वर्ल्डकप क्लासिक्स - २०१५ - आयर्लंड विरुद्ध झिंबाब्वे
७ मार्च २०१५
बेलरीव्ह ओव्हल, होबार्ट
ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया बेटावरच्या होबार्टमधल्या बेलरीव्ह ओव्हलवर पूल बी मधली आयर्लंड आणि झिंबाब्वे यांच्यातली मॅच होणार होती. क्वार्टरफायनलमध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही मॅच अत्यंत महत्वाची होती. आयर्लंडने वेस्ट इंडीज आणि संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध विजय मिळवला असला तरी दक्षिण आफ्रीकेविरुद्धं त्यांना तब्बल २०० रन्सनी पराभव पत्करावा लागला होता. झिंबाब्वेने संयुक्त अरब अमिरातीविरुद्धची मॅच जिंकली असली तरी दक्षिण आफ्रीका, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानने त्यांना धूळ चारली होती.
मिसळपाव