मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रीडा

वर्ल्डकप क्लासिक्स - १९९६ - सेमीफायनल - वेस्ट इंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया

स्पार्टाकस ·
१४ मार्च १९९६ पीसीए, मोहाली चंदीगडमधल्या मोहालीच्या मैदानात वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकपची दुसरी सेमीफायनल खेळली जाणार होती. क्वार्टरफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने ली जरमॉनच्या न्यूझीलंडचा पराभव करुन सेमीफायनल गाठली होती तर वेस्ट इंडीजने वर्ल्डकपचे प्रमुख दावेदार असलेल्या दक्षिण आफ्रीकेला घरचा रस्ता दाखवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. या सेमीफायनलमधल्या विजेत्या संघाची फायनलमध्ये अर्जुन रणतुंगाच्या श्रीलंकेशी गाठ पडणार होती.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९९६ - क्वार्टरफायनल - वेस्ट इंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रीका

स्पार्टाकस ·
११ मार्च १९९६ नॅशनल स्टेडीयम, कराची सिंध प्रांताची राजधानी असलेल्या कराचीच्या नॅशनल स्टेडीयमवर वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात तिसरी क्वार्टरफायनल रंगणार होती. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडे वर्ल्डकपचे संभाव्यं विजेते म्हणून पाहिलं जात होतं. ग्रूपमधल्या आपल्या पाचही मॅचेस आरामात जिंकून त्यांनी क्वार्टरफायनलमध्ये धडक मारली होती. वेस्ट इंडीजची परिस्थिती नेमकी उलट होती. झिंबाब्वेविरुद्धची पहिली मॅच जिंकल्यावर भारताविरुद्ध वेस्ट इंडीजला पराभव पत्करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाप्रमाणेच वेस्ट इंडीजनेही श्रीलंकेत खेळण्यास नकार दिल्याने ती मॅचही वेस्ट इंडीजने गमावलेली होती.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९९६ - क्वार्टरफायनल - भारत विरुद्ध पाकिस्तान

स्पार्टाकस ·
१९९६ चा वर्ल्डकप हा १९८७ च्या वर्ल्डकपनंतर भारतीय उपखंडात झालेला दुसरा वर्ल्डकप होता. भारत आणि पाकिस्तान यांच्या जोडीला श्रीलंकेलाही स्पर्धेचं संयुक्तं यजमानपद बहाल करण्यात आलं होतं. श्रीलंकेतील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजने श्रीलंकेत मॅचेस खेळण्यास नकार दिल्यावर या दोन्ही संघांची खात्री पटावी म्हणून श्रीलंका विरुद्ध भारत-पाकिस्तान अशी मॅच खेळवण्यात आली होती. या मॅचमध्ये वासिम अक्रमच्या बॉलवर सचिन तेंडुलकरने रोमेश कालुवितरणाचा कॅच घेतल्याची नोंद झाली!

वर्ल्डकप क्लासिक्स - १९९२ - सेमीफायनल - इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रीका

स्पार्टाकस ·
२२ मार्च १९९२ एससीजी, सिडनी न्यू साऊथ वेल्समधल्या सिडनीच्या ऐतिहासिक मैदानात गेल्या वर्ल्डकपमधले उपविजेते इंग्लंड आणि अपार्थाईड व्यवस्था मोडीत निघाल्यावर वर्षाभरापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेली दक्षिण आफ्रीका यांच्यात वर्ल्डकपची दुसरी सेमीफायनल रंगणार होती. या मॅचमधील विजेत्या संघाची मेलबोर्नच्या मैदानावर फायनलमध्ये गाठ पडणार होती पाकिस्तानशी! ग्रॅहॅम गूचच्या इंग्लिश संघात स्वतः गूच, अनुभवी अ‍ॅलन लॅम्ब, ग्रॅहॅम हिक, नील फेअरब्रदर, अ‍ॅलेक स्ट्युअर्ट असे बॅट्समन होते. इंग्लंडच्या बॉलिंगचा भार मुख्यतः अनुभवी फिलिप डिफ्रीटार, ग्लॅडस्टन स्मॉल, रिचर्ड इलिंगवर्थ यांच्यावर होता.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९९२ - सेमीफायनल - न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान

स्पार्टाकस ·
२१ मार्च १९९२ ईडन पार्क, ऑकलंड न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडमधल्या ऑकलंडच्या ईडन पार्कवर यजमान न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्डकपची पहिली सेमीफायनल रंगणार होती. न्यूझीलंडच्या संघाने आपल्या ८ पैकी सात मॅचेस जिंकून सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. पहिल्या ७ मॅचेस जिंकल्यावर शेवटच्या एकमेव मॅचमध्ये न्यूझीलंडला पराभव पत्करावा लागला होता. अर्थात आधीच सेमीफायनल गाठलेली असल्याने न्यूझीलंडच्या दृष्टीने ही मॅच फारशी महत्वाची नव्हती. याउलट पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला होता तो पावसाच्या कृपेने! इंग्लंडविरुद्ध ७४ रन्समध्ये ऑलआऊट झाल्यानंतरही पावसामुळे ही मॅच वाहून गेली होती.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९९२ - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

स्पार्टाकस ·
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेला १९९१९ मधला वर्ल्ड्कप हा पूर्वीच्या चारही वर्ल्डकपपेक्षा अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण होता. या वर्ल्डकपमध्ये सर्वप्रथम पांढर्‍या रंगाच्या कपड्यांऐवजी रंगीत कपड्यांचा वापर करण्यात आला होता. पारंपारीक लाल बॉलची जागा पांढर्‍या बॉलने घेतली होती तर पांढरा बॉल स्पष्टपणे दिसावा म्हणून काळ्या रंगाचा साईटस्क्रीनही या वर्ल्डकपमध्येच प्रथम वापरण्यात आला.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८७ - फायनल - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड

स्पार्टाकस ·
८ नोव्हेंबर १९८७ ईडन गार्डन्स, कलकत्ता कलकत्त्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्डकपची फायनल रंगणार होती. वास्तविक ही फायनल भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होईल असा अनेकांचा अंदाज होता पण 'बिली द किड' क्रेग मॅकटरमॉटने लाहोरला पाकिस्तानला धूळ चारली होती तर ग्रॅहॅम गूचच्या स्वीपने आणि चंद्रकांत पंडीतला एलबीडब्ल्यू देण्याच्या अंपायर टोनी क्राफ्टरच्या साफ चुकीच्या निर्णयामुळे भारताच्या वर्ल्डकपच्या आकांक्षांवर पाणी पडलं होतं!

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८७ - सेमीफायनल - ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान

स्पार्टाकस ·
४ नोव्हेंबर १९८७ गद्दाफी, लाहोर लाहोरच्या गद्दाफी स्टेडीयमवर यजमान पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्डकपची पहिली सेमीफायनल खेळली जाणार होती. न्यूझीलंडविरुद्धच्या ग्रूपमधल्या शेवटच्या मॅचमध्ये गावस्कर - श्रीकांत यांच्या आतषबाजीने ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या स्थानावर ढकललं होतं. ग्रूपमधल्या आपल्या सगळ्या मॅचेस भारतात खेळणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने पाकिस्तानविरुद्ध आणि ते देखिल पाकिस्तानमध्ये खेळणं निश्चितच कठीण आव्हान होतं. या वर्ल्डकपनंतर आपण क्रिकेटमधून रिटायर होत असल्याची आणि लाहोरची मॅच ही पाकिस्तानमधली आपली अखेरची मॅच असल्याचं इमरान खानने जाहीर केलेलं होतं.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८७ - भारत विरुद्ध न्यूझीलंड

स्पार्टाकस ·
३१ ऑक्टोबर १९८७ व्हीसीए, नागपूर नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ग्रूप ए मधली दुसर्‍या राऊंडची मॅच रंगणार होती. वर्ल्डकपमधलं आव्हान संपुष्टात आल्याने त्यांच्या दृष्टीने या मॅचला काहीच अर्थ नव्हता. भारत आणि ऑस्ट्रेलियाने ग्रूप ए मधून सेमीफायनल गाठली होती तर ग्रूप बी मधून पाकिस्तान आणि इंग्लंडने. पाकिस्तानने ग्रूप बी मध्ये पहिला क्रमांक मिळवला असल्याने ग्रूप ए मध्ये दुसर्‍या स्थानावर राहणार्‍या टीमला लाहोरच्या मैदानात पाकिस्तानशी सेमीफायनलमध्ये मुकाबला करावा लागणार होता.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८७ - वेस्ट इंडीज विरुद्ध पाकिस्तान

स्पार्टाकस ·
१६ ऑक्टोबर १९८७ गद्दाफी, लाहोर लाहोरच्या गद्दाफी स्टेडीयममध्ये यजमान पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यात ग्रूप बी मधली मॅच खेळली जाणार होती. ग्रूपमधल्या आपल्या पहिल्या मॅचमध्ये इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागल्यावर वेस्ट इंडीजने श्रीलंकेचा फडशा पाडला होता, पण सेमीफायनल गाठण्याच्या दृष्टीने ही मॅच जिंकणं वेस्ट इंडीजला अत्यावश्यक होतं. १९८४ - ८५ चा मोसमात क्लाईव्ह लॉईड रिटायर झाल्यावर वेस्ट इंडीजच्या संघाच्या कॅप्टनपदाची जबाबदारी आली होती व्हिव्हियन रिचर्ड्सकडे!