मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रीडा

मानाचा मुजरा!

चतुरंग ·
अठरावर्षांपूर्वी घडले एक पहा नवल चेंडु-फळीचा खेळ खेळण्या पडे एक पाऊल वामनमूर्ती बघता, त्याला भलेभले हासले तलवारीसम बॅट तळपता डोळेही दिपले एकामागुन एक मोडितो विक्रमही सगळे टीकाकरण्या जाती तेही ठरती की बावळे असा घडविती शिष्यच तेची गुरु 'रमाकांत' स्वर्गीय पित्याचा पुत्र असे हा खरा मातृभक्त 'अजित' राहुनी निभवी तोही धाकलीच पाती खेळामधला 'डॉन'ही त्याला देई यशोपावती जगात सगळ्या जरी वाजतो डंका खेळाचा पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा अजून खिळती त्यावर सार्‍या अभिमानी नजरा मराठमोळ्या 'सचिन' तुला रे मानाचा मुजरा! चतुरंग

* सचिनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा *

मनस्वी ·
* सचिनला ३५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा *
सचिन उत्तम क्रिकेटपटू आहेच, पण त्या व्यतिरिक्त सचिनबद्दल आपल्याला काही अधिक माहिती असल्यास जसे काही किस्से / त्याचा स्वभाव / आठवणी असल्यास कृपया इथे शेअर कराव्यात.

गाण्यांच्या शोधात

ॐकार ·
कधी कधी बर्‍याच गाण्यांचा विचार डोक्यात घोळत असतो. विचार घोळवावा लागतो. गाणी एकरूपच असतात, ती घोळवावी लागत नाहीत. एखाद्या गाण्याचे शब्द, लय, ताल, राग, सुरावट लक्षात राहण्यामागे कारण काय असेल? जास्त विचार केला तर अनेक शास्त्रीय कसोट्या सांगता येतील. त्या कसोट्यांची रसिकतेला मात्र काही गरज नाही. अंतर्बाह्य असतं ते गाणं. त्यात शब्द , ताल , सूर , लय काहीच वेगळं नसतं. सगळं एकजीव असतं. उदाहरणं अनेक आहेत . असा बेभान हा वारा हे गाणं ऐकताना मी नेहमी मला एका चित्राचा कोपरा समजत आलो आहे. ते चित्र इतकं सजीव आहे की मला ते अगदी तसंच शब्दात बांधणं जमत नाही.

वामनावताराचे ३९ वे शतक!

चतुरंग ·
स्व.डॉन ब्रॅडमन यांच्या घरच्या मैदानावर तडाखेबंद फलंदाजीने ३९ वे शतक झळकावून सचिनने कांगारुंना जाणीव करुन दिली की "चड्डीत रहा" नाहीतर "नाड्या" माझ्या हातात आहेत!!

जगभरातील व्यक्तिमत्वे ओळखा

देवदत्त ·
WorldPersonalities वरील चित्रात जगभरातील व्यक्तींची चित्रे रेखाटली आहेत. किती ओळखता येतात ते पाहू? मी ओळखलेले: महात्मा गांधी चार्ली चॅपलीन बीथोवन हिटलर सद्दाम हुसैन बिल क्लिंटन ब्रुसली अल्बर्ट आईन्स्टाईन अब्राहम लिंकन यासर अराफात मेरीलीन मॉन्ऱो जॉर्ज बुश आणखी जमल्यास लिहीन पुढे... (चित्र आंतरजालावर कुठेतरी मिळाले.)

'टप्प्याचे' महत्त्व - (पी.जे.-कम -कोडं)

नंदन ·
नजफगढमध्ये लहानपण गेलेल्या वीरेन्द्रला चक्क शास्त्रीय संगीत आवडायचं. दुबेबुवांच्या क्लासबाहेर तो गाणं ऐकत तासन् तास उभा रहायचा. शेवटी जाटाचं पोर वाया चाललं, म्हणून वडिलांनी त्याचा कान पकडून एका क्रिकेट प्रशिक्षकाकडे नेलं. असो. पण मुख्य मुद्दा तो नाही. मुख्य मुद्दा आहे तो त्याच्या खेळण्यातला 'सूर'जो हरवलाय त्याचा. इतका की, दुखापतींनी ग्रस्त झालेल्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यातही त्याची निवड होऊ शकली नाही. खाली मान घालून तो गॅरी कर्स्टन गुरुजींकडे गेला. गुरुजींनी त्याला बसवून घेतलं, त्याच्या खेळाच्या जुन्या चित्रफिती दाखवल्या आणि मग नेटमध्ये घेऊन गेले.

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

आजानुकर्ण ·
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.