नको पुन्हा एकदा
नको आता वेदनांचे प्रमाण पुन्हा एकदा
नको आता आनंदाला उधाण पुन्हा एकदा
नको ग्रीष्मात सोनेरी क्षणाची सावली
नको आता सुखाचे विधान पुन्हा एकदा.
हरवून गेले ओळखीचे रस्ते संभ्रमामध्ये
नको आता ते आयुष्याचे भान पुन्हा एकदा.
डंख होतो पुन्हा पुन्हा स्वप्नांच्या इंगळीचा
नको आता निद्रेला अवताण पुन्हा एकदा.
देवा तुच धर हात माझा या मावळतीला
झालो आहे बालकासम अजाण पुन्हा एकदा.