लाॅकडाऊन: अडतिसवा दिवस
२१ मार्चला पहिले लाॅकडाऊन सुरू झाले. सुरूवातीच्या दिवसांत इतर गोष्टींमध्ये वेळ घालवण्यासोबत 'ओटीटी' प्लॅटफाॅर्मवरील वेब सिरिज बघायला सुरूवात केली. वूटची असुर, हाॅटस्टारची स्पेशल आॅप्स, एमएक्स प्लेअरच्या पांडू आणि समांतर अशा एका पाठोपाठ एक वेब सिरिजचा फडशा पाडत असताना, एक दिवस मित्राने 'मनी हाईस्ट' या वेबसिरीजची लिंक पाठवली. यातला हाईस्ट शब्द नवीन असल्याने, त्याचा अर्थ गूगलवर शोधू गेलो तर राॅबरी असा त्याचा अर्थ सापडला.