लाॅकडाऊन: अडतिसवा दिवस

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
1 May 2020 - 12:18 pm

२१ मार्चला पहिले लाॅकडाऊन सुरू झाले. सुरूवातीच्या दिवसांत इतर गोष्टींमध्ये वेळ घालवण्यासोबत 'ओटीटी' प्लॅटफाॅर्मवरील वेब सिरिज बघायला सुरूवात केली. वूटची असुर, हाॅटस्टारची स्पेशल आॅप्स, एमएक्स प्लेअरच्या पांडू आणि समांतर अशा एका पाठोपाठ एक वेब सिरिजचा फडशा पाडत असताना, एक दिवस मित्राने 'मनी हाईस्ट' या वेबसिरीजची लिंक पाठवली. यातला हाईस्ट शब्द नवीन असल्याने, त्याचा अर्थ गूगलवर शोधू गेलो तर राॅबरी असा त्याचा अर्थ सापडला. सुरूवातीला फारसे लक्ष गेले नव्हते त्या सिरिजकडे, पण सोशल मिडियावर काही ठिकाणी उल्लेख वाचले आणि त्याचदरम्यान ही सिरिज नेटफ्लिक्सच्या इंडियन व्ह्युवर्समध्ये टाॅपला असल्याचे दिसून आले. त्यावेळीच हे काहीतरी वेगळं प्रकरण असल्याची खात्री पटली. झालं. मग दणादण सगळे एपिसोड डाऊनलोड करून घेतले. एखादा एपिसोड बघून, बाकीचे नंतर पाहू, असं स्वतःशीच ठरवून पाहायला सुरूवात केली. पहिला एपिसोड संपला आणि पुढे काय घडलं असेलं अशी उत्सुकता लागल्याने, एका पाठोपाठ एक असे सहा एपिसोड एका बैठकीत पाहून संपवले. त्यापुढच्या दोन दिवसांत पहिल्या सिझनचे तेरा आणि दुसऱ्या सिझनचे आठ एपिसोड पाहून जेव्हा एक स्टोरी संपली आणि डोळ्यांना थोडीशी विश्रांती देण्यासाठी थोडासा ब्रेक घेतला.

प्रोफेसर आणि त्याच्या आठ साथीदारांनी 'द राॅयल मिन्ट' या बँकेतून यशस्वीरित्या चोरलेल्या पैशांची कहाणी म्हणजे मनी हाईस्ट. अ वेल प्लान्ड राॅबरी !! उपचारासाठी लागणाऱ्या पैशांची चोरी करताना प्रोफेसरचे (सर्जिओ मर्किना) वडील कधीतरी त्या बँकेच्या बाहेर पोलिस चकमकीत मारले जातात. चोरीसाठीचा डिटेल्ड प्लान बनवून, वडीलांचा अयशस्वी प्रयत्न पूर्ण करण्यासाठी प्रोफेसर, बर्लिन, नैरोबी, टोकयो, रिओ, डेन्वर, माॅस्को, ओस्लो आणि हेल्सिन्की. एक एक करत आठ निर्ढावलेल्या गुन्हेगारांना एकत्र करतो आणि त्याच्या चोरीची सुरूवात करतो.

तसं बघायला गेलं तर एखाद्या बँकेतून पैशाची चोरी करणे अशी सरधोपट वाटणारी कथा आपण यापूर्वी अनेका सिनेमांतून, मालिकांमधून पाहीलेली असते. पण मनी हाईस्ट या सगळ्याला अपवाद ठरते. ही कथा सरळ रेषेत जाणारी सामान्य कथा नाही. यातल्या अनेक ट्विस्टमुळे, एकाच वेळी समांतर पातळीवर चालणाऱ्या प्रेमप्रकरणांमुळे, एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांमुळे कथेची वीण शेवटपर्यंत उसवत नाही. या सिरिजचा सर्वात मोठा यूएसपी काय असेल तर त्यात मानवी भावभावनांच्या अनेक छटा उत्तम पद्धतीने दाखवल्या गेल्या आहेत. याचाच परिणाम असा होतो कि, बऱ्याचदा सुख-दुःखांच्या हिंदोळ्यावर झुलत तुम्ही त्यातल्या प्रसंगाशी एकरूप होऊन जाता.

सध्या जगभरात गाजत असलेली ही सिरिज सुरूवातीला फ्लाॅप गेली होती यावर विश्वास ठेवणं खरं तर कठीण आहे. रिलिज झाल्यानंतर सुरूवातीच्या काही दिवसांत स्पेनपुरतीच मर्यादीत राह्यल्याने सिरिजला प्रेक्षकवर्ग कमी होता. सुरूवातीला बऱ्यापैकी चालल्यानंतर या वेब सिरिजची जादू ओसरू लागली आणि सिरिज फ्लाॅप झाल्याचे सिरिजच्या दिग्दर्शक - निर्मात्यांनीही मान्य केले. अशात अचानक एक दिवस नेटफ्लिक्स नावाचा मिडास टच सिरिजला लाभला आणि त्यापुढच्या वर्षभरात जगात सर्वात जास्त पाह्यल्या गेलेल्या सिरिजच्या यादीत या वेब सिरिजने तिसरा क्रमांक पटकवला. यथावकाश त्यांना एमी अवार्डही मिळाले आणि उत्तरोत्तर मनी हाईस्टची लोकप्रियता कळसाला पोचली. त्यातल्या कलाकांराचे सोशल मिडियावरील फाॅलोअर दिवसागणीक लाखोंच्या संख्येने वाढायला लागले. ग्लोबली सिरिजला मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि वाढत जाणारी लोकप्रियता पाहून नेटफ्लिक्सने मनी हाईस्टच्या टिमला आणखी एक चोरी करण्याचे प्रपोजल दिले आणि तिथून पुढे ती संपूर्ण टिम पुन्हा नव्या जोमाने, नव्या उमेदाने सुसाट सुटलीये. सध्या जगभरात मनी हाईस्टचा तिसरा आणि चौथा सिझन खूप गाजतोय.

दुसऱ्या लाॅकडाऊनची मुदत ३ मे रोजी संपतेय. जवळपास चाळीस पेक्षा जास्त दिवसांपासून लोक घरात अडकलीयेत. सतत २४ तास धावणाऱ्या मुंबईला ब्रेक लागल्यामुळे, घराच्या चार भिंतीमध्ये अडकून पडलेली जनता प्रचंड कंटाळलीये. पण करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लाॅकडाऊनची मुदत संपण्याेएवजी वाढण्याचीच लक्षणे जास्त दिसताहेत. लोकांनी पहिल्या लाॅकडाऊनमध्येच नियमांचं काटेकोरपणे पालन केलं असतं, तर कदाचित आज ही वेळ आलीच नसती. असो. 'मनी हाईस्ट'च्या दुसऱ्या कथेचा पाचवा सिझन पुढील वर्षी येईल तोवर तुम्ही चार सिझनमध्ये विभागलेले हे दोन्ही जबरदस्त दरोडे पाहून घ्या.

धोरणमांडणीवावरप्रकटनप्रतिसादप्रतिक्रियाआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

1 May 2020 - 12:25 pm | कुमार१

+११
तिचे ३ भाग पाहिले आहेत. छानच !
यासंबंधी पूर्वी इथे काही लिहीलेले आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 May 2020 - 4:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवा, वेबसिरीज वेळेअभावी म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा कधीच झेपल्या नाहीत आणि तिकडे फिरकलोही नाही. आता मिपाकर म्हणू तुम्ही दी रॉयल मिंट म्हणून उल्लेख केला ते चाळतो. आपल्याकडूनच अशा विविध गोष्टीची माहिती होते आभार. आम्ही आपले रामायण महाभारतवाले. उत्तर रामायण लैच कंटाळवाने सुरु आहे तरी पाहतोय.

लॉकडाऊन अगोदर कडकपणे राबवले गेले असते तर वगैरे हे जर तर काहीही उपयोगाचे वाटत नाही. आता यापुढे सामोरं जायचं त्याची तयारी कितपत झाली आहे. ऑरेंज, ग्रीन,रेड झोनमधील परिस्थिती पाहून लॉकडावून शिथील-कडक असेल. नसेल पण येणार्‍या काळात आपल्याला काळजीने वागावे लागेल. शिस्त पाळावी लागेल. लोक हजारोने मेसेजेस फॉरवर्ड करतात घरी राहा बाहेर पडू नका यातले वीसेक टक्के तरी लोक विनाकारण बोंबलतच असतात असे वाटते.

आपण बसलोय लस कधी येईल त्याची वाट पाहात. (कपाळ ठोकणारी स्मायली) अरे लेकहो आपल्याकडे टीव्हीवर कोरोनाचे एक्स्पर्ट हे स्टारकलाकार असतात. जागतिक पातळीवरील क्रिकेटच्या रँक खालीवर झाले की चुकचुक करणारे आपण. कोणत्या खेळाडूला किती रकमेच्या बोलीत आयपीएलमधे घेतलं त्यावर चिंतन मनन करणारे आपण आत्तापर्यंत कोरोनावर लस यायला पाहिजे म्हणतो आपण अरे तिकडे संशोधनाच्या काय सोयी आहेत, किती वेतनावर ते काम चालतं. किती मूलभूत संशोधनाची केंद्रे आहेत ? किती वित्त पुरवठा होतो यावर काहीच काम नसतं.

परळ येथील हाफ़किनच एक नाव ऐकलेलं मी जी विंचू, सर्पदंश यावर आणि काही गोष्टींवर लस तयार करत असते अशा अनेक संस्था असतील पण त्यावर त्या सारख्या विविध उच्च दर्जांच्या संस्थांचं काम मोठं व्हायला पाहिजे. भविष्यात अशी अनेक संकटे येतील आणि अशाच कोणत्या तरी साथीने जगाला गुंडाळलेले असेल असे वाटते.

जाऊ द्या... तान तरी कशाकशाचा घ्यावा. देवा एखादा चांगला सिनेमा सुचवा. अडकले सुटले वगैरे. मनाचं समाधान. दुसरं काय.

-दिलीप बिरुटे

चौकटराजा's picture

1 May 2020 - 9:38 pm | चौकटराजा

टीनेज बँक हाईस्ट तू नळीवर आहे.

चौकटराजा's picture

1 May 2020 - 9:42 pm | चौकटराजा

सर्कस कथा , पटकथा, गायन ,सन्गीत,निर्मिती व अभिनय चार्ली चाप्लिन

चांदणे संदीप's picture

1 May 2020 - 5:02 pm | चांदणे संदीप

पहिल्या एपिसोडमधले प्रत्येक कॅरॅक्टरच्या इन्ट्रोडक्शनने इतके बोर मारले की पुढचा एपिसोडपण न पाहता मी सिरीज डिलीट मारली होती. आता परत बघावी म्हणतोय.

सं - दी - प

चौथा कोनाडा's picture

1 May 2020 - 5:13 pm | चौथा कोनाडा

मनी हाईस्ट ची ओळख भारी करून दिलीय !

बघायला पाहिजे ही वेसि !

ही सिरीज डाउनलोड केलेली आहे पण अजून पाहायला सुरुवात केलेली नाही, आता लवकरच बघावी लागणार हे निश्चित.

प्रशांत's picture

1 May 2020 - 10:36 pm | प्रशांत

ते १० वी क कधी पुर्ण करता?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 May 2020 - 11:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लॉकडाऊनच्या धाग्यानिमित्त लिहिलं त्यांनी.

-दिलीप बिरुटे

शिरोडकरचं लग्न झालं आता, आता काय लिहिणार कप्पाळ..

किसन शिंदे's picture

3 May 2020 - 4:54 pm | किसन शिंदे

२०५०

सूक्ष्मजीव's picture

1 May 2020 - 11:53 pm | सूक्ष्मजीव

छानच!

ही सिरीज स्पॅनिश मधे आहे की इंग्लिश मधे ?

किसन शिंदे's picture

3 May 2020 - 4:55 pm | किसन शिंदे

मूळ सिरिज स्पॅनिश भाषेत आहे, पण नेटफ्लिक्सवर इंग्लिशमध्ये बघता येईल तुम्हाला.

सूक्ष्मजीव's picture

5 May 2020 - 1:31 pm | सूक्ष्मजीव

मिळाली.

स्पॅनिश व इंग्लिश असा ड्युअल ऑडीओ असलेला पहिला सिझन मिळाला.

गणेशा's picture

2 May 2020 - 9:29 am | गणेशा

तू चांगले लिहिले आहे..
हिंदीत dubbed नसल्याने नाही पाहिली हि series..

किसन शिंदे's picture

3 May 2020 - 4:56 pm | किसन शिंदे

अरे सबटाईटल्स आॅन करून पहा ना. हिंदी डबींगची गरजच वाटत नाही.