Skip to main content

चित्रपट

चित्रपट — मराठी व हिंदी चित्रपटांवरील लेखन, परीक्षणे आणि चर्चा. चित्रपटसृष्टीतील घडामोडी व आठवणी येथे वाचा.

डिगर

लेखक कॉमी यांनी रविवार, 01/11/2026 14:15 या दिवशी प्रकाशित केले.

डिगर बघितला. 
उत्तम सिनेमा. खूप आवडला.

स्पॉयलर शिवाय ह्या सिनेमाबद्दल बोलणे शक्य नाहीये. तेव्हा स्पॉयलर अलर्ट.

हनुमान अंश

लेखक निनाद यांनी गुरुवार, 03/09/2026 16:42 या दिवशी प्रकाशित केले.

नीम करोली बाबा ज्यांना आपण प्रेमाने 'महाराज जी' म्हणतो हे विसाव्या शतकातील भारतातील एक महान आणि चमत्कारी संत होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य उत्तर भारतात फिरून घालवले आणि उत्तराखंडमधील कैंची धाम येथे आपला प्रसिद्ध आश्रम स्थापन केला. बाबांची प्रभू हनुमानावर अथांग भक्ती होती. त्यांची निस्सीम भक्ती, नम्रता आणि सेवाभाव पाहून लाखो भक्त त्यांना 'हनुमान अंश' म्हणजेच हनुमानाचे रूप  मानतात.

न्यायव्यवस्थाच अपयशी ठरली तर न्याय कोण देणार? Citizen Vigilante (2026)

लेखक झालमुरी यांनी मंगळवार, 30/06/2026 19:49 या दिवशी प्रकाशित केले.

 

एखादा सिनेमा केवळ मनोरंजनच करत नाही, तर अस्वस्थ करणारे प्रश्नही विचारतो. Citizen Vigilante हा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा पाहून मलाही तसंच वाटलं.

कल्पना करा - प्रगत देश आहे, कायदा आहे, न्यायालये आहेत, पोलीस आहेत... पण तरीही गुन्हेगार मोकाट फिरत असतील, वारंवार गुन्हे करत असतील, फिर्यादींना न्याय मिळत नसेल, तर सामान्य नागरिकाने काय करावे? त्यातलाच एखाद्या सामान्य नागरिकाने स्वतःच न्यायाचा मार्ग ठरविला आणि त्या मार्गावर चालायला सुरुवात केली तर?

...तर काय होईल याचेच चित्रण या सिनेमात आहे.

चार फूल हैं और दुनिया है आणि परफेक्ट डेज

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी सोमवार, 12/01/2026 05:12 या दिवशी प्रकाशित केले.

हा चित्रपट मी खूपदा पाहिला आहे. खूप मेडिटेटिव असा हा चित्रपट आहे. अगदी जादू केल्यासारखा धरून ठेवतो.

x

विनोदकुमार शुक्ल गेले.

हा चित्रपट आणि विनोदकुमार शुक्ल यांच्यातला एक दुवा जुळून आला.

त्यांच्यावर केलेली "चार फुल हैं और दुनिया है" ही डाक्यूमेंट्री मागच्या वर्षी मुबईवर पहिली होती. ती आता यूट्यूब वरती आहे.

सेव्हन इयर्स इन तिबेट-seven years in Tibet

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 08/01/2026 15:42 या दिवशी प्रकाशित केले.

पुस्तक प्रदर्शनाला गेलो होतो तेव्हा लेक एका कोकरासारखे स्वछंद बागडत होती. तेवढ्यात ती एक पुस्तक घेऊन आली ,"हे पुस्तक मला पाहिजे आहे ". पुस्तकाचे पूर्ण नाव आठवत नाही पण 'माओ झेडाँग' या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा संस्थापक यांच्या आयुष्यावरचे ते पुस्तक होते. "तुला माहितेय का,कि हा कोण आहे?"मी विचारले ."चीनचा कम्युनिस्ट माओ "मला माहिती आहे ती म्हणाली. आज तू नळीची कृपा म्हणावी कि काय तिला पहिले महायुद्ध ,दुसरे महायुद्ध ,हिटलर ,रशिया ,चीन,जपान ,अमेरिका यांची बरीच माहिती आहे . त्यातलाच एक हा 'माओ' याबद्दल तिला माहिती आहे.

निशानची (हिंदी सिनेमा)

लेखक मन यांनी सोमवार, 05/01/2026 11:15 या दिवशी प्रकाशित केले.

‘निशानची’ (अर्थ : नेमबाज, बंदुकबाज, sniper) ह्या सिनेमाचे दोन्ही भाग आवडले. सिनेमाचा विषय एका पैलवान असणाऱ्या वडिलांच्या संशयास्पद मृत्यूनंतर कुटुंबाची झालेली स्थिती, त्या परिस्थितीला दोन भिन्न स्वभावाच्या जुळ्या भावांनी आणि नेमबाजीमध्ये तरुणपणी निपुण असणाऱ्या,  पदकविजेत्या त्यांच्या आईने दिलेलं तोंड, त्यानंतर उलगडत जाणाऱ्या घटना, नवीनच माहिती होत गेलेले धागेदोरे आणि दरम्यान वाढत गेलेली गुंतागुंत असा काहीसा सांगता येईल. अनुराग कश्यपच्या इतर काही सिनेमांप्रमाणेच ह्यातही महिला पात्रे निव्वळ पूरक भूमिका म्हणून, सोबत असायला हवीत म्हणून अशी असण्यापलीकडे आहेत.

'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है!

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 11/12/2025 23:19 या दिवशी प्रकाशित केले.

सुमारे दीड वर्षांपूर्वी निर्मितीची आणि वर्षभरापूर्वी शीर्षकाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट रसिकांमध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा 'धुरंधर' हा चित्रपट शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित झाला.

दशावतार - आठवणींची साठवण

लेखक चिमी यांनी गुरुवार, 25/09/2025 23:14 या दिवशी प्रकाशित केले.

||श्री कातळोबा प्रसन्न||

ढिशक्लेमर – हा दशावतारचा review नाही. फक्त काही आठवणींची साठवण.

चित्रपट परिक्षण:मला भावलेला चित्रपट "मियळगन" (Meiyazhagan)....(Spoiler Alert )

लेखक श्वेता२४ यांनी शनिवार, 23/08/2025 20:14 या दिवशी प्रकाशित केले.

फोटो

तुमच्या अतिशय तरल आणि सुंदर आठवणी ज्या राहत्या घराशी निगडीत आहेत असे घर कायमस्वरूपी सोडण्याची वेळ तुमच्यावर कधी आली आहे का?