मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वर्ल्डकप क्लासिक्स - १९९६ - सेमीफायनल - वेस्ट इंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया

स्पार्टाकस ·

ह्या मॅचमधले रॉजर हॉर्पर बॅटींगला येतानाचे दृष्य मला अजुनही आठवते आहे. हॉर्पर हा पिंच हिटर म्हणुन कधीही प्रसिध्द नव्हता आणि आल्यानंतर एक दोन बॉल खेळल्यावर हा नक्की बॅट्समन तरी असावा का अशी स्थिती बनली होती.मॅच लवकर संपवण्याचा वेस्ट इंडिजचा आततायीपणा त्यांना नडला.

गॅरी ट्रुमन 19/02/2017 - 20:51
ही पण एक अविस्मरणीय मॅच होती. मार्क वॉ जर म्हणाला असेल---"How the bloody hell did we win that?" तर ते अगदी समजण्यासारखे आहे. एक वेळ अशी होती की वेस्ट इंडिजने १६५ रन्स केल्या होत्या आणि दोनच विकेट गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची तिसरी विकेट पडल्यावर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू केवळ एक उपचार म्हणून एकत्र आले होते. कोणीही विकेट गेल्याचा आनंद व्यक्त केला नव्हता. त्यावेळीही आता वेस्ट इंडिज किती ओव्हर राखून आणि किती विकेट राखून जिंकणार एवढाच प्रश्न राहिला आहे असे वाटत होते.

In reply to by साधा मुलगा

कोणीतरी स्वीप मारला होता आणि वेंकटराघवनच्या टाळक्यावर बसला होता चेंडू. तरी पट्ठ्या अक्खी मॅच उभा राहिला. मी असतो तर टॅम्पलीस करून घरी गेलो असतो...ख्या ख्या ख्या

लेखनविषय:
लेखनप्रकार
१४ मार्च १९९६ पीसीए, मोहाली चंदीगडमधल्या मोहालीच्या मैदानात वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकपची दुसरी सेमीफायनल खेळली जाणार होती. क्वार्टरफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने ली जरमॉनच्या न्यूझीलंडचा पराभव करुन सेमीफायनल गाठली होती तर वेस्ट इंडीजने वर्ल्डकपचे प्रमुख दावेदार असलेल्या दक्षिण आफ्रीकेला घरचा रस्ता दाखवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. या सेमीफायनलमधल्या विजेत्या संघाची फायनलमध्ये अर्जुन रणतुंगाच्या श्रीलंकेशी गाठ पडणार होती.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९९६ - क्वार्टरफायनल - वेस्ट इंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रीका

स्पार्टाकस ·

गॅरी ट्रुमन 18/02/2017 - 11:38
अजून एक जबरदस्त लेख. या सामन्यात रॉजर हार्परच्या त्या खतरनाक ओव्हरपर्यंत दक्षिण आफ्रिका हरू शकेल असे वाटत नव्हते. जबरदस्त फॉर्मात असूनही आयत्या वेळी कच खायची असा दक्षिण आफ्रिकेला 'चोकिंग' चा त्रास होणे हा जुनाच प्रकार आहे :( काहीही असले तरी हा सामना दक्षिण आफ्रिकेने गमाविल्यानंतर वाईट वाटलेच होते. दक्षिण आफ्रिकेसारखा चांगला संघ हरला हे तर दु:ख होतेच पण त्याबरोबरच तो केनियासारख्या लिंबूटिंबू संघाकडून पराभव पत्करलेल्या वेस्ट इंडिजसारख्या संघाकडून हरला याचे अजून दु:ख होते.

In reply to by गॅरी ट्रुमन

स्पार्टाकस 18/02/2017 - 19:54
दक्षिण आफ्रीका या मॅचमध्ये बाराच्या भावात गेली असं माझं मत आहे. वेस्ट इंडीजला त्यांनी सिरीयसली घेतलंच नाही. उलट केनियाविरुद्धची मॅच हरल्यावर वेस्ट इंडी़जचे खेळाडू चवताळून उठले आणि त्यांनी शेवटच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं. दक्षिण आफ्रीकेसाठी ही खरंतर वॉर्निंग बेल होती. समोरच्या टीममध्ये लारा असताना त्यांना हलकं लेखण्याची घोडचूक दक्षिण आफ्रीकेने केली आणि ती त्यांना भोवली. बाय द वे, वर्ल्डकपमध्ये सगळ्या मॅचेस जिंकून केवळ एक मॅच गमावल्यामुळे वर्ल्डकपबाहेर पडण्याची पाळी आलेला दक्षिण आफ्रीका हा पहिला संघ. त्यानंतर २०१५ मध्ये हीच पाळी सेमीफायनलमध्ये भारत आणि फायनलमध्ये न्यूझीलंडवर आली.

पैसा 18/02/2017 - 12:51
कोणत्याही परिस्थितीत सामन्याचा निकाल एकहाती बदलू शकणार्‍या खेळाडूंमधे लाराचं नाव सर्वात वर असेल!

११ मार्च १९९६ नॅशनल स्टेडीयम, कराची सिंध प्रांताची राजधानी असलेल्या कराचीच्या नॅशनल स्टेडीयमवर वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात तिसरी क्वार्टरफायनल रंगणार होती. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडे वर्ल्डकपचे संभाव्यं विजेते म्हणून पाहिलं जात होतं. ग्रूपमधल्या आपल्या पाचही मॅचेस आरामात जिंकून त्यांनी क्वार्टरफायनलमध्ये धडक मारली होती. वेस्ट इंडीजची परिस्थिती नेमकी उलट होती. झिंबाब्वेविरुद्धची पहिली मॅच जिंकल्यावर भारताविरुद्ध वेस्ट इंडीजला पराभव पत्करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाप्रमाणेच वेस्ट इंडीजनेही श्रीलंकेत खेळण्यास नकार दिल्याने ती मॅचही वेस्ट इंडीजने गमावलेली होती.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९९६ - क्वार्टरफायनल - भारत विरुद्ध पाकिस्तान

स्पार्टाकस ·

ही मॅच कधीही विसरू शकणार नाही. जडेजाने केलेली वकारची धुलाई आणि नंतर प्रसादने सोहेलचा घेतलेला बदला. हा प्रसंग मनात कायमस्वरूपी कोरला गेलेला आहे.

चिनार 17/02/2017 - 09:55
जबरदस्त !! या मॅच विषयी कधी लिहिता याची वाट बघत होतो. अप्रतिम लिहिलं आहे! २०१५ च्या वर्ल्डकप मधल्या भारत -पाकिस्तान मॅचच्या आदल्या दिवशी मी सुद्धा या आणि २००३ वाल्या मॅचवर लिहिले होते. http://www.misalpav.com/node/30362

गॅरी ट्रुमन 17/02/2017 - 10:09
ही एक अगदीच अविस्मरणीय मॅच होती. या मॅचमधील पहिल्यापासून शेवटपर्यंत अगदी प्रत्येक बॉल बघितला होता. जाडेजाने वकारची धुलाई करेपर्यंत आपण २५०-२५५ चे आव्हान पाकिस्तानपुढे उभे करू असेच वाटले होते पण जाडेजामुळे २८७ पर्यंत पोहोचलो. आमीर सोहेल आणि सईद अन्वरने आपल्या गोलंदाजांना झोडपायला सुरवात केली आणि १० ओव्हरमध्ये ८४ पर्यंत मजल मारली तेव्हा असे वाटायला लागले की मॅच गेलीच हातातून!! आमीर सोहेल प्रसादबरोबरच्या भांडणानंतर गेला आणि इंझमाम तसा चाचपडतच खेळत होता. माझी आठवण बरोबर असेल तर आमीर सोहेल-वेंकटेश प्रसाद यांच्यात बाचाबाची चालू होती त्यावेळी नवज्योतसिंग सिध्दूही प्रसादच्या बाजूने आला होता तसेच सिध्दू आणि आमीर सोहेल यांनी आपल्या मातृभाषेतून--पंजाबीतून एकमेकांवर दुगाण्या झाडल्या होत्या. नंतर रशीद लतीफने फटकेबाजी केली त्यावेळीही मॅच नियंत्रणातून चालली असे वाटू लागले. पण वेंकटपथी राजूने मोंगियाकरवी त्याला मस्त स्टंप-आऊट करवले. वेंकटपथी राजूनेच १९९२ च्या वर्ल्डकपमधील मॅचमध्ये वसिम अक्रमलाही किरण मोरेकडून असेच स्टंप-आऊट करवले होते त्याची आठवण आली. या मॅचमध्ये विजय मिळाल्यानंतर मार्च महिन्यातच दुसरी दिवाळी साजरी झाली होती. ती शनीवारची रात्र होती आणि मॅच संपल्यावर रात्री दहा-साडेदहानंतर रस्त्यावर तरूणाईला अगदी उधाण आले होते. त्यावेळीही आता १३ मार्चला कलकत्त्यातील सेमीफायनलच्या मॅचमध्ये श्रीलंकेला हरवायचे वगैरे वगैरे स्वप्ने रंगू लागली होती. १० मार्चच्या पेपरमध्येही "उपांत्यपूर्व फेरीत भारताने पाकिस्तानचा पराभव करून मोठ्या दिमाखात उपांत्यफेरीत प्रवेश केला" वगैरे छापून आले होते. पण कुठचे काय....

गॅरी ट्रुमन 17/02/2017 - 10:35
एकूणच आपण भारतीय क्रिकेटच्या बाबतीत खूपच 'पझेसिव्ह' असतो. शेवटी तो एक खेळ आहे (आणि कदाचित फिक्सिंगही) हे आपण विसरून क्रिकेटला त्यापेक्षा बरेच जास्त महत्व देत असतो. ९ मार्चला सगळ्या देशाने आपल्या क्रिकेटसंघाला डोक्याला घेतले आणि अवघ्या ४ दिवसातच कलकत्त्यातील श्रीलंकेविरूध्द झालेल्या पराभवानंतर पायदळी तुडविले. अर्थातच पाकिस्तानात जशा गुडघ्यातल्या प्रतिक्रिया आल्या तशा आपल्याकडे आल्या नाहीत. तरीही १३ मार्चच्या एका पराभवानंतर उलट्या टोकाची प्रतिक्रिया देणेही समर्थनीय नव्हते. १९८९ मध्ये भारतीय संघ पाकिस्तानच्या दौर्‍यावर गेला असताना कराचीच्या एकदिवसीय सामन्यात मनोज प्रभाकरने पाकिस्तानच्या ३ विकेट भराभर घेतल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानी प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करून तो सामना बंद पाडला होता. असे काही भारतात कधीच होणार नाही असे वाटत होते १२ मार्च १९९६ पर्यंत. १३ मार्चच्या घटनेने मात्र या समजाला तडा गेला.
"He is a great player, and this is the last time we will see him bat.’
जावेद मियांदाद कसाही असला (दाऊद इब्राहिमचा व्याही असला, मैदानातही भडक डोक्याने बर्‍याच गोष्टी करणारा असला) तरी एक क्रिकेटपटू म्हणून खरोखरच अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा होता हे कोणीच नाकारू शकत नाही. शारजात चेतन शर्माला त्याने शेवटच्या बॉलवर सिक्स मारून पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता ते केवळ अविस्मरणीय होते. असे करायला जबरदस्त जिगर अंगात असायला पाहिजे. त्या शेवटच्या बॉलवरील सिक्सचे व्हिडिओ युट्यूबवर आहेत. शेवटच्या बॉलवर खेळायच्या आधी मैदानात कुठेकुठे भारतीय फिल्डर्स आहेत हे त्याने बघितले आणि चेतन शर्मा रन-अप घ्यायच्या आधी तीनेक सेकंद तो त्याच्या जागेवर क्रिझमध्ये उभा होता तेव्हा त्याच्या चेहर्‍यावरील आत्मविश्वास केवळ अप्रतिम होता हे बघायला मिळेलच. असे खेळाडू नेहमीनेहमी होत नसतात त्यामुळे जावेद मियांदादचा तो शेवटचा सामना होता तेव्हा त्याला टाळ्या वाजवून मान देणे यात मला तरी काही चुकीचे वाटत नाही. पण बहुतेकवेळा आपण पाकिस्तानविरूध्दचा सामना मग देशभक्ती, धर्मयुध्द वगैरे गोष्टी करायला लागतो आणि अशा काही गोष्टी नजरेआड करतो. पाकिस्तानकडून खेळणारे इमरान खान आणि वसिम अक्रम हे खेळाडूही मला त्यांच्या जिगरबाज खेळामुळे आणि आत्मविश्वासामुळे आवडायचे. आज इमरान खान भले तालिबानचा समर्थक असेल पण तो एक उत्कृष्ट क्रिकेटपटू होता हे काही त्यामुळे खोटे ठरत नाही. हल्ली क्रिकेटबरोबरची लिंक तुटल्यामुळे सद्यकालीन संदर्भ देता येत नाहीत पण माझ्या आठवणीतील खेळाडू हेच.

In reply to by गॅरी ट्रुमन

स्पार्टाकस 17/02/2017 - 12:15
जावेद मियांदाद बॅट्समन म्हणून श्रेष्ठ होताच... किंबहुना हनिफ महंमद, झहीर अब्बास, माजिद खान, इंझमाम उल हक, युनुस खान या सगळ्यांच्या तुलनेतही तो पाकिस्तानने जगाला दिलेला सर्वोकृष्टं बॅट्समन होता, पण त्याचबरोबर तो एक उत्कृष्टं स्ट्रॅटेजिस्ट होता. इमरान कॅप्टन असताना अनेक बॉलिंग चेंजेस आणि फिल्डींग प्लेसमेंट्सचा उगम जावेदच्या सुपिक डोक्यात व्हायचा आणि इमरान ते राबवायचा असं खुद्दं इमराननेच अनेकदा सांगितलं आहे. निव्वळ एक क्रिकेटर म्हणून तो एक अफलातून खेळाडू होता!

In reply to by गॅरी ट्रुमन

चतुरंग 17/02/2017 - 19:53
+१ जावेद मियांदादचं टायमिंग आणि रिस्टवर्क अफलातून होतं. त्यामुळे तो चेंडूचा अंदाज अगदी शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन अगदी शेवटी शेवटी फटका बदलू शकत असे. त्याचा आत्मविश्वासही जबर होता आणि त्याच्यात एक किलर इंस्टिंक्ट होती. इमरान आणि अक्रम हे दोघेही उच्च दर्जाचे स्विंग बोलर्स होते यात शंका नाही. त्यातही डावखुरा असल्याने अक्रम उजव्या हाताने खेळणार्‍या फलंदाजांना जे डेडली इनस्विंगर्स टाकत असे ते कमाल असत. त्याचे यॉर्कर्स खेळणे हे देखील येरागबाळ्याचे काम नव्हते!

बबन ताम्बे 17/02/2017 - 14:14
जडेजाने केलेली धुलाई अजूनही आठवतेय. तो जेंव्हा आउट होउन पॅव्हेलीयनकडे जात होता तेंव्हा प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्या वाजवून त्याच्या बॅटींगला दाद दिली होती.

श्रीगुरुजी 17/02/2017 - 15:42
त्या काळात परदेशात असल्याने १९९६ च्या विश्वचषक स्पर्धेतील एकही चेंडू बघायला मिळाला नव्हता. तरी पण या सामन्याचे वर्णन अनेकवेळा वाचले आहे.

१९९६ चा वर्ल्डकप हा १९८७ च्या वर्ल्डकपनंतर भारतीय उपखंडात झालेला दुसरा वर्ल्डकप होता. भारत आणि पाकिस्तान यांच्या जोडीला श्रीलंकेलाही स्पर्धेचं संयुक्तं यजमानपद बहाल करण्यात आलं होतं. श्रीलंकेतील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजने श्रीलंकेत मॅचेस खेळण्यास नकार दिल्यावर या दोन्ही संघांची खात्री पटावी म्हणून श्रीलंका विरुद्ध भारत-पाकिस्तान अशी मॅच खेळवण्यात आली होती. या मॅचमध्ये वासिम अक्रमच्या बॉलवर सचिन तेंडुलकरने रोमेश कालुवितरणाचा कॅच घेतल्याची नोंद झाली!

वर्ल्डकप क्लासिक्स - १९९२ - सेमीफायनल - इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रीका

स्पार्टाकस ·

गॅरी ट्रुमन 16/02/2017 - 10:32
अजून एक जबरदस्त लेख. हा सामना बघितल्यावर आणि हा लेख वाचण्यापूर्वी या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघावर अन्याय झाला असेच वाटत होते. पण आता समजते की दक्षिण आफ्रिकेची बाजूही पूर्ण धुतल्या तांदळासारखी नव्हती. कोणताही संघ पहिल्यांदा खेळायला येताना आपल्याला ५० ओव्हर्स मिळतील या हिशेबाने खेळायला येत असतो. त्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मुद्दामून वेळकाढूपणा केला असेल तर त्यामुळे इंग्लंडला खेळायला ४५ ओव्हर्सच मिळाल्या तर तो पण इंग्लंडवर अन्यायच झाला. इंग्लंडच्या संघाने जर शेवटी ५ ओव्हर्समध्ये फटकेबाजी करायची असा प्लॅन बनवला असेल तर तो पूर्णच चौपट होईल. असे करणे समर्थनीय नाहीच. इतकी वर्षे मला वाटत होते की पावसामुळे सामना उशीरा सुरू झाला म्हणून तो ५० ऐवजी ४५ षटकांचा खेळविण्यात आला आणि दक्षिण आफ्रिकेचा हा प्लॅन मला माहित नव्हता. पावसाचा तो निर्णय अगदीच विचित्र होता. त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या मॅचमध्ये फटका बसला होता. तसाच फटका दक्षिण आफ्रिकेलाही सेमीफायनलमध्ये बसला. या निर्णयाचा प्रताप माहित असतानाही केप्लर वेसल्सने टॉस जिंकूनही पहिल्यांदा बॉलिंग का घेतली हा प्रश्नही तेव्हा पडलाच होता.

बबन ताम्बे 16/02/2017 - 11:46
द. आफ्रीकेच्या खेळाडुंची चेह-यावर निराशा लपत नव्ह्ती. डकवर्थ-लुइस नियम नंतर बदलला (की बंद केला?) ते बरे झाले. पण माझ्यासारख्या भारतीय क्रिकेट रसिकांना पण वाईट वाटले. वाईट याच्यासाठी की फायनलला पाकीस्तान इंग्लंडला सहज हरवेल असे वाटत होते. त्याऐवजी द. आफ्रीका फायनलला असती तर पाकीस्तानला जड गेले असते असे त्यावेळी वाटत होते. जावेद मियादादनी मारलेल्या माकडउडया आणि भारतीय खेळाडुंचा केलेला अपमान , यामुळे पाकीस्तानच्या टीमबद्द्ल भारतीयांना खूप चीड होती. पुढच्या वर्ल्ड कपला पण द. आफ्रिका दुर्दैवीच ठरली.

पुढील भागांच्या प्रतीक्षेत. ह्याच वर्ल्ड कप मध्ये भारताचा संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध केवळ एका धावेने हरला होता. राजू आणि श्रीनाथ ह्यांनी घोळ घातला आणि शेवटच्या चेंडूवर रनआऊट झाले. तो सामना (दुर्दैवाने) अजूनही स्मरणात आहे.

२२ मार्च १९९२ एससीजी, सिडनी न्यू साऊथ वेल्समधल्या सिडनीच्या ऐतिहासिक मैदानात गेल्या वर्ल्डकपमधले उपविजेते इंग्लंड आणि अपार्थाईड व्यवस्था मोडीत निघाल्यावर वर्षाभरापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेली दक्षिण आफ्रीका यांच्यात वर्ल्डकपची दुसरी सेमीफायनल रंगणार होती. या मॅचमधील विजेत्या संघाची मेलबोर्नच्या मैदानावर फायनलमध्ये गाठ पडणार होती पाकिस्तानशी! ग्रॅहॅम गूचच्या इंग्लिश संघात स्वतः गूच, अनुभवी अ‍ॅलन लॅम्ब, ग्रॅहॅम हिक, नील फेअरब्रदर, अ‍ॅलेक स्ट्युअर्ट असे बॅट्समन होते. इंग्लंडच्या बॉलिंगचा भार मुख्यतः अनुभवी फिलिप डिफ्रीटार, ग्लॅडस्टन स्मॉल, रिचर्ड इलिंगवर्थ यांच्यावर होता.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९९२ - सेमीफायनल - न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान

स्पार्टाकस ·

अतिशय सुंदर लिखाण अगदी सामना पाहत आहे असंच वाटत होतं गेल्या वल्ड कप मध्ये सुद्धा न्यूझीलंड चं महिन्याभराचं कर्तृत्व फायनल मध्ये मातीमोल ठरलं होतं तेंव्हा फार वाईट वाटलं होतं

गॅरी ट्रुमन 15/02/2017 - 10:45
नेहमीप्रमाणे आणखी एक जबरदस्त लेख. हा सामना शनीवारी होता आणि अर्धा दिवस शाळा झाल्यावर सकाळी मॅच बघायला घेतली तेव्हा पाकिस्तानच्या डावातील तीसेक षटके झाली होती. तोपर्यंत न्यू झीलंडच जिंकेल असे वाटत होते. थोड्या वेळातच इंझमाम आला. त्याने पहिले २-३ बॉल्स खेळून काढले आणि त्यानंतर न्यू झीलंडच्या बॉलिंगवर त्याने ना भूतो ना भविष्यति असा हल्ला सुरू केला. त्यानंतर न्यू झीलंडला जिंकायची थोडीही संधी त्याने शिल्लक ठेवली नाही.
३३ ओव्हर्ससमध्ये न्यूझीलंडने जेमतेम ११४ / ३ पर्यंत मजल मारली होती!
त्या काळचे एकदिवसीय सामन्यांचे गणित वेगळे असायचे असे दिसते. १९९२ च्या वर्ल्डकपमध्ये अनेक मॅचमध्ये ३० ओव्हर्स पूर्ण झाल्या तरी शंभरीच्या आसपास रन्स झालेल्या असणे ही बर्‍यापैकी सामान्य गोष्ट होती. भारत विरूध्द पाकिस्तान या ४ मार्चच्या सिडनीमधील लढतीत किरण मोरे उड्या मारतो म्हणून जावेद मियांदाद आणि किरण मोरे यांच्यात थोडी बोलाचाली झाली होती आणि नंतर जावेदने भर स्टेडिअममध्ये किरण मोरेची नक्कल करायला बेडूकउडी मारली होती. या दोघांची बोलाचाली चालू असताना पाकिस्तानच्या डावातील २५ ओव्हर्स पूर्ण झाल्या होत्या आणि रन्स झाल्या होत्या ८५/२. त्याचवेळी स्क्रिनवर खाली भारताची २५ ओव्हर्सनंतर ८६/२ अशी स्थिती होती असे दाखवत होते. त्याकाळी २३०-२४० ही बर्‍यापैकी आव्हानात्मक धावसंख्या असायची. २५० पेक्षा जास्त धावा काढल्या तर विजय पक्काच असे समजले जायचे. १९९२ च्या वर्ल्डकपमध्ये बहुतांश सामन्यांमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणार्‍या संघाने २५० पेक्षा कमी रन्स केल्या होत्या. नंतरच्या काळात हे गणित बदलले. तशी सुरवात मार्क ग्रेटबॅचने केलीच होती. पहिल्या १५ ओव्हर्सपर्यंत ३० यार्डाबाहेर दोनच फिल्डर्स असायचे त्यामुळे सुरवातीलाच बॉलर्सवर तुटून पडायचे आणि रन्स गोळा करायच्या हे धोरण मार्क ग्रेटबॅचने सुरू केले होते (त्यापूर्वी काही प्रमाणात श्रीकांतने हे धोरण अवलंबले होते). पण तरीही सुरवातीला फटकेबाजी केल्यानंतर नंतर वेग मंदावून शेवटी २५० च्या आसपासच धावा केल्या जायच्या. सचिनने वनडे मधील पहिले शतक ठोकले होते ऑस्ट्रेलियाविरूध्द कोलंबोला. ही मॅच होती १९९४ च्या गणपतीच्या पहिल्या दिवशी. त्या सामन्यातही सचिन ऑस्ट्रेलियनांवर अगदी जोरदार तुटून पडला होता आणि १० ओव्हर्समध्ये आपल्या १०० रन्स झाल्या होत्या. पण ५० ओव्हर्स पूर्ण होईपर्यंत धावसंख्या होती २४६!! म्हणजे उरलेल्या ४० ओव्हर्समध्ये साडेतीनच्या रनरेटने रन्स काढल्या गेल्या होत्या. १९९६ च्या वर्ल्डकपमध्ये जयसूर्याने मात्र हे गणित पूर्णच बदलले.

In reply to by गॅरी ट्रुमन

सहमत. पहिल्या १५ ओव्हर नंतर ५०/० किंवा ५०/१ म्हणजे अतिशय चांगली सुरवात, २५-३० ओव्हर मध्ये १०० आणी ५० ओव्हर मध्ये २४० म्हणजे भारी वाटायचे. २५० च्या पुढे रन्स झाल्या तर मॅच जिंकलीच अशी परिस्थिती असायची. त्या वेळची पिचेस देखील जलदगती गोलंदाजांना मदत देणारी होती आणी बहुतेक देशांकडे (भारत सोडून) उत्तम जलदगती गोलंदाजांचा तोफखाना होता.

गॅरी ट्रुमन 15/02/2017 - 11:48
१९९६ च्या वर्ल्डकपमध्ये जयसूर्याने मात्र हे गणित पूर्णच बदलले.
यावरून एक गोष्ट आठवली. कधीकधी असे वाटते की आपणच आपल्यावर बंधने घालून घेत असतो. एक मैल धावायच्या शर्यतीत हे अंतर ४ मिनिटापेक्षा कमी वेळात पूर्ण करणे शक्य नाही अशी धारणा कित्येक वर्षे होती. किंबहुना त्या वेगाने धावण्यासाठी मानवी शरीर बनलेलेच नाही आणि त्या वेगाने धावल्यास पायाच्या स्नायू आणि हाडांवर परिणाम होईल असेही म्हटले जात होते. एका अर्थी एक मैल धावायला चार मिनिटांचे मानसिक बंधन आपणच आपल्यावर घालून घेतले होते. मे १९५४ मध्ये इंग्लंडच्या रॉजर बॅनिस्टरने हे अंतर ३ मिनिटे ५९ सेकंद आणि काही मिलिसेकंदात पूर्ण केले आणि ते ४ मिनिटांचे बंधन मोडले.हे अंतर ४ पेक्षा कमी मिनिटात पूर्ण करणे शक्य आहे हे समजल्यावर ते मानसिक बंधन दूर झाले. आणि दिड महिन्यातच रॉजर बॅनिस्टरचा विक्रमही एका सेकंदाने मोडला गेला. सध्याचा विक्रम आहे ३ मिनिटे ४३ सेकंद आणि काही मिलिसेकंद. हा विक्रमही कधीतरी मोडला जाईलच. क्रिकेटमध्येही ५० ओव्हर्समध्ये ३०० धावा करणे खूप कठिण मानले जायचे. वेस्ट इंडिजने १९७८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूध्द ५० ओव्हर्समध्ये ३०० पेक्षा जास्त धावा काढल्या होत्या. हा विक्रम अनेक वर्षे अबाधित होता. १९८७ मध्ये रिलायन्स कप दरम्यान व्हिव्हिअन रिचर्डसने त्यावेळी लिंबूटिंबू असलेल्या श्रीलंकेच्या गोलंदाजीची पिसे काढली आणि ५० षटकात ३६० रन्स केल्या. तो विक्रम अबाधित होता १९९६ पर्यंत. १९९६ च्या वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेने लिंबूटिंबू असलेल्या केनियाविरूध्द ३९८ रन्स कुटल्या तेव्हा वाटले की दुसरा संघ केनियासारखा लिंबूटिंबू होता म्हणून इतक्या रन्स काढता येणे शक्य झाले आणि ४०० रन्स काढता येणे शक्य नाही. मार्च २००६ मध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरूध्द ४०० धावांचे ते मानसिक बंधन ओलांडले. ४०० धावा हे बंधन नाही आणि ते ओलांडता येऊ शकते हे लक्षात आल्यावर दक्षिण आफ्रिकेने त्यानंतर अवघ्या ४ तासात तो विक्रमही मोडला. आतापर्यंत १८ वेळा ५० ओव्हर्समध्ये ४०० पेक्षा जास्त रन्स वनडे मध्ये काढल्या गेल्या आहेत. सध्याचा विक्रम आहे ४४४ धावांचा. आता वाटत आहे की ४५० रन करणे शक्य नाही. पण हा विक्रमही कधीतरी मोडला जाईलच. ग्लेन टर्नरने वनडे मध्ये १७१ धावा काढून नवा विक्रम नोंदवला १९७५ मध्ये. तो विक्रम ८ वर्षे अबाधित होता आणि कपिल देवने १७५ धावा करून तो विक्रम १९८३ मध्ये मोडला. तेव्हाही वाटले की कपिलसारखे वादळ सारखेसारखे येत नसते आणि विरूध्द संघ झिम्बाब्वेसारखा लिंबूटिंबू होता म्हणून ते शक्य झाले. पण पुढच्याच वर्षी १९८४ मध्ये रिचर्डसने १८९ धावा ठोकल्या आणि हा विक्रमही मोडता येऊ शकतो हे दाखविले. त्यानंतर वनडेमध्ये २०० रन्स कोणी करू शकत नाही असे वाटत असतानाच सचिनने तो विक्रम केलाच. खरा तर पहिले द्विशतक झळकावायचा सईद अन्वरच. पण मे १९९७ मधील चेन्नईमधील सामन्यात सौरभ गांगुलीने त्याचा एक जबरदस्त कॅच पकडला आणि सईद अन्वरला २०० रन्स काढता आल्या नाहीत पण रिचर्ड्सचा विक्रम त्याने मोडलाच. सचिनचाही विक्रम पहिल्यांदा सेहवागने आणि नंतर रोहित शर्माने मोडलाच. सध्या असे वाटत आहे की रोहित शर्माचा २६४ धावांचा विक्रम अबाधित राहिल आणि तो मोडता येणे कठिण. पण हा विक्रम मोडता येणे शक्य नाही हे माहित नसलेला किंवा असे मानसिक बंधन स्वतःवर न घातलेला कोणीतरी "इडिअट" येईलच आणि रोहित शर्माचाही विक्रम मोडेल. सध्या वाटत आहे की वनडेमध्ये ३०० करता येणे शक्य नाही पण कोण जाणे ते ही शक्य होईल. अनेकदा अशक्यप्राय समजल्या जाणार्‍या गोष्टी कोणीतरी साध्य करतो आणि सगळ्यांना त्याचे आश्चर्य वाटते. ते साध्य होते त्यातील एक महत्वाचे कारण असते की ती गोष्ट अशक्यप्राय आहे हे इतर लोक समजतात हे त्याला माहितच नसते किंवा माहित असले तरी तो स्वतः ती गोष्ट अशक्यप्राय आहे हे बंधन स्वतःवर घालून घेत नसतो. त्यातूनच असे वेगवेगळे विक्रम प्रस्थापित होतात आणि मोडलेही जातात.

२१ मार्च १९९२ ईडन पार्क, ऑकलंड न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडमधल्या ऑकलंडच्या ईडन पार्कवर यजमान न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्डकपची पहिली सेमीफायनल रंगणार होती. न्यूझीलंडच्या संघाने आपल्या ८ पैकी सात मॅचेस जिंकून सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. पहिल्या ७ मॅचेस जिंकल्यावर शेवटच्या एकमेव मॅचमध्ये न्यूझीलंडला पराभव पत्करावा लागला होता. अर्थात आधीच सेमीफायनल गाठलेली असल्याने न्यूझीलंडच्या दृष्टीने ही मॅच फारशी महत्वाची नव्हती. याउलट पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला होता तो पावसाच्या कृपेने! इंग्लंडविरुद्ध ७४ रन्समध्ये ऑलआऊट झाल्यानंतरही पावसामुळे ही मॅच वाहून गेली होती.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९९२ - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

स्पार्टाकस ·

गॅरी ट्रुमन 14/02/2017 - 10:31
ही मॅचही एक क्लिफहँगर होती. ऑस्ट्रेलियात सकाळी सुरू होणारी मॅच भारतीय वेळेप्रमाणे पहाटे सुरू होत असे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या डावातील पहिली चाळीस षटके बघायला मिळाली नव्हती. पण त्यानंतर मात्र सगळी मॅच बघितली होती. ही एक खरोखरच अविस्मरणीय मॅच होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नक्की काय होईल असे सांगता येत नाही अशा काही मॅच असतात त्यात या मॅचचा नंबर बराच वरचा आहे हे नक्कीच. या मॅचची आणखी एक आठवण म्हणजे सचिनने मारलेला एक फटका सीमारेषेपार गेला होता. पण तो षटकार आहे की चौकार याविषयी संभ्रम होता. सुरवातीला तो षटकार आहे असे गृहित धरून भारताच्या खात्यात ६ रन्स जास्त आल्या होत्या.पण नंतर पंचांनी वॉकीटॉकीवरून खात्री करून तो चौकार आहे हे जाहिर केले होते. त्यामुळे टिव्हीवर स्कोअर दोन रन्सनी कमी झाला होता. आणि नेमक्या याच दोन रन्स आपल्याला भोवल्या :( या सामन्याचे आणि १९८७ च्या रिलायन्स कपमधील ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या सामन्याशी हे साम्य नक्कीच आहे. त्या सामन्यात डिन जोन्सने मारलेला फटका चौकार आहे की षटकार याविषयी संभ्रम होता. तसाच संभ्रम यावेळी सचिनने मारलेल्या फटक्याविषयी होता. डिन जोन्सचा तो सुरवातीला चौकार समजून ऑस्ट्रेलियाला चार रन्स दिल्या गेल्या होत्या पण नंतर तो षटकारात बदलला गेला तर सचिनचा तो फटका सुरवातीला षटकार समजून सहा रन्स दिल्या गेल्या होत्या त्या नंतर चारमध्ये बदलल्या गेल्या. दोन्ही सामन्यात आपला एका रनने पराभव झाला होता. आणि दोन्ही सामन्यात या दोन-दोन रन्स आपल्याला भोवल्या होत्या :( रवी शास्त्री ज्या पध्दतीने खेळला हे बघून खरोखरच त्याच्यावर संताप आला होता. मुंबईत काही ठिकाणी त्याचे पोस्टर जाळायचा वगैरेही प्रकार झाला होता. त्याकाळी क्रिकेट हा अगदी कडव्या धर्माप्रमाणे मी समजत असे त्यामुळे आम्हा मित्रमंडळींमध्येही रवी शास्त्रीविरूध्द प्रचंड संताप आला होता. नशीबाने त्याला इतर सामन्यांमध्ये घेतले गेले नाही. त्यानंतर सप्टेंबर १९९४ मध्ये त्याने निवृत्ती जाहिर केली तेव्हा तो कोणाच्या खिजगणतीतही नव्हता. एकूणच १९९१-९२ मध्ये रवी शास्त्रीची कूर्मगती आपल्या काही पराभवांसाठी कारणीभूत ठरली होती. दक्षिण आफ्रिकेच्या नोव्हेंबर १९९१ मधील पहिल्या भारत दौर्‍यात तिसरा सामना होता दिल्लीला जवाहरलाल नेहरू स्टेडिअममध्ये. ही विकेट उस़ळती होती आणि त्यावर भरपूर रन्स निघणार्‍यातल्या होत्या. या सामन्यात भारताने ५० ओव्हरमध्ये २ बाद २८७ रन्स केल्या-- रवी शास्त्री आणि संजय मांजरेकर या दोघांनीही शतके ठोकली. पण रवी शास्त्रीने १४९ बॉल्समध्ये १०९ रन्स केल्या होत्या. म्हणजे जवळपास ५०% बॉल्स खेळून ४०% पेक्षा कमी रन्स त्याने केल्या होत्या. या सामन्यात केप्लर वेसल्स आणि पीटर कर्स्टन यांनी भारतीय बॉलर्सचा भरपूर समाचार घेऊन दक्षिण आफ्रिकेला पहिला विजय मिळवून दिला होता. वर्ल्डकपच्या आधी भारत, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिरंगी लढत झाली होती त्यातही काही सामन्यांमध्ये रवी शास्त्रीची कूर्मगती आपल्याला भोवली होती. त्यानंतर कॉमेन्टरी करताना रवी शास्त्री (आणि संजय मांजरेकरनेही) "required run rate is going out of control. India needs to score runs at a faster pace" असे काहीसे म्हटले की लेकांनो तुम्ही स्वतः असे किती वेळा केले होतेत हा प्रश्न विचारायचा वाटायचा :(

रवी शास्त्रीने अक्षरश: रडू आणले होते ह्या मॅचमध्ये. माझे वडील भारत एका रनने हरला ह्या धक्क्याने २ दिवस आजारी देखील पडले. बाकी १९९२ च्या वर्ल्ड कपने मला क्रिकेटची ओळख झाली. त्यावेळेपर्यंत आमच्याकडे टी. व्ही. देखील न्हवता. वर्ल्ड कप आहे म्हणून टी. व्ही. घेतला. पहाटे लवकर उठून मॅच बघायला खूप मजा यायची.

श्रीगुरुजी 14/02/2017 - 15:34
रवी शास्त्री ज्या पध्दतीने खेळला हे बघून खरोखरच त्याच्यावर संताप आला होता. मुंबईत काही ठिकाणी त्याचे पोस्टर जाळायचा वगैरेही प्रकार झाला होता. त्याकाळी क्रिकेट हा अगदी कडव्या धर्माप्रमाणे मी समजत असे त्यामुळे आम्हा मित्रमंडळींमध्येही रवी शास्त्रीविरूध्द प्रचंड संताप आला होता. नशीबाने त्याला इतर सामन्यांमध्ये घेतले गेले नाही. त्यानंतर सप्टेंबर १९९४ मध्ये त्याने निवृत्ती जाहिर केली तेव्हा तो कोणाच्या खिजगणतीतही नव्हता.
रवी शास्त्रीचे नाव काढले किंवा त्याला बघितले तरी अत्यंत संताप येतो. या माणसाने आपल्या संथ खेळीने अनेक सामने घालविले आहेत. त्याचा निवृत्तीपूर्व शेवटचा सामना देखील भयंकर होता. १९९३-९४ मध्ये भारत द. आफ्रिकेच्या दौर्‍यावर गेला होता. पहिल्या तीन कसोटीतील ३ सामन्यांपैकी १ आफ्रिकेने जिंकला होता व २ अनिर्णित राहिले होते. मालिका वाचविण्यासाठी भारताने चौथा सामना जिंकणे आवश्यक होते. चौथ्या सामन्याने आफ्रिकेने प्रथम फलंदाजी केली. मला नक्की धावफल आठवत नाही, परंतु आफ्रिकेचा दुसरा डाव चौथ्या दिवशी शेवटच्या सत्रात संपल्यानंतर उर्वरीत अर्धा तास व संपूर्ण पाचवा दिवस या वेळात विजयासाठी भारताला ३१८ धावांचे लक्ष्य दिले होते. चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या होती नाबाद १५. सिधू व शास्त्री नाबाद होते. ५ व्या दिवशी भारताला ९० षटकांत ३०३ धावा करायच्या होत्या. परंतु भारताने ५ व्या दिवशी विजयास अजिबात प्रयत्न न करता संपूर्ण दिवस खेळून सामना अनिर्णित ठेवण्यात धन्य मानली. भारताने संपूर्ण ५ व्या दिवसांत ९० षटके खेळून फक्त २ गडी गमावून सामना हरू दिला नाही, परतु धावा फक्त १२५ केल्या. सामना संपला तेव्हा भारताची धावसंख्या नाबाद १५ वरून २ बाद १४० इतकीच झाली होती. त्या डावात सिधु, शास्त्री, मांजरेकर व अझरूद्दीन या चौघांनी अत्यंत संथ फलंदाजी करून भारतीयांना पूर्ण निराश केले. सामना जिंकायचा निदान थोडा प्रयत्न तरी करायचा होता. शास्त्रीने त्या डावात तब्बल २०० मिनिटे फलंदाजी करून जेमतेम २३ धावा केल्या होत्या. हा सामना शास्त्रीच्या आयुष्यातला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. या सामन्यानंतर तो संघातून कायमचा वगळला गेला व परत कधीच संघात येऊ शकला नाही हे आपले सुदैव.

गॅरी ट्रुमन 14/02/2017 - 16:21
१९९२ च्या वर्ल्डकपच्या आधी भारत, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिरंगी मालिका झाली होती. तसेच भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामने झाले होते. त्या पाच पैकी ३ कसोटी सामने झाल्यावर तिरंगी मालिका पूर्ण केली गेली आणि उरलेले दोन कसोटी सामने नंतर झाले. मला वाटते या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात रवी शास्त्रीला दुखापत झाली आणि त्यामुळे तो उपचारांसाठी भारतात परतला. परिणामी त्याला दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळता आले नव्हते. पाचवा कसोटी सामना संपल्यावर साधारण १०-१२ दिवसांनी वर्ल्डकप सुरू होणार होता. रवी शास्त्रीची दुखापत वेळेत बरी होऊ नको दे आणि त्याला वर्ल्डकपमध्ये खेळायला मिळू नको दे असे फार फार वाटत होते. एक दिवस मराठी बातम्यांमध्ये सांगितले गेले: "मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी-- रवी शास्त्री विश्वचषकात खेळू शकणार"!! त्यावेळी आनंदाची बातमी ऐवजी प्रचंड दु:खाची बातमी असे म्हणायला पाहिजे होते असे फार वाटले होते. ही बातमी ऐकून मला तरी त्यावेळी फार वाईट वाटले होते :(

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेला १९९१९ मधला वर्ल्ड्कप हा पूर्वीच्या चारही वर्ल्डकपपेक्षा अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण होता. या वर्ल्डकपमध्ये सर्वप्रथम पांढर्‍या रंगाच्या कपड्यांऐवजी रंगीत कपड्यांचा वापर करण्यात आला होता. पारंपारीक लाल बॉलची जागा पांढर्‍या बॉलने घेतली होती तर पांढरा बॉल स्पष्टपणे दिसावा म्हणून काळ्या रंगाचा साईटस्क्रीनही या वर्ल्डकपमध्येच प्रथम वापरण्यात आला.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८७ - फायनल - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड

स्पार्टाकस ·

गॅरी ट्रुमन 13/02/2017 - 10:05
अजून एक जबरदस्त लेख. भारताचा सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर फायनल बघायचा उत्साहच राहिला नव्हता. तो सामना बघितला होता पण या सामन्याच्या विशेष आठवणी नाहीत. असो. आता १९९२ च्या विश्वचषकावरील लेखांची वाट बघत आहे,

८ नोव्हेंबर १९८७ ईडन गार्डन्स, कलकत्ता कलकत्त्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्डकपची फायनल रंगणार होती. वास्तविक ही फायनल भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होईल असा अनेकांचा अंदाज होता पण 'बिली द किड' क्रेग मॅकटरमॉटने लाहोरला पाकिस्तानला धूळ चारली होती तर ग्रॅहॅम गूचच्या स्वीपने आणि चंद्रकांत पंडीतला एलबीडब्ल्यू देण्याच्या अंपायर टोनी क्राफ्टरच्या साफ चुकीच्या निर्णयामुळे भारताच्या वर्ल्डकपच्या आकांक्षांवर पाणी पडलं होतं!

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८७ - सेमीफायनल - ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान

स्पार्टाकस ·

गॅरी ट्रुमन 12/02/2017 - 09:56
नेहमीप्रमाणे जबरदस्त लेख. या सामन्याची एक आठवण म्हणजे ऑस्ट्रेलियाची बॅटिंंग सुरू असताना स्टेडिअममध्ये 'ले जाएंगे ले जाएंगे हम वर्ल्डकप ले जाएंगे' अशा घोषणा होत होत्या. मियांदादचा उडलेला झेल नक्की कोण पकडणार या गोंधळातून अ‍ॅलन बॉर्डर आणि डायर या दोघांनीही पकडला नाही आणि त्यातून चौकार गेला हे दृश्यही अजूनही आठवते. पाकिस्तानचा संघ शेवटपर्यंत चिवटपणे लढतो असा विश्वास असल्यामुळे शेवटी अब्दुल कादिर आणि तौसिफ अहमद खेळत असतानाही पाकिस्तानच जिंकणार असे वाटत होते. पण क्रेग मॅकडरमॉटने तसे होऊ दिले नाही. पाकिस्तानने पहिली सेमीफायनल गमावल्यानंतर काय आकाश ठेंगणे झाले होते. आता दुसर्‍या दिवशीची इंग्लंडविरूध्दची सेमीफायनल जिंकून कलकत्त्याला इडन गार्डनमध्ये ऑस्ट्रेलियाला नमविले की रिलायन्स कप आपलाच असे मलाच नाही तर बहुसंख्य क्रिकेटचाहत्यांना वाटायला लागले असावे. पण कुठचे काय....

श्रीगुरुजी 12/02/2017 - 16:09
या सामन्यापूर्वी इम्रान अहंकाराने फुरफुरत होता. "आम्ही भारताला भारतामध्ये हरवून विश्वचषक जिंकण्यास उत्सुक आहोत" असे त्याने सांगितले होते. पाकिस्तान यावेळी विश्वचषक जिंकणारच असा पाकिस्तानी संघाला व संपूर्ण पाकिस्तानला प्रचंड अंधविश्वास होता. परंतु ऑस्ट्रेलियाने तो पार धुळीस मिळविला. या सामन्यात शेवटची १० षटके सुरू असताना अक्रमने लागोपाठ ३ वाईड चेंडू टाकल्याचे आठवते. हा सामना हरल्यानंतर लाहोरवर प्रेतकळा पसरली होती असे वाचल्याचे आठवते. हा संपूर्ण सामना मी पाहिला होता व पाकिस्तान हरताना अत्यानंद होत होता. अर्थात दुसर्‍याच दिवशी या अत्यानंदाला टाचणी लागली होती.

In reply to by श्रीगुरुजी

गॅरी ट्रुमन 12/02/2017 - 21:57
पाकिस्तान यावेळी विश्वचषक जिंकणारच असा पाकिस्तानी संघाला व संपूर्ण पाकिस्तानला प्रचंड अंधविश्वास होता. परंतु ऑस्ट्रेलियाने तो पार धुळीस मिळविला.
यात पाकिस्तान ऐवजी भारत लिहिले आणि ऑस्ट्रेलियाऐवजी इंग्लंड लिहिले तर फार परिस्थिती वेगळी नव्हती :( भारताचा इंग्लंडविरूध्दचा सेमीफायनलचा सामना होता ५ नोव्हेंबर १९८७ रोजी म्हणजे गुरूवारी. त्यावेळी मॅच बघायला म्हणून मुंबईतील अनेक खाजगी ऑफिसांनी सुटी दिली होती आणि तो दिवस शनीवरी भरून काढावा असे सांगितले होते. आमच्या बिल्डिंगमधील सगळेच त्या दिवशी घरी होते आणि सगळे मॅच बघत होते. अर्थातच असे पराभव पचवायण्याच्या बाबतीत आपण पाकिस्तानपेक्षा अधिक परिपक्व आहोत (असे मला १९९६ च्या इडन गार्डनवरील श्रीलंकेविरूध्दच्या सेमीफायनलपर्यंत वाटत होते) त्यामुळे मुंबईवर प्रेतकळा वगैरे पसरली नाही पण माझ्यासकट अनेकांना अतीव दु:ख नक्कीच झाले होते. इडन गार्डनवरील प्रकाराने मात्र त्या समजाला तडा गेला. १९९९ मध्ये इडन गार्डनवरच पाकिस्तानविरूध्दच्या कसोटीच्या वेळी परत एकदा हुल्लडबाजी झाल्यावर सगळे स्टेडिअम खाली करून सामना खेळवला गेला होता. नशीबाने त्यानंतर असे काही झालेले नाही.

४ नोव्हेंबर १९८७ गद्दाफी, लाहोर लाहोरच्या गद्दाफी स्टेडीयमवर यजमान पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्डकपची पहिली सेमीफायनल खेळली जाणार होती. न्यूझीलंडविरुद्धच्या ग्रूपमधल्या शेवटच्या मॅचमध्ये गावस्कर - श्रीकांत यांच्या आतषबाजीने ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या स्थानावर ढकललं होतं. ग्रूपमधल्या आपल्या सगळ्या मॅचेस भारतात खेळणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने पाकिस्तानविरुद्ध आणि ते देखिल पाकिस्तानमध्ये खेळणं निश्चितच कठीण आव्हान होतं. या वर्ल्डकपनंतर आपण क्रिकेटमधून रिटायर होत असल्याची आणि लाहोरची मॅच ही पाकिस्तानमधली आपली अखेरची मॅच असल्याचं इमरान खानने जाहीर केलेलं होतं.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८७ - भारत विरुद्ध न्यूझीलंड

स्पार्टाकस ·

गॅरी ट्रुमन 11/02/2017 - 09:50
अरे वा . मस्तच. हा सामना अगदीच एकतर्फी झाला होता पण भारताचा दणदणीत विजय झाल्यामुळे चांगलाच लक्षात आहे. स्पार्टाकसभाऊंची ही लेखमाला मिपावरील क्लासिक लेखमाला होणार यात शंकाच नाही.

In reply to by सिरुसेरि

गॅरी ट्रुमन 11/02/2017 - 17:14
अझरने रिलायन्स कपच्या इतर काही मॅचमध्येही गोलंदाजी केली होती हे लक्षात आहे. रिलायन्स कपमध्ये एका गटात ४ संघ होते आणि प्रत्येक संघ इतर तीन संघांशी साखळीमध्ये दोनदा खेळला होता. भारताची ऑस्ट्रेलियाविरूध्द पहिली मॅच मद्रासला झाली होती आणि आपला त्यात एका धावेनी पराभव झाला होता हे याच लेखमालेतील अन्य एका लेखात आलेच आहे. तर भारताची ऑस्ट्रेलियाविरूध्द दुसरी मॅच दिल्लीला झाली होती आणि त्या मॅचमध्ये अझरने पहिल्यांदा अर्धशतक ठोकले होते आणि नंतर बॉलिंग करताना ३ विकेट्सही घेतल्या होत्या. इतरही काही मॅचमध्ये अझरने गोलंदाजी केली होती--- भारताने गमावलेल्या रिलायन्स कपच्या मुंबईतील इंग्लंडविरूध्दच्या सेमीफायनलमध्ये सुध्दा त्याने गोलंदाजी केली होती असे लक्षात आहे.

श्रीगुरुजी 12/02/2017 - 15:52
गावसकर तसा फार आक्रमक फलंदाज नसल्याने त्याने खाली खेळावे ही कपिलची सूचना होती. जरी गावसकरने झिंबाब्वेविरूद्ध ११४ चेंडूत फक्त ५० धावा केल्या होत्या, तरी ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्याने ७२ चेंडूत ६१ धावा करून बर्‍यापैकी वेगवान खेळी केली होती. शतक पूर्ण करण्याआधी गावसकर ९९ वर नाबाद होता तेव्हा त्याने ७८ चेंडू खेळले होते. विश्वचषक स्पर्धेत ८२ धावात शतक करणार्‍या लॉईडचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी त्याला होती. परंतु त्याने नंतरचे पूर्ण षटक निर्धाव खेळून काढले व त्यानंतर ८५ व्या चेंडूला १ धाव घेऊन शतक पूर्ण केले. त्यामुळे नवीन विक्रम करण्याची संधी गमाविली. १९७५ मध्ये आपल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात गावसकर पूर्ण ६० षटके खेळून फक्त नाबाद ३६ धावा करू शकला होता. तेव्हा त्याची धावगती २० पेक्षाही कमी होती. त्याच गावसकरने आपल्या शेवटून दुसर्‍या सामन्यात तब्बल ११७ धावगतीने फक्त ८५ चेंडूत शतक केले होते. त्यावेळी मटामध्ये वि. वि. करमरकर यांनी अत्यंत समर्पक शब्दात लिहिले होते की "मावळतीचा सूर्य बघायला जावे, पण प्रत्यक्षात मध्यान्हीचा तळपता सूर्य दिसावा असा गावसकरचा खेळ होता.".

गॅरी ट्रुमन 13/02/2017 - 10:14
या सामन्यासाठी लंचनंतर श्रीकांत आणि गावसकर बॅटिंगसाठी येत असताना अ गटात पहिला क्रमांक मिळविण्यासाठी भारताला हे आव्हान ४२.२ ओव्हर्समध्ये गाठणे गरजेचे आहे असे टिव्हीवर दाखवत होते हे आठवते. तसेच श्रीकांत आऊट झाल्यानंतर त्यावेळी सिध्दू बॅटिंगसाठी यायचा. रिलायन्स कपच्या वेळी सिध्दू चांगलाच फॉर्ममध्ये होता तेव्हा श्रीकांत-गावसकरने दिलेल्या चांगल्या सुरवातीनंतर सिध्दू भरपूर फटकेबाजी करेल आणि मॅच बघायला आणखी मजा येईल असे वाटले होते. पण बहुदा गावसकरला शतक ठोकायला मिळावे या उद्देशाने सिध्दूला न पाठवता अझरला पाठविले गेले. या सामन्याच्या दिवशी सकाळी पेपरमध्ये आले होते की न्यू झीलंडचा कॅप्टन जेफ क्रो ने म्हटले की हा सामना जिंकून ६ पैकी ३ सामने जिंकायचा न्यू झीलंडचा प्रयत्न असेल आणि भारताला हा सामना सोपा जाणार नाही. त्याबद्दल त्याची सामना सुरू होण्यापूर्वी थोडी आणि सामना संपल्यावर भरपूर टर आम्ही मित्रमंडळींनी उडवली होती.

३१ ऑक्टोबर १९८७ व्हीसीए, नागपूर नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ग्रूप ए मधली दुसर्‍या राऊंडची मॅच रंगणार होती. वर्ल्डकपमधलं आव्हान संपुष्टात आल्याने त्यांच्या दृष्टीने या मॅचला काहीच अर्थ नव्हता. भारत आणि ऑस्ट्रेलियाने ग्रूप ए मधून सेमीफायनल गाठली होती तर ग्रूप बी मधून पाकिस्तान आणि इंग्लंडने. पाकिस्तानने ग्रूप बी मध्ये पहिला क्रमांक मिळवला असल्याने ग्रूप ए मध्ये दुसर्‍या स्थानावर राहणार्‍या टीमला लाहोरच्या मैदानात पाकिस्तानशी सेमीफायनलमध्ये मुकाबला करावा लागणार होता.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८७ - वेस्ट इंडीज विरुद्ध पाकिस्तान

स्पार्टाकस ·

गॅरी ट्रुमन 10/02/2017 - 10:15
मस्त. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत खिळवून ठेवलेल्या मॅचमधील ही एक मॅच होती. या मॅचमधील अगदी प्रत्येक बॉल मी बघितलेला होता. पाकिस्तानी क्रिकेटपटू अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आशा सोडत नाहीत आणि जीव तोडून खेळायचे (मॅचफिक्सिंग नावाचा कलंक क्रिकेटला लागायच्या आधीचा हा काळ होता) हे जावेद मियांदादने चेतन शर्माला शेवटच्या बॉलवर मारलेल्या सिक्समुळे आणि मार्च १९८७ च्या भारताविरूध्दच्या बंगलोर टेस्टमुळे कळलेच होते. या मॅचमुळे त्या समजावर अगदी शिक्कामोर्तब झाले होते. त्यामु़ळेच नंतर पाकिस्तान ऑस्ट्रेलियाविरूध्दची सेमीफायनल काहीही करून जिंकेल असेच शेवटपर्यंत वाटत होते. तौसिफ अहमद हा त्या काळातील एक चांगला स्पीनर होता. त्याने खूप विकेट घेतल्या आणि नंतर शेन वॉर्न किंवा अनिल कुंबळेसारख्या उंचीला पोहोचला नाही. पण आयत्या वेळी तो एखादी विकेट काढून पाकिस्तानचे हातातून चाललेल्या सामन्यात नियंत्रण आणून द्यायचा. या सामन्यातही फिल सिमॉन्स चांगला सेट झालेला असताना त्याची विकेट तौसिफनेच घेतली होती. मार्च १९८७ च्या भारताविरूध्दच्या बंगलोर टेस्टमध्ये पहिल्या डावात ५ आणि दुसर्‍या डावात ४ विकेट्स त्याने घेतल्या होत्या. विशेषतः दुसर्‍या डावात दिलीप वेंगसरकरला त्याने त्रिफळाचीत केले आणि धोकादायक ठरणार्‍या रॉजर बिन्नीलाही आयत्या वेळी त्याने आऊट केले होते.

गॅरी ट्रुमन 10/02/2017 - 10:38
पाकिस्तानचा संघ शेवटपर्यंत झुंजत राहतो हा माझा विश्वास त्याकाळी दृढमूल झाला होता त्यासाठी आणखी एक कारण होते. या पाकिस्तान विरूध्द वेस्ट इंडिज सामन्याच्या ३-४ दिवस आधी पाकिस्तान विरूध्द इंग्लंड हा सामना रावळपिंडीमध्ये झाला होता. एक वेळ अशी आली होती की माईक गॅटिंग आणि अ‍ॅलन लॅम्ब हे दोघे खंदे वीर मैदानात होते. इंग्लंडसाठी विजय पन्नास एक धावा दूर होता आणि तीनच विकेट्स गेलेल्या होत्या. अशावेळी इंग्लंड किती विकेट्स राखून आणि ५० ओव्हरपूर्वी किती आधी जिंकणार हाच प्रश्न होता. पण तरीही पाकिस्तानच्या बॉलर्सनी आशा सोडली नाही. सलीम जाफरने गॅटिंगला आऊट केले आणि त्यानंतर अ‍ॅलन लॅम्बही परतला आणि एकेक करून इंग्लंडचे फलंदाज तंबूत परतू लागले. कोणतीही विकेट पडल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंचा जिगर दाखविणारा जल्लोष (आणि ते खेळत असलेला झिम्मा) खरोखरच जबरदस्त होता. शेवटी ही मॅचही पाकिस्तानने जिंकली होती. थोडे विषयांतर होत आहे पण १९९७ मध्ये शारजात पाकिस्तान विरूध्द झिम्बाब्वे सामन्यातही पाकिस्तानची ७ बाद ४० अशी अवस्था झाली होती. अशावेळी मोईन खानने किल्ला लढविला आणि पाकिस्तानला सर्वबाद होऊ न देता १५० पर्यंत पोहोचवले. आणि त्यानंतर वसिम अक्रम आणि इतरांनी झिंबाब्वेला गुंडाळून तो सामना जिंकला. पाकिस्तान ७ बाद ४० असताना हा सामनाही पाकिस्तान जिंकू शकेल असे फार कोणाला वाटले नसावे.

In reply to by गॅरी ट्रुमन

गामा पैलवान 10/02/2017 - 19:23
गॅरी ट्रुमन, पाकिस्तानी खेळाडू चिवटपणे शेवटपर्यंत लढंत राहतात ही तुमची धारणा बरोबर आहे. इमरानखानाने ही जिद्द निर्माण केली. मात्र त्याच बरोबर त्याने बुचाने चेंडू कुरतडणे इत्यादी अश्लाघ्य कृत्येही केली. अर्थात, प्रस्तुत सामन्यात असं घडलं असेलंच असं खात्रीने सांगता येत नाही. आ.न., -गा.पै.

१६ ऑक्टोबर १९८७ गद्दाफी, लाहोर लाहोरच्या गद्दाफी स्टेडीयममध्ये यजमान पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यात ग्रूप बी मधली मॅच खेळली जाणार होती. ग्रूपमधल्या आपल्या पहिल्या मॅचमध्ये इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागल्यावर वेस्ट इंडीजने श्रीलंकेचा फडशा पाडला होता, पण सेमीफायनल गाठण्याच्या दृष्टीने ही मॅच जिंकणं वेस्ट इंडीजला अत्यावश्यक होतं. १९८४ - ८५ चा मोसमात क्लाईव्ह लॉईड रिटायर झाल्यावर वेस्ट इंडीजच्या संघाच्या कॅप्टनपदाची जबाबदारी आली होती व्हिव्हियन रिचर्ड्सकडे!