांनी गुरुवार, 11/04/2024 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझे मिपावर लिहिलेले माझे बोटीवरचे आणि इतर सर्व अनुभव अर्थातच मराठीत आहेत. प्रतिसादामध्ये तुम्ही त्यांचं कौतुक खूपच केलंत. मात्र हल्ली बहुतांश मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण झाल्यामुळे मराठी व्यवस्थित वाचता येत नाही. 'वाचता येत नाही' असं म्हणणं तितकसं बरोबर नाही. ते टाळतात. दुसरी गोष्ट म्हणजे माझे नव्वद टक्के विद्यार्थी अमराठी आहेत. त्यांना मी कॉलेजमध्ये जेव्हां यातल्या काही गोष्टी सांगितल्या तेव्हां त्यांनी आग्रह धरला की मी त्याचं इंग्रजीत पुस्तक करावं. मी सर्व अनुभव पुन्हा इंग्रजीत लिहिले आणि कालच त्याचं पुस्तक प्रकाशित केलं आहे.

प्रारब्ध - ४

लेखक साहना यांनी शुक्रवार, 08/12/2023 04:21 या दिवशी प्रकाशित केले.
हयग्रीव ला जाग आली तेंव्हा कदाचित अंधार होता किंवा त्याच्या डोळ्यांना काळोख दिसत असावा. पण नाही, आकाशांत चांदणे दिसत होते. सर्वांग ठणकत होते. कुठेतरी बाजूला आग असावी कारण त्यातून उडालेल्या ठिणग्या हवेतून जात होत्या. तो जमिनीवर पडला असावा. इतक्यांत त्याला एक चेहेरा दिसला. नाही, त्याची छकुली नव्हती, पोरगा नव्हता. कुणीतरी दुसराच. काळे कपडे घातलेला थोडासा उग्र. हयग्रीव ने उठायचा प्रयत्न कला पण त्याला जमले नाही. आधी त्याला वाटले कि मेलो असावो आणि नरकांत असू पण अचानक त्याची छकुली पळत आली आणि तिचा चेहेरा समोर येताच त्याला समजले कि हा नरक असणे शक्यच नाही. त्याचा मुलगा सुद्धा जवळ आला.

माझी आवडती पुस्तके भाग: १

लेखक सुजित जाधव यांनी सोमवार, 13/03/2023 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, परवा एका प्रश्न आणि उत्तर साईटवर तुमचे सर्वात आवडते पुस्तक कोणते? असा प्रश्न विचारला होता. त्यानिमित्ताने मी हा लेख लिहला होता. त्यामध्ये थोडेफार बदल करून तो मिपावर पोस्ट करतोय. तशी मी भरपूर पुस्तकं वाचली नाहीयेत पण फारच कमी वाचलीयेत असं पण नाही (अजुन बरीच पुस्तके वाचायची आहेत त्यामुळे मला स्वतःला नेहमी वाटत असतं की माझं वाचन अजुन खूपच कमी आहे.) आता त्या सगळ्या पुस्तकांमधून माझं सर्वात आवडत एकच पुस्तक निवडणं खूपच अवघड काम आहे.. खेळण्याच्या दुकानात सगळी आवडती खेळणी समोर पाहिल्यावर एखाद्या लहान मुलाची जी मनःस्थिती होते अगदी तशीच मनःस्थिती सर्वात आवडतं पुस्तक निवडताना माझीही होते.

अमू- OTT सिनेमा

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 04/11/2022 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
अमू सुखी संसाराची स्वप्ने रंगवणारी चारचौघींसारखीच आहे.राजाराणीला दृष्ट लागू नये असे फुलपाखरासारखे दिवस उडत असतात.आणि राजाचं खरं रूप हळूहळू दिसायलं लागतं. एका विक्षिप्त माणसाशी आपली लग्नगाठ बांधली आहे अमूच्या लक्षात येतं.सगळ‌ ठीक होईल असं तिला वाटतं.याबाबत आईशीही ते बोलते,इथे आईही तिच्या बाबतीत ‌असेच घडल्याची कबूली देते आणि मुलं झालं की सगळं ठीक होईल असा हवेत विरणारा उतारा देते. हद्द तेव्हा पार होते जेव्हा एका झापडीने झालेली सुरुवात ,बेल्टने मारण्यापर्यत जाते.अमू घर सोडून निघती खरी पण काहीतरी पण हा कायमस्वरूपी उपाय नाही,परत एकदा त्याला प्रेमात पाडूया या आशाने ती हसत मार खात, तिच्या मनाविरुद्

दिंडी (गूढकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी रविवार, 18/09/2022 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
दिंडी (गूढकथा) दिंडी संथ गतीने पुढे सरकत होती. मध्यरात्र उलटून गेली होती. तरी दिंडीचे मार्गक्रमण सुरूच होते. खरेतर आता कुठेतरी सगळ्यांनी मुक्कामाला थांबायला हवे होते. पण आमच्या सगळ्यांच्या अंगात कोणते बळ आले होते कोणास ठाऊक, पण आम्ही पुढे चालतच होतो. पन्नास साठ माणसांचा आमचा समूह, गेल्या बारा - तेरा दिवसांपासून असेच पुढे पुढे जात होतो. मुक्काम पडत होते. जागोजागी आमचे पाल पडत होते. रोज अनेक मैल अंतर आम्ही कमी करत होतो.                 पण आज आम्ही कुठेच मुक्काम केला नाही.