लेखकबेसनलाडूयांनी सोमवार, 13/10/2014 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
माझाच चंद्र
सतत हरवतो
तुझ्या आभाळी
कोसळणारे
गढूळ धबधबे
कडेकपारी
झडणारा मी
वसंत टपटप
अश्रूंमधला
ओळी कातर
उल्लेख पानभर
व्याकुळ शाई
बंद पापण्या
तवंग मणभर
साचवलेले
हिरव्याकंच
जखमांचे वैभव
मन शेवाळी
बेलाशेठ लिहिते झाले म्हणून उत्सुकतेने वाचली, आवडली. पण बेलाशेठ कधीपासून परत लिहायला लागले म्हणून शोधलं, तर पोकळी आणि दाखला या दोन यावर्षीच लिहिलेल्या कविता सापडल्या, त्या आधिक आवडल्या. वेलकम बॅक, बेलाशेठ, आता चालू ठेवा लिहिणं.
प्रतिक्रिया
आँ...
सुं..........................
बेलाशेठ लिहिते झाले
सुरेख
आवडली!
"हिरव्याकंच जखमांचे वैभव मन
एकच नंबर!!
वा!
अरे कुणाला ही कविता समजली असेल तर ....
हैयो