मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मतदारयाद्यांचा घोळ

माहितगार ·

शुचि 17/04/2014 - 20:54
तुम्ही तुमच्या पुरते तात्कालीक मत व्यक्त करू शकताच आणि विसरून जाऊ शकताच, मिपासारख्या संस्थळांचा उद्देशच तो आहे.
होय हा उद्देश्य तर आहेच पण अन्य संस्थळांचे फायदेही आहेत. (१) माझ्यापुरता बोलायचे झाले तर "मिपा" आदि संस्थळांमुळे माझ्या वैयक्तिक "अंधश्रद्धाप्रवण विचारसरणीत" खूप बदल सकारात्मक घडलेला आहे. बराच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजला आहे. (२) काही "डुक्करमुसंडी" "ब्लेम करणार्‍या" प्रतिक्रिया वाचून निदान हे कळू लागलेले हे की लेखकाच्या भूमिकेत शिरुन, त्याच्या दृष्टीने लेख वाचायचा असतो. म्हणजे हा एक फायदाच आहे. (३) वादविवाद कौशल्य (डिबेट या चांगल्या अर्थाने) अजिबातच नव्हते ते नगण्य का होईना डेव्हलप झाले आहे. (४) संस्थळांचा अजून एक मुख्य फायदा मला हा जाणवतो की "आपापल्या आयव्हरी टॉवरमध्ये न बसता", समाजातील विविध बॅकग्राऊंड्मधून आलेल्या घटकांचे परस्परांशी मिळून मिसळून रहाणे/वागणे.

In reply to by शुचि

माहितगार 17/04/2014 - 21:23
क्षमा असावी, मी आपल म्हणण नाकारत नाही. विधानाचा उद्देश मिपा आणि इतर संस्थळांवर टिका करण्याचा नाही. विकिवरील संदर्भासहीत लेखन पुढील संदर्भा करता वापरता येत माहितीतील गॅप्स नेमकेपणाने लक्षात येतात. तीच ती टेप वाजण्यापेक्षा सकारात्मक मार्ग शोधण्यासाठी नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकते. अर्थात प्रत्येकाच आपापल विचार स्वातंत्र्य आहे. अवांतरः अवांतर प्रतिसाद डिफॉल्ट मध्ये झाकलेले राहतील अशी या द्रुपल संस्थळांना सोय हवी. - या वाक्याची सही बनवू कि काय या विचारात असलेला

In reply to by शुचि

धन्या 19/04/2014 - 11:38
काही "डुक्करमुसंडी" "ब्लेम करणार्‍या" प्रतिक्रिया वाचून निदान हे कळू लागलेले हे की लेखकाच्या भूमिकेत शिरुन, त्याच्या दृष्टीने लेख वाचायचा असतो. म्हणजे हा एक फायदाच आहे.
या वाक्यातील "डुक्करमुसंडी" हा शब्द मुळचा इंग्रजी वाटतो. तसे असेल तर तो शब्द कोणता हे सांगाला का?

ऋषिकेश 18/04/2014 - 11:40
आमच्या घरातही काल हा अनुभव आला. माझ्या कुटुंबातील अर्ध्या सदस्यांची नावे वगळलेली होती. त्यांनी त्याच पत्त्यावर गेले ३-४ निवडणूकांत मतदान केले आहे. माझ्या परिचितांपैकी काहिंचे निवासस्थान गेली २५ वर्षे तेच असूनही यावर्षी नाव वगळले गेले होते. मतदान झाल्याची टक्केवारी मोठी दिसते आहे कारण एकूण मतदारसंख्या कमी झाली आहे की खरेच अधिक व्यक्ती बाहेर पडल्या हे कळायला मार्ग नाही.

आशु जोग 18/04/2014 - 11:48
पुण्यात काँग्रेस सोडल्यास बहुतेक उमेदवारांनी यावर आंदोलनाचा इशारा दिला आहे. काँग्रेसचा उमेदवाराने नंतर सूरात सूर मिसळला आहे... . यापुढे एककलमी कार्यक्रम... मतदारांना न्याय देणे... लोकशाही वाचवणे

शशिकांत ओक 18/04/2014 - 17:21
प्रत्यक्ष मतदान करण्यापुर्वी आपले नाव मतदार यादीत असल्याचे प्रत्येक व्यक्तिने तपासून पाहणे गरजेचे आहे. जर तसे केले गेले नसेल तर, व आपले नाव कोणत्या केंद्राच्या यादीत आहे या स्लिप्स घरोघरी येऊन वाटल्या जातात. त्या तशा मिळाल्या नसतील तर का मिळाल्या नाहीत याची चौकशी केली होती काय ऐन वेळी गिल्ला केला काय वगैरे प्रश्न उपस्थित होतात.

In reply to by शशिकांत ओक

माहितगार 18/04/2014 - 18:15
अगदी प्रत्येक मतदानापुर्वी (स्थानिक प्रशासन ते लोकसभा किमान ३ वेळा; विधानपरिषदेकरीता पदविधर मतदार संघ असतो तो तुम्ही आणि मी मोजत सुद्धा नाही; त्या शिवाय मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रीया प्रशासनाने पाच वर्षात ७ वेळा केली तर दहा वेळा?) मतदारयादीतले नाव तपासण्याची प्रक्रीया तर्कसुसंगत रहात नाही. खरेच प्रत्येक मतदार तपासणी साठी आला तर तेवढा ताण घेण्याची क्षमता प्रशासनात तरी आहे काय. एक तर माणसे स्थानांतरीत होतात किंवा मरतात (क्वचीत हरवतात, पण त्यांच नाव ७वर्षेपर्यंत मतदार यादीतन काढता येत नसाव). आजच्या काळा मजुरांचे स्थानांतर सुद्धा प्रत्यक्षात लेबर काँट्रॅक्टर शिवाय होत नाही. बोटावर मोजणारी व्यावसायिकांच्या स्वस्थानांतरा शिवाय बाकी स्थानांतरे शैक्षणिक अथवा अस्थापनांची असतात. स्थानांतराचे रेकॉर्ड उपलब्ध करण्याची जबाबदारी आस्थापनांवर टाकली आणि तो डाटा मतदार अद्ययावत करण्यासाठी वापरला की ते काम संपते त्या शिवाय मृतांचा डाटा स्थानिक प्रशासन संस्थांकडून डेथ रेकॉर्डस मधून येऊ शकतो. भारतात लोकशाहीची सुरवात झाली तेव्हा गावातले राजकीय कार्यकर्ते वस्तीतील प्रत्येक नागरीकाला ओळखत; मतदार याद्या अद्ययावत करण्यात स्थानांतरीतांची नावे जोडणे लावणे हे काम उत्साहात करत मृतांची नावे वगळत. आजच्या काळात वस्तीतील कार्यकर्ता स्वयंसेवी असणे आणि प्रत्येक नागरीकाला ओळखत असणे मागे पडले आहे. आज पुण्यासारख्या मेट्रोपॉलीटन शहरातील पेड कार्यकर्ते आपापल्या वस्तीतील कितीशा नागरीकांना ओळखतात ? नावे वगळण्याची आणि जोडण्याची प्रक्रीया मात्र या भाडोत्री कार्यकर्त्यांच्या हातची बटीक झाली नाही काय. ५ टक्के गैरसोईची नावे वगळा ५ टक्के डुप्लिकेट जोडा एकुण १० टक्क्याचा फरक सहज मारता येतो ? आणि कुणाला काही थांगपत्ता नाही. ज्यांना मतदान करता आले नाही ते ५ टक्केच असतात तुम्ही मतदार यादी का तपासली नाही म्हणून त्यांच्यावरच व्हिक्टीम ब्लेमींग करण्यात सारेच सहभागी होतात. आधारकार्ड सारखा डाटाबेस मतदार याद्या अद्ययावत करण्यास वापरण्याच्या आड न्यायव्यवस्थासुद्धा आनंदाने येते. माझ्या स्वत;च्या मतदानावर अशी संक्रांत अद्याप आलेली नाही पण अशी संक्रांत येई पर्यंत मीही दुसर्‍यांच्या अडचणीकडे दुर्लक्ष करतो आणि नियमात राहून मतदारयादीचा गोंधळ चालू राहतो.

आतिवास 18/04/2014 - 17:59
'मतदान करू शकलेले' आणि 'मतदान करू न शकलेले' असे दोन वर्ग समाजात आहेत याची जाणीव झाली. जे मतदान करू शकले ते ज्या पद्धतीने 'मतदान करू न शकलेल्या' लोकांवर टीका करताहेत ('आधी झोपला होतात काय' वगैरे थाटाची) ती पाहून करमणूक होते आहे. मतदाता म्हणून नाव नोंदवण्यासाठी अनेक लोकांनी दिलेल्या मुदतीत प्रयत्न करूनही त्यांची नावं का आली नाहीत; असलेली नावं गायब कशी झाली; एकाच घरातील काहींची नावं आहेत तर काहींची नाहीत - असे बरेच घोळ आहेत. ते घोळ निस्तरावेत यासाठी यंत्रणेत काय सुधारणा झाल्या पाहिजेत याचीही चर्चा होते आहे - पण सुधारणा होतील का किंवा कधी होतील हा एक प्रश्नच आहे.

In reply to by आतिवास

माझ्या मते अनेक लोकांनी आपले नाव आत्ताच्या निवडणूकीसाठी मतदार यादीत आहे कि नाही हे आयत्या वेळी पाहिले. जर घोळ होउ शकतात असे गृहीत धरले असते तर त्याना हे जरा अगोदर समजले असते. अर्थात अगोदर समजले तरी काय? हा प्रश्न राहतोच. जसे की अमोल पालेकारांना महिनाभर अगोदर माहित होते कि आपले नाव यादीत नाही. अपडेट लिस्ट मधे पण आले नाही

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार 19/04/2014 - 11:19
पोलिस आयुक्तांचीही आयोगाकडे लेखी तक्रार (मटा वृत्त) हि बातमी घ्या पुण्याचे दस्तुरखुद्द पोलीस आयुक्तांनी यादीत स्वतःचे नाव येण्याकरता लागणार्‍या सर्व कागदोपत्री बाबी पूर्ण केल्या तरी त्यांचेही नाव आलेले नाही. प्रशासकीय सेवेत आहेत कागदोपत्री पुर्तता कशा करावयाच्या त्यांना माहीत नसण्याची शक्यता कमी.
हट्टी आयोग, गलथान प्रशासन अन्‌ उदासीन पक्ष
या सकाळ वृत्तात खापर सॉफ्टवेअर आऊट सोर्सींग एजन्सीवर फोडलेले दिसत असले तरी, आऊट सोर्सींग एजन्सीची बीले क्लिअर केली नाही की ती मंडळी गायब होणे अशक्य नाही. "या सर्व अर्जांची डाटा एन्ट्री करण्याचे काम बाहेरच्या जिल्ह्यातून करून घ्यावे लागले." असे वृत्तात म्हटले आहे पण या तथाकथीत बाहेरच्या जिल्ह्याचे नाव वृत्तामध्ये गुलदस्त्यात ठेवले दिसते आहे. मतदारयादी छायाचित्र नसलेल्यांची नावे वगळावीत असा कोणत्यातरी आदेशाचा अर्थ लावून नावे ऊडवली गेली. आणि ज्यांनी आपले नाव यादीत आले नाही हे पाहून अर्ज भरले त्यांची येऊ शकली नाहीत. हे जाणीवपुर्वक नसावे अशी आशा करणेच हातात असते. कारण पुराव्यांशिवाय बोलता येत नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

आतिवास 19/04/2014 - 19:59
मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी लोकांनी किती वेळ खर्च करणे, किती हेलपाटे घालणे अपेक्षित आहे? सरकार मतदानासाठी जशी एक दिवसाची सुट्टी देतं तशी नावनोंदणीसाठी एक दिवसाची आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तीन दिवसांची पगारी सुट्टी देईल काय? ;-) बाकी या देशातल्या ९०% (त्याहून जास्त खरं तर!)लोकांना ऑनलाईन नाव नोंदण्याची आणि तपासून पाहण्याची सोय नसते - त्यांनी पाठपुरावा करावा म्हणजे नेमकं काय करावं हे कुणी सांगेल काय?

In reply to by आतिवास

आयुर्हित 19/04/2014 - 21:52
माझ्या पुण्यातील एका सुशिक्षीत मित्राने सर्व कुटुंबियांचे नाव नोंदवण्यासाठी चक्क ३ वेळेला फोटो देवून फॉर्म भरून देवून सुद्धा त्यांचे नाव यादीत आलेले नाही, शेवटी त्याला व त्याच्या सर्व कुटुंबियांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे. हे एक उदाहरण पाहून जी युवाशक्ती पहिल्यांदाच मतदान करणार होती, तीच्या मतदानाच्या अपेक्षा पूर्ण होणे कठीण वाटते.

माहितगार 18/04/2014 - 19:11
एनी वे, मतदार याद्या तयार करण्याची अद्ययावत करण्याची प्रक्रीया कशी होते. संबंधीत इतिहास सोबत घोळांचा इतिहास, निवडणूक कायद्यातील सबंधीत कलमे, लेखांचे दुवे इत्यादी माहिती कुणी उपलब्ध केल्यास विकिवरील लेखास सुरवात करता येईल.

आयुर्हित 18/04/2014 - 21:46
याद्यांमध्ये अक्षम्य कसूर झालेली आहे. अशा या हलगर्जीपणा बद्दल कोणती कायदेशीर कारवाई करता येईल? जर्मनीवरून मतदानासाठी आले अन्‌ हताश होऊन मतदान न करताच गेले पुणेकरांकडून संताप

भाते 19/04/2014 - 12:35
पुण्यातल्या लाखभर मतदारांची नावे मतदार यादीतुन गायबली. २४ तारखेला मुंबईत सुध्दा थोडयाफार प्रमाणात हेच चित्र दिसल्यास नवल वाटणार नाही. स्थलांतरित (युपी, बिहार, बांग्ला… इ.) लोकांमुळे आधीच या शहरांची लोकसंख्या वाढत आहे. या स्थलांतरित लोकांना गैरमार्गाने स्थानिक नागरिक म्हणुन रेशन कार्ड तर सहज मिळते. कदाचित मुळ मतदारांची नावे मतदार यादीतुन गायब करून या स्थलांतरित लोकांची नावे तर मतदार म्हणुन या यादीत घुसवली गेली असण्याची शक्यता आहे. त्याशिवाय २०-२५ वर्षे एकाच ठिकाणी वास्तव्य करणार्यांची आणि एकाच कुटुंबातील काही सदस्यांची नावे कशी काय वगळली जातात?

In reply to by भाते

माहितगार 19/04/2014 - 12:42
निवडणूक आयोग ज्यांच्या कडून काम करवून घेते त्यात सहसा राज्यशासनाच्या कर्मचार्‍यांचे एका अर्थाने मराठी लोकांचे प्राबल्य असावे. (नेते आणि चमचे सोडून) सर्वसामान्य मराठी माणूस सहसा असा खालच्या स्तरावर जाऊन प्रकार करणार नाही असे वाटते.

In reply to by भाते

माहितगार 19/04/2014 - 12:45
आणि युपी, बिहारचेही लोक महाराष्ट्रातील स्थानिक राजकारणामुळे मराठी लोकांवर थोडेफार नाराज असू शकतील पण असे काही करतील असे खरे म्हणजे वाटत नाही.

In reply to by माहितगार

पैसा 19/04/2014 - 19:47
http://indianexpress.com/article/cities/pune/reliable-voters-from-citys-slums-swell-by-four-lakh-since-last-lok-sabha-polls/ त्याचवेळी २ लाख नावे गायब आहेत असे पोलीस कमिशनर म्हणत आहेत. http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/About-2L-names-missing-from-voters-list-Pune-police-commissioner/articleshow/33874102.cms

कंजूस 19/04/2014 - 21:30
माझा अनुभव - आम्ही जून २०१३मध्येच वेबसाईटवर नावे शोधली होती .नव्हती .ऑगस्ट २०१३ पर्यंत २०११च्या छापील याद्या होत्या आणि ज्यांचे फोटो स्पष्ट नव्हते त्यांची नावे वेबसाईटवर दाखवत नव्हते .जी गोष्ट आमच्याबाबत झाली होती.आमचे नवीन फोटो (फॉम वगैरे न भरता) जुन्या फोटोंवर चिकटवून सही घेतली आणि साहेबांनी सही केली .पाच मिनीटे लागली . ऑगस्ट नंतर २०१४च्या कच्च्या छापील यादीत आमचे नवीन फोटो छापून आले .पण वेबसाईटवर फेब्रु० मध्येच नावे येतील असे सांगितले तशी आली .कार्डे जानेवारीत मिळाली .वेळीच जागे झाल्यामुळे काम झाले .

बँकांची डेबिट कार्ड असतात. त्यावरील खातेदाराची माहिती आणि फक्त त्यालाच माहित असलेला पिन कोड वापरून जगात कुठूनही खात्यातील पैसे खातेदाराला काढता येतात. तसेच दिवसाची मर्यादा उलटून गेल्यावर पैसे काढता येत नाहीत. अशी कांही कार्ड व्यवस्था मतदानासाठी करावी. जेणे करून निदान भारतात तरी कुठूनही (स्थलांतरीतांनाही) मतदान करता येईल. असे कांही अस्तित्वात आल्यास बरेचसे गोंधळ आटोक्यात येतील असे वाटते. ह्यालाच पुढे जाऊन परदेशस्थांना दूतावासात जाऊन मतदान करता येईल.

प्रश्नलंका 20/04/2014 - 05:22
आधार कार्ड, जन गणना अशा लोकांची माहिती गोळा करणार्‍या उपक्रमांची आताच अंमल बजावणी झालेली असून ही त्याचा इथे वापर करु न शकणे हे अनाकलनीय आहे.. एकच काम (लोकांची माहीती गोळा करणे) हे वेगवेगळ्या मार्गांनी करून देखील गोंधळ घालणे हा तर निव्वळ मूर्खपणा झाला.! बाकी पेठकरकाकांशी सहमत पण जे या एवढ्या डोकेफोड आणि वेळखाऊ कामातदेखील घोळ (पक्षी: भ्रष्टाचार) करु शकतात ते त्या कार्ड व्यवस्थेत तर काय काय करतील.. :)

मदनबाण 20/04/2014 - 09:51
लाख-दोन लाख लोकांची नावे यादीतुन डिलीट कशी काय होतात ? या धाग्याशी अवांतर एक प्रश्न विचारावासा वाटतो... तो म्हणजे हे राजकारणी संपत्ती जाहिर करतात, तेव्हा एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे यांच्या स्वतःच्या नावावर कुठलेही {४ चाकी} वाहन नसते.असे का ? प्रमाणाच्या बाहेर अवांतर :- राज ठाकरेंची मला आवडलेली "रोखठोक" मुलाखत...

In reply to by मदनबाण

माहितगार 20/04/2014 - 15:10
स्वतःच्या नावावर कुठलेही {४ चाकी} वाहन नसते.असे का ?
हाच प्रश्न आम्हालाही पडला, मदनबाणांना मिपा वर कुणी चार्टर्ड अकाऊंटट आहेत का ? (स्वप्नातल्या उत्तरांवर विश्वास ठेऊ नये त्या अफवा असतात, मला जे स्वप्नात 'चाअ' उत्तर मिळाल ते असं: "चाकाखावरून संपत्ती संस्थांच्या नावावर ठेवायच्या असतात, त्या आपल्या खात्या(ण्या)त दाखवायच्या नसतात; ज्या काखावरून स्थावर येतात त्या 'खा'त्यात हिशेबीपणे दाखवायच्या असतात. पुढच्या वर्षांना स्थावरची वाढीव किंमत मार्केट मध्ये वाढते त्या पेक्षा अधिक दाखवायची म्हणे? असे का ? हा प्रश्न विचारे पर्यंत स्वप्न तूटल 'चाअ' निघोन गेले. भावी उमेदवारांनो ह.(शिकोन) घ्या. ;) )

In reply to by माहितगार

माहितगार 20/04/2014 - 15:39
आत्ताच कळलेल्या व्युत्पत्तीशी/व्याख्येशी सहमत नसलो तरी जिज्ञासू मिपाकरांकरीता देतो आहे "ज्या संस्थेच्या नावावर खान्यासहीत, कारचा (सर्व) खर्च टाकता येतो आणि कारही फिरवता येते अशा संस्थेस कारखाना म्हणतात" 'ने'ता(हाटॉ)वर करून बगला होतो सर्वसामान्य कार नसलेला 'ने'ता पाहून पगला होतो :)

In reply to by माहितगार

माहितगार 20/04/2014 - 15:25
स्वप्नातील भाषिक त्रुटीत खालील प्रमाणे सुधारणा सुचवली गेली. मी सहमत नसलो तरी जिज्ञासू मिपांकरांकरता देतो ती खालील प्रमाणे.: (स्वप्नातल्या उत्तरांवर विश्वास ठेऊ नये, त्या अफवाच असतात, मला जे स्वप्नात 'चाअ' उत्तर मिळाल ते असं: "चाकाखावरील संपत्ती संस्थांच्या नावावर ठेवायच्या असतात, त्या आपल्या खात्या(ण्या)त दाखवायच्या नसतात; ज्या काखावरून स्थावर येतात त्या 'खा'त्यात शिस्तीत हिशेबीपणे दाखवायच्या असतात. पुढच्या वर्षांना स्थावरची वाढीव किंमत मार्केट मध्ये वाढते त्या पेक्षा अधिक दाखवायची म्हणजे स्थावरचे सुटॉवर होतात ! असे का ? हा प्रश्न विचारे पर्यंत स्वप्न तुटले, 'चाअ' निघोन गेले. भावी उमेदवारांनो ह.(शिकोन) घ्या. ;) )

In reply to by माहितगार

माहितगार 20/04/2014 - 15:58
@ म.बा. तुमचा वरचा प्रश्न (फक्त साहित्यिक दृष्ट्याच) भलताच प्रेरणादायी ठरला आहे. एक म्हण सूचली खास
"जो (कारच्या खर्चाचीही) झळ घेत नाही आणि सोबत स्थावरचा (किमंती वाढण्याचा) घोळही घालत नाही तो 'ने'ता कसला ?"

प्यारे१ 20/04/2014 - 16:47
प्रेमात नि युद्धात सगळं काही क्षम्य असतं ना? निवडणुका म्हणजे हल्लीचं युद्धच की! पुणेकरांना आपण फार हुशार वाटतं नै? बसा 'व'रडत! ;) -(आव्हान दिलं की पुणेकर पेटतात हे ठाऊक असलेला) प्यारे

चौकटराजा 21/04/2014 - 09:12
निवडणूक आयोग ही एक स्वायत्त सरकारी संस्था आहे. पण या आयोगाचे काम मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर असेच असते.कडक धोरण बिरण सगळे याना खरे तर बकवास वाटते. भारतीय कायद्याप्रमाणे आपल्या मतदानाच्या अधिकाराची जबाबदारी मूलत: ( प्रायमरी) नागरिकाची असून ती आयोगाची दुय्यम ( सेकंडरी) आहे अशी व्यवस्था असेल तर आयोग जिंकला नाहीतर आयोगावरच महाअभियोग चालवला गेला पाहिजे. कारण आयोगातील अधिकारी करदात्यानी दिलेल्या पैशातूनच वेतन घेत असतात.

In reply to by चौकटराजा

माहितगार 21/04/2014 - 09:19
व्यक्तींवर कारवाई अथवा महाभियोगाने केवळ व्यक्ती बदलतात. केवळ व्यक्ती बदलल्याने व्यवस्थेतील त्रुटी दूर होतात का या बद्दल साशंक आहे. माझ्या मते गरज व्यवस्था आधूनिकीकरणाची आहे.

In reply to by माहितगार

पैसा 21/04/2014 - 09:32
या मतदार याद्यां अद्ययावत करण्याचे काम कोणा खाजगी कंपनीला दिले होते असे आता सांगत आहेत. कंपनीचे नाव मात्र सांगायला तयार नाहीत. आर टी आय खाली कोणाला माहिती मिळवता येते का बघा. विशिष्ट हेतूने खाजगी कंपनीचे काम प्रभावित करणे हा राजकारण्यांच्या डाव्या हाताचा मळ आहे.

In reply to by पैसा

माहितगार 21/04/2014 - 09:47
आर टी आय खाली कोणाला माहिती मिळवता येते का बघा. विशिष्ट हेतूने खाजगी कंपनीचे काम प्रभावित करणे हा राजकारण्यांच्या डाव्या हाताचा मळ आहे.
पै ताई मी कधी आर टी आय वापरला नाही सल्लाही देण्यापासून दूर असतो. पण जे ऐकुन आहे जिथे सत्ता संपत्तीचा खेळ चालू असतो, तेथे स्वसंरक्षणाची काळजी न घेता आर टी आय मध्ये पडू नये असे म्हणतात, त्या बाबत अधिक न बोललेल बरं अशी स्थिती आहे म्हणे

In reply to by माहितगार

पैसा 21/04/2014 - 09:51
त्यावरून कित्येक लोकांचे खून झाल्याच्या बातम्या माहिती असताना आपला जीव धोक्यात का घाला! पण इच्छाशक्ती असेल तर एखादा माणूस एखाद्या राजकीय पक्षाच्या पाठिंब्याने कदाचित माहिती मिळवू शकेल. कोणी सांगावं! किंवा इथे धमक्या देणारे काही डेरिंगबाज लोक असतात, त्यातला कोणी असली कामं करून सगळ्यांचा दुवा घेऊ शकेल. बघा, हाय का पावर कोणाच्यात! आपण तर घाबरट आहोत. सरळ कबूलच आहे.

In reply to by पैसा

माहितगार 21/04/2014 - 10:17
"त्यांना" नको तीथे तुम्ही बोट ठेवत नाही तो पर्यंत महाराष्ट्र एक सभ्य सुरक्षीत राज्य आहे. उत्तरप्रदेश बिहारात त्यांच्या नेत्यांची असभ्यता समोरूनच रफ वागणूकीतन दिसत असल्याने विरोधी कार्यकर्यांना कुणा पासून काळजी घ्यायची ते समजण सोपतरी जात असेल. महाराष्ट्रातील सभ्यतेचे बुरख्यांमुळे समोरून समजतही नाही. करून सरून नामा निराळे राहण्यात महाराष्ट्राचा हात बिमारू राज्येही धरू शकत नाहीत. रादर महाराष्ट्रीय राजकारण्यांसारख व्हिक्टीम ब्लेमींग अजून कोणी करू शकत नाही. अशा बाबतीत पोलीसदले पत्रकार सारेच किती पोखरले गेलेय ते तुमच्या माझ्या सारख्यांना कल्पनाही येत नाही. एवढ्यातून काही बाहेर आलच तर समाजही दुर्लक्ष करतो. म्हणजे स्वतःचा आणि कुटूंबाचा जीव धोक्यात घालूनही समाज त्यांच्या मागे उभा रहात नसेल तर उद्दीष्ट आणि श्रम दोन्ही पाण्यात जात असावेत. ज्यांची नावे मतदारयादीत शील्लक राहतात त्यांनीच प्रस्थापितांना मतपेटीतून दूर केले, काही व्यवस्था परिवर्तन झाले तरच काही फरक पडेल. अवांतरः यात मला एक गंमत वाटते जे लोक अशा राजकारणाचे घरी दारी साक्षी राहीलेले असतात त्यातील काहींना परदेशात सुरक्षीत राहण्याचीही संधी मिळते ते स्वतःच का बोलते होत नाहीत, त्यामुळे राजकारणात काय चालू आहे हे सामान्य माणसाला अंदाजा असला तरी नेमके ठाऊक नसते. आणि समाजाला माहिती होऊन जाग येत नाही तो पर्यंत बदल अशक्य नसले तरी अवघड जातात

पैसा 21/04/2014 - 10:06
महाराष्ट्रात ८.०६ कोटी मतदार आहेत. त्यातले ६० लाख मतदार जागा सोडून गेले म्हणून त्यांची नावे काढून टाकली, असं सांगितलं जातंय. हा आकडा जरा जास्तच वाटतोय. शहरात लोकांच्या बदल्या वगैरे होतात, पण गावातून इतके लोक जागा बदलत नाहीत. १० वर्षांपूर्वी आमच्या अख्ख्या बिल्डिंगची नावे अशीच गायब झाली होती. (१६ फ्लॅट्स, किमान ३५ मतदार) तेव्हा आमच्या घरात पूर्णवेळ एक मोलकरीण असायची. म्हणजे घरात कोणी नव्हते हे शक्यच नाही. कोणी चौकशीला आले नव्हते हेच त्यात खरे.

In reply to by आतिवास

पैसा 21/04/2014 - 10:51
पण आता नागपूर, औरंगाबाद, अमरावती, रत्नागिरी, नाशिक, पनवेल, मुंबई सगळीकडेच मोठ्या प्रमाणात नावे गायब झाल्याच्या बातम्या येत आहेत. महाराष्ट्रातले लोक बर्‍याच प्रमाणात जागरूक आहेत आणि मतदान करायला मिळालं नाही म्हणून लगेच ओरडतात. बाकी राज्यांत काय अवस्था आहे देवजाणे!

In reply to by आतिवास

यशोधरा 21/04/2014 - 10:58
ही वेब साईट कोणाची आहे? ही माहिती कुठे अणि कोणाकडे जमा होईल? आणि पुढील प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन काय असेल? तुम्ही दिलेल्या दुवावर पान उघडले असता ह्यापैकी काहीच माहिती दिसली नाही, म्हणून विचारत आहे.

In reply to by यशोधरा

आतिवास 21/04/2014 - 11:06
अर्धवट माहितीबद्दल क्षमस्व. मला आलेला दुवा जसाच्या तसा डकवला आहे आधी. ही वेबसाईट आहे - खाली पत्ता आणि फोन क्रमांकही आहेत.

In reply to by आतिवास

यशोधरा 21/04/2014 - 11:19
क्षमस्व कशाला? :) अगोदरच्या दुव्यावर काहीच आगापीछा कळला नाही त्यामुळे जाणून घ्यायच्या उद्देशाने विचारले. धन्यवाद. :)

आशु जोग 21/04/2014 - 10:50
माहीतगार हे माहीतगार असल्यासारखे का लिहीतात...

आयुर्हित 21/04/2014 - 11:44
हजारो नागरिक मतादानाविना असूनही निवडणूक निरीक्षकांनी दिला आयोगाला अजब अहवाल: मतदार यादीतील गोंधळामुळे पुण्यातील हजारो मतदार मतदानापासून वंचित राहिले असले, तरी निवडणुकीत प्रशासनाने योग्य ती प्रक्रिया पार पाडली होती, अशा आशयाचा अहवाल निवडणूक निरीक्षकांनी आयोगाला पाठविल्याचे समजते. मतदान गोंधळप्रकरणी ‘क्लीन चिट’

आयुर्हित 23/04/2014 - 10:26
पुणे शहर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी हजारो मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर खळबळ उडाली. अनेकांना मतदान केंद्रावरून परत यावे लागले. वास्तविक हा अनुभव नवा नाही. २००४ची लोकसभा निवडणूक आठवून पाहा. त्या वेळेस लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी नावे वगळली गेल्याने असाच गोंधळ झाला होता. त्या वेळी तर लॅपटॉप आणि मोबाइलवर सॉफ्टवेअरही आस्तित्वात नव्हती. त्यामुळे नावे वगळली गेल्याच्या बातम्या दोन दिवस प्रसिद्ध झाल्या आणि त्यानंतर सगळेच शांत झाले. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये थोड्या-फार फरकाने नावे वगळली जाणे, नावे न सापडणे असे प्रकार घडतच आले आहेत. प्रत्येक वेळी त्यावरून गोंधळ होतो. सामान्य मतदारांना कोणीच वाली नसल्याने त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. पहिले पाढे पंचावन्न या न्यायाने व्यवस्था पुढे सुरू राहते. यंदा मात्र, काही तरी वेगळे घडते आहे. मतदान करायला न मिळालेल्यांचा उद्रेक झाला आहे. गेल्या पंचवीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच मतदान करायला मिळाले नाही, म्हणून थेट जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालण्याची हिंमत पुणेकरांनी दाखविली आहे. या सर्वांना मतदान करायला मिळेल किंवा नाही, हे आत्ता कोणीही सांगू शकत नाही; पण केंद्रीय निवडणूक निरीक्षक आणि एकूणच प्रशासकीय यंत्रणा हा हक्क मिळू नये यासाठीच काम करणार आहे हे स्पष्ट आहे. न्यायालयाने काही दिलासा दिला, तरच या निवडणुकीमध्ये वगळल्या गेलेल्यांना मतदानाचा हक्क मिळू शकेल. मात्र, यंदा किमान आपण सगळे जण लढण्याच्या मनःस्थितीत तरी आहोत. याबाबतची याचिकाही दाखल झाली आहे. आपल्याला आपल्या हक्कांची जाणीव होते आहे आणि ते हक्क हिरावून घेणाऱ्यांना जाब विचारण्याची आपली तयारी आहे हेच या सगळ्यांतून दिसून येते आहे, ही समाधानाची गोष्ट आहे, असे म्हणायचे. खरे तर एकदा यादीत नाव असल्यावर ते वगळण्यासाठी खूप मोठी प्रक्रिया आहे. दुबार आणि मयत मतदारांची नावे वगळण्याचा प्रश्न ‘महाराष्ट्र टाइम्स’ने लावून धरला होता. माजी नगरसेवक श्याम मानकर यांनी या प्रश्नी माहिती अधिकाराचा वापर करून गोळा केलेली माहिती ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे दिली होती. त्यानुसार पुण्यामध्ये तीस टक्के मतदार गायब असल्याचे वारंवार आढळून आले होते. त्यासाठी वर्षभर कामाला लावलेल्या यंत्रणेने सलग दोन वर्षे सर्वेक्षण केल्यानंतर ही नावे आढळली होती. ही नावे वगळण्यात का येत नाहीत, असा प्रश्न ‘मटा’ने उपस्थित केला होता. त्या वेळी, हेच जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी, ‘मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया अतिशय किचकट असते, तो अधिकार आम्हाला नाही,’ असे सांगत होते. मतदाराचे नाव वगळण्यासाठी पंचनामा करावा लागतो, नोटीस द्यावी लागते, त्याचे म्हणणे ऐकून घ्यावे लागते अशीही कारणे दिली गेली. मग आत्ताच असे काय घडले, की यातील कोणतीही प्रक्रिया पार न पाडता पुणेकरांची नावे यादीतून वगळली गेली? याचा खुलासा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर आहेच. याची चौकशी ते करणार की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. वगळलेल्या मतदारांना या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क मिळेल किंवा नाही, पण नावे वगळणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी. या बाबतीत राजकीय षड्‍‍यंत्र असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामध्ये वस्तुस्थिती आहे किंवा नाही, हे ही आपण तपासून घेणे आवश्यक आहे. त्याचीही चौकशी व्हायला हवी. वास्तविक ही चौकशी एव्हाना सुरू व्हायला हवी होती. निवडणूक आयोगाला मतदानाबाबतचा जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ द्या; पण नावे वगळली का गेली हे तर पुणेकरांना कळलेच पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांकडे ‘महाराष्ट्र टाइम्स’नेच सुमारे एक हजाराहून अधिक जणांची व्यथा थेट पोहोचवली आहे. यातील कोणतीही शंभर नावे काढा आणि ती का वगळली गेली याची कारणे पुणेकरांसमोर मांडा, असे आमचे जिल्हाधिकाऱ्यांना आव्हान आहे. ते सबळ कारणे ते देऊ शकले, तर नावे वगळण्याची प्रक्रिया राबविली गेली असे म्हणता येईल. पुणेकर आपल्या अधिकाराबाबत सजग नाहीत, असा निष्कर्षही कदाचित काढता येईल; पण ‘यादीमध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही, हे तुम्ही तपासले नाहीत. मग चूक केलीत,’ असे जे सध्या सांगितले जात आहे ते तरी बंद होईल. याबाबत कायमस्वरूपी यंत्रणा उभारायला हवी, अशी सूचना ‘मटा’ने केली होती. आपल्या लोकशाहीची किंमत आपण मोजायला हवी. आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळख प्रमाणपत्र, जनगणना अशा अनेक गोष्टींसाठी सध्या विविध सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते खासगी यंत्रणा राबविल्या जातात. त्यावर कोट्यवधी रुपये खर्चही केले जातात. महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डामध्ये कायमस्वरूपी दोन कर्मचारी नेमा. त्यांच्याकडे फक्त ही माहिती गोळा करण्याचे आणि ती अद्ययावत ठेवण्याचेच काम द्या. त्या भागामध्ये नव्याने राहायला किंवा जन्माला आलेल्या माणसाची माहिती ही यंत्रणा गोळा करीत राहील. ती नोंदविताना जुन्या ठिकाणाहून ती रद्द करण्याची जबाबदारीही घेईल. या दोन माणसांना प्रारंभी माहितीचे संकलन करण्यासाठी तात्पुरती दहा-पंधरा जणांची टीम देता येईल. सहा महिने हा कार्यक्रम राबविला, तर महापालिकेचा वॉर्ड पिंजून काढणे ही अवघड गोष्ट नाही. अगदी प्रत्येकाच्या घरी जाऊन माहिती घेणे शक्य होईल. एकदाच काय ती माहिती गोळा करा. त्यामुळे दर महिन्याला जनगणनेपासून ते वॉर्डमध्ये नक्की किती नागरिक आहेत, किती मतदार आहेत येथपासून त्यांच्याकडे कोणकोणती कार्डे आहेत येथपर्यंत हजार गोष्टींची माहिती सरकारकडे उपलब्ध होईल. वॉर्डामध्ये अशी यंत्रणा उभारल्यास दर वर्षाला त्यावर जास्तीत जास्त दहा लाख रुपये खर्च करावे लागतील. शहरात मिळून वर्षाला पंधरा कोटी रुपये खर्च होतील; पण नागरिकांना त्याचा खूप मोठा दिलासा मिळेल. सरकारची कोणतीही नवी योजना राबविताना ही आकडेवारी उपयोगी पडेल. त्याचप्रमाणे प्रत्येक योजनेचे लाभार्थी ठरविण्यासाठीही त्याचा फायदा होईल. मतदानाच्या आठ दिवस अगोदरपर्यंत मतदारयादी अद्ययावत करता येईल. आता हे करण्याची वेळ आलेलीच आहे. अन्यथा प्रत्येक वेळेस कोणीतरी धनदांडगा उठेल आणि तुमच्या कोणत्या ना कोणत्या अधिकारावर गदा आणत राहील. आपण किती दिवस हे सगळे सहन करत राहणार आहोत? हे असेच सुरू राहिल्यास उद्यापासून दररोज सकाळी वाहन घरातून काढताना तुमच्या परवान्याची नोंद सरकार दरबारी आहे ना, याची खात्री करावी लागेल. कदाचित त्याचा पुढचा टप्पा म्हणजे या पुढे दररोज सकाळी तुम्ही भारतीय नागरिक आहात ना, याचीही खात्री करावी लागेल. यातील अतिशयोक्तीचा भाग सोडला, तरीही आताचा प्रकार पाहिला, तर तो दिवस दूर नाही, याबाबत तुम्हीही माझ्याशी सहमतच असाल! साभार : यादीतून नावे वगळलीच कशी? पराग करंदीकर Tuesday April 22, 2014

आयुर्हित 23/04/2014 - 16:17
आता मतदारांनीही नक्षलवादी बनावे. सरकारला तीच भाषा समाजात असेल तर या शिवाय मार्ग नाही. प्रचंड नवे मतदार यादीतून वगळली जातात. मग या प्रक्रियेवर विश्वास कसा ठेवायचा? वास्तविक एकदा मतदार यादीत नाव आले तर ते वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला दिलाच कसा जातो? ज्या कर्मचार्यांनी हे दुष्कृत्य केले असेल त्यना राष्ट्र द्रोही ठरवावे. त्यांचावर निवडणूक आयोगांनी कार्यवाही करावी. प्रतिक्रिया शशी संत - बुधवार, 23 एप्रिल 2014 - 01:21 PM IST मूळ लेख:अडीच लाख नावे मतदारयादीतून वगळली बुधवार, 23 एप्रिल 2014 - 03:45 AM IST

In reply to by आयुर्हित

माहितगार 23/04/2014 - 16:37
भारतीय संविधानात मुलभूत अधिकार म्हणून मान्यता असताना आणि सर्वोच्च न्यायालय आणि व्यवस्था परिवर्तन साधण्याचे इतर मार्ग उपलब्ध असताना काम संयमाने घ्यावयास हवे. टोकाच्या प्रतिक्रीया नोंदवण्याकडे कल करून घ्यावा असे वाटत नाही. क्षोभ समजला तरीही टोकाच्या प्रतिक्रीया फायद्या पेक्षा नुकसान साधणार्‍या होऊ शकतात म्हणून टाळावयास हव्यात.

In reply to by माहितगार

आयुर्हित 23/04/2014 - 17:01
भारतीय संविधानाने प्रदान केलेले सात मुलभूत अधिकार/हक्क खालील प्रमाणे आहेत.[१] 1.समानतेचा हक्क 2.अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क 3.शोषणापासून संरक्षणाचा हक्क 4.धार्मिक निवड व स्वातंत्र्याचा हक्क 5.सांस्कृतिक व शैक्षणीक हक्क 6.संवैधानिक प्रतिकाराचा हक्क 7.मालमत्तेचा हक्क (हा हक्क ४४व्या संवैधानिक दुरुस्तीनुसार मुलभूत अधिकारातून वगळून कायदेशीर अधिकार म्हणून नमूद करण्यात आला आहे.) यात मतदानाचा हक्क हा भारतीय संविधानात मुलभूत अधिकार म्हणून मान्यता नाही! मतदान हा मुलभूत अधिकार नाही: हायकोर्ट news at bottom of the page

In reply to by आयुर्हित

चौकटराजा 23/04/2014 - 17:17
मतदान ही एक अभिव्यक्तिच आहे. फक्त अशा प्रकारची अभिव्यक्ति पकत करण्यासाठी वय १८ ची अट आहे एवढेच.

In reply to by आयुर्हित

माहितगार 23/04/2014 - 17:23
ओह तुम्ही लिखित यादी पर्यंत पोहोचलां ? मतदारांच्या आधिकाराची कालजी घेतल्या शिवाय भारतीय संविधान सुरळीत चालणार नाही एवढे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष महत्व त्याचे नक्कीच आहे. ते महत्व नाकारण्याचा प्रयत्न झाल्यास भलभलते घोळ होऊ शकतात याची वरच्या लेव्हलला सर्वोच्च न्यायालय इत्यादी व्यवस्थीत कल्पना असणार. आणि ह्या निर्णयाचे संदर्भ वेगळे आहेत. मतदानाच्या चालू प्रोसेस मध्ये ढवळा ढवल करून मतदानाचा अधिकार मागता येत नाही पण पुढच्या वेळी मतदान करता आले पाहिजे आणि प्रॉब्लेम विसृत आहे आणि न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज आहे हे भक्कम पुराव्या सहीत सादर करावे लागते सिबीआयच अस्तीत्व संवैधानिक नसल्याचा आसाम उच्चन्यायालयाने निर्णय दिला तो सुप्रीम कोर्टाला उचलून बाजूला ठेवावा लागला. हा तर मतदानाचा अधिकार आहे. न्यायालये घोळ होणार नाही हे पहाण्यात सक्रीय भूमीका बजावू शकतील पण न्यायालयात पोहोचण्या आधी इतर संवैधानिक मार्ग एक्झॉस्ट झालेले दाखवावे लागते. आणि तरी सुद्धा टोकाच्या भूमीकेचे समर्थन करण्यासारखी स्थितीही नाही.

आयुर्हित 25/04/2014 - 12:05
महाराष्ट्रातील फक्त ७४लाख मतदारांची नावे गायब ! A whopping 74 lakh names went missing from voters’ list in Maharashtra, out of which around 4.5 lakh are from Pune over the past two years. Moneylife explored the route of retracing how one voter’s name was deleted without follwing any norm. Was this done deliberately? Missing names of voters in the voter list during elections is not new. What is new this time is the exceptionally large number of deleted names. In Pune for example, the names of about 4.24 lakh voters’ have been deleted between 2013 and 2014 as per the documents put up on its website, www.ceo.mah.gov.in. That accounts for 25% names which have been deleted, and allegedly replaced by other ones. Pune voter list file inspection shows deletion is done fraudulently!

आयुर्हित 26/04/2014 - 13:38
अभिनेत्री वंदना गुप्ते आणि अभिनेता अतुल कुलकर्णी यांनाही या प्रकाराचा फटका बसला. पेडर रोडला सकाळी मतदान करायला गेलेले एचडीएफसी बँकेचे दीपक पारेख यांनाही मतदारयादीत आपले नाव नसल्यामुळे धक्का बसला. सर्वसामान्य नागरीक, सेलिब्रेटी, उद्योजक इतकेच काय राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही या घोळाचा फटका बसला. वडाळा सहकारनगरात हा प्रकार घाऊक प्रमाणात घडल्यामुळे निवडणूक कर्मचारी आणि मतदारांमध्ये वादावादी झाली. २००७मध्ये पालिकेची निवडणूक लढवलेले तुषार राऊळ मतदार केंद्रावर मतदानासाठी गेले तेव्हा त्यांचे नाव यंदा मतदारयादीतून गायब झाल्याचे दिसले. दादरच्या स्वामी समर्थ मठाजवळील प्रणय आंबेकर यांचे नाव गायब होते. पण दीड वर्षांपूर्वी मृत झालेल्या त्यांच्या आजी रत्नप्रभा आंबेकर यांचे नाव मात्र यादीत होते. मतदारयाद्यांतील गोंधळाचा मुंबईकरांनाही फटका एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख, ज्येष्ठ वकील राम जेठमलानी आणि मुंबई शेअर बाजाराचे अध्यक्ष आशिषकुमार चौहान या महत्त्वाच्या व्यक्तींनाही यादीत नाव नसल्याने मतदान करता आलं नाही. 'मतदान करण्यासाठी आपण पत्नी आणि मुलासह गेलो. पण यादीत नाव नसल्याचं कळताच आपल्याला धक्काच बसला', असं दीपक पारेख यांनी सांगितलं. घाटकोपर, मुलुंड आणि भांडूपमधील किमान लाखभर मतदारांची नावं यादीतून गायब असल्याचा आरोप इशान्य मुंबई मतदारसंघातील भाजपचे उमेदवार किरीट सोमय्यांनी केला. या प्रकरणी हलगर्जीपणा आणि कट कारस्थान रचल्याची तक्रार आपण करणार असल्याचं सोमय्यांनी सांगितलं. तर २१ हजारांपेक्षा जास्त मतदारांची नावं यादीतून गायब असल्याचा आरोप आपच्या नेत्या मीरा सन्याल यांनी केला आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकांमध्ये मतदान करणाऱ्यांचीही नावं यादीतून गायब आहेत. मतदार यादीत नाव नसल्याने अनेकांनी निवडणूक आयोगाला जबाबदार धरलं आहे. मोबाईलवरून एसएमएस करून मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही याची खात्री करून घ्या, असं आवाहन आयोगाने केलं होतं. मात्र, आयोगाकडून एसएमएसला रिप्लायच आला नाही, असं अनेकांनी सांगितलं. मतदान जनजागृतीसाठी निवडणूक आयोगाने पाण्यासारखा पैसा ओतला. पण कोट्यवधी रुपये खर्चूनही यादीत नाव नसल्याचा फटका हजारो मुंबईकरांना बसला आणि त्यांना आपलं अमुल्य मत देता आलं नाही. त्यामुळे मतदार यादीतील घोळाबद्दल निवडणूक आयुक्त एच.एस ब्रम्हा यांनी आता मुंबईकरांची माफी मागितीली आहे. निवडणूक आयोगाने मागितली माफी याद्यामधील घोळाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचा निर्णय शिवसेना भाजप, आरपीआय महायुतीच्या नेत्यांनी शुक्रवारी घेतला. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जवळपास ५० लाख मतदार आपल्या मताच्या हक्कापासून वंचित राहिले. निवडणूक आयोगाने नाव नोंदणीसाठी आवाहन करूनही या मतदारांनी निवडणुकीपूर्वी आपले नाव मतदार यादीत आहे की, नाही याची योग्य काळजी घेतली नाही. त्यामुळे त्यांना हा फटका बसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र, ही चूक सुधारण्याची संधी या मतदारांना पुन्हा एकदा उपलब्ध झाली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता २८ मेपर्यंत आहे. ती उठल्यावर नव्याने मतदार नोंदणीची प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. चार महिन्यांनी विधानसभा निवडणूक असल्याने, आता तरी या मतदारांनी आपले नाव यादीत येईल याची काळजी घेऊन नोंदणी करावी, असे मत व्यक्त होत आहे. चूक सुधारा २८ मे नंतर

आयुर्हित 26/04/2014 - 13:41
The EC officials are tight-lipped over the issue. Nitin Gadre, the Chief electoral officer of Maharashtra didn't respond to calls. In an SMS response to the query if an inquiry would be initiated into the fiasco and if any action would be taken on the company, Gadre asked us to refer the interview of Sudhir Tripathi, the Election Commission of India officer and in-charge of Maharashtra, published in a tabloid on Friday. Denying all charges of mishandling of the data, Tripathi had told the paper that it was people's fault as they didn't bother to check their name in the list before election. IT firm which prepared voters' list of Mumbai voters faces flak

आयुर्हित 30/04/2014 - 03:29
नाशिक जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदाना वेळी मतदार याद्यांमधील घोळ उघडकीस आला. हजारो मतदारांची नावे वगळली गेल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. मतदार याद्यांमधून काही विशिष्ट नावे वगळण्यामागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या घोळामुळे तब्बल दोन लाख मतदारांना मतदान करता आले नाही. त्यांना मतदानाची पुन्हा संधी द्यावी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपने आंदोलनाचे आयोजन केले होते. शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, उपमहापौर सतीश कुलकर्णी, संभाजी मोरुस्कर, महेश हिरे, नगरसेविका सीमा हिरे, माजी उपमहापौर प्रा. देवयानी फरांदे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. राज्यात अनेक ठिकाणी या पद्धतीने मतदारांची नावे वगळली गेली आहेत. निवडणूक यंत्रणेच्या कारभाराच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात जवळपास दोन लाख मतदार या घोळामुळे मतदान करू शकले नाहीत. या मतदारांना मतदानाची संधी द्यावी, अशी मागणी सावजी यांनी केली. एकीकडे छगन भुजबळ कुटुंबियांची नावे दोन ठिकाणी यादीत समाविष्ट करण्याची दक्षता यंत्रणेने घेतली. परंतु, दुसरीकडे सर्वसामान्यांची नावे गायब करण्यात आली. जिवंत मतदारांना मृत दाखविणे, मृत मतदारांची नावे जिवंत मतदार म्हणून असणे, कित्येक वर्षांपासून एकाच ठिकाणी वास्तव्यास असलेल्यांना स्थलांतरित दाखविणे, शेकडो मतदारांची नावे 'डिलिटेड'या शिक्का मारून काढून टाकणे असे अनेक घोळ मतदार यादीमध्ये झाले आहेत. त्यास कोण जबाबदार आहे, याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. साधारणता अर्धा तास चाललेल्या आंदोलनावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत या मार्गावर वाहतुकीचा बराच ताण असतो. त्याच वेळी आंदोलनामुळे अनेक वाहनधारक कोंडीत अडकून पडले. वंचित मतदारांना मतदानाची संधी द्या!

नितिन थत्ते 30/04/2014 - 13:57
>>एचडीएफसी बँकेचे दीपक पारेख यांनाही मतदारयादीत आपले नाव नसल्यामुळे धक्का बसला. त्यांनी उघडपणे मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला होता त्यांचेही नाव नाही याचा अथ हे नावे गाळण्याचे कारस्थान कोणी घडवले आहे ते दिसून येत आहे. ;)

नेमेची येतो पावसाळा, तशा निवडणूका नेहमीच येत असतात. भारतीय लोकशाहीला आता अनेक वर्षे झाली. एवढ्या वर्षात तंत्रज्ञानाचा बराच विकास झाला. पण पुन्हा एकदा "मतदारयाद्यांचा घोळ" आणि "नियमीत मतदारासही मतदान करता आले नाही" याच्या बातम्या आल्याकी भारतीय लोकशाहीला किती वर्षे झाली ती मोजवत नाहीत. माझे मतदान व्यवस्थीत झाले. पण टिव्ही वृत्तपत्र पहातो तर पुन्हा या बातम्या आहेतच.

पोहे बटाटा कटलेट

अस्मी ·

पैसा 17/04/2014 - 11:20
कांदेपोहे उरले ही घटना कधीच घडत नसल्यामुळे डायरेक पोह्यांचे करावे लागतील. बघू प्रयत्न करून! आणि पाकृ आगदी सिस्टिम्याटिक लिहिलीस. नवीन काही केलंस की नक्की इथे टाकत जा!

सस्नेह 17/04/2014 - 13:18
मस्त दिसताहेत कटलेट्स. यात भाज्या घातल्या तर आणखी मजा येईल.

अनन्न्या 17/04/2014 - 16:03
सध्या सुट्ट्या चालू असल्याने रोज नविन काय मेनु,ते कळतच नाही, यासाठी मिपाचा पाकृ. विभाग खूप मदत करतो. अजुन नविन रेसिपी नक्की शेअर कर गं!

In reply to by तुमचा अभिषेक

सूड 18/04/2014 - 18:40
पैजारब्वांचा प्रतिसाद कळलेला दिसत नाय, चला माझ्या प्रतिसादावरुन हिंट देतो. >>संकष्टी नसेल तर घालायला हरकत नसावी म्हणजे अशी तिथ बघून अंडी घालता येतात? नाय त्याचं काये, अंडी घालण्याचा अन्भव नाय ना!! ;)

पोहे फार च आवडीचे, बटाटे त्या खालोखाल, कटलेट हा प्रकार मात्र फारसा आवडीचा नाही, दिसतेय तर तसे छानच, पण आमच्याकडे असा खटाटोप करण्यापेक्षा पोहे आवडतात तर गप खा ना तेच असेच सुनावले जाईल याची फुल खात्री ..

चाणक्य 19/04/2014 - 08:41
केले मी. छान झाले होते. धन्यवाद सोप्या पाकृ बद्दल

यशोधरा 17/05/2014 - 18:59
आज केले हे. भिजलेले थोडेसे पोहे आणि २ लहान बटाटे होते हाताशी. थोडेसे बदल केले ते असे - म्हणजे जे जिन्नास आयत्यावेळी हाताशी होते ते वापरले - तिखट, गरम मसाला पूड आणि किंचित साखर घातली चवीला. १ टेस्पू बेसनपीठ आणि ३ टीस्पू दही घातलं स्मूथ मळण्यासाठी. कोथिंबीर अगदी बारीक कापून तशीच मिसळली लगद्यात. आणि कटलेट्स थापली. मस्त झाली होती चवीला आणि लग्गेच फन्नाही उडाला! धन्यवाद अस्मी! :)

परवा कांदेपोहे करायला पोहे भिजवले होते...पण ते जरा जास्तच झाले मग थोडे पोहे वगळले. मग त्या उरलेल्या पोह्यांचे कटलेट्स करायचे ठरवले :) साहित्य:- तीन बटाटे ३ वाट्या जाड पोहे ४-५ ब्रेड स्लाइस चवीनुसार मीठ आले-लसूण-मिरची-कोथिंबीर पेस्ट तळण्यासाठी तेल बेसन कृती:- १. बटाटे उकडून घ्यावेत. २. पोहे चाळणीत भिजवून निथळत ठेवावेत. ३. ब्रेडचा बारीक चुरा करून घ्यावा. ४. भिजलेले पोहे, कुस्करलेले बटाटे, आले-लसूण-मिरची-कोथिंबीर पेस्ट, ब्रेडचा चुरा, मीठ असे सगळे चांगले मिक्स करुन घ्यावे. ५. आता ह्या मिश्रणाला हाताने किंवा साच्याने आकार देउन छान कटलेट्स करुन घ्यावे. ६. नॉनस्टीक पॅनमध्ये तेल गरम करत ठेवावे.

केलं की नाही?

साती ·

साती 17/04/2014 - 09:17
आज भल्या सकाळी केलं. अत्यंत शिस्तीत कारभार चालू होता. वॉर्ड ऑफिसरने दिलेली स्लीप आणि ओळखपत्रं- मी पारपत्रं दिलं एवढ्यावरच काम झालं. माझा रांगेत तिसराच नंबर होता. पाच मिनिटात काम झालं. कर्नाटकात केलेलं माझं पहिलं मतदान.

जेपी 17/04/2014 - 09:59
मी पण श्यै लावुन आलो . voter id नसल्यामुळे पॅन आणी आधार कार्ड घेउन गेलतो . माझ जीवनातील पहिलच मद्दान .20 मिंट लागली सगळ आटपायला .

साती,जेपी, अभिनंदन हो तुमचे.घटनेने दिलेला हक्क बजावलात हे उत्तम झाले. हे आताच जावून आले.देश स्वच्छ पाहिजे असेल तर झाडू हातात हवी असे ह्यांचे मत. (मतदान करायचे की नाही ह्या सम्भ्रमात पडलेली) माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

साती 17/04/2014 - 10:14
हातात झाडू हे काँबिनेशन दिल्लीत फेल गेलंय. आपला दिलेले काँग्रेस समर्थन. त्यामुळे विचार करा. एकवेळ नोटा वापरा. पण मतदानाला जाऊन याच!

In reply to by साती

अग पण पैशाचे राजकारण विरुद्ध तत्वाचे राजकारण अशी ही लढाई दिसतेय. मोदी माणूस असेल मोठा पण गडकरी,मुंडे,राजनाथ? परवाच राज ठाकरे म्हणाले:" कोण राजनाथ?". (राजाकारण्यांच्या आणि जनतेच्या पार्श्वभागावर अधून मधून हाणायला झाडू हवाच असे मत असलेली)माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 17/04/2014 - 11:47
>>> हे आताच जावून आले.देश स्वच्छ पाहिजे असेल तर झाडू हातात हवी असे ह्यांचे मत. तुमचे "हे" म्हणजे नानासाहेब नेफळे आहेत ना? *LOL* *DANCE* *BRAVO*

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

देश स्वच्छ पाहिजे असेल तर झाडू हातात हवी असे ह्यांचे मत. आणि घर स्वच्छ असेल तर झाडू ह्यांच्या हातात हवी असे तुम्चे मत (असावे). कसं ? (डूआय्डी नस्ल्यास ह घ्या)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

श्रीगुरुजी 17/04/2014 - 12:11
>>> (डूआय्डी नस्ल्यास ह घ्या) माईसाहेब आणि त्यांचे "हे" हे काही वेगळे आहेत का? "हे" "ते"च आहेत आणि "ते" "हे"च आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

मग त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निवाड्याचा फायदा घेण्यास हरकत नसावी :)

प्रचेतस 17/04/2014 - 10:15
सकाळी ७ च्या सुमारास चिंचवड येथील मतदान केंद्रावर गेलो. १०/१२ जण रांगेत उभेच होते. १०/१५ मिनिटात नंबर लागला. वोटींग स्लीप आणि ओळखपत्र पुरावा केंद्र कर्मचार्‍यांनी पडताळून पाहिला. मग शाई लावून एका कर्मचार्‍याने वोटींग मशिन कार्यान्वित केलं मग आम्ही आमचा मतदानाचा हक्क बजावून बाहेर पडलो.

अजया 17/04/2014 - 10:25
मीही आत्ताच आले हक्क बजावुन! वोटर स्लीपवर काम झालं. आमचा भाग कर्जत्,पनवेल ,उरण सह मावळ मतदारसन्घाला जोडलाय. आता पिं चिं मधल्या राजकारण्यांना आमच्या भागात रस नाही आणि आम्हाला ते पाच वर्षात दिसतही नाहीत ,तर्रीही आम्ही जातो ,मद्दान करायला! तसेही रायगड जिल्ह्याची स्थिती कोणीही यावे, टपली मारून जावे अशी असल्याने कोणालाच या बाबतित ना खंत ना खेद !!

पैसा 17/04/2014 - 10:27
आमचं मतदान १२ तारखेलाच झालं. माझं नाव कॅन्सल केलेलं भाजपाच्या कार्यकर्त्यांनी झटपट लावून दिलं. व्यवस्थित नवीन कार्ड आणि स्लिप पण आली. सकाळी लायनी असणार हे माहित असल्याने मुद्दाम दुपारी १ वाजता गेले. केंद्रावर निवडणूक अधिकारी वर्ग सोडता कुणीही नव्हते. मात्र गोव्यात एकूण मतदान ७७% झालं. तेव्हा लेकांनी उत्तम प्रतिसाद दिला असं दिसतं. बोटाला शै लावण्यापूर्वी फक्त स्लिप घेतली. कार्ड पाहिलंसुद्धा नाही. अर्थात स्लिपवर फोटो प्रिंट केलेला होता, त्यामुळेही प्रॉब्लेम नव्हता. हा नेहमीचाच अनुभव आहे. आमच्या चेहर्‍यांवर मध्यमवर्गीय सभ्य असल्याचा छाप जोरदार दिसत असावा! वट्ट २ मिनिटांत आम्ही दोघेही मद्दान करून केंद्राबाहेर!

घाबरलो ना शीर्षक वाचून! हुश्य! मतदान होय! केले ना! दहा पंधरा मिनिटात झाले. निवडणुक आयोगाच्या नुसार माझे मतदान एका ठिकाणी होते पण प्रत्यक्षात तिथे गेल्यावर कळाले कि माझे नाव दुसर्या ठिकाणी आहे. ते ही केंद्र जवळच होते. काहि अडचण आली नाही.

आज..सकाळी ८ ते ११ हा माझा वेळ..फक्त मतदान यादीत माझं नाव आहे की नाही? हे पहाण्यात गेला आहे.दहा वर्षांपूर्वी मी पुण्याच्या ज्या भागात रहायचो..तिथे-मागल्या निवडणुकिपर्यंत माझं(घरच्यांचं) नाव मतदार यादीत नीट येत होतं. शिवाय गेल्या ७ वर्षात सिंहगड रोडला शिफ्ट झाल्यामुळे..तिकडे नावनोंदणी(बदल) साठीचे फॉर्म ३/४ वेळा..अगदी यथासांग भरून झाले..पण आज असा प्रकार आहे,की सकाळपासून मी तिकडे आणि इकडे असा..७ टोलबुथवर नाव आहे की नाही??? हे शोधतोय..पण सर्वत्र उत्तर एकच-मतदार यादीत आपलं नाव नाहिये! आणि हाच प्रकार खूप लोकांच्या बाबतीत चालू आहे. प्रत्येक मतदान केंद्राजवळ दोन लायनी आहेत..एक नाव शोधण्याची..आणि दुसरी यावेळंची- 'मत-दानाची!' यावेळी बहुतेक मला मतदान करताच येणार नाही..असा या सगळ्या'चा अर्थ आहे. :(

In reply to by अत्रुप्त आत्मा

पैसा 17/04/2014 - 11:25
मिपाकरांची नावं काढून टाकली काय होलसेलमधे? मध्यंतरी आतिवास यांचा एक लेख आला होता, मला वाटलं, तेव्हा बहुतेकांनी आपली नावं आहेत का नाही हे शोधलं असेल. कारण त्यात या सगळ्याची भरपूर चर्चा झाली होती.

In reply to by अत्रुप्त आत्मा

आमचं याच्या विरुद्ध होतं. नविन पत्यावर नाव नोंदवलं होतं, त्यावेळेस जुन्या पत्यावरचे नाव काढून टाकायचा फॉर्म भरून दिला होता. महिन्याभरापूर्वी जुन्या पत्त्यावरच्या निवडणुक ऑफिसमधून फोन आला की आमच्याकडे तुमचा फोटो नाही तो जमा करा. त्यांना वस्तुस्थिती सांगून तिथले नाव काढून घेतले. (साय्बांचा सल्ला अगोदर समजला अस्ता तर दोन ठिकाणी मद्दान करायला मिळले अस्ते ना ;) :) )

श्रीगुरुजी 17/04/2014 - 11:50
सकाळी ८ वाजताच जाऊन पवित्र कर्तव्य पार पाडून आलो. उमेदवारासमोरील बटन दाबल्यावर मत त्या उमेदवारालाच जाते की अजून कोणाला जाऊन पडते हे त्या साहेबांनाच ठाऊक!

In reply to by पैसा

श्रीगुरुजी 17/04/2014 - 11:58
नाही. आमचं केंद्र दुसरीकडे आहे. पण कलमाडी शाळेत ही गडबडच दिसतेय. प्रोग्रॅमेबल इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे हॅक करता येऊ शकतात. त्यामुळेच अनेक देशांनी त्यावर बंदी घातलेली आहे. भारतात मतपत्रिका वापरल्या तर मतदान केंद्रे ताब्यात घेतात. इलेक्ट्रॉनिक मतयंत्रे वापरली तर हॅक होण्याचा धोका असतो. उद्या ऑनलाईन मतदान सुरू केले तर मतदारांचे लॉगिन आयडी मिळवून त्यांच्या नावाने मते दिली जातील.

पिशी अबोली 17/04/2014 - 11:51
आम्ही चौघांनीही १२ तारखेला सकाळी ७.३० ला जाऊन केलं. जाऊन सरळ मतदान. रांगा नाही काही नाही. लोक फार शिस्तीत येत होते. दिवसभर वर्दळ होती म्हणे पण गर्दी नाही.

आतिवास 17/04/2014 - 12:11
अजून विमानतळावर (अडकून) आहे. जुनं नाव गायब झालं - म्हणजे निदान ऑनलाईन तरी सापडलं नाही. नव्याने अर्ज करून, तहसील कार्यालयात जाऊन पडताळणी केली आहे - पण अजून नाव दिसत नाहीये. माझे शेजारी मतदान करायला गेलेत तेव्हा माझंही नाव शोधून येणार आहेत. दुपारी घरी येता येता मतदान करणार आहे - नाव यादीत असल्यास!!

चावटमेला 17/04/2014 - 12:24
सकाळी ९ वाजता एमायटी शाळेतील मतदान केंद्रात जावून मतदान करून आलो. सुदैवाने माझ्यासकट घरच्यांचीही नांवे यादीत सापडली. हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झाली होती.

आपल्या पैकी किती लोकांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही? हे गेल्या महिनाभरात वेळोवेळी तपासले आहे. माझा पत्ता चुकीचा होता म्हणुन मी ऑनलाईन करेक्शन साठी अर्ज केला होता. एखादे वेळी नाव गायब होण्याचा प्रकार होउ शकतो हे गृहीत धरुन मी दर दोन दिवसाला आपले नाव यादीत आहे का हे कालपर्यंत पहात होतो. माझे नाव होते. मी मतदान केले.

निवडणूक आयोगानेच यावेळी मतदारांना मतदानाच्या वेळी अचूक क्रमांकाच्या मतदानस्लीप घर पोहोच केल्यात का ? बाकी, आमच्याकडे मतदान २४ ला आम्ही आपलं मतदान अधिकारी म्हणून इलेक्शन ड्युटीला असू... :) -दिलीप बिरुटे

मिहिर 17/04/2014 - 12:46
आत्ता थोड्या वेळापूर्वीच पाषाण रस्त्यावरील एनसीएल जवळील न्यू मॉडर्न हायस्कूलमध्ये जाऊन मतदान करून आलो. माझ्या बूथवर तर कोणीच नव्हते, शेजारच्या बूथवर १५-२० जणांची रांग होती. ओळखपत्र म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स दाखवले. सगळे मिळून दोन-तीन मिनिटे लागली असतील. पहिल्यांदाच मतदान केले.

खांग्रेस कडून मतदान यंत्र आणि मतदार याद्यात घोटाळा (आमच्या खास प्रतींनिधिकडून) पुण्यात दोन लाख मतदारांचे नाव यादीतून गायब , मतदार यादीत आढळली सोलापूर ची नावे , अनेक ठिकाणी मतदान यंत्रात घोळ आढळला , काही ठिकाणी मतदान थांबवण्याची शक्यता . बाडमेर मध्ये सुद्धा मतदान थांबवले .लोकांचा लोकशाही वरून विश्वास उडू नये म्हणून कॉंग्रेस प्रेरित प्रसार माध्यमे बातम्या दाखवत नाही अशी टीका स्थानिक नेत्यांनी केली . गेल्या निवडणुकीत कर्नाटकात असली मतदान यंत्रे मिळाली होती , प्रत्येक तिसरे मत कॉंग्रेस ला जाणार मग तुम्ही कोणतेही बटन दाबा . अजून सुद्धा अमेरिका , जपान , फ्रांस हे देश शिक्का पद्धत वापरतात , निवडणुकी आधीच जपानी कंपन्या नि मतदान यंत्रातले दोष दाखवले होते . आपण कधी सुधारणार ? http://indiaevm.org/ India's EVMs are Vulnerable to Fraud

मतदान केंद्रावर असणाऱ्या यादीत नाव नसेल तर खालीलपैकी एका शक्यतेच्या दृष्टीने तपास करा. १. केंद्रावर असणाऱ्या मूळ मतदान यादीत नाव नाही, पण पुरवणी यादीमध्ये आहे. (केंद्रावरील अधिकाऱ्यांकडे पुरवणी यादी मागणे) २. पुरवणी यादीच केंद्रावर नसणे. (झोनल अधिकारी किंवा त्यावरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पुरवणी याद्या केंद्रावर तात्काळ पोचवल्या जातील, याची खात्री करून घेणे.) ३. अन्य मतदान केंद्रावर नाव स्थलांतरीत झालेले असणे. (ते केंद्र शोधून काढणे) महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर बऱ्याच अंशी पुरवणी याद्यांसकट मतदार याद्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये सर्च करणे थोडेसे क्लिष्ट आहे, पण साधारण तासभर मेहनत घेतली तर वरील तीनही शक्यतांबाबत खातरजमा करून घेता येईल. अभिराम साठे यांनी (किंवा दुसऱ्या एका ठिकाणी उपेंद्र थत्ते यांनी) कॉपी पेस्ट केलेली "तरीही मतदान करता येईल" अशा आशयाच्या पोस्ट गेले काही दिवस फिरत आहेत, पण त्यात काहीही तथ्य नाही. त्यांनी नमूद केलेला फॉर्म ७ हा मतदान यादीवरील नावांबद्दल आक्षेप नोंदवण्यासाठी आहे. खरेतर फॉर्म ६ हा नाव नोंदवण्यासाठी आहे, आणि फॉर्म ८ हा नोंदवल्या गेलेल्या नावातील काही तपशील चुकीचा असेल तर त्यात दुरुस्ती करण्यासाठी आहे. नाव नसल्याचे आढळल्यास आजच्या आज फॉर्म ६ भरून, पुरवणी यादीत नाव समाविष्ट होणे आणि मतदान करायला मिळणे थोडे अशक्य वाटते. पण गेल्या निवडणुकीतील मतदान यादीत नाव आहे, आणि आता नाही अशा अनेक घटना असतील तर त्या सगळ्यांनी एकत्रितपणे जोरदार मागणी केली तर मतदान थांबवण्याचा निर्णय निरीक्षक किंवा सक्षम अधिकारी घेवू शकतात. अशा परिस्थितीत त्या केंद्रांवर काही दिवसांनी फेरमतदान घेता येवू शकते. पण यासाठी issue should should be blown up to that proportion and to the highest possible authority. यासाठी तातडीने थेट दिल्लीच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे हजारोंच्या संख्येने इमेल ताबडतोब रवाना करता येवू शकतील.

प्रीत-मोहर 17/04/2014 - 13:11
आमच्याकडे गोव्यात १२/०४/२०१४ ला होत,भल्या सकाळी ७.१५ वाजता केलं. अत्यंत शिस्तीत कारभार चालू होता. B.L.O ने दिलेली स्लीप आणि EPIC CARD नेल होत. पण ती स्लीपच पाहिली आणि काम झाल. खूप मोट्ठी गर्दी जमली होती मतदान करायला. मोस्टली युवा वर्ग. वेटिंग १५ मिंट. वोटिंग- शाई लावणे वगैरे २ मिनिट.टोटल १७ मि. मधे मी बाहेर. मला मज्जा यासाठी आली, की बराच युवा वर्ग उत्साहाने आणि जबाबदारीच्या जाणीवेने बाहेर पडला होता. अर्थात हे एका मैत्रीणीने सांगितल. जिच्या आयुष्यातल हे पहिल मतदान होत.

केलं. ७.३० ला रांगेत लागलो ८ वाजता मतदान झालंसुद्धा. मी बाहेर येईपर्यंत बर्‍यापैकी गर्दी झाली. ह्या वेळी थोडा भारी प्रकार होता इकडे एकाच नावाचे दोन उमेदवार उभे आहेत. आप्पा उर्फ श्रीरंग बारणे युतीचे आणि अजुन एक कोणीतरी श्रीरंग बारणे अपक्ष म्हणुन उभे होते. युतीच्या उमेदवारांचे चिन्ह धनुष्यबाण तर अपक्ष बारण्यांच चिन्हं नुसता बाणं होतं. बाकी मतदानयंत्रात घोळ असल्याची चर्चा इथेही दबक्या आवाजात चालु होती. तसं काही नसेल अशी अपेक्षा. स्थळ प्राधिकरण, म्हाळसाकांत विद्यालय.

सव्यसाची 17/04/2014 - 14:25
खरेतर खूपच इच्छा होती कि मतदान करावे पण कलकत्त्यात असल्याने आणि परीक्षा सोमवारपासून सुरु होत असल्याने मतदान करणे अजिबात शक्य नाही झाले.. आमच्या गावी आजच मतदान आहे..

भारतात झालेल्या पहिल्या दोन निवडणुका सोडल्या तर बाकी सर्व निवडणुकात मी मतदान करून आलेलो आहे . दान सत्पात्री[ ? ] करावे असे शहाणे म्हणतात ते मात्र मला अजून जमले नाही असे समजत असूनही मी आत्ताच मतदान करून आलो कारण मतदान करून लोकशाही जिवंत ठेवता येते पण " चांगले सरकार ''निर्माण होण्यासाठी मतदानाखेरीज अनेक गोष्टींची गरज असते हे मला पटले आहे

In reply to by देशपांडे विनायक

मतदान करून लोकशाही जिवंत ठेवता येते पण " चांगले सरकार ''निर्माण होण्यासाठी मतदानाखेरीज अनेक गोष्टींची गरज असते हे मला पटले आहे -दिलीप बिरुटे

मोहन 17/04/2014 - 15:19
१२.३० ला लायनीत उभारलो त १.१५ ला लंबर लागला. हे लंबी लाइन पाव्हुन त डोल्याल पानी आल बगा.

In reply to by प्यारे१

आदूबाळ 17/04/2014 - 16:28
मी पण :( आमच्या मतदारसंघात सुसुतैंच्या विरोधात सक्षम उमेदवार नसल्याने बरेच लोक नोटा बटण दाबून आले असा रिपोर्ट आहे. अर्थात सुसुतैंच्या विजयावर काही परिणाम होणार नाही म्हणा...

Prajakta२१ 17/04/2014 - 16:20
दुपारी १२ वाजता जाऊन केले मतदान स्लीप घरीच आली होती ह्यावेळेस त्यामुळे काहीच प्रॉब्लेम आला नाही :-) शक्य असेल तर मतदान पण online सुरु केले तर किती चांगले होईल याद्यांचा गोंधळ होणार नाही बाहेरच्या लोकांना आणि इलेक्शन ड्युटीवर असणार्यांना पण मत देत येईल आज जे जे लोक ड्युटीवर आहेत त्यांना मत देताच येणार नाहीये ना ? तेवढी मते कमी झाली मग :-(

In reply to by Prajakta२१

आज जे जे लोक ड्युटीवर आहेत त्यांना मत देताच येणार नाहीये ना ? देता येतं प्रोसेस किचकट आहे. एक टपाली आणि दुसरं तिथेच मतदान केंद्रावरच करता येतं. -दिलीप बिरुटे

भाते 17/04/2014 - 17:06
२४ तारखेची. बाकी, प्रत्येक वेळी मतदान केल्यावर निवडुन आलेल्या / न आलेल्या उमेदवारांच्या नावाने न केलेल्या कामापद्धल हक्काने बोंबा मारायला आम्ही मोकळे.

प्रसिद्धीसाठी मोदी कोणत्या थराला गेलेत ते पाहा! Narendra Modi interview was 'paid news', alleges Congress complaint ती मुलाखत (आप की अदालतमधे) लागल्यावर पाच मिनीटातच काय प्रकार आहे तो लक्षात आला! आयला, ही बातमी मतदानाच्या फक्त एक दिवस आधी प्रसिद्ध व्ह्यायला हवी होती! पंतप्रधान होण्यासाठी हा सत्तालोभी माणूस काहीही करु शकतो हे पुन्हा अधोरेखित झालं. आणि पैश्यासाठी रजत शर्मा कितीही वाकू शकतो याची लांछनास्पद प्रचिती आली. आज NDTV चे संचालक आणि संपादक कमार नक्वी यांनी राजिनामा दिला आहे. पोस्टच्या अनुषंगानं लिहायच तर मतदान केलं, कुणाला ते उघड आहे!

In reply to by संजय क्षीरसागर

गब्रिएल 17/04/2014 - 18:02
संक्शि, हितबी गरळ वकायला पायजे काय? धागा काय लोकं काय म्हंत्यात आनि तुम्च काय. पन एक हाय वन टरॅक मायंडचा ब्येस्ट नमुना दाकवाय्चा इडाच उचल्ल म्हना की. इक्त गरळ वकू नाय, मान्साचा साप बन्तो बाबा. आनि सग्ले लय हासतात त्ये येग्ळच बर्का. आता कान्ग्रेसची दर कंप्लेट खरी म्हन्ल तर कोन्तेहि बटन दाबलं तरी विलेक्शन मिशीनी कान्ग्रेसला मत जातय हे कोनी क्येलं ह्ये तुमच्या सपनात आल आसनच. त्येबी सांगा जरासुदिक. करा मणोरंजन आम्चे, व्होउद्या खर्च, मिपा हाये घर्चं. ह्या ह्या ह्या

In reply to by संजय क्षीरसागर

रौल बाबानी अर्नब गोस्वामी समोर स्वत:ची ईज्जत काढुन घेतली त्याला पन मोदींनीच पैसे दिले असतील नै? सत्तेत राहाण्यासाठी खांग्रेस काय काय करतय त्यावर पण एक अभ्यासपुर्ण लेख येऊ द्या की.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मोदींनी मुलाखत फिक्स करुन सगळ्या जनतेला उल्लू बनवलं हे उघड झाल्यानं नाराज होऊन नसती शेरेबाजी करण्यात अर्थ नाही. प्रतिवादाला मुद्दा उरला नाही की मग गरळ (किंवा उद्दामपणा!) वगैरे कांगावा चालू होतो. मिडीया विकत घेणारा लाचखोर माणूस आतून किती पाताळयंत्री असेल याची कल्पना करा म्हणजे झालं!

मैत्र 17/04/2014 - 18:11
पहिल्यांदाच मतदान करु शकलो नाही. पण अनेक मित्र / परिचयातल्या लोकांची नावे मतदारयादीतून गायब होती म्हणून मतदान करता आले नाही. गेली ८-१० वर्षे एकाच ठिकाणी राहणारे आणि नियमित मतदान करणारे सुशिक्षित मतदार कोथरूड / एरंडवणे वगैरे भागातल्या याद्यातून अंतर्धान पावले आहेत. ऐन वेळी काहीही करता आलं नाही. दुपारी फोटो आणि प्रूफ सह फॉर्म ६ भरल्यास लगेच मतदान करता येईल अशी अफवा उठली होती. त्याप्रमाणे महेश विद्यालय, कुमार परिसरजवळ गर्दी झाली. पण अखेर तसं काही करता आलं नाही आणि बरेच उत्साही मतदार निराश होऊन घरी परतले. एकूणात यावेळी पुण्यातला निकाल आजच जाहीर करायला हरकत नाही असं दिसतंय गेल्या काही दिवसातल्या बातम्यांवरुन..

In reply to by मैत्र

आदूबाळ 17/04/2014 - 18:14
आगोदर ऑनलाईन तपासता येत होतं ना?
एकूणात यावेळी पुण्यातला निकाल आजच जाहीर करायला हरकत नाही असं दिसतंय गेल्या काही दिवसातल्या बातम्यांवरुन..
+१

In reply to by कवितानागेश

आदूबाळ 17/04/2014 - 19:27
फुललं तरी "कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे" तसंच रहाणार की... "देई कोण हाळी त्याचा पडे बळी आधी हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे..""

संपत 17/04/2014 - 18:21
चिंचवडमध्ये ५ मिन्टात मतदान झाले. बायको 'अब कि बार' वाली असली तरी राजकारणात फारसा रस नसलेली. मतदान करायला गेली तर कमळाचे चिन्हच नाही. तिने मला मोठ्याने विचारले 'चिन्ह नाही'. ती काय बोलतेय हे लगेच लक्षात आले, पण निवडणूक अधिकाऱ्यांसमोर कसे सांगणार . तेवढ्यात सुचले, म्हटले नावे वाच. सुदैवाने तिला उमेदवाराचे नाव ठाऊक होते. सारख्या नावाचे दोन उमेदवार असले तरी तिने योग्य नावापुढेच शिक्का मारला. कॉलेजमध्ये असताना निवडणूक बुथवर बसायचो तेव्हा मतदान करून आलेल्या बायका 'आपले' चिन्ह कुठचे रे भाऊ असे विचारायच्या त्याची आठवण आली. चिन्ह सांगितले कि हो हो त्यालाच दिले मत असे रेटून सांगायच्या. सक्रीय कार्यकर्ते तरी रात्री आणि सकाळी १० वेळा सांगून आले असायचे आपले चिन्ह कुठचे ते, पण सर्व मेहनत पाण्यात.

In reply to by संपत

काळा पहाड 17/04/2014 - 23:21
एक्दम एक्दम सेम स्टोरी. मला म्हणते जानकर च्या समोर कमळाचं चिन्ह कसं नाही, कपबशी का आहे. तिथे इलेक्शन अधिकार्‍याला विचारणार होती कमळाचं चिन्ह कुठाय म्हणून. नशीब नाही विचारलं.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

थॉर माणूस 24/04/2014 - 12:01
सध्या भाजप म्हणजे फक्त मोदी असले तरी एनडीएमधे इतर पक्षही आहेत हे दाखवायला. :P असो, आमचाही असाच गोंधळ झाला होता. अहो इकडे कपबशीवाला पक्ष (एक माणूसवाला) आहे महायुतीतला. त्याला उमेदवारी दिली होती. स्साला काही प्रचारपण केला नाही त्यांनी आमच्या भागात. निवडणूकीच्या आधीच हत्यारे टाकल्यासारखी परीस्थीती होती. सातारा भागात पण महायुतीने उदयनराजेंसमोर कच खाल्ली म्हणे. त्यामानाने पुण्यात बरी परीस्थिती होती थेट कमळाचा उमेदवार दिल्यामुळे.

अनन्न्या 17/04/2014 - 18:29
रत्नागिरीत अनेक जेष्ठ नागरिकांची नावे गायब आहेत. सिंधुदुर्गात धनुष्यबाणासमोरचे बटण दाबले तरी मत काँग्रेसलाच जातेय अशी बातमी पसरलीय इकडे, खरं-खोटं राणेना माहित! मी सकाळी सात वाजताच मतदान केले. मॉर्निंग वॉकवाल्यांनी गर्दी केल्याने अर्धा तास गेला.

In reply to by अनन्न्या

पैसा 17/04/2014 - 19:58
वर मी लिंक दिलीय बघ, नारबची वाडी म्हणून. लोकांच्या लक्षात आल्यावर गोंधळ उडाला आणि मग मशीन बदलेपर्यंत ३ तास फुकट गेले. कलमाडी आणि नारायण राणे यांच्या एरियात हे प्रकार झाले हा मोठा 'गंमतीदार' योगायोग दिसतो आहे. पूर्वी बिहारमधे बूथ कॅप्चरिंग वगैरे व्हायचे. गुंड लोक धाडधाड मतपत्रिकांवर शिक्के मारताना शिनेम्यात पाहिले आहे. पण ही सॉफिस्टिकेटेड गुंडगिरी झाली.

रेवती 17/04/2014 - 19:38
नाही केले. मला आतापरेंत एकदाच शाई लावून घ्यायला मिळालीये. एकदा नाव बदलून सासरच्या गावी करणे वै. प्रयत्न केले आणि कोणी दाद लागू दिली नाही.

मी नाही करु शकले... मागच्या वेळी तिथे होते तर माझं नाव पुर्विच्या कंपनीच्या टाउनशीप जवळच्याच गावात होतं. तरिही धडपडत जाउन हक्क बजावुनच आले होते.. यावेळी वाईट वाटतय खूप....आधी नी मैं कमली कमली असले तरि यावेळी माझ्यावर आप ची फुल्ल सहानुभूती लाट आहे...

शिद 17/04/2014 - 20:57
महाराष्ट्रात मावळ मतदारसंघात कर्जत तालुक्यातील डिकसळ मतदान केंद्रावर नवरदेवाने मतदान वाजत गाजत येऊन मतदान केले. (फोटोः संतोष दळवी) महाराष्ट्रात मावळ मतदारसंघात कर्जत तालुक्यातील डिकसळ मतदान केंद्रावर नवरदेवाने मतदान वाजत गाजत येऊन मतदान केले.

श्रीगुरुजी 17/04/2014 - 23:37
साहेबांच्या आदेशानुसार आता शाई पुसुन दुसर्‍यांदा मतदान करण्याचा विचार आहे. *LOL* *DANCE* *BRAVO* साहेब म्हणतात मतदान करो दो बार, अबकी बार मोदी सरकार पप्पूला फुगे, टॉफी प्रिय फार, अबकी बार मोदी सरकार केजरीवालांच्या झाडूचा चमत्कार, अबकी बार मोदी सरकार सुपर रिन की चमक बारबार, लगातार अबकी बार मोदी सरकार

साती 18/04/2014 - 00:02
दिवसभर सगळीकडे ' मतदान करा' चा प्रचार केल्यानंतर संध्याकाळी एक प्लेजंट सरप्राईज! काम कमी असल्याने नवर्याने चक्क पिक्चरची तिकीटे बुक करवली. पिक्चर होता भूतनाथ रिटर्नस. लहान मुलांचा असेल म्हणून मुलाबाळांसकट गेलो तर काय, तो पिक्चर ' मतदानाबद्दल जागृती ' या विषयाबद्दल होता. अगदी नोटाबद्दलही फार रंजक पद्धतीने माहिती होती. बालकलाकारांसह सर्वांचीच कामे अत्त्युत्तम . पण सगळ्यात महत्त्वाचे काय तर 'आपले मत आपले भविष्य' हाच विचार मांडला होता. वेळ आणि संधी मिळताच नक्की पहा.

लेखनप्रकार
सध्या एक एक टप्प्यात निवडणू़का आटपत आहेत. राजकारणावर आणि राजकारण्यांवर बोलताना न थकणारे आपण मतदान हक्क मात्र बजावतो का ? या धाग्यावर तुमच्या भागातील मतदानाची तारीख, तुम्ही मतदान केले का, नसल्यास का नाही, असल्यास किती वेळ लागला इ. माहिती लिहिणे अपेक्षित आहे. बघुया कोण किती जबाबदारीने वागतंय ते! आपले मत आपले भविष्य... ढॅण ट डॅण!

मॅटरहॉर्न

स्पार्टाकस ·

स्पंदना 17/04/2014 - 07:01
अवघड आहे. का माणस असा सोन्यासारखा जीव धोक्यात घालतात काही कळत नाही. गप सार भात (गरमागरम) खावा. एखाद पुस्तक घ्यावं अन ताणुन द्यावी, ते सोडुन.... माणस जगावेगळी असतात हेच खरं. नुसता फोटो पाहुन कापर भराव असा हा सुळका. त्यात बर्फाळ! धन्यवाद स्पार्टाकस. तुमच्या लेखमालेमुळे एका वेगळ्याच जगाच, हिमतीच दर्शन होतयं. मध्यंतरी जॅक डॅनियल्सनीपण असच एक वेडखुळ सर्पांच जग आणलं होतं मिपावर. तुम्ही गिर्यारोहणाचं आणलंत.

चौकटराजा 17/04/2014 - 14:45
माउंट एव्हरेस्ट हे सर्वीच्च शिखर असले तरी या शिखराला शिखरांची राणी असे सम्बोधले जाते. " मोस्ट फोटोग्राफ्ड समिट ही त्याची दुसरी ओळख आहे.ज्याना वरच्या प्रकारची जोखीमभरी साहसे करायची नसतील त्यानी झेरमाट गावातून या शिखरावर अवश्य जावे .त्यासाठी गुगल अर्थ या मित्राची संगत घ्यावी. @स्पार्टाकस साहेब, लेख थरारक आहे. अशीच एक डोक्युमेटरी आयगर बद्द्ल नेटवर आहे ती पहावी.

स्पार्टाकस 18/04/2014 - 09:40
मॅटरहॉर्नची चढाई हा एक अद्भुत अनुभव असतो.. निदान माझ्यासाठीतरी होता. २००३ साली कामानिमीत्त जिनेव्हाला गेलो असताना ऑफीसमधील सहका-यांसह मुद्दाम या ट्रेकसाठी गेलो होतो. माथ्यावर पोहोचल्यावर वरुन दिसणा-या दृष्याचं वर्णन करण्यास शब्द तोकडे पडतात.

यशोधरा 18/04/2014 - 16:44
तुमचं लिखाण थरारक असतं पण ते वाचून झाल्यावर एक प्रकारची खिन्नता येते... अर्थात, इथे तिथे जीव जाण्यापेक्षा कोणताही गिर्यारोहक हिमशिखरावर जीव गेलेला कधीही उत्तम म्हणेल म्हणा!

आल्प्स ! सुमारे १२०० किलोमीटर पसरलेल्या आल्प्स पर्वतराजीला युरोपात अनन्यसाधारण महत्व आहे. युरोपातील अनेक देशांतील नैसर्गीक सौंदर्याला ब-याच अंशी कारणीभूत असलेला आल्प्स हा गिर्यारोहकांच्या दृष्टीने आकर्षणाचा विषय नसला तरच नवल. पूर्वेला ऑस्ट्रीया आणि स्लोवानिया, पश्चिमेला फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि लिचेन्स्टाईन आणि दक्षिणेला इटली आणि मोनॅको या देशांमध्ये पसरलेला आल्प्स पर्वतात अनेक मनोहर सौंदर्यस्थळं आहेत तशीच आव्हानात्मक गिरीशिखरंही. आशिया खंडात जे हिमालयाचं स्थान तेच युरोपात आल्प्सचं ! आल्प्सच्या पश्चिम भागातील पर्वतरांग पेनीन आल्प्स म्हणून ओळखली जाते.

बीट सार

अनन्न्या ·

कवितानागेश 16/04/2014 - 18:30
ओके. पण लसणीमुळे बीटचा उग्र वास येत नाही.> मी आत्ता विचारणार होते, एवढा जास्त लसूण घातला तर सार उग्र होणार नाही का? बीटचा उग्रपणा हिंगानी कमी होईल ना?

अनन्न्या 16/04/2014 - 18:35
सात - आठ पाकळ्या जास्त नाही होत, दोन बीट आहेत ना! या प्रमाणात पंधरा माणसाना एक वेळ पुरेल एवढे सार होते.

दिपक.कुवेत 16/04/2014 - 18:43
पण आमचुर घालुन चव वेगळि लागेल ना? किंवा नाहि घातला तरी काहि विशेष फरक पडेल असं वाटत नाहि. तिखटाएवजी ओल्या हिरव्या मिरच्याच योग्य.

अनन्न्या 16/04/2014 - 18:49
बीट आणि नारळाचे दूध याला आमचुरामुळे जी थोडी आंबट्सर चव येते ती चांगली वाटते, आमच्याकडे हे आमचुराचे प्रमाण थोडे जास्त आवडते. ओल्या मिरच्या चांगल्या लागतात. लहान मुले घरात जास्त असल्याने मिरच्या कमी वापरते, मिरच्या कधी कधी खूप तिखट असतात, त्याचा अंदाज येत नाही.

ब़जरबट्टू 21/04/2014 - 09:22
घरी प्रयोग केला होता..मस्त जमला..खोबरे नव्हते, तरी चव व रंग छान मस्त.. सर्वात मस्त म्हणजे, बीटची उग्रता पुर्णपणे गेली होती, सर्वाना आवडली... :) आभार...

साहित्यः दोन मध्यम बीट, एका नारळाचे खोबरे, एक चमचा आमचूर, चार-पाच चमचे साखर, मीठ, दोन चमचे तूप, जीरे, हिंग, सात-आठ लसूण पाकळ्या बारीक करून, लाल तिखट चवीनुसार, कढीलिंबाची पाच-सहा पाने. कृती: बीट कुकरला शिजवून घ्या. सालं काढून बीट्चे तुकडे करून मिक्सरला गुळगुळीत वाटून घ्या. नारळाचे दूध काढून वाटलेल्या बीटमध्ये मिसळा. मीठ, साखर, आमचुर, तिखट चवीनुसार मिसळा. बारीक केलेली लसूण मिसळा. गरजे नुसार पाणी घाला. कढीलिंबाची पाने धुऊन थोडी कुस्करून मिश्रणात टाका. तुपाची जीरे, हिंग घालून खमंग फोडणी करा आणि साराला द्या.

नावात काय आहे? किंवा नावातच सगळे आहे.

स न वि वि ·

पक्या 16/04/2014 - 12:52
मुलीने स्वत:च्या मर्जी खेरीज अजिबात नाव बदलू नये. आणि तसे करायचे असेल तर मुलीलाही मुलाचे नाव बदलण्याचे स्वातंत्र्य द्यावे व् मुलीने मुलाचे बदलेले नाव मुलानेही स्वीकारावयास हवे.

आदिजोशी 16/04/2014 - 14:34
आमचं नाव आम्हाला लग्नानंतर बदलावं लागलं नाही ह्यातच आम्ही आनंदी आहोत.

तसेही आडनाव तर बदलतोच न.(न बदलून सांगतो कुणाला)
गरज नाही.. माझे नाव-आडनाव मी बदललेले नाही.. घर आहे, होम लोन आहे, पासपोर्ट आहे.. फक्त परदेश वारी नाही झालेली.. पण अनेकींची झालेली आहे ज्यंची नाव बदललेली नाहित.. अशा अनेक जणी इथे असतील.. काही प्रॉब्लेम येत नाही हे पहा:- Now, women can retain their maiden name MUMBAI: Women in Maharashtra have another reason to celebrate as International Women's Day approaches. It is now perfectly legal for a woman to retain her maiden name after marriage. The Bombay high court recently amended a crucial rule under the Family Courts Act to prevent a woman from being compelled to file any marriage-related proceedings only in her husband's surname, thus offering relief to many seeking a divorce. It will also help a married woman file proceedings in other courts under her maiden name, say legal experts. The radical rule says that "a wife who has not changed her name after marriage, by publishing in the official gazette, may continue to use her maiden name". The law is clear now: a woman is not obliged to take her husband's name after marriage......... ........ The Law On Names After Marriage * A wife may continue to use her maiden name if she has not changed it officially after marriage * A wife can file for divorce in her maiden surname; married surname; any other name she may have adopted and officially gazetted After Divorce * A woman can continue using her former married surname, except if her intention is to defraud the ex

जे त्यांना मोठेपणी आपला नाव बदलायची एक संधी मिळते. अन्यथा मुलांना आपले नाव आत्माराम असले तरी आयुष्यभर तेच चालवावे लागते. (वर उल्लेखलेले आत्माराम माझ्याच एका मित्राचे नाव होते कारण ते त्याच्या आजोबांच्या नावावरून ठेवले होते, बिचारा मुलगी असता तर बदलता तरी आले असते.) अवांतर - आजोबांच्या वा आजीच्या नावावरून ठेवलेले ओल्ड फॅशन नाव हा देखील एक चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. बिचारे ते पाळण्यातले लहान मूल काही विरोध करू शकत नाही म्हणून आपली मर्जी चालवणे कितपत योग्य.

In reply to by तुमचा अभिषेक

जे त्यांना मोठेपणी आपला नाव बदलायची एक संधी मिळते.
ती जगात सगळ्यांनाच असते हो.. गॅझेट मध्ये तुम्ही नाव बदलु शकता..

In reply to by पिलीयन रायडर

ते ही खरेच पण मग ते आईवडीलांनी ठेवलेल्या नावाला उघड उघड नापसंती दाखवल्यासारखे झाले ना. नाही म्हटले तरी त्यांचे मन दुखावणे वा वाईटपणा घेणे आलेच त्यात. आणि अगदीच काही विचित्र वा अगदीचे नावडीचे नाव असल्याशिवाय अशी वाट वाकडी करून कोण जाणार नाही. काही मुली स्वताहून आपले नाव बदलण्यास उत्सुक असतात. स्वानुभव आहे :)

मुलगा आणी मुली दोघेही नावे बदलतात ना... मुलाचे नाव होतो मन्या, सोन्या, सोनुडा तर मुलीचे नाव होते मनी, शोनी, शोनु, पिल्लु, टिंगु इत्यादी इत्यादी. खोटे वाटले तर विचारा कोणालाही... म्हणुनच नावातच सगळे आहे.

लग्नानंतर काय काय बदलते ? घर, नाव, आडनाव, चाली-रिती , नाती-गोती, अगदी खाण्या-पिण्याच्या पद्धती सुद्धा … बघायला गेलो तर बरच काही …. गेल्या आठवड्यात ऑफिस ला जात असताना बस मध्ये दोन मुली (कदाचित त्यातील एकीच लग्न-बिग्न ठरले असावे,आणि दुसरी तिला ज्ञानामृत देत असावी- ज्याचा अनुभव तिला असेल कि नाही कुणास ठाऊक ) काही तत्सम बाबींवर चर्चा करत होत्या. त्यातील रंगलेली चर्चा तर फक्त ' लग्ना नंतर नाव बदलावे कि नाही' हीच होती. असे म्हणतात कि मुलाचे नाव राशी वरून ठेवत नाही कारण लग्न नंतर नाव बदलतच.

एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - ५ ( अंतिम )

स्पार्टाकस ·

असंका 16/04/2014 - 10:15
काही वर्षांपूर्वी आपली पण एक पाणबुडी बुडाली होती.मला वाटतं काही नौसैनिक पण मृत्युमुखी पडले त्या अपघातात. त्याबद्द्लही काही सांगता येइल का?

वाखु साठवली आहे. आता वाचत बसलो आहे. आधीच्या भागांची लिंक शोधतांना थोडा त्रास झाला.पण गूगल बाबाने मदत केली.लिंक शोधण्यासाठी इतरांना त्रास होवू नये, म्हणून आधीच्या भागाच्या लिंक्स देत आहे.चोंबडे पणा केल्याबद्दल क्षमस्व. एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - १ http://misalpav.com/node/27564 एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - २ http://www.misalpav.com/node/27574 एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - ३ http://www.misalpav.com/node/27582 एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - ४ http://misalpav.com/node/27588 संपादकांना नम्र विनंती, क्रुपया ह्या लिंक्स एकत्र जोडता आल्यास उत्तम.

सुहास झेले 22/04/2014 - 02:13
जबरदस्त... तुमच्या लेखनशैलीचा फ्यान झालेलो आहे. स्पार्टाकस यांचे असेच उत्तमोत्तम लेख मिपाकारांना वाचायला मिळोत :)

लेखनविषय:
एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - १ http://misalpav.com/node/27564 एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - २ http://www.misalpav.com/node/27574 एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - ३ http://www.misalpav.com/node/27582 एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - ४ http://misalpav.com/node/27588 **************************************** एस्केप फ्रॉम डाऊन अंडर ही लेखमाला आज संपली. ही लेखमाला प्रकाशीत करु दिल्याबद्दल मिसळपाव प्रशासनाचा मी मनापासून आभारी आहे. दुस-या महायुध्दात अनेक साहसगाथा गाजल्या.

ब्रूक्स-भगत रिपोर्ट- १९६२ चे चीन-भारत युध्ध

संतोषएकांडे ·

आयुर्हित 15/04/2014 - 22:29
निवडून येण्याआधीच चीनला मोदींची भीती In January 2010, when Gujarati diamond traders were arrested in China, the Indian government's efforts at freeing them failed to bear fruit for almost two years. It was only after Modi's visit to China that they were freed in December 2011. The Indian establishment has been crying hoarse for Chinese investment in infrastructure for several years now, but there has been barely a trickle in response. China's lukewarm response can perhaps be attributed to India's labyrinth of labor and land acquisition laws. Despite this, after Modi emerged as a prime ministerial candidate in September 2013, the Chinese government immediately upped the ante by offering to meet 30% of the total demand for investment in India's investment sector until 2017. It is difficult to avoid reading between the lines and seeing this as an endorsement of China's faith in Modi to walk the talk should he take the helm after the general elections. The inherent strength of the Modi-China relationship is underscored by Chinese media's response to Modi. The prime ministerial candidate made an election speech in Arunachal Pradesh in February asking China to back-off from its claim over the province, which it claims as South Tibet, yet Chinese official media quickly downplayed Modi's words as an necessary electioneering tactic. Such bonhomie can be a crucial ingredient in the concrete that cements India-China ties over the next five years. India could very easily change the trajectory of its economic growth for the better by tapping China's experience in economic development. The opportunity can also be just as easily squandered if Modi chooses to wear a saffron hat and treat China just as another enemy of India like Pakistan, China's best friend in South Asia. New China-India era no shoo-in under Modi

In reply to by भटक्य आणि उनाड

रघुपती.राज 21/04/2014 - 14:34
फार वाइट वाटते, हे पुस्तक वाचुन. http://www.amazon.in/Himalayan-Blunder-Curtain-Raiser-Sino-Indian-1962/dp/8181581458/ref=sr_1_1?s=books&ie=UTF8&qid=1398070952&sr=1-1&keywords=himalayan+blunder युद्ध हरणे हा एक भाग झाला. पण आपल्या युद्धकैदी बनवलेल्या जवानाना युद्धान्न्तर मिळालेली वागणुक खरेच मनाला विशन्न करुन सोडते.

रमेश आठवले 16/04/2014 - 15:34
अमेरिकेने व्हीसा देण्याच्या प्रश्नावर मोदींना अपमानास्पद वागणूक दिली आहे. त्या मूळे दुखावलेले मोदी यांनी इतर आर्थिक दृष्ट्या समृद्ध असणार्या देशांशी व्यापार, व्यवहार, उद्योग या क्षेत्रात खास सहकाराचे धोरण अवलंबले तर त्याचे आश्चर्य वाटावयास नको.

आयुर्हित 21/04/2014 - 09:22
मूळ ब्रिटीशर पण सध्या ऑस्ट्रेलीया निवासी पत्रकार नेविल मॅक्सवेलने हा रिपोर्ट मार्च १७ २०१४ रोजी आंतर्जालावर ठेवून भारत सहित आंतरराष्ट्रीय मिडीयात हडकंप आणला

In reply to by ऋषिकेश

अशे रिपोर्टस शोधून काढणं हे आपल्या सारख्या साधारण माणसाला नेहमीच जड जात असतं. तरी युध्ध १९४८,१९६५ व १९७१ वर एक एक विश्लेषणात्मक लेख लिहीणार आहे मी लौकरच.

शुचि 24/04/2014 - 19:41
त्यांच्या ब्रिगेडला गोळीबाराची परवानगी नव्हती. कारण...? ब्रिगेडचं काम रक्षणाचं होतं. आक्रमणाची सत्ता त्यांना नव्हती.
आक्रमण नव्हे तर सेल्फ्-डिफेन्सची (स्वसंरक्षण) तर सत्ता असेल :(

'स्वसंरक्षणाची सत्ता असेल'. माय फूट...स्वतःचं स्वरक्षण तर सामान्य पशु पण कोणालाही न विचारता करु शकेल. पण 'पहिला वार शूराचा' या नियमानुसार आपल्याच सरहदीत आपणच दुश्मनावर वार नाही करू शकलो तर त्या आर्मीचा अर्थ काय...? आणी आपल्याच सरहदीत शत्रुला परत न हाकलता आपणच आपलं रक्षण करायच या पेझा शरमजनक बाब काय असावी...!

In reply to by संतोषएकांडे

शुचि 24/04/2014 - 22:34
आक्रमणाची सत्ता नव्हती हे माझ्या दृष्तीने चूकच आहे मी ती नसल्याचे समर्थन करतच नव्हते. मी पळवाट शोधत होते जी की तेव्हा आर्मीनेदेखील शोधायला हवी होती एखादे फुसकट कारण शोधून स्वसंरक्षणाच्या नावाखाली आक्रमण करायला पाहीजे होते. बाकी चालू द्या.

नितिन थत्ते 25/04/2014 - 12:07
आक्रमणाची परवानगी नव्हती हे विधान गंमतशीर वाटते. हा रिपोर्ट तर "भारताने क्लेम केलेल्या हद्दीत असलेले चिनी पोस्टस नष्ट करण्याचा आदेश भारत सरकारने दिल्यामुळे हे युद्ध झाले" असे म्हणतो ना?

ऑक्टोबर १९६२ साली चीनच्या युध्धात खरा॑ब रीत्या पराजित झाल्या नंतर भारताच्या संरक्षण खात्याने पराजयाच्या कारणांची तपास करण्यासाठी एक विस्तृत रिपोर्ट तैयार करायचं ठरवलं. १९६२ च्या जालंधरच्या ११व्या कॉरच्या कमांडींग ऑफीसर लेफ्टनन्ट-जनरल हेन्डरसन ब्रूक्सला हे काम सोपवीण्यात आलं. त्याने ब्रिगेडीयर पी.एस. भगत यांच्या सहयोगाने विश्लेषणात्मक रिपोर्ट तैयार करून जुलाइ १९६३ला संरक्षण खात्याला सुप्रत केला. ब्रूक्स-भगत रिपोर्ट तत्कालिन सरकारची झोप उडवीणारा होता. युध्धासाठी भारताच्या अपूरत्या तैयारीचे असंख्य दृष्टांत त्यात होते.

वैतागवाडी मॅनेजमेन्ट

शुचि ·

In reply to by काळा पहाड

मृत्युन्जय 16/04/2014 - 13:53
गुड आयडीया. संदेश कार्डावरच हे लिहुन द्यायचे. वायझेड गोर्‍याला कळणारही नाही आणि तुमच्या भावनाही मोकळ्ञा होतील :)

बाप्पू 15/04/2014 - 20:43
एकदम सहमत कामापेक्षा या असल्या निरर्थक आणि फालतू गोष्टींवर हे लोक का वेळ वाया घालवतात काय माहीत.. "कल्चरल गॅप" तर आहेच. आणि मला तर खूप जाणवतो. पण हे जे वागतात ते खरेच कल्चर आहे का..?? की निव्वळ आपण किती मॉडर्न कल्चर वाले आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न.?? कोल्हापुर सारख्या मर्दानी आणि रागंड्या भागातून आलेला मी असले काही येड*वे प्रकार पहिले की हसवे की रडावे ते समजत नाही... पण करणार काय... शेवटी "पापी पेट का सवाल है" म्हणून त्यांच्यातलाच एक असण्याचा आव आणावा लागतो.

In reply to by बाप्पू

शुचि 15/04/2014 - 20:54
परवा एका इन्फॉर्मल इन्टेर्व्यू/बोलणी करता गेलेले तर तो दिव्य मॅनेजर इतर जगात किती समस्या आहेत अन अमेरीकेतील प्रॉब्लेम्स (समस्या) कसे "वर्केबल" आहेत हेच पुराण लावून बसला. एक स्रीनी नावाचा भारतीय म्हणे हट्टाने परत गेला अन मग भारतात अ‍ॅडजस्ट होईना म्हणून याला परत परत फोन करत राहीली. च्यायला मी काय गप्पा झोडायला आलेय का अन ते ही अशा रेसीस्ट :( याच्या पार्श्वभागावर सणसणीत लत्ताप्रहार करावासा वाटला. त्या कंपनीत डायव्हर्सिटी किती आहे ते या "कुजक्या शितावरुन" कळलेच म्हणा.

In reply to by शुचि

प्रसाद१९७१ 16/04/2014 - 18:17
तुम्ही नोकरी सोडुन का देत नाही? का कोणी जबरदस्ती केली आहे नोकरी करण्यासाठी? तुम्ही Albert Elis चे REBT वाचा आणि समजुन घ्या. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचे Horriblisation ( भयंकरीकरण ) करता आहात. तसेच तुम्हाला "च" ची बाधा झाली आहे. एखादी गोष्ट अशी"च" झाली पाहीजे, तशी"च" झाली पाहीजे असे तुमचे मत आहे. त्याबद्दल विचार करा.

In reply to by प्रसाद१९७१

शुचि 16/04/2014 - 19:02
तुम्हाला मुद्दा समजला नाहीये.
तसेच तुम्हाला "च" ची बाधा झाली आहे. एखादी गोष्ट अशी"च" झाली पाहीजे, तशी"च" झाली पाहीजे असे तुमचे मत आहे. त्याबद्दल विचार करा.
ही बाधा आमच्या मॅनेजरला झालेली आहे. सर्वांनी सही केलीच्च पाहीजे वगैरे. बाकी नोकरी करायची कोणी सक्ती केली आहे अथवा नाही याच्याशी तुमचा काडीमात्र संबंध नाही.

रेवती 15/04/2014 - 20:50
आता जाऊ देगं बाई शुचीमामी! मागला सगळा अठवडा डोनेशन्सच्या प्रकारांना वैतागले होते. स्प्रिंग आल्यामुळे इथे नुसते चाला, नाहीतर सायकल चालवा, गाणी गा आणि त्याचे पैसे द्या, मग आम्ही डोनेट करतो. अरे. एक झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. यादी संपेचना! एका हिंदी भाषिकाने खास मराठी गाण्यांचा सराव करून कार्यक्रम तयार केलाय व या म्हणत होता. " अरे बाबा, परवाच इथे हृदयनाथांचा करेक्रम झाला, तो हौसफुल्ल होता, ते ठीक आहे पण तुझा गाढवी आवाज, हिंदाळलेले मराठी ऐकण्यासाठी आम्ही $ १०० का द्यायचे?" आता एक मुलगी पोहत बसणारे, तिथे जाऊन पोहणे बघून पैसे द्यायचे. मागला अठवडा तर रोज काहीतरी असलं होतच. बरं, कौतुक न कराल तर तुम्ही समाजकंटकांच्या यादीत गेलाच! मी फक्त पोहणं बघायला जाणार आहे व तिला पैसे देऊन येणार आहे. बाकी काही नाही.

आदूबाळ 15/04/2014 - 21:06
ठेलशल घेऊ नका हो. मी असल्या कार्डांवर मराठीत शुभेच्छा/शोकसंदेश लिहितो आणि मराठीतच सही करतो. एखाद्याला दोनदा फोन करूनपण त्याने उचलला नाही, परत फोन केला नाही तर व्हॉईसमेलवर मराठीत निरोप ठेवतो. आपण आपलं मनोरंजन करून घ्यायचं.

पैसा 15/04/2014 - 22:35
मराठी कळणारं कोणी नाही ना? दे की खच्चून शिव्या!

In reply to by पैसा

शुचि 15/04/2014 - 22:45
हाहाहा .... अगं फक्त काम करण्याचे वातावरण व्यवस्थित "फॅसिलिटेट" केलं तरी खूप झालं. मग त्या सोशल अ‍ॅक्टिव्हीटीजची अन सोशल इव्हेन्ट्सची थेरं अन मुख्य म्हणजे कंपल्शन्स कशाला? काही लोक बहीर्मुखी असतात तर काही अंतर्मुखी. समजून घ्या ना. _______________ अर्थात हे मान्य की मनुष्य एक बेट बनून राहू शकत नाही मग एखादी वेळ ठरवा "हॅपी अवर" ज्या वेळेत काम नाही तर गप्पा अन खेळ. पण नाही कामाच्या मध्ये मध्ये ग्रीटींग्ज. ______________ मध्ये येड्यानी अभिनंदनाची मेल पाठवलेली की अमका (अबक) एन्गेज झाला त्याचे अभिनंदन करा. १० मिनीटात त्याच मॅनेजरची मेल - सॉरी अबकचं लग्न झालेलं आहे अन दे आर एक्स्पेक्टींग अ बेबी. एनीवे अभिनंदन करा. - व्हॉट अ जोक. इतक्या खाजगी बाबीत टीम-अभिनंदनाची अहमहमिका कशाला म्हणते मी :). द्या की सुखानी जगून.

In reply to by शुचि

पैसा 15/04/2014 - 23:00
विचारायचं होतंस, १० मिनिटात एंगेजमेंट, लग्न आणि बेबी? सुपरफास्ट मामला आहे का म्हणून! आपलं डोकं खराब करून घेण्यापेक्षा अर्ध्या मिनिटात सही करून मोकळं झालेलं बरं असं वाटतं एकेकदा. पण खरे तर मित्रांनी मनापासून शुभेच्छा देणं वेगळं आणि असा जुलमाचा रामराम वेगळा. आमच्या ऑफिसात एक आम्हाला न आवडणारे रीजनल मॅनेजर होते. त्यांची बदली झाली तेव्हा एका चमच्याने त्याना गिफ्ट देऊया म्हणून पैसे गोळा करायला सुरुवात केली. खरे तर आमच्या ऑफिसात दर महिना एक छोटी रक्कम पगारातून एका अकाउंटला आपोआप टाकली जात होती. त्यातून अशा गिफ्ट्स, फुले इ. चा खर्च केला जायचा. पण उगा रीजनल मॅनेजरसमोर शायनिंग मारायला हा चमचा पैसे गोळा करायला लागला तर मी अजिबात देणार नाही म्हणून सांगितलं. माझं पाहून मग आणखी काहीजणांनी पैसे देणार नाही म्हणून सांगितलं. काही टेन्शन घ्यायचं नाही. सुरुवातीला विचित्र आहे म्हणतील. मग आपोआप सगळ्यांनाच सवय होऊन जाईल.

In reply to by पैसा

इरसाल 16/04/2014 - 14:54
वाढदिवसाच्या शुभेच्छा : मेल्या/ मेली, हलकट, पाचकळ, फाजील, वसाड्या तुला वाढदिवसाच्या गोगोड शुभेच्छा. शोक संदेश :या मेल्याच्या/मेलीच्या कुत्र्याला मरायला आजचाच दिवस बरा सापडला.

In reply to by इरसाल

पैसा 16/04/2014 - 16:12
गुगल ट्रान्सलेशनमधे याचं भाषांतर काय येतंय ते बघावं लागेल! Utterly crest / Maly, mean, pacakala, forward, vasadya gogoda Happy Birthday to you. किंवा Of these drafts / communicative found a cure for the dog to starve to ajacaca days

बरं अभिनंदन केल्यावर बर्फी पेढे वगैरे वा गेला बाजार केक अन पेस्ट्री तरी देतात का ? नाहीतर कोरडे अभिनंदन म्हणजे वैतागवाणाच प्रकार असतो :(

In reply to by तुमचा अभिषेक

रेवती 15/04/2014 - 23:01
अहो एकदा बाळंतपणं सुरु झाली की चार वर्षात दोन नैतर आठ वर्षात ५ झाल्यशिवाय थांबत नैत! पहिल्याच्या जन्माची मिठाई वाटून होईपरेंत दुसरं जन्माला येतं. ;) (याला सरसकटीकरण म्हणतात पण थोड्याफार फरकानी जे असते ते ल्हिले.)मग हे उपद्वाय कोण करणार?

In reply to by तुमचा अभिषेक

शुचि 15/04/2014 - 23:03
हो आम्ही एक केक कापतो सगळ्या मासिक बड्डे वाल्यांसाठी :) पण बहुसंख्य अंतर्मुखच आहेत त्यामुळे ऑकवर्डच सिनॅरीओ असतो. इथे मिनेसोटा च्या इन्ट्रोवर्ट्स बद्दल एक जोक आहे - मिनेसोटा मध्ये कोणी एक्स्ट्रोव्हर्ट आहे हे कसे ओळखायचे? सोप्पे आहे - ती व्यक्ती दुसर्‍याच्या बुटांकडे पहात असते ;)

In reply to by शुचि

दिपक.कुवेत 16/04/2014 - 18:31
फार तापदायक ठरतं. आमच्या ऑफिस मधे तर सगळे ज्याचा बड्डे असेल त्याच्या डेस्क पाशी जाउन 'हॅपप्पी बड्डे टु यु....." चं जे गाणं सुरु करतात ते पार शेवटपर्यत. ईतकं लाजल्यासारखं होतं ना....सगळे सहकारी ते गाणं संपेस्त तुमच्याकडे टकामका बघत असतात. क्वॉलीटि मॅनेजरनी सर्वाच्या वतीने एक विश करणारा ईमेल पाठवुन ह्यांच भागत नाहि. कमाल म्हणजे सगळे मॅनेजर अगदि जीम सुद्धा ह्या खेळात सामील होतो.

पेट थेरपी 16/04/2014 - 06:28
तुमच्या जीवनात काही छान घड्ले तर हीच टीम तुमचे अभिनंदन करते का? का इग्नोअर करते? मग आपण इतरांच्या आनंदात /दु:खात सहभागी होउ शकत नाही हा एक प्रकारचा मनाचा कोतेपणाच आहे. स्वभावाला औषध नाही पण जरा मनाच्या कक्षा रुंदवता आल्या तर बघा. इट रिअली इज अ टीम एव्हरीवेअर. इतके स्वकेंद्रित राहणे म्हणजे लीडरशिपच्या सर्व पोझिशन्स आपल्याहाताने दूर सारणे आहे. अश्यानेच बायकांना ग्लास सीलिन्ग तोडणे अवघड जाते. सहानुभूतीका जमानाही नहीं रहा. :)

In reply to by पेट थेरपी

शुचि 16/04/2014 - 06:40
आपला प्रतिसाद वेगळा वाटला अन खरोखर मनापासून लिहिल्यासारखा वाटला. पाहिलं म्हणजे प्रत्येकालाच नेतृत्व गाजविण्यात रस असतो असे नाही. मी अंतर्मुख आहे हे मी आधीच स्पष्ट केले आहे अर्थात अंतर्मुखी व्यक्ती नेता नसतात असेही नाही. पण माझा तो प्रांत नाही, दुसरे हे की आपण सरसकटॆकरण केले आहे की बायकांना सीलिंग तोडणे कठीण जाते. असेच काही मला वाटत नाही. बाकी मनाचा कोतेपणा हा वेगळा दृष्टीकोन आपण पुढे आणलात याबद्दल आभारीच आहे. पण कोणाचं कुत्रा-मांजर मेले म्हणून शोकसंदेश पाठविणे मला अतिशय भंपक (रिडीक्युलस) वाटते.

In reply to by पेट थेरपी

लंबूटांग 16/04/2014 - 08:31
मला असेच काहीसे म्हणायचे होते. पण म्हटले फक्त शुची मामी च्या प्रत्येक धाग्यावरच प्रतिसाद कशाला द्यायचा. ते लीडरशीपच्या पोझिशन्स अन ग्लास सीलिंग वगैरे वगैरे शी नाही सहमत. धाग्यातील पहिल्या दोन मुद्द्यांशी अंशतः सहमत. पण कार्डावर दोन ओळी खरडण्याबद्दल कटकट करण्याऐवजी इथे दहा ओळींचा धागा काढणे आणि अजून प्रतिसाद देणे हे बघून अंमळ मौज वाटली. बाकी तुम्हाला कार्डावर सही करायची नसेल तर सरळ पुढच्याला नेऊन देण्याचा ऑप्शन असतोच. मी तर ओळख पाळख नसलेल्यांच्या कार्डावरही सही ठोकून दिली आहे. आणि मग केक खायलाही गेलो आहे :). बाकी तुम्ही फेसबुकवर वर्‍षानूवर्‍ष न भेटलेल्या लोकांना बड्डे विशेस देताच ना? मग इथे रोज ज्यांच्याबरोबर दिवसातला अर्ध्याहून अधिक वेळ घालवतो त्यांना द्यायला काय हरकत आहे. कुत्रा गचकला वगैरे तुम्ही म्हणू शकता पण बर्‍याच लोकांसाठी ते घरातील सदस्यच झालेले असतात. उद्या कोणाची आई गेली तर तुम्ही थेरडी गचकली आणि कार्डे कसली देतात असे म्हणाल का? आपण अमेरिकेत राहत असताना भारतात असे करतो का आणि तसे करतो का हा विचार करण्यात काय हशील आहे? भारतात आपण १ मैल जायला गाडी घेऊन जातो का? मला तर बर्‍याच भारतीय मित्रांचा हा कन्फ्युजड प्रकार कळतच नाही. इथे येताना अगदी खुशीने आले स्वतःहून अन मग भारतात कुठे असे करतात, कसली थेरं असे म्हणत जगायचे. असो. धाग्यावर अवांतर नको. पाणी देणे नं देणे वगैरे तर मी भारतातही पाहिले आहे, त्यात रेसिझम असावा असे वाटत नाही. पण पांढरी पाल वगैरे म्हणून आपणही काही वेगळे केलेले नाही.

In reply to by लंबूटांग

आनन्दा 16/04/2014 - 11:20
अमेरिकेत आहात तर अमेरिकनांसारखे रहा.. असे मला वाटते. पटत नसेल तर ठीक आहे, नका पाळू, पण पाळणार्यांना नाव तर ठेवू नका.. नाही का?

In reply to by आनन्दा

प्रसाद१९७१ 16/04/2014 - 18:19
अमेरिकेत आहात तर अमेरिकनांसारखे रहा.. असे मला वाटते. पटत नसेल तर ठीक आहे, नका पाळू, पण पाळणार्यांना नाव तर ठेवू नका.. नाही का?>>>+१००००००००००००००००००

In reply to by लंबूटांग

मृत्युन्जय 16/04/2014 - 13:59
भारतात आपण १ मैल जायला गाडी घेऊन जातो का अजुन कसे जाणार मग? १ मैल = १.६ किमी. इतके अंतर पायी फक्त मॉर्निंग वॉकलाच चालले जाते हो.

In reply to by लंबूटांग

शुचि 16/04/2014 - 17:27
पण पांढरी पाल वगैरे म्हणून आपणही काही वेगळे केलेले नाही.
हे शब्द त्या बाईच्या वृत्तीतून आलेले आहेत. अन्य कोकेशिअन स्त्रिया मला गोर्या चा वाटतात. त्यांचे निळे डोळे अन विविधरंगी केस आकर्षकच वाटतात.

In reply to by लंबूटांग

आजानुकर्ण 16/04/2014 - 19:02
पण कार्डावर दोन ओळी खरडण्याबद्दल कटकट करण्याऐवजी इथे दहा ओळींचा धागा काढणे आणि अजून प्रतिसाद देणे हे बघून अंमळ मौज वाटली.
हाहा.. .खरंय

पक्या 16/04/2014 - 12:40
जर शुभेच्छा वा शोकसंदेश खरोखर मनापासून द्यायचे असेल आणि ते मिळणाऱ्या व्यक्तीला खरोखर आनंद किंवा बरे वाटणार असेल तर दयावेत. आणि तेहि प्रत्यक्षात भेटून त्या व्यक्तिशी संवाद साधला तर किती छान। अन्यथा कार्डावर सही न करणे उत्तम. सक्तिने सह्या करून घेण्यास काहीच अर्थ नाही. वेळेचा अपव्यय आहे. वाढदिवसासाठी मला वाटते टीम मीटिंग मध्ये सुरवातीला वा शेवटी सर्वांनी त्या आठवड्यातील सर्व बड्डे असलेल्यांचे एकमुखाने अभिनंदन करावे. किती लाइवली वाटेल आणि टीम स्पिरिट ही दिसून येईल. आमच्या ऑफिस मधील एकाचे २ कुत्रे काही महिन्यांच्या अंतराने गेले. पण त्याने हे जगजाहिर केले नाही आणि अगदी २-४ जणांनाच विषय निघाला म्हणून समजले. शोक संदेशाचे कार्ड वगैरे हां प्रकार नाहीचे. वाढदिवस असेल कोणाचा तर टीम लंच करतात. तसेही एरवी लंच मिटिंग्ज असतातच. त्यामुळे त्यात खुप नाविन्य नाही पण ग्रीटिंग्ज कार्ड साइन करण्यात कोणाला फारसा रस नसावा त्यामुळे तो प्रकार आमच्या US ओफ्फिस टीम मध्ये तरी नाहीये. कुत्रा मांजर घरातले सदस्यच असतात त्यांच्या जाण्याने त्यांच्या मालकाला दू:ख होतेच. पण त्या बाबतीतील शोक संदेश हे व्यक्तिगत पातळीवर असावेत. हे शोक संदेश पाठवणारे पेट म्हणून फक्त कुत्रा मांजराचीच दखल घेतात की अजुन इतर पेट्स ची पण घेतात. माझ्या एका मित्राचा गेल्या वर्षी एक पॅराकीट गेला आणखी एका मित्राचा फिशटैंक मधील एक मोठा मासा गेला. अशा केस मध्ये ते काय करतात ?

In reply to by पक्या

शुचि 16/04/2014 - 17:24
जर शुभेच्छा वा शोकसंदेश खरोखर मनापासून द्यायचे असेल आणि ते मिळणाऱ्या व्यक्तीला खरोखर आनंद किंवा बरे वाटणार असेल तर दयावेत. आणि तेहि प्रत्यक्षात भेटून त्या व्यक्तिशी संवाद साधला तर किती छान। अन्यथा कार्डावर सही न करणे उत्तम.

पेट थेरपी 16/04/2014 - 13:15
जसजसे तुम्ही मॅनेजमेंट्च्या पायर्‍या चढाल तसे सर्वांना बरोबर घेउन पुढे जाणे. कलीग्ज समजून घेणे महत्त्वा चे ठरत जाते. मी फक्त माझे काम करणार आणि पगार घेउन गप्प बसणार अशीच वृत्ती असेल तर काय म्ह्णायचे? अर्थात काही लोक्स ना अ‍ॅस्पर्जर सिंड्रोम असतो व मिळून मिसळून वागणे खरेच अवघड जाते भारतात देखील आजकाल टीम बिल्डिंग साठी खास प्रयत्न केले जातात. सर्वांना व्हर्टिकली वर जाण्यात रस ही नसतो. कुत्रे मांजरी घरातील सदस्यच असतात ह्याला अनुमोदन. आजकाल अमेरिकन स्त्रियांना कुत्रे पाळायला जास्त आवडते, मुले होउ देण्यापेक्षा असे परवाच वाचले. इस अवस्थामें अगर किसीका कुत्ता मर जाता है तो कंडोलन्स तो बनता है. आपल्या देशी कल्चर मध्ये पण लग्न आणि मयत ह्या दोन महत्त्वाच्या सामाजिक गोष्टी मानल्या जातात ह्या दोन प्रसंगी नक्की हजर राहावे असे मानले जातात. अर्थात तुमचा वैयक्तिक चॉइस आहे. उगीच न्यागिंग केल्यासारखे वाटायला नको.

सौंदाळा 16/04/2014 - 14:25
ठेण्शन कायको लेताय शुचिताय एक सजेशन, टिममधल्या लोकांना हे भेट्/शोक पत्र कॉमन जागी ठेवायला सांगा आणि जो/जी याचा लीडर आहे त्याला म्हणावे टीमला मेल पाठव. भेट्/शोक पत्र माझ्या डेस्कवर (किंवा अमुक अमुक जागी) आहे ईच्छुकांनी आज सह्या/संदेश लिहावेत उद्या/इओडी ते योग्य व्यक्तीला देण्यात येईल.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शुचि 16/04/2014 - 17:23
हो ना असाच प्रस्ताव ठेवासा वाटला. पण म्हटलं - परत ते "It is very disappointing." ऐकावे लागू नये.

असे वाढदिवसाचे, शोकसंदेशाचे कार्ड आपल्या टेबलावर आले तर ते तसेच पडून राहु द्यावे. कोणी विचारल्यास 'काम आटोपल्यावर करते सही' वगैरे सांगावे. त्यांना घाई असेल तर घेऊन जा कार्ड सांगायचे. नंतर आपल्याला वेळ मिळेल तेंव्हा त्या सहकार्‍याला भेटून किंवा दूरध्वनीवर शुभेच्छा/शोकसंदेश द्यावा. कामाचा मूड लागला असताना मध्ये मध्ये कोणी अवांतर गप्पांसाठी (गॉसिपसाठी) विचलीत केले तरी विचारशृंखला तुटते आणि कामाचा वेग मंदावतो. कार्यलचाचे नुकसान होतेच पण आपले वैयक्तिक समाधानही उणावते.

In reply to by प्रभाकर पेठकर

शुचि 16/04/2014 - 17:22
जुलमाच्या रामरामाचा कंटाळा येतो हो प्रपे. शोक अन आनंद या भावना उस्फूर्त आल्या पाहिजे. अन्यथा चिडचिड होते :)

In reply to by शुचि

कवितानागेश 17/04/2014 - 18:23
बरोबर आहे. शोक आणि आनंद या भावना उत्स्फुर्तपणे आल्या पाहिजेत. तेच नॉर्मल आहे. पण त्या जर का तश्या येतच नसतील, उलट कामाच्या मूडमध्ये असा चटकन बदल होउ देणे, (' बदल करणे' नाही 'होउ देणे') आणि कोरडेपणा आला असेल तर दुरुस्ती कुठे करायची? पाचेक मिनिटे आपण त्या आनंदाच्या किंवा दु:खाच्या भावनेमध्ये वाहात जाणार असलो तरी त्यात काही हार्म नाही. इथे मला हिडन तक्रार, 'अरे बापरे, आता इमोशनल व्हायचंय!!' अशी दिसतेय. कदाचित ती तशी नसेलही. माझं रीडिन्ग चुकू शकतं... :) अर्थात म्हणून कार्डावर प्रत्येकानी कम्पलसरी काहितरी लिहावंच अशी कुणी दुसर्‍यावर जबरदस्ती करणं योग्य नाहीच.

In reply to by कवितानागेश

शुचि 17/04/2014 - 18:53
नाही ग माऊ. तक्रार ही आहे की "बळजबरी करु नका". एक इइमेल पाठवा की अमुक यांचे अभिनंदन करा अथवा अमुक यांचा पोपट्/गाढव काय तो पेट मेला. मग आम्ही करायचं तेव्हा करु. कामात केंद्रीत (फोकस्ड) असताना हे काय, सही करा अन्य कुणाला शोधा/येरझारा घाला.

रेवती 16/04/2014 - 18:08
काय शुचीमामी, मनतालं बोलून झाल्यावर बरं वाटलं की नाही अजून? ;) जौ दे गं! आता पुढल्यावेळी आपण हिरवीन आहोत आणि आपला सगळेजण ऑटोग्राफ घेताहेत असे मनात आण. तुझ्या सहीला कित्ती कित्ती महत्व आहे हे विसरू नकोस. तुझ्याशिवाय टीम अपूर्ण आहे. ;) जो मनुक्ष मिटींगा घेत बसला असेल त्याला एक ईमेल पाठवून तुझ्या क्युबिकलपाशी थांबून जायला निरोप ठेव नैतर त्याच्या क्युबिकलमध्ये चिकट पावती (स्टिकी नोट) लावून 'सही कर मेल्या!' अस निरोप ठेव . कमी मनस्ताप!

प्रसाद१९७१ 16/04/2014 - 18:12
जुलमाच्या रामरामाचा कंटाळा येतो हो प्रपे. शोक अन आनंद या भावना उस्फूर्त आल्या पाहिजे. अन्यथा चिडचिड होते >>> मला वाटते तुम्ही पराचा कावळा करता आहात. ह्या गोष्टींना तुम्ही Part of Job का समजत नाही. आपण नोकरी मधे कीती टक्के गोष्टी आपल्याला पाहीजे तश्या करतो? तसेच हे पण करायचे. ह्या गोष्टी पण KRA आहेत असे समजायचे आणि करायच्या.

प्यारे१ 16/04/2014 - 18:34
थोरांचे बोल कसे समजूत घालणारे असतात नै ;) किती झालं तरी रेवती'आज्जी' मोठ्याच असणार ना शुचि'मामी'पेक्षा! उगा 'परीची चिमणी' करतेय ही मामी. ल्ही कि दोन शब्द. श्री. रा. रा. बॉब, आपला सरडा गेल्याचे (गेल्याचे म्हनजे मेल्याचे. आमच्याकडं असंच लिहीतात.)समजले. आमची गेल्या वर्षी तुमच्या घरच्या बागेतल्या पार्टीमध्ये एकदा भेट झाली होती. सुंदर निळसर शर्ट चड्डी घातलेला तो सरडा पाहून मी अत्याधिक आश्चर्यानं किंचाळले. ते ऐकून सरड्यानं आपले कपडे काढून तो चॉकलेटी झालेला पाहून मला पुन्हा ओरडावेसे वाटले. पण आधीच्या ओरडण्यानं दोन चार माणसं धक्का बसून कोमात गेल्यानं आवंढा गिळून गप्प बसले. तर ते असो. मुळात तो रंग बदलणारा सरडा असल्याचे नंतर समजले. आपण मीटिंगमध्ये नेहमीच कसे सेफ राहू शकता त्याचं उत्तर सरड्यासारखं रंग बदलणं जम णं हेच असू शकेल. पुन्हा असो. एकदाच भेटून मला आश्चर्याचा धक्का देणार्‍या सरड्याचा 'सोल पिस्स्फुली रेस्ट' करो हीच आकाशातल्या बापाकडं प्रार्थना. कळावे, (आतून आनंदी) शुचि असं काही बाही लिहावं! सोप्पं असतंय.

In reply to by प्यारे१

आदूबाळ 16/04/2014 - 18:58
__/\__ :)) "अ‍ॅकॉर्डिंग टू अवर भग्वदगीता, द सोल चेंजेस इट्स बॉडीज लाईक युवर लेट शॅमिलियन चेंजेस इट्स कलर्स" वगैरे तारेसुद्धा तोडता येतील!

सुहास.. 16/04/2014 - 18:44
एकदा मॅनेजर सांगत होता , अरे हे सर्व एक्स्ट्रा - करिक्युलम अ‍ॅक्टिविटी आहेत !! मी " सर मी इथ काम करायला येतो , हे फालतुचे धंदे करायला येत नाही !! ' ( आधीच भेंडी दिवसाचे १२ तास खाता आमचे, २ तास ट्रॅव्हलिंग चे, आणि वर हे केक थापुन घ्या तोंडाला !! ) कधी ही ऑफीस पार्टीज ला हजर नसलेला खडुस

फेरफटका 16/04/2014 - 21:16
माफ करा, पण मला तुमचा नेमका आक्षेप कशावर आहे तेच नाही कळलं. आपल्या सुख-दु:खात कुणी सहभागी झालं तर आपल्याला बरं वाटतच ना, मग ईतरांच्या सुख-दु:खात आपण औपचारिकता म्हणून सहभागी व्हायला काय हरकत आहे? बरं, एका सहीनं तुमचा असा कितीसा वेळ 'वाया' जातो, जो तुम्ही अदरवाईज सत्कारणी लावणार असता? हा प्रकार न आवडणं / पटणं हे देखील समजू शकतो, पण त्याचा ईतका राग करणं, त्याला शिव्या देण्याईतका गंभीर नाहीये. भारतात आपण काय करतो हे अमेरिकेत राहून कशाला तोलायचं? आपण आपल्या चॉईस ने हा देश निवडलाय. अशी तुलना केल्यामुळे आपण स्वतःला उगाचच दु:खी करतो (हा फक्त एक मैत्रीपुर्ण सल्ला आहे, दोषारोप नाही.)

शुचि 16/04/2014 - 21:20
भारतात आपण काय करतो हे अमेरिकेत राहून कशाला तोलायचं? आपण आपल्या चॉईस ने हा देश निवडलाय. अशी तुलना केल्यामुळे आपण स्वतःला उगाचच दु:खी करतो (हा फक्त एक मैत्रीपुर्ण सल्ला आहे, दोषारोप नाही.)
धन्यवाद. नक्की विचार करेन.

आत्मशून्य 16/04/2014 - 21:30
अन मी विरोध दाखवला तर सुनावलं गेलं "इट इज व्हेरी डिसपॉइंटींग. वी हॅव्ह अ टीम कल्चर हीअर" ......
होतं. होतं असं कधी कधी... याप्रकारात कधी आपण शिकारी असतो तर कधी शिकार इतकचं.... स्थान स्थळ आणी स्तवन... यातच काय तो फरक.

शुचि 16/04/2014 - 22:03
परवा खरं तर वैतागूनच हा धागा काढला होता. खरच फार फार वैतागले होते. पण बर्‍याच प्रतिक्रियांनी स्वतःमध्येच डोकावून पहाण्याची संधी मिळाली. माझा आत्मकेंद्रितपणा लक्षात आला. खरं स्वपरीक्षणासाठी, या धाग्याचा खूप उपयोग मला झाला. पेट थेरपी यांचे विशेष आभार ज्यांनी धाग्याला किंचीत बोचरी पण आवश्यक कलाटणी दिली. अन्य सर्व प्रतिसादकांचे आभार आहेतच.

ऑफिसमधील काही डोक्यात जाणार्‍या गोष्टी - (१) Yup/Nope dudes. औपचारीक इमेल मध्ये सुद्धा Yup/Nope" शब्दांची पखरण करणारे महाभाग. (२) अजून एक प्रकार म्हणजे जे माहीत आहे तेच घोळवून सांगत, माहीतीपूर्ण असण्याचा आव आणणारे सहकारी. प्रकल्प पुढे न्यायला, नव्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी, जे स्वतःला माहीत आहे तेच घोळवत बसणारे अन मांडत रहाणारे. (३) "बड्डे" हा एक वैतागवाणा प्रकार. दर महीन्याला, आमच्याकडे ३-४ "बड्डे ग्रीटींग्स" वर शुभेच्छा लिहाव्या लागतात. कोणाचं कोणी गचकलं तर "शोकसंदेश" ची कार्डे. काल तर कमाल झाली, एकीचा कुत्रा गचकला तर ते कार्ड "शोकसंदेशाकरता" आलं.

नेदरलँड्स - Keukenhof / क्युकेनहॉफ

सानिकास्वप्निल ·

दिपक.कुवेत 15/04/2014 - 19:16
सानिका आणि भटकंती मधे??? असो मी पहिला. आता निवांत फोटो बघतो आणि वर्णन वाचतो. फोटो काय पाकॄ सारखे देखणे असतीलच ह्यात तीळमात्र शंका नाहि. क्रमशः वाचुन बरं वाटलं.

दिपक.कुवेत 15/04/2014 - 19:24
नुसते फोटो बघुन जीव एवढा वरखाली होतोय तर तीथे प्रत्यक्षात वेड न लागलं तर नवलचं. ट्युलिपना त्यांच्या रंगानुसार दिलेली नावं पण एकदम सार्थ.

सखी 15/04/2014 - 19:47
क्लासच सानिका कसले मस्त फोटु काढले आहेस, शेवटचे २ बघुन डोळ्याचं पारणं फिटलं.

सुंदर फोटो आणि वर्णन. हे सगळे सोबतच पहिले आपण याचे अजून वेगळे समाधान. :) मागच्या वर्षी गेलो होतो तेव्हाचा हा वृत्तांत. त्यावर्षीची सगळी कसर यावेळी भरून निघाली. मोअर फोटोज कमिंग सून.

मस्तं छायाचित्रं आणि वर्णन. शाकाहारी खाण्यापिण्याची सोय आहे हे पाहून काकू खुश होतील. मेच्या ८ ते ११ तारखांना आहोत आम्ही अ‍ॅमस्टरडॅम मध्ये. (पण आता मी वृत्तांत्त काय लिहू? तुम्ही तर चौफेर लिहिले आहे.)

रेवती 15/04/2014 - 20:21
पर्यटनक्षेत्रही काबीज केल्याबद्दल अभिनंदन! सगळी पिक्चरे अतिषय सुंदर आलीत यापेक्षा काही बोलता येणार नाही. मधुरा आणि तू तिथे भेटलात म्हणजे आनंदाची Purissima झाली म्हणायची. अगदी विमानतळापासूनचे दर्शन झाल्याने प्रवास घडल्याचे समाधान मिळाले.

मितान 15/04/2014 - 20:25
सुंदर फोटो ! पवनचक्की आणि तिच्या मागे असणारी ट्यूलिप शेतं ? पवनचक्कीसमोर मिळणारी स्ट्रॉबेरी नि क्रीम ? मी इथे फोटो काढण्याचा माझाच विक्रम मोडला होता. एका दिवसात ७८० फक्त ! वेड लागतं अक्षरशः ! आठवणी जाग्या झाल्या. आता भारतातल्या ट्युलिप गार्डनला भेट द्यावी म्हणते...

मस्त !!! अतिशय सुंदर फोटो आणि वर्णन. जुन्या आठवणींना बहर आला. तपकिरी झालेल्या कागदावरच्या प्रकाशचित्रांमधले रंग मनातल्या मनात उजळ झाले ! फुलांची शेती करण्याबरोबरच त्या शेतांच्या सफरींचे आणि दोन फूटबॉल मैदानाइतक्या फुलांच्या यांत्रिक लिलावगृहांच्या सफरींचे मार्केटिंग करण्याच्या डच कल्पकतेचे कौतूक करावे तेवढे कमीच.

बाळ सप्रे 15/04/2014 - 20:43
ट्युलिप्सचा पहिलाच फोटो पाहून एकदम स्वर्गात पोहोचल्याचा भास झाला!!! तुमची खादाडी असो वा भटकंती फोटोग्राफी मात्र एकदम हुच्च्च्च्च!!

मैत्र 15/04/2014 - 21:33
नेहमीप्रमाणे अप्रतिम फोटो.. विभाग बदलला पाहून आश्चर्य वाटलं.. पण फोटोग्राफीचं कौशल्य वादातीत आहे आणि वेगळ्या ऑब्जेक्टस साठी पण झळकतं आहे.. नेदरलँड्सचे फोटो पाहून नॉस्टॅल्जिक वाटलं.. poffertjes म्हणजे डच मिनी पफ्स प्रमाणेच डच पॅनकेक्स pannenkoek अतिशय चविष्ट आणि मस्त लागतात!

प्यारे१ 16/04/2014 - 14:19
खल्लास! वेड ! वेड!! वेड!!! नेदरलॅण्ड्चा व्हिसा कुठे मिळतो हो????? इकडे अल्जिरियन लोकांना अगदी युरोपसारखं वातावरण असूनही आळशीपणानं काही करत नाहीत हे लोक! :(

आयुर्हित 19/04/2014 - 23:28
डोळ्याचे पारणे फिटेल असे सुंदर फोटो व छान लेख! धन्यवाद, आमची अशी मस्त सफर घडवल्याबद्दल. विषय ट्युलीप गार्डन चा निघालाच आहे तर हे गाणे must आहे बघणे! देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुये...

ये कहाँ आ गये हम, यूं ही साथ साथ चलते....ह्या गाण्यात ट्युलिप्सचा बहर बघून आपल्या ही कधीतरी असा बहर बघायला मिळाला पाहीजे असे वाटून गेले होते. पहिल्या नेदरलँड ट्रीपमध्ये ऑगस्टमध्ये गेलो असल्यामुळे हा बहर बघता आला नाही म्हणून रूखरुख लागली होती. साधारण स्प्रिंग सुरु झाला की दोन महिने हा बहर Keukenhof / क्युकेनहॉफमध्ये बघायाला मिळतो. ह्यावेळेस अगदी पक्कं ठरवले की जायचेच आणी लगेच झुतरमिअरस्थित मित्राला फोन केला आणी ट्युलिप्स गार्ड्न कधी उघडते हे विचारुन घेतले. २० मार्च ते १८ मे २०१४ पर्यंत ट्युलिप्सचा बहर सगळ्यांना बघता येईल असे तो म्हणाला.