मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रीडा

वर्ल्डकप क्लासिक्स - २००७ - आयर्लंड विरुद्ध झिंबाब्वे

स्पार्टाकस ·
२००७ चा वर्ल्डकप हा वेस्ट इंडीजमध्ये झालेला पहिला वर्ल्डकप. वेस्ट इंडीजमधल्या बार्बाडोस, जमेका, गयाना, त्रिनिदाद - टोबॅगो, अँटीगा - बर्बुडा, ग्रेनेडा, सेंट कीट्स - नेव्हीस आणि सेंट लुशिया या आठ देशांत वर्ल्डकपच्या मॅचेस खेळवण्यात आल्या होत्या. वर्ल्डकपच्या मॅचेससाठीच्या सुरक्षा नियमांमुळे आणि वेस्ट इंडीयन प्रेक्षकांच्या रसिकतेचं अविभाज्यं अंग असलेल्या ड्रम्स आणि इतर वाद्यांवर बंदी घालण्यात आल्याने वेस्ट इंडीजच्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच नाराजी होती. त्याचबरोबर मॅचच्या तिकीटांच्या किमतीही सामान्यांच्या आवाक्याबाहेर होत्या.

वर्ल्डकप क्लासिक्स - २००३ - दक्षिण आफ्रीका विरुद्ध श्रीलंका

स्पार्टाकस ·
३ मार्च २००३ किंग्जमीड, दर्बन क्वा झुलू नाताल प्रांतातल्या दर्बानच्या किंग्जमीड मैदानावर यजमान दक्षिण आफ्रीका आणि श्रीलंका यांच्या पूल बी मधली मॅच होणार होती. दक्षिण आफ्रीकेच्या दृष्टीने ही मॅच अत्यंत महत्वाची होती. ग्रूपमधल्या पहिल्याच मॅचमध्ये वेस्ट इंडीजकडून पराभव पत्करावा लागलेल्या दक्षिण आफ्रीकेला नंतर न्यूझीलंडने पावसाने व्यत्यय आलेल्या मॅचमध्ये डकवर्थ - लुईस नियमाच्या आधारे हरवलं होतं.

वर्ल्डकप क्लासिक्स - २००3 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड

स्पार्टाकस ·
२ मार्च २००३ सेंट जॉर्जेस पार्क, पोर्ट एलिझाबेथ ईस्टर्न केप प्रांतातल्या पोर्ट एलिझाबेथच्या सेंट जॉर्जेस पार्कच्या मैदानावर पारंपारिक अ‍ॅशेस प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पूल ए मधली मॅच खेळली जाणार होती. ग्रूपमधल्या पहिल्या पाचही मॅचेस जिंकून ऑस्ट्रेलिया आधीच सुपर सिक्समध्ये धडकली होती त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने या मॅचला फारसं महत्वं नव्हतं, पण We want to win everything या वृत्तीने वर्ल्डकपमध्ये उतरलेल्या स्टीव्ह वॉला एकही मॅच गमावणं आणि ते देखिल इंग्लंडसारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध हे कधीही मंजूर होणं शक्यं नव्हतं.

वर्ल्डकप क्लासिक्स - २००३ - भारत विरुद्ध पाकिस्तान

स्पार्टाकस ·
१ मार्च २००३ सुपर स्पोर्ट्स पार्क्स, सेंचुरीयन ग्वाटेंग प्रांतातल्या सेंचुरीयनच्या सुपर स्पोर्ट्स पार्क मैदानात भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधली पूल ए मधली मॅच रंगणार होती. २००३ च्या वर्ल्डकपमधली मॅच ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातली वर्ल्डकपमधली चौथी मॅच. १९९२, १९९६ आणि १९९९ मधल्या तीन्ही मॅचेसमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता त्यामुळे त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान निकराने प्रयत्नं करणार हे उघड होतं. पाकिस्तानच्या दृष्टीने ही मॅच आणखीन एका कारणाने महत्वाची होती ती म्हणजे या मॅचमध्ये विजय मिळवल्यास पाकिस्तानला सुपर सिक्समध्ये प्रवेश मिळवणं सुकर होणार होतं.

वर्ल्डकप क्लासिक्स - २००३ - वेस्ट इंडीज विरुद्ध श्रीलंका

स्पार्टाकस ·
२८ फेब्रुवारी २००३ न्यूलँड्स, केपटाऊन टेबल माऊंटनच्या पार्श्वभूमीवर असलेल्या केपटाऊनच्या निर्सगरम्य न्यूलँड्सच्या मैदानात पूल बी मधली वेस्ट इंडीज आणि श्रीलंका यांचातली मॅच होती. वर्ल्डकपमधलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी वेस्ट इंडीजच्या दृष्टीने ही मॅच अत्यंत महत्वाची होती.

वर्ल्डकप क्लासिक्स - २००३ - दक्षिण आफ्रीका विरुद्ध वेस्ट इंडीज

स्पार्टाकस ·
२००३ चा वर्ल्डकप हा आफ्रीका खंडातला पहिला वर्ल्ड्कप! अपार्थाईड व्यवस्था मोडीत निघाल्यावर १९९१ मध्ये क्रिकेटजगतात परतलेल्या दक्षिण आफ्रीकेला झिंबाब्वे आणि केनिया यांच्याबरोबर या वर्ल्डकपचं यजमानपद देण्यात आलं होतं. हा वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वीच इंग्लंडच्या संघाने रॉबर्ट मुगाबेच्या हुकूमशाही सरकारच्या निषेधार्थ हरारे इथे झिंबाबवेविरुद्धच्या मॅचमध्ये खेळण्यास नकार दिला. इंग्लंडप्रमाणेच न्यूझीलंडच्या संघाने सुरक्षिततेच्या कारणावरुन केनियाविरुद्ध नैरोबी इथे खेळण्यास नकार दिला.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९९९ - सेमीफायनल - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रीका

स्पार्टाकस ·
१७ जून १९९९ एजबॅस्टन, बर्मिंगहॅम वॉरीकशायर काऊंटीचं माहेरघर असलेल्या एजबॅस्टनच्या मैदानात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात वर्ल्डकपची दुसरी सेमीफायनल रंगणार होती. या मॅचमधील विजेत्या संघाची लॉर्ड्सवर फायनलमध्ये गाठ पडणार होती ती पाकिस्तानशी. ओल्ड ट्रॅफर्डच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा आरामात पराभव करुन पाकिस्तान फायनलमध्ये धडकले होते.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९९९ - सुपर सिक्स - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रीका

स्पार्टाकस ·
१३ जून १९९९ हेडींग्ली, लीड्स यॉर्कशायर काऊंटीचं माहेरघर असलेल्या हेडींग्लीच्या मैदानात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात सुपर सिक्समधली शेवटची मॅच रंगणार होती. ऑस्ट्रेलियाच्या दॄष्टीने ही मॅच अत्यंत महत्वाची होती. सेमीफायनल गाठण्यासाठी ही मॅच जिंकणं अत्यावश्यक होतं. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रीका आणि पाकिस्तान यांनी आधीच सेमीफायनलम गाठली होती. पण या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाल्यास न्यूझीलंडविरुद्धची मॅच पावसात वाहून गेल्यामुळे एक पॉईंट मिळालेल्या झिंबाब्वेला सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळाला असता!

वर्ल्डकप क्लासिक्स - १९९९ - दक्षिण आफ्रीका विरुद्ध झिंबाब्वे

स्पार्टाकस ·
२९ मे १९९९ काऊंटी ग्राऊंड, चेम्सफर्ड इसेक्स काऊंटीचं माहेरघर असलेल्या चेम्सफर्डच्या मैदानात ग्रूप ए मधली दक्षिण आफ्रीका आणि झिंबाब्वे यांच्यातली मॅच खेळली जाणार होती. ग्रूप ए मधून दक्षिण आफ्रीका आणि भारत या दोन संघांचा सुपर सिक्स मधला प्रवेश नक्की झाला होता. पण इंग्लंडच्या सुपर सिक्समधल्या प्रवेशाच्या आशा मात्रं या मॅचवर टिकून होत्या.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९९९ - भारत विरुद्ध झिंबाब्वे

स्पार्टाकस ·
१९९९ चा वर्ल्डकप हा १९७५, १९७९ आणि १९८३ या पहिल्या तीन वर्ल्डकपनंतर १६ वर्षांनी इंग्लंडमध्ये झालेला चौथा वर्ल्डकप. या वर्ल्डकपचं एक वैशिष्ट्यं म्हणजे या वर्ल्डकपमधल्या काही मॅचेस इंग्लंडबरोबरच स्कॉटलंडमध्ये एडींबर्ग, वेल्समध्ये कार्डीफ, आयर्लंडमध्ये डब्लिन आणि हॉलंडमध्ये अ‍ॅम्स्टलव्हीन इथे खेळवण्यात आल्या होत्या. टेस्ट क्रिकेटचा दर्जा नसताना वर्ल्डकपमध्ये यजमानपदाची संधी मिळालेला स्कॉटलंड हा पहिला देश! या वर्ल्डकपचं एक वैशिष्ट्यं म्हणजे या वर्ल्डकपमध्ये ग्रूप मॅचेसनंतर १९९६ च्या वर्ल्डकपप्रमाणे क्वार्टरफायनलच्या ऐवजी सुपर सिक्स ही पुढची पायरी ठरवण्यात आली होती.