वर्ल्डकप क्लासिक्स - १९९६ - सेमीफायनल - वेस्ट इंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया
१४ मार्च १९९६
पीसीए, मोहाली
चंदीगडमधल्या मोहालीच्या मैदानात वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकपची दुसरी सेमीफायनल खेळली जाणार होती. क्वार्टरफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने ली जरमॉनच्या न्यूझीलंडचा पराभव करुन सेमीफायनल गाठली होती तर वेस्ट इंडीजने वर्ल्डकपचे प्रमुख दावेदार असलेल्या दक्षिण आफ्रीकेला घरचा रस्ता दाखवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. या सेमीफायनलमधल्या विजेत्या संघाची फायनलमध्ये अर्जुन रणतुंगाच्या श्रीलंकेशी गाठ पडणार होती.
मिसळपाव