टी.सी.

कविता१९७८'s picture
कविता१९७८ in जनातलं, मनातलं
22 Sep 2014 - 11:42 am

काल ट्रेनच्या परतीच्या प्रवासात एक किस्सा घडला, वेस्टर्न लाईनला आता लोकल्स डहाणु पर्यंत झाल्या आहेत आणि तेव्हापासुन इथे लोकल मध्ये लेडीज डब्यात लेडीज टी.सी. दिसते. पालघर या स्टेशनापासुन डहाणु हे तिसरे आणी शेवटचे स्टेशन असल्याने लोकल तशी रीकामीच होती त्यामुळे बर्‍याच बायका सीटवर पहुडल्या होत्या. ती टी.सी पालघरहुन चढली व एकेक करुन तिकीटे चेक करु लागली. माझ्या मागच्या सीटवर एक काकु झोपल्या होत्या त्यांना तीने उठवले व तिकिट मागितले. त्या म्हणाल्या गाडी सुटली होती घाई-घाईत पकडली म्हणुन तिकिट नाही काढलं , टी.सी म्हणाली तुम्हाला फाईन भरावा लागेल, त्या काकु लगेचच गयावया करु लागल्या, पाय दुखत होता, गाडी सुटली म्हणुन मी तिकीट नाही काढलं , २० रु घे, कशाला रीसीप्ट फाडतेस त्यावर टी.सी. म्हणाली हे २० रु वगैरे असलं मी काही घेत नाही आणि बोलता बोलता तिने रीसीप्ट त्या काकुच्या हातात दिली आणी पैसे घेउन सुट्टे पैसे तिला परत केले. काकु धडधडीत खोटं बोलत होत्या हे सर्वांनाच माहीत होतं कारण लोकल एकदा सुटली की लगेच स्पीड पकडते त्यामुळे इथल्या लोकांना लोकल मधे चढणं शक्य नाही , बाकीच्या शटल्स , पॅसेंजर्स लगेचच स्पीड पकडत नाही त्यामुळे एकवेळ त्या गाडीत माणसं चढतात. चालत्या गाडीत चढणे हे चुकच आहे तरीही बर्‍याचदा असे होते कारण इथे सध्यातरी दुपारनंतर १ -२ तासांच्या अंतरावर गाड्या आहेत.

माझ्यासहीत बाकीच्या बायका त्या काकुला समजवायला लागल्या की तिकीट काढलंच पाहिजे आता पाहा २५ - ३० रु वाचवायला गेलात पण २७० रुपयांचा फटका बसला ना, आणि तसंही त्यावेळी दर १०-१५ मिनिटांनी अशा ३ -४ गाड्या होत्या ही गाडी सुटली तरीही दुसरी मिळाली असती. त्यावर त्या काकु म्हणाला जाउ दे तिला खाउ दे पैसे , त्यावर आम्ही सर्वांनी सांगितले ते पैसे ती खाणार नाहीये तिला खायचे असते तर तिने रीसीप्ट फाडलीच नसती आमचे हे सर्व संभाषण ती दरवाज्याजवळ उभे राहुन ऐकत होती. थोड्यावेळाने आली आणि सांगायला लागली की काय करणार हो लोकं तिकिटं काढत नाहीत , आमचं तर रोजचं आहे हे पण मी पैसे घेत नाही , आम्हाला चांगला पगार मिळतो, असे लोकांचे पैसे घ्या आणि तेच पैसे डॉक्टर कडे घालवा त्यापेक्षा मी कुणाकडुनही पैसे घेत नाही आणि अशा कीती लोकांना सोडणार बर्‍याच जणांकडे रीसीप्ट एवढे ही पैसे नसतात तर केव्हा केव्हा त्यांना सोडुन देते.

मला त्या टी.सी. चे कौतुक वाटले कारण टी.सी म्हंटले की कुणी विश्वासच ठेवत नाही की ते पैसे घेत नाही पण मी अशी प्रामाणिक टी.सी. पहिल्यांदाच पाहीली.

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

22 Sep 2014 - 12:37 pm | कवितानागेश

:)
असे लोक कमी दिसतात.

एस's picture

22 Sep 2014 - 12:39 pm | एस

मला त्या टी.सी. चे कौतुक वाटले कारण टी.सी म्हंटले की कुणी विश्वासच ठेवत नाही की ते पैसे घेत नाही पण मी अशी प्रामाणिक टी.सी. पहिल्यांदाच पाहीली.

+१... टीसीचे कौतुक!

दिपक.कुवेत's picture

22 Sep 2014 - 12:46 pm | दिपक.कुवेत

हम्म...आताशा असे टीसी फार कमी दिसायला लागलेत. सगळ्यांचा पैसे घेण्यावरच जोर असतो.

प्रामाणिकपणाचं कौतुक आहेच परंतू असं नेहमीच झालं की २०रुपये देऊन पटवलं ही कथा बंद होईल. ठराविक स्टे वर आता धाडच टाकतात उदा० मुंब्रा आणि ठाकुर्ली.मुंबऱ्याला एखाद्या बाईला पकडले की ती राडा करायची आणि पाचदहा मिनीटांत तिला सोडवायला नगरसेवक यायचा!
शिंदे नावाच्या टीसीने मे २०१३ ते एप्रिल २०१४ या काळात एक कोटी रुपयाच्या पावत्या फाडल्यापासून टीसींना रेल्वेने टार्गेट दिले आहे.

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 12:06 pm | प्रसाद१९७१

मुंबऱ्याला एखाद्या बाईला पकडले की ती राडा करायची आणि पाचदहा मिनीटांत तिला सोडवायला नगरसेवक यायचा!

हरकत नाही, त्या नगरसेवकाला १-२ तास घालवावे लागले हे ही काही वाईट नाही.

दिपक.कुवेत's picture

22 Sep 2014 - 1:16 pm | दिपक.कुवेत

तिकिट नसलेला चेहरा बरोब्बर कसा काय पकडतात हे एकदा जाणून घ्यायचय.

पोटे's picture

22 Sep 2014 - 1:26 pm | पोटे

असे काय न्हाय .. आम्हाला जेंव्हा जेंव्हा पकडले तेंव्हा तिकिट होते

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Sep 2014 - 1:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

असे सरकारी कर्मचारी कमी आहेत. पण ते आहेत म्हणून काहीतरी सुधारणा होईल अशी आशा आहे !

बॅटमॅन's picture

22 Sep 2014 - 1:40 pm | बॅटमॅन

टीसीचे कौतुक आहे. लय भारी.

प्यारे१'s picture

22 Sep 2014 - 2:04 pm | प्यारे१

मला टी सी मराठी होती याचं कौतुक वाटतंय. ;)
(मराठीमध्ये बोलली म्हणून मराठी असं गृहीत धरतोय)

कविता१९७८'s picture

22 Sep 2014 - 2:21 pm | कविता१९७८

ती टी.सी. मुसलमान होती आणि हिंदीत बोलत होती, मी लिहिताना मराठीतुन लिहिलंय.

प्यारे१'s picture

22 Sep 2014 - 2:30 pm | प्यारे१

असो!

प्रभाकर पेठकर's picture

30 Sep 2014 - 4:31 pm | प्रभाकर पेठकर

>>>>ती टी.सी. मुसलमान होती...

धर्म अधोरेखित करण्याची आवश्यकता नव्हती. कोंकणात, सोलापुरात अनेक मराठी भाषिक मुसलमान आहेत.
नुसते, 'तिकिट तपासनिस हिन्दी भाषिक होती' एव्हढा उल्लेख पुरेसा होता.

कविता१९७८'s picture

1 Oct 2014 - 10:09 am | कविता१९७८

मुस्लिम हा शब्द केवळ लिहून काय फरक पडतो? सहज लक्षात आलं ते लिहिलं. त्यात बरं वाईट असं काही नाही. उलट सगळीकडे बुरखेवाल्या मुस्लिम महिला दिसतात त्यापेक्षा टीसीची नोकरी करणारी मुलगी मुस्लिम असल्याबद्दल खरं तर कौतुकच वाटलं.

प्रभाकर पेठकर's picture

1 Oct 2014 - 9:15 pm | प्रभाकर पेठकर

इतरांकडे पाहताना, इतरांबद्दल विचार करताना, निदान सुशिक्षितांनी तरी, धार्मिक चष्म्यातून पाहू नये एव्हढेच म्हणायचे आहे.

शिद's picture

1 Oct 2014 - 9:45 pm | शिद

सहमत.

धर्मराजमुटके's picture

1 Oct 2014 - 10:32 pm | धर्मराजमुटके


इतरांकडे पाहताना, इतरांबद्दल विचार करताना, निदान सुशिक्षितांनी तरी, धार्मिक चष्म्यातून पाहू नये एव्हढेच म्हणायचे आहे.

हे ठीक पण त्यांचा धार्मिक चष्म्यातून पाहायचा विचार नसावा असे वाटते. तिकिट तपासनीसाच्या डगल्यावर नावाची पट्टी डकविलेली असते. त्यावरुन त्यांनी त्या बाई मुसलमान आहेत असे म्हटले असावे इतकेच.

अवांतर : अनेक हिंदुंना मुसलमान व्यक्तीला मुसलमान म्हणताना फारच कानकोंडे वाटते. मुस्लीम किंवा मॉमेडीयन म्हटले की जरा सुधारीत पद्धतीने बोलल्यासारखे वाटते असे निरि़क्षण आहे. ( हे अवांतर श्री. पेठकर यांना उद्देशून नाही.)

बॅटमॅन's picture

8 Oct 2014 - 3:52 pm | बॅटमॅन

अवांतर : अनेक हिंदुंना मुसलमान व्यक्तीला मुसलमान म्हणताना फारच कानकोंडे वाटते. मुस्लीम किंवा मॉमेडीयन म्हटले की जरा सुधारीत पद्धतीने बोलल्यासारखे वाटते असे निरि़क्षण आहे.

मराठी म्हणजे नीच अन डौनमार्केट तर इंग्लिश म्हणजे हायफाय अशी समीकरणे गच्च रुतून बसल्यावर दुसरं काय होणार. मी शक्यतोवर मुसलमानच म्हणतो. त्या शब्दात कै अपमानवाचक छटा आजिबात नाही.

>>>निदान सुशिक्षितांनी तरी, धार्मिक चष्म्यातून पाहू नये एव्हढेच म्हणायचे आहे.

+१

कविता१९७८'s picture

1 Oct 2014 - 11:04 pm | कविता१९७८

सुशिक्षितानी तिच्या प्रामाणिकपणाचेही कौतुक केलेले आवडेल.

प्रामाणिकपणा किमान मला तरी सर्वत्र दिसतो, आणि प्रामाणिक असलेली व्यक्ती ही व्यक्ती असते, अगदी त्यात स्त्री-पुरुषपासून ते व्यक्तीचा धर्म-जात याचा उल्लेख करावे असे काही नसते.

तुम्हाला शक्यतो "पहिल्यांदाच" दिसला असेल कदाचित, म्हणून तुम्ही सर्वांना 'किमान' प्रामाणिकपणाचे कौतुक करा असे सांगत आहात. असो.

कविता१९७८'s picture

1 Oct 2014 - 11:54 pm | कविता१९७८

असो.

काउबॉय's picture

22 Sep 2014 - 2:16 pm | काउबॉय

आजकाल डोक्टर बरेच भितीदायक झालेत :(

मी एकदा टीसीची गंमत केली होती, ठाण्याच्या रेल्वे ब्रीजवर काहीवेळा हे उभे असतात, खालुन जे पण प्रवासी येतात त्यांच्याकडुन तिकीटाची विचारणा करतात... मला दिसले की ते अनेक जणांकडुन तिकीट मागत आहेत आणि माझ्या चेहर्‍याकडे पाहताच मी चेहरा एकदमं गंभीर केला, आणि चालण्याचा वेग वाढवला तसेच सरळ चालायचे सोडुन माझ्या पुढील माणांसाच्या बाजुने वेगाने वाट काढायला लागलो...टीसीच्या लक्षात आल्यावर तो माझ्या जवळ आला, तो जवळ येताच पटकन खिशातले तिकीट काढले आणि त्याच्या हातावर टेकवले. ;) त्याच्या चेहरा बघण्या सारखा झाला होता. ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

च्च च्च..टीसीची नोक्री म्हणजे पाप ओ. टीशी, शेल्शमन, इ. लोकांना असे करू नये बा कधी.

असे लोकांचे पैसे घ्या आणि तेच पैसे डॉक्टर कडे घालवा

हे मात्र सत्य आहे. माझ्या ओळखीत जे काही अंडर टेबल व्यवहार करणारे सरकारी कर्मचारी आहेत, त्यांची हीच अवस्था आहे.

प्रभाकर पेठकर's picture

30 Sep 2014 - 4:37 pm | प्रभाकर पेठकर

>>>>लोकल मध्ये लेडीज डब्यात लेडीज टी.सी. दिसते.

'लेडिज' टि.सी. नाही 'लेडी' टि.सी.

बाकी, इंग्रजी शब्दांचा अनावश्यक वापर जरा जास्तच आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे साधे, सोपे पर्यायी मराठी शब्द वापरल्यास बरे होईल.

कविता१९७८'s picture

1 Oct 2014 - 10:11 am | कविता१९७८

लेखातील चुका निदर्शनास आणुन दिल्या बद्द्ल आभारी आहे, टी.सी. च्या प्रामाणिक पणाबद्द्ल ही प्रतिसाद वाचायला मिळाला असता तुमच्या कडुन तर आनंद झाला असता.

प्रभाकर पेठकर's picture

2 Oct 2014 - 1:48 am | प्रभाकर पेठकर

कविता१९७८जी,

'लेडी' आणि 'लेडिज' पेक्षाही जास्त गंभीर चुक मी दाखविली (धार्मिक चष्मा) पण आपल्याला ती रुचली नाही. ह्या चुकी इतकीच ती चुकही मान्य झाली असती तर तुमच्या प्रामाणिकपणाचं कौतुक वाटलं असतं.

बाकी तिकीट तपासनिसाच्या प्रामाणिकपणाचं कौतुक शब्दात व्यक्त करावं एव्हढं विशेष मला त्यात कांही वाटले नाही. असा प्रामाणिकपणा (अप्रामाणिकपणाच्या जोडीने) अनेकदा पाहावयास अनुभवास येतो. कोणाही प्रामाणिक माणसाचं कौतुकच वाटतं पण दरवेळेस ते शब्दात व्यक्त होतंच असं नाही. पण ते व्यक्त झाले नाही म्हणजे त्या मुद्द्याकडे मुद्दामहून दुर्लक्ष केले आहे असेही नाही.

पैसा's picture

1 Oct 2014 - 11:19 pm | पैसा

मूळ प्रसंग बाजूलाच र्‍हायला! प्रतिसादात प्यारेने जसं म्हटलं "मराठी मुलगी टीसी म्हणून कौतुक वाटलं". तसंच कविताने म्हटलं, "मुस्लिम मुलगी टीसी म्हणून कौतुक वाटलं." त्यावर एवढा कीस पाडायची गरज आहे का? तिने मुस्लिम वाईट, किंवा असं काही म्हटलं आहे का? तर करा टीका. मी पण करीन. पण बोलण्याच्या ओघात आपण कित्येक गोष्टी बोलून जातो. त्यातलं प्रत्येकालाच काहीतरी खटकेल. उद्या एखादा टीसी इथे आला तर म्हणेल तुम्ही लोक सगळ्याच टीसीना शिव्या द्यायचं बंद करा. आणखी कोणीतरी उठून म्हणेल ती बाई होती हे का म्हटलंत! टीसी हा टीसी असतो. अशाने कोणी काहीच लिहा बोलायला नको.

त्यावर एवढा कीस पाडायची गरज आहे का?

टीसी हिंदीभाषीक होती फक्त एवढंच नमूद केलं असतं तर कोणाला त्याबद्दल वावगं नसतं वाटलं, निदान मला तरी.

पहाटवारा's picture

2 Oct 2014 - 1:17 am | पहाटवारा

खरंतर कदाचीत लिहिणार्‍याच्या मनातहि नसेल पण जर वाचणार्‍यांनी जर तशा चष्म्यातून पाहिले तर तसेहि दिसेल..
शब्द अथवा विशेषण जर अपमानकारक असेल तरिहि एक वेळ आक्षेपाचे कारण समजेल पण सर्वसाधारण विशेष्-नामाच्या वापरात जर तसा काहिहि अर्थबोध होत नसेल, तर अशावेळी त्याकडे लक्षहि जायला नको.. नाहि का ?

-पहाटवारा

प्रभाकर पेठकर's picture

2 Oct 2014 - 2:10 am | प्रभाकर पेठकर

पैसा,

प्रतिसादात प्यारेने जसं म्हटलं "मराठी मुलगी टीसी म्हणून कौतुक वाटलं". तसंच कविताने म्हटलं, "मुस्लिम मुलगी टीसी म्हणून कौतुक वाटलं."

प्यारेंच्या आणि धागाकर्तीच्या वाक्यांमध्ये फरक आहे.

तिला मराठी समजण्यासाठी प्यारेंनी प्रतिसादातच कारण दिले आहे.
(मराठीमध्ये बोलली म्हणून मराठी असं गृहीत धरतोय)

पण धागाकर्तीने
ती टी.सी. मुसलमान होती आणि हिंदीत बोलत होती, मी लिहिताना मराठीतुन लिहिलंय. ह्या वाक्यात ती मुसलमान होती असा समज होण्यासाठी कांही कारणमिमांसा दिलेली नाही. हिन्दीत बोलणारा प्रत्येकजण मुसलमान असतो का? मुसलमान माणसं मराठी बोलत नाहीत का? आणि सर्वात मुख्य म्हणजे भाषेबद्दल प्रतिसाद असताना धर्म मधे आणणं गैर आहे असे तुम्हाला वाटत नाही का? प्यारेंनी हिन्दू मुलगी असं न म्हणता मराठी मुलगी म्हणजेच मराठी भाषिक मुलगी असे म्हंटले आहे. त्यावर फक्त ' नाही ती हिन्दीभाषिक होती आणि हिंदीत बोलत होती, मी लिहिताना मराठीतुन लिहिलंय.' अशी वाक्यरचना जास्त योग्य झाली असती एव्हढेच मला अधोरेखित करायचे आहे. अकारण धर्माचे उल्लेख आले की हा वेगळा तो वेगळा असे विचार मनांत येतात, त्याच्या पुढची पायरी म्हणून एक चांगला दूसरा वाईट असे विचारही येऊ शकतात. आपल्या विचारांमधून अकारण धर्माचे संदर्भ नाहीसे व्हावेत आणि एकमेकांकडे बघायची आपली दृष्टी साफ व्हावी ही सहिष्णू समाज घडविण्यातील पहिली पायरी असावी.

मला वाटतं ह्या विषयावर जरा जास्तच चर्चा झाली आहे. त्यामुळे माझ्याकडून पूर्णविराम.

कविता१९७८'s picture

2 Oct 2014 - 7:23 am | कविता१९७८

आभार

प्यारे१'s picture

3 Oct 2014 - 3:20 am | प्यारे१

त्या प्यारेला नाय काम.
कशाला तुमी शानि सुरती मान्सं टाईम्फास करु र्‍हायले कुनाला म्हायती.