तिन कविता तिन ठिगळे

Primary tabs

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
8 Oct 2013 - 4:09 pm

पहिले ठिगळ मि.का. च्या कवितेला.
वरिगिनल कविता <a href="http://www.misalpav.com/node/17298" title="प्रलय">प्रलय</a>

शंख करत माझ्या नावाचा
बाप धावतो मागे मागे
गुणपत्रक ते बघता बघता
नेत्र तिसरा उघडु लागे

अकडा मोठा बॅकलॉगचा
तरी भटकतो मित्रांसंगे
लेक्चर बुडवुन कट्ट्या वरती
रात्रं दिन करीतसे दंगे

निर्लज्ज हात पुढे पसरतो
पॉकेटमनी संपताच तो
छळायस जन्मला कारटा
हताश बाबा करवदतो

मग

ढळतो संयम मातेचाही
बाबांची ती जागा घेई
हलाहल ते पचवित सांगा
पोळीवरती तुपही नाही

दुसरे ठिगळ पल्लवी मिंड यांच्या <a href="http://www.misalpav.com/node/25753" title="आज पुन्हा उडावेसे वाटले">आज पुन्हा उडावेसे वाटले</a> ला

आज मला कपडे बदलावेसे वाटले
मोजेही जरा धुवावेसे वाटले
अंगावरची जीन्स रोजचीच
बर्‍याच दिवसानी तीला काढावेसे वाटले

घोटभर चहासाठी
कप विसळावेसे वाटले
चहाचे भांडेही धुवावेसे वाटले
झुरळांचा खडु फिरवावेसे वाटले

बेडवरच्या मळलेल्या चादरीला
अलगद ओढावेसे वाटले
उशांचे अभ्रेही बदलावेसे वाटले
भिंतीवरची जळमटेही काढावेसे वाटले

दारा मागचे तसले फोटो
फाडुन टाकावेसे वाटले ( पण खरच फाडले नाही हं.... फक्त वाटले :) )
त्या जागी देवादिकांचे फोटो
लावावेसे वाटले

टेरेस वरुन रोजच तुला पहातो
आज तुझ्या समोर येउन
एकदाच काय तो फैसला
करावेसे वाटले

फार झाले आता एकाकी जगणं
तुझ्या सारखे गोडपाखरु
आयुष्यात यावे असे वाटले......

त्याचमुळे कि काय.....

आज मला कपडे बदलावेसे वाटले

ठिगळ तिसरे अज्ञातकुल यांच्या <a href="http://www.misalpav.com/node/25756" title="अविचल">अविचल</a> ला

पुसू पाहतो पुसू शके ना गालावरचे चुंबन खास
उचंबळे मन आठवणींने तव स्पर्शाचा होई भास
फुटे बिंग सापडती हीस माझ्या शर्टावरती केस
पटवा पटवी घरात चाले, दिवस चार जाणार उदास

तिकडे टाकल्या होत्या पण फारच डचमळायला लागल म्हणुन शेवटी नवा धागाच काढला

कोडाईकनालगरम पाण्याचे कुंडभूछत्रीवाङ्मयशेतीभयानकबिभत्सकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसबालकथाविडंबनविनोदऔषधोपचारविज्ञानकृष्णमुर्तीमौजमजा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

8 Oct 2013 - 5:01 pm | प्रचेतस

काय पैजारबुवा, आज भरपूर मोकळा वेळ दिसतोय.

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Oct 2013 - 5:16 pm | ज्ञानोबाचे पैजार

नुकतीच ए जी एम झाल्या मुळे तुमड्या लावण्याचे काम सिरीयसली घेतले आहे

इरसाल's picture

9 Oct 2013 - 1:11 pm | इरसाल

माझा बॉस नुकताच ए जी एम झालाय......................
तुम्ही आणी मी एकाच डिपार्ट्मेंटला तर नाहीत ना ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Oct 2013 - 1:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

"नुकतीच ए जी एम" वरून हे ज्ञानोबांना "अन्युअल जनरल मिटींग"चे संक्षिप्त रूप अपेक्षित असावे असे वाटते... तुम्हाला बहुतेक "आसिस्टंट जनरल मॅनेजर" असं म्हणायचं आहे... चूकभूल देणे घेणे ;)

इरसाल's picture

9 Oct 2013 - 2:19 pm | इरसाल

व्हय जी तसचं बोललु !

मुक्त विहारि's picture

8 Oct 2013 - 11:53 pm | मुक्त विहारि

हसून हसून लोळत आहे

अभ्या..'s picture

9 Oct 2013 - 3:23 am | अभ्या..

ब्येस्ट्च ओ माऊली :)

स्पंदना's picture

9 Oct 2013 - 3:48 am | स्पंदना

अगागा! पार बाजार उठिवलाय कवितांचा. त्या अज्ञात्कुलच्या कवितांना हात घालण्याएव्हढे कूल झालात तुम्ही पैजारबुवा.
मस्त! येक कडक षॅल्युट!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

9 Oct 2013 - 12:07 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

दंडवत स्विकारा!!
__/\__!!

सस्नेह's picture

9 Oct 2013 - 12:46 pm | सस्नेह

कसले कसले रस भरलेत ओ पैजारबुवा जिलब्यांमधे ?
कोडाईकॅनाल, भूछत्री, आई, बाबा अन काय काय..
कॉकटेल भारी जमलंय !

प्यारे१'s picture

9 Oct 2013 - 12:50 pm | प्यारे१

मस्तय हो बुवा.

एजीएम झाल्याबद्दल हाबिणंदण... सर!

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Oct 2013 - 12:56 pm | ज्ञानोबाचे पैजार

प्यारेकाका,

एजीएम झालो नाही एजीएम (अ‍ॅन्युअल जनरल मिटिंग)झाली

पण हबिणंदणा बद्दल आभार. हित हापिसात एजीएम वेळेत झाल्याची कोणालाच किंम्मत नाही.

एकदा लेट करुन दावतोच.

विटेकर's picture

9 Oct 2013 - 12:51 pm | विटेकर

उत्तम विडंबन !
सहसा कवितांच्या वाटेस जात नाही. पण हा क्लिक वाया गेला नाही ! लगे रहो !

पैसा's picture

9 Oct 2013 - 2:45 pm | पैसा

जबरदस्त झालीत विडंबनं!