रौद्ररस
मी लोकलयात्री
मी लोकलयात्री
स्टेशनावरी उभा ठाकतो
ट्रेनागमना पुढे वाकतो
युद्धासाठी सज्ज जाहतो
मी लोकलयात्री
गर्दी बघता चमकून जातो
तरीही क्षणात मी सावरतो
मग अंगीचे बळ जागवतो
मी लोकलयात्री
बसण्या जागा मृगजळ जरी
उभे रहाण्याचे बळ जरी
ट्रेन रिकामी बघून हर्षतो
मी लोकलयात्री
एकच गलका उडे क्षणातच
कुणी कधीचे कुठे क्षणातच
मेंढरापरी गर्दीत घुसतो
मी लोकलयात्री
नवे चेहरे रोज पुढ्यात
नवे वास मम नाकपुड्यात
रोज नव्याशी जुळवून घेतो
मी लोकलयात्री
दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण, प्रोक्षण, लवण, कर्तन
दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण,
आकर्षण ते लवणादी प्रोक्षण,
कर्तन करुनी या शब्दांचे
सारे करुया जिल्बी भक्षण
पैसा ताई फू...फुंकरुनी
निखार्यास त्या हवाच देई (दुष्ष्ष्ट :-/ )
मम हाती तो तांब्या-कसला
जिल्बी पडता जीवच घेई
दुष्ट हत्ती तो काड्या लावी
संधी कधिही सोडत नाही
स्वतःच देतो तांब्या भरुनी
आपण जिल्बी सोडत नाही (महा दू..दू.. :-/ )
धन्या वाकडू सामिल यांना
हल्ली तो ही काड्या सारी
धन्या वा कडू... असला तरिही
दगड मारण्या तयार भारी
दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका
दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका
इकडे अमुच्या भारताचा सातबारा गहाण है।
दॅट्स व्हाय शायनिंग यह इंडिया महान है॥
पोशिंद्याच्या घामाभवती बांडगुळांचे कडे
नितनेमाने रोज पाडती प्रेत-मढ्यांचे सडे
महासत्तेचे स्वप्न दावुनी तज्ज्ञ धावती पुढे
तिकडे त्रेपन-चौपन मजले मजल्यावरती चढे
चेले-चमचे, खुर्ची-एजंट गातसे गुणगान है ॥
तिन कविता तिन ठिगळे
पहिले ठिगळ मि.का. च्या कवितेला.
वरिगिनल कविता <a href="http://www.misalpav.com/node/17298" title="प्रलय">प्रलय</a>
शंख करत माझ्या नावाचा
बाप धावतो मागे मागे
गुणपत्रक ते बघता बघता
नेत्र तिसरा उघडु लागे
अकडा मोठा बॅकलॉगचा
तरी भटकतो मित्रांसंगे
लेक्चर बुडवुन कट्ट्या वरती
रात्रं दिन करीतसे दंगे
निर्लज्ज हात पुढे पसरतो
पॉकेटमनी संपताच तो
छळायस जन्मला कारटा
हताश बाबा करवदतो
मग
नाटकी बोलतात साले!
नाटकी बोलतात साले!
कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे
भुकेचा प्रश्न सुटणारा नाही, तुझ्या भाषणाने, पण;
तू वाचाळ नाहीस अशी, खात्री तर पटली पाहिजे!
राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर
तुझी शक्ती मनगटात तू, पूर्ण एकवटली पाहिजे
रावणांच्या राज्यात पुन्हा, सीता एकाकी पडलीय
भूमीच्या मुक्तीसाठी, तुझी काया झटली पाहिजे
देच तुतारी फुंकून तू, इथेच, याच स्थळी, अशी की;
क्रिया येथे आणि प्रतिक्रिया, दिल्लीत उमटली पाहिजे
नायक क्रमांक एक
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी.
या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी.
(कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे)
(ज्याच्या कडे बर्यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे. तिच्या आईने तीला बर्यापैकी कपडे घालुन चित्रीकरणाला पाठवायचे आश्वासन दिले आहे)
वाड्यातील भांडणे-भाग १
वाचक आणी (विशेषतः महिलांसाठी ) खुलासा---सदर काव्य/गीत हे आंम्हाला पुण्यातील नामातच-शेष राहिलेल्या ''वाडा'' या संस्कृतिच्या नाश्टेलजियातून सुचलेले आहे. पाणी प्रश्न सध्या बिकट असला,तरी मुबलक पाणी असलेल्या काळातही काव्यात वर्णिलेले भांडण पाहाता तो किती चिकट होता,याचा वाचकांस प्रचिती यावी. म्हणुन हे गीत-कुंजन ;)
चालत चालत जिन्यातुन जाता बादली बदकन सांडली
वरच्या मजल्या वरची शिंदिण देशपांड्यांशी भांडली॥धृ॥
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
3
<<< सांभाळ गो बाय, उत्साहित कळ्यांना >>>
3