न्यूयॉर्क आणि वॉशिंटन डी सी मधे कट्टा करूया का?

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
17 Sep 2014 - 8:06 pm

नमस्कार.
पुढील एका महिन्याच्या कालावधीत (२० आक्टोबर पर्यंत) न्यूयॉर्क आणि वॉशिंटन डीसी मधे कट्टा करूया का?
कोण कोण मिपाकर या दोन्ही शहरात आहेत? मी सध्या आल्बनीमधे आहे, आणि खास म्युझियम्स बघण्यासाठी या दोन्ही शहरांचा आठवडाभराचा प्रवास करण्याचा बेत करत आहे.
कट्ट्याचे वेळी एकाद्या म्यूझियमची सफर करू शकतो, किंवा अन्य कुठेतरी मोकळ्या जागी जमू शकतो, आणि पुरेसा वेळ असल्यास मी तैलरंगात निसर्गचित्रणाचे प्रात्यक्षिक करू शकतो.

माझा इथला फोनः ५१८ ८३१ १७९१.

.

वावरसंस्कृतीकलासमाजजीवनमानप्रवासदेशांतरप्रकटनविचारबातमीमाहितीचौकशीविरंगुळा

प्रतिक्रिया

इनोचे डबेच आणून ठेवावे म्हणतो. ;)

राघवेंद्र's picture

17 Sep 2014 - 8:35 pm | राघवेंद्र

न्यूयॉर्क मधिल एखादे म्युझियम बघायला व कट्टयाला मी तयार आहे. मी सध्या एडिसन न्यु जर्सी मध्ये आहे.

चित्रगुप्त's picture

17 Sep 2014 - 10:05 pm | चित्रगुप्त

@ राघवः मेट्रोपॉलिटन बघता येईल. त्यानंतर समोर सेंट्रल पार्कात फिरता येईल. माझ्या तारखा अजून ठरलेल्या नाहीत. तुम्ही केंव्हा येऊ शकता?

राघवेंद्र's picture

18 Sep 2014 - 12:04 am | राघवेंद्र

शनिवार - रविवारी भेटु शकतो.
मिपा करांनो, चित्रगुप्त काकांसोबत मेट्रोपॉलिटन बघणे खुप चांगला अनुभव असेल.

अमित खोजे's picture

24 Sep 2014 - 8:25 am | अमित खोजे

न्यूयॉर्कमध्ये आम्हीपण आहोत. शनिवार रविवार जमले तर अति उत्तम. फोन कराच - ५१६ ४५१ ४७१८

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2014 - 8:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही २३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरमध्ये कुठे असाल? मी तेव्हा डीसी भागात असेन.

त्या आठवड्यात मोकळा वेळ किती मिळेल त्याबद्दल साशंक आहे. नॅशनल गॅलरीला रेंब्रॉंचं कलेक्शन येणार असं दिसतंय, पण ते थोडं उशीरा येणारे. जेनेरिक दालनं बघूनही बराच काळ लोटला, निदान ते तरी पाहता येईल.

डीसीला आले की फोन करते. माझा नंबर आणि त्याबरोबर 'सेल फोन टेक्सस' असा डिस्प्ले दिसतो.

चित्रगुप्त's picture

17 Sep 2014 - 10:54 pm | चित्रगुप्त

@ अदिती: माझ्या अजून येण्याच्या तारखा ठरलेल्या नाहीत. पण बहुधा आक्टोबराच्या पहिल्या आठवड्यात.

पिवळा डांबिस's picture

17 Sep 2014 - 10:04 pm | पिवळा डांबिस

नुसती शिंची स्मिथसोनियनची म्युझियमं बघायची म्हंटलीत तरी एक आठवडा सहज लागेल तुम्हाला!
आमचं डीसी म्हणजे तुम्ही काय समजलेंत?
:)
बघा, बघा, मजा करा!!

चित्रगुप्त's picture

17 Sep 2014 - 10:09 pm | चित्रगुप्त

@ पिवळा डांबिस: तसे यंदा न्यूयॉर्क बघून झालेले आहे, स्मिथसोनियनची म्युझियमं बघून तीस वर्सं उलटलीत आता.
डीसीत एकट्या जिवाला उतरायची सोय कशी/कुठे करावी म्हणता?

पिवळा डांबिस's picture

17 Sep 2014 - 10:14 pm | पिवळा डांबिस

मी जर तिथे रहात असतो तर माझ्याकडेच उतरा म्हंटलं असतं, पण मी पडलो दूर कॅलिफोर्नियात...
मी जेंव्हा डीसीला जातो तेंव्हा हॉटेलातच उतरतो.
कदाचित काही मिपाकर असतील तिथे डीसी, मेरीलॅन्डमध्ये...

श्रीरंग_जोशी's picture

17 Sep 2014 - 11:00 pm | श्रीरंग_जोशी

माझ्या पाहण्यातला मिपावर घोषणा करून होणारा अमेरिकेतील पहिलाच कट्टा आहे.

मनःपूर्वक शुभेच्छा!! वृत्तांताची वाट पाहीन.

रेवती's picture

17 Sep 2014 - 11:23 pm | रेवती

अभ्यास, अभ्यास, अभ्यास....

श्रीरंग_जोशी's picture

17 Sep 2014 - 11:33 pm | श्रीरंग_जोशी

हो, अभ्यास कमी आहे हे ठाऊक आहेच.

सगळ्यात पयल्या कट्ट्याच्या इतिहास मोठा आहे पंत!

श्रीरंग_जोशी's picture

18 Sep 2014 - 12:16 am | श्रीरंग_जोशी

कृपया त्याच्या वृत्तांताचा दुवा द्यावा. बिंगून पाहिले पण यश मिळाले नाही.

रेवती's picture

18 Sep 2014 - 1:46 am | रेवती

पूर्वीचे दुवे मध्यंतरी आलेल्या पुरात वाहून गेले असण्याची शक्यता आहे, तरी बघते. सापडल्यास लगेच देते. माझ्या नवर्‍याने तो वृत्तांत ल्हिला होता एवढे आठवते.

श्रीरंग_जोशी's picture

18 Sep 2014 - 1:58 am | श्रीरंग_जोशी

मी पण हाच दुवा शोधून आलो होतो. बराच वेळ लागला, यादी संपतच नव्हती ;-).
चतुरंग यांच्या गेल्या काही वर्षांतल्या लेखन वारंवारितेकडे पाहून कल्पनाही केली नव्हती की पूर्वी ते एवढे सक्रीय होते.

नंदन's picture

17 Sep 2014 - 11:38 pm | नंदन

सहमत आहे :)

(तिन्ही कोष्टांवरचा कट्टेकरी)

नाटक्या's picture

18 Sep 2014 - 11:38 am | नाटक्या

अहो साहेब,

हे बघा :

http://www.misalpav.com/node/3407

http://www.misalpav.com/node/7547

http://www.misalpav.com/node/13803

आणि हो ह्य व्यतिरिक्त बरेच अनऑफिशीयल पण झालेत. दारू प्यायला सगळे एकदम तय्यार आहेत हो बे एरियातले ...

श्रीरंग_जोशी's picture

18 Sep 2014 - 8:46 pm | श्रीरंग_जोशी

सगळे वृत्तांत निवांतपणे वाचून काढतो.

या सर्व दुव्यांमध्ये सर्वात शेवटचा दुवा ऑगस्ट २०१० चा आहे. गेल्या ४ वर्षांत तरी मिपावर धागा काढून झालेला अमेरिकेतील कट्टा आढळत नाही.

पिवळा डांबिस's picture

18 Sep 2014 - 9:57 pm | पिवळा डांबिस

गेल्या ४ वर्षांत तरी मिपावर धागा काढून झालेला अमेरिकेतील कट्टा आढळत नाही.

तू नुसत्या शंका काढत बस.
(म्हणूनच तुला कोणी कट्ट्याला बोलावत नाही!!) :)
अरे एकदा प्रत्यक्ष ओळखी झाल्यानंतर प्रत्येक वेळेस मिपावर धागा काढण्याचं प्रयोजन उरत नाही. एकमेकांना फोन केले जातात...

श्रीरंग_जोशी's picture

18 Sep 2014 - 10:05 pm | श्रीरंग_जोशी

आमच्या भागात भरपूर मिपाकर अवतीर्ण होवोत. मग आम्ही पण कट्ट्यावर कट्टे करू ;-).

पिवळा डांबिस's picture

18 Sep 2014 - 10:12 pm | पिवळा डांबिस

आत्याबाईला जर मिशा आल्या तर...
वैग्रे वैग्रे!!!
:)

राजेश घासकडवी's picture

18 Sep 2014 - 10:44 pm | राजेश घासकडवी

या सर्व दुव्यांमध्ये सर्वात शेवटचा दुवा ऑगस्ट २०१० चा आहे. गेल्या ४ वर्षांत तरी मिपावर धागा काढून झालेला अमेरिकेतील कट्टा आढळत नाही.

बरेच वेळा कट्टे होतात, पण त्याबद्दल धागे काढले जातातच असं नाही. मी, अदिती, मुक्तसुनीत असे मिळून गेल्या साडेतीन वर्षांत अनेक मिपा कट्टे केलेले आहेत.

श्रीरंग_जोशी's picture

18 Sep 2014 - 10:53 pm | श्रीरंग_जोशी

माझ्या मूळ प्रतिसादात केवळ एक निरिक्षण नोंदवले होते. या धाग्यामुळे मला किमान दोन मिपाकर ठाऊक झाले जे अमेरिकेत राहतात.

बाकी त्या प्रतिसादामुळे जुन्या वृत्तांतांचे दुवे मिळताहेत जे अन्यथा शोधले अन वाचले गेले नसते :smile: .

आजानुकर्ण's picture

19 Sep 2014 - 9:52 pm | आजानुकर्ण

सहमत. मी व माझी बायको मिळून आम्ही दररोजच मिपा कट्टा करतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2014 - 5:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

दारू प्यायली पाहिजे आणि/किंवा मिसळपाव खायला पाहिजे, शिवाय आंजा-गॉसिप मारलं पाहिजे, तरच कट्टा म्हणता येईल. रोजचं वरणभात, भेंडीची भाजी यात काय मजा?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Sep 2014 - 8:56 am | विश्वनाथ मेहेंदळे

अरे !!! वल्ली आणि बुवा ???
हा आयडी कधी घेतलात ??? ;-)

प्रास's picture

21 Sep 2014 - 5:49 pm | प्रास

हा!हा!हा!

प्यारे१'s picture

21 Sep 2014 - 6:03 pm | प्यारे१

विमेंचा 'जाहीर निषेढ' ;)

सूड's picture

24 Sep 2014 - 2:32 pm | सूड

हायला!! =))))

पिवळा डांबिस's picture

18 Sep 2014 - 9:51 pm | पिवळा डांबिस

बाकी बेपत्ता असतो..
पण कट्ट्याचं नांव काढलं की कसा हजर!!!! :)

नाटक्या's picture

19 Sep 2014 - 3:51 am | नाटक्या

नाटक्या म्हणे आता उरलो वाचना (आणि पिण्या) पुरता ||

अहो पिंडाकाका कट्टा
केल्याने होत (पित) आहे रे आधी प्यालेच पाहीजे |

ठाव न्हाई जणू

अहो चित्रगुप्तकाका, कुठं दिवाळीच्या जवळपास कट्टा करताय. माझ्याकडे आख्खा ऑक्टोबर पाहुणे असणारेत. सणावराचं नाय बा जमत! थंडीत तुम्ही बाहेर कसं भेटणार? नैतर ४ तास ५ तास प्रवास फार आहे म्हटलं नसतं.

चित्रगुप्त's picture

18 Sep 2014 - 1:49 am | चित्रगुप्त

@ रेवती: ४-५ तासाचा प्रवास म्हणजे कुठे आहात तुम्ही? आल्बनीच्या जवळपास असेल तर तिकडंबी करू कट्टा.

रेवती's picture

18 Sep 2014 - 1:56 am | रेवती

बॉस्टन.
तसे ४ तास लागतात पण वाहतुकीमुळे, मध्येच घेतलेल्या थांब्यामुळे वेळ लागतो.

लंबूटांग's picture

19 Sep 2014 - 2:41 am | लंबूटांग

वैयक्तिक कारणास्तव कमीत कमी पुढील दीडेक महिना तरी फारसे कुठे जाणे नाही जमणार.

बॉस्टनला यायचा प्लॅन असल्यास भेटायला नक्की आवडेल.

ए बाबा, तू वेळेवर व्यनि कर रे! इथं आम्ही वाट बघत बसलोय.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Sep 2014 - 11:36 pm | अत्रुप्त आत्मा

वाहव्वा...मस्स्त...
http://www.sherv.net/cm/emoticons/smile/happy-nodding-smiley-face-emoticon.gif
होऊ द्या कट्टा..http://www.sherv.net/cm/emoticons/yes/ok-sign-smiley-emoticon.gif येऊ द्या वृत्तांत!

निशदे's picture

17 Sep 2014 - 11:45 pm | निशदे

करा करा...........कट्टे करा, मजा करा.........
(स्वगतः कॅलिफोर्निया जरा उदासच आहे का या बाबतीत)

खटपट्या's picture

18 Sep 2014 - 4:22 am | खटपट्या

आमि हाव कि !! बगा कोण कोण तयार हाये ! मी एल ए ला यायला तयार आहे.

पिवळा डांबिस's picture

18 Sep 2014 - 10:57 am | पिवळा डांबिस

कॅलिफोर्निया जरा उदासच आहे का या बाबतीत

टेबलावर दिसतील अजूनि ग्लासांच्या खाचा,
सिंकमध्ये तरंगे अजूनि रंग मटणाचा |
क्षितिजावर उठतो अजूनि मेघ हुरड्याचा,
अद्याप यमन तो भट घाटावर गात...

वेडात रंगले कॅलिफोर्नियन ते खास ||
:)

नंदन's picture

18 Sep 2014 - 11:03 am | नंदन

अद्याप यमन तो भट घाटावर गात...

=))

जिज्ञासूंसाठी पहिल्या द. कॅलिफोर्निया मिपा कट्ट्याचा वृत्तांत - http://www.misalpav.com/node/4574
बाकी अनेक खाद्यपदार्थांची नावं राहून गेलीत ;)

पिवळा डांबिस's picture

18 Sep 2014 - 11:01 am | पिवळा डांबिस

मी रिचमण्ड, व्हर्जिनिया ला राहतो. रिचमण्डला कट्टा जमला तर उत्तमच, पण डी.सी.ला ठरणार असेल, तरीही माझ्याकडे ८-१० जणान्ची राहण्याची व्यवस्था होउ शकेल. अट एकच की, कट्टा वीकान्ताला असावा.
मिपाकरान्ची सेवा करण्याची सन्धी अवश्य द्यावी, ही आग्रहाची विनन्ती.

चित्रगुप्त's picture

18 Sep 2014 - 8:24 pm | चित्रगुप्त

रिचमंडाहून डीसी ला दोन-तीन तास लागतात ना? कसे करावे?

damn's picture

19 Sep 2014 - 4:38 am | damn

मी राहतो, तिथुन डीसी ला जायला २ तास सहज लागतात, पण काळजी नसावी.
अपना गरीबरथ है ना!
माझ्या गरीबरथामधे ४ डोकी सहज मावतात. आणि असलेच अधिक लोक्स, तर आणखी एक कार रेन्ट करु की!

मुक्त विहारि's picture

18 Sep 2014 - 7:24 am | मुक्त विहारि

करा कट्टे....

आम्हाला "कट्टा" हा शब्दच फार आवडतो.

लौंगी मिरची's picture

18 Sep 2014 - 9:11 am | लौंगी मिरची

छान आहे कल्पना . ऑक्टोबर मध्ये थंडी फार असते , बाहेर फिरणं शक्य होइल का? आम्हि यायचं म्हटलं तर आमची पिल्लावळहि सोबत असणार , त्यांना घेऊन फिरणे
शक्य होइल का ? . मला न्यु यॉर्क बरे पडेल पण कट्टा इन्डोअर असावा .

चित्रगुप्त's picture

18 Sep 2014 - 8:23 pm | चित्रगुप्त

@लौंगी मिर्ची: ब्रुकलिन आर्ट म्युझियममधे पण करू शकतो कट्टा. जेवण्याचे बघू कुठेतरी.

समीरसूर's picture

18 Sep 2014 - 10:45 am | समीरसूर

हा कट्टा रंगणार असं दिसतंय. मजा करा. कट्ट्याला शुभेच्छा! :-)

म्युझियम्स बघणे, पार्कात फिरणे, बोचरी थंडी, आरामात खाणे-पिणे...मजा येणार या कट्ट्याला...

प्यारे१'s picture

18 Sep 2014 - 1:21 pm | प्यारे१

हिरवटांनी हिरव्यांसाठी काढलेला धागा! ;)

चित्रगुप्त's picture

18 Sep 2014 - 8:52 pm | चित्रगुप्त

पिकलं पान होऊ तेंव्हाही आम्ही हिरवटच राहणार.

प्यारे१'s picture

18 Sep 2014 - 9:19 pm | प्यारे१

:) तुम्ही हलकं घेणार ह्याची खात्री असल्यानंच टंकलेलं तसं.

बाकी जुन्या कट्ट्याच्या लिंक्स वरुन वृत्तांत वाचले. मराठी माणसं एकत्र होती की तेव्हा.
पुलाखालून नि वरुनही बहुत पानी बहून गेलेलं जाणवलं.
असो!

मुक्त विहारि's picture

19 Sep 2014 - 3:23 am | मुक्त विहारि

अज्जुनही आहेत.

या एकदा आमच्या डोंबोलीला...

पिवळा डांबिस's picture

18 Sep 2014 - 9:49 pm | पिवळा डांबिस

ऋतु हिरवा, ऋतु बरवा...
प्यारेला ईनो भरवा,
प्यारेला ईनो भरवा,
हिरवा...
ऋतु हिरवा...
ऋतु हिरवा, ऋतु बरवा ||
:)

प्यारे१'s picture

18 Sep 2014 - 10:00 pm | प्यारे१

=)) =))

भाते's picture

18 Sep 2014 - 10:36 pm | भाते

चित्रगुप्त काका, हा धागा काढल्यापध्दल धन्यवाद.
त्यानिमित्ताने मिपाचे अनेक जुने कट्टावृत्तांताचे दुवे एकाच धाग्यावर मिळाले.
आणखी कट्टावृत्तांताचे दुवे येतील अशी आशा आहे.

सर्वांनी एकत्र भेटा, गप्पा मारा, खादाडी करा. सविस्तर आणि सचित्र कट्टा वृत्तांत मात्र न विसरता टाका. :)

येडा अण्णा's picture

19 Sep 2014 - 6:14 pm | येडा अण्णा

न्यूयॉर्क मध्ये केल्यास मी येवु शकतो. मी सध्या जर्सी सिटि मध्ये रहातो.

विवेकपटाईत's picture

19 Sep 2014 - 9:05 pm | विवेकपटाईत

चित्रगुप्त काका, दिल्लीत परतल्यावर आपण पुन्हा महाराष्ट्र सदनात कट्टा करू या. अमेरिकेतल्या गोष्टी ही ऐकायला मिळतील आणि सदनातले जेवणाचा दर्जा किती सुधारला हे ही कळेल.

पिवळा डांबिस's picture

20 Sep 2014 - 10:02 am | पिवळा डांबिस

चित्रगुप्त काका, तुमच्या अंमळ सिरियस धाग्याचे पूरग्रस्त काश्मीर केल्याबद्दल सॉरी....
पण कॅलीफोर्नियनांच्या कट्टाक्षमतेलाच चॅलेंज झाल्यामुळे नाविलाज जहाला!!! तुम्ही समजू शकाल म्हणुन लिहितोय, आमचा लाडका मिपाकर मिथन्या भोईर अजूनही मिपावर असता तर म्हणाला असता,
"इचिभनं, जल्लां सगलां काय नांवानच हाय! दादूस, आयकान काय घेतंस, हान तुझ्यायला!!"
:)
गेले ते प्रांजळ आणि निर्मळ दिवस!!
:(

शशिकांत ओक's picture

21 Sep 2014 - 11:11 pm | शशिकांत ओक

प्रधानमंत्री नमो वाशिंग्टनच्या सफेद घरात पाहुणचार घ्यायला ओबामा काकांच्या निमंत्रणाला मान देऊन कट्टा करायला जातायत त्यातच हात धुवून घ्यायला काय हरकत आहे?

चित्रगुप्त's picture

22 Sep 2014 - 6:20 am | चित्रगुप्त

धाग्याचे पानिपत बघून आता भारतात परतल्यावर पानिपतासच कट्टा करवा म्हणतो.

(स्वगतः कॅलिफोर्निया जरा उदासच आहे का या बाबतीत)

ह्या स्वगताने व्यथित होऊन पिडांकाकांनी या शनिवारी मला फोन केला.

"बघ रे, हे लोक काय लिहून राह्यलेत!" - इति काका.

"हं, एखादा सकल कॅलिफोर्निया कट्टा प्लॅन करायला हवा खरा." - माझाही दुजोरा.

"बरं, पण फोनवर कुठे हे ठरवायचं? घरी ये, गप्पा मारू आणि मग ठरवू काय ते!"

त्याप्रमाणे संध्याकाळी मी काकांच्या घरी पोचलो. कॅलिफोर्निया पीठाधीशांनी तोवर जय्यत तयारी केली होतीच.

Katta

अभीष्ट चिंतुनि आम्ही त्यांचे भिडवियले काठः

Katta

आता अनायासे भेटलोच आहोत तेव्हा इतर गजालींना सुरूवात झाली. अमेरिकेची आर्थिक आघाडी, राज्यात येऊ घातलेल्या निवडणुका, मराठी संकेतस्थळांचा उदय (आणि काहींचा अस्तही), सध्या काहीच न लिहिणारे आणि काहीच्या काही लिहिणारे आयडी, पेठकरकाका-स्वातीताई-गणपा या ज्येष्ठ सदस्यांच्या पाककृती, आजकाल गाजणारे धागे यावर मग गप्पा रंगल्या. चखण्याने आणि एका बाटलीने तळ गाठला, तेव्हा मात्र वाट पाहत असणार्‍या सावजी चिकनकडे वळलो. चिकन आणि सोबतच्या दोन भाज्या इतक्या फक्कड झाल्या होत्या की इतका वेळ बडबडणारे आम्ही शांत बसून केवळ खाद्यसाधनेत मग्न झालो.

दुसर्‍या दिवशी सकाळी गावात भटकून येऊनही आगामी कॅलिफोर्निया कट्ट्याच्या प्लॅनिंगला सुरूवात न झालेली पाहून काकांनी त्या विषयाला तोंड फोडलं. बे एरिया, बेकर्सफिल्ड, लॉस एंजेलिस परिसर आणि सॅन डिएगो या परिसरातील मिपाकरांनी एकत्र येऊन जंगी कॅलिफोर्निया कट्टा करायला हवा, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

मी यावर काही बोलणार तोच काकूंकडून जेवणाची वर्दी आली. सकाळचा वाफाळत्या साबुदाणा खिचडीचा नाश्ता अंमळ उशीराच झाला होता, तेव्हा साधंसंच काहीतरी करायचं म्हणून काकूंनी सोड्याची खिचडी केली होती. सोबत उगीच तोंडीलावणं म्हणून चार तळलेल्या बांगड्याच्या फोडी. कोकणी पद्धतीचं जेवण म्हणून फणसाची भाजी. इथे फॉलचे वेध लागलेत तेव्हा भोपळ्याची ताकातली कोशिंबिर. ती आवडेल न आवडेल म्हणून काकडीची कोशिंबिर. शेवटी पुरणपोळी आणि घरगुती तूप. म्हटलं ना, अगदी साधंसं जेवण हो!

Katta

जेवणानंतर खरं तर बसून नीट प्लॅनिंग करायचं होतं, पण आता पुढल्या आठवड्याची तयारी आणि एल.ए.चं कुप्रसिद्ध ट्रॅफिक या चिंता मला भेडसावू लागल्या होत्या. शेवटी, "आपण दोघंच कुठे हे ठरवण्यात पुरे पडणार काका? नवीन सदस्यांना सॅन लुईस ओबिस्पो किंवा तत्सम मध्यवर्ती ठिकाण आणि सोयीचा वीकेंड ठरवून भेटायला सांगू. हाकानाका! टेक्ससमधले काही लोक उगाच 'दुष्काळ, दुष्काळ!' म्हणून बोंबलताहेत, त्यांनाही आवतण धाडू." अशी मखलाशी करून काकांचा निरोप घेतला. निघताना 'अरे, हाही एक कॅल-कट्टाच झाला की' असं माझ्या लक्षात आलं :).

तर त्याचाच हा आपला छोटेखानी वृत्तांत! (चित्रगुप्त यांची क्षमा मागून)

अनुप ढेरे's picture

24 Sep 2014 - 11:32 am | अनुप ढेरे

आवरा ! लईच साधा की ओ कट्टा हा.

विलासराव's picture

24 Sep 2014 - 11:49 am | विलासराव

चखना आन साधंसच जेवण लई आवडलं बॉ आपल्याला.

पण अजुनही तुम्ही साधं पाणी न पिता रंगीत पाणीच पिता याचं नवलही वाटलं.

प्रभाकर पेठकर's picture

24 Sep 2014 - 8:51 pm | प्रभाकर पेठकर

कट्टा वृत्तांत थेट मनाला भिडला हो.
आम्ही आलो होतो तेंव्हा नाही कोणी केले असले कट्टे-बिट्टे. असो. पुढच्या वेळी ठरवून करू.

पिवळा डांबिस's picture

26 Sep 2014 - 2:26 am | पिवळा डांबिस

आम्ही आलो होतो तेंव्हा नाही कोणी केले असले कट्टे-बिट्टे.

कारण तुमची गल्ली चुकली पेठकरकाका!! :) डाव्या किनार्‍यावर आला असतांत नक्की केला असता कट्टा!!

असो. पुढच्या वेळी ठरवून करू.

नक्की! उत्तर असो वा दक्षिण, आमचा कॅलिफोर्नियनांचा एकदा पाहुणचार तर बघा!!!
"मस्त संत्री खाऊ! वाळ्याचे तट्टेगिट्टे लावून पडले राहू आरामात!!!"
:)

चित्रगुप्त's picture

26 Sep 2014 - 8:31 pm | चित्रगुप्त

हिप हिप हुर्रे....

वाळ्याचे तट्टेगिट्टे लावून पडले राहू आरामात!!!"

....हा खरा कट्टा.... बाकी वो खानापीना चलताईच र्हैता.
"पडे रहो" हाच आमचा शुभ-संदेश आहे. "पडले राहणे" हेच सर्व सुखाचे आगरू. जीवनाचे इतिकर्तव्य.
आमचे सर्व खास मित्र याच "पडे रहो" संप्रदायाचे पायिक आहेत.

भोपळ्याची कोशिंबीर, फणसाची भाजी, पुरणपोळ्या....आहाहा!!

मुंबैकरानो-पुणेकरांनो (हे दोन्ही मांडवाचे वर्‍हाडी असलं की असं होतं) चला बघू करा एखादा कट्टा प्लान पटापट !!

एस's picture

24 Sep 2014 - 10:15 pm | एस

पिडांकाका अंमळ बारीक झालेत! ;-)

श्रीरंग_जोशी's picture

25 Sep 2014 - 7:24 am | श्रीरंग_जोशी

निशब्द!!

अखिल कॅलिफोर्निया + टेक्सास कट्ट्याला शुभेच्छा.
बाकी अ‍ॅरिझोनामध्ये पण काही मिपाकर राहतात असे ऐकले आहे :smile: .

पिवळा डांबिस's picture

26 Sep 2014 - 2:22 am | पिवळा डांबिस

आयला, हे कधी आलं इथं!!!
सर्व संबंधितास खुलासा करण्यात येतो की हा कट्टा नव्हता. ही कट्टा प्लान करण्यासाठी घेतलेली बैठक होती.
पण बैठकीत भाग घेणार्‍यांचे डोळे पेंगुळल्यामुळे बैठकीत कोणताही निर्णय ठरला नाही!!!
:)

शशिकांत ओक's picture

29 Sep 2014 - 9:13 am | शशिकांत ओक

चित्रगुप्तांच्या नोंदीतून निरटलेला कट्टा?
मित्रा, कट्यावर मोदींच्या अमेरिका भेटीतील भाषणाचा गैर भारतीय लोकांवर काय प्रभाव पडला? कुठे काही वाचनात किंवा चर्चमधे आले तर वाचायला आवडेल.

चित्रगुप्त's picture

29 Sep 2014 - 8:49 pm | चित्रगुप्त

@ शशिकांत ओकः:

चर्चमधे आले तर वाचायला आवडेल.

"चर्च म्हणजे चर्चा करण्याची जागा" हे पुनांचे विधान आठवून सद्गदीत झालो.

शशिकांत ओक's picture

29 Sep 2014 - 10:09 pm | शशिकांत ओक

चित्रगुप्त,
काकांनी
ओबामा ला बालपणात ओ, बाबा - माये एकत्रितरीतिने म्हणायला आवडे. मग अम्मा का लाडला म्हणून तिने ओबामा असे नाव ठेवून त्याचा लाड पुरवला... म्हणतात

डांबिस काका अंमळ बारीक (सडपातळ नाहि!!!) झाल्यासारखे दिसत आहेत.

विटेकर's picture

24 Sep 2014 - 10:11 am | विटेकर

छान , सचित्र वृत्तांत !
रच्याकने , या चित्रगुप्तांच्या कटट्याला यायचे असेल तर कोथरुड वरुन किती लांब पडेल?
मी सहसा संध्याकाळी बाहेर पडत नाही , नळस्टॉपवर हल्ली फार गर्दी असते , ३-३ सिग्नल थांबावे लागते !
शक्यतो दुपारी ४ ची वेळ ठेवा.

इरसाल's picture

26 Sep 2014 - 5:18 pm | इरसाल

मी पीत नसल्याने टीपॉयच्या खाली असलेल्या पीत चित्र सॉरी काळंचित्र असलेल्या बुकावर माझ सगळं लक्ष होतं ;)

स्पार्टाकस's picture

28 Sep 2014 - 11:14 am | स्पार्टाकस

कुठे ? कधी?