बीट सार
साहित्यः दोन मध्यम बीट, एका नारळाचे खोबरे, एक चमचा आमचूर, चार-पाच चमचे साखर, मीठ, दोन चमचे तूप, जीरे, हिंग, सात-आठ लसूण पाकळ्या बारीक करून, लाल तिखट चवीनुसार, कढीलिंबाची पाच-सहा पाने.
कृती: बीट कुकरला शिजवून घ्या. सालं काढून बीट्चे तुकडे करून मिक्सरला गुळगुळीत वाटून घ्या. नारळाचे दूध काढून वाटलेल्या बीटमध्ये मिसळा. मीठ, साखर, आमचुर, तिखट चवीनुसार मिसळा. बारीक केलेली लसूण मिसळा. गरजे नुसार पाणी घाला. कढीलिंबाची पाने धुऊन थोडी कुस्करून मिश्रणात टाका. तुपाची जीरे, हिंग घालून खमंग फोडणी करा आणि साराला द्या. साराला उकळी काढा, गरमागरम सार भाताबरोबर वाढा.
यात लाल तिखटाऐवजी ओली मिरची वापरायची असल्यास फोडणी करताना त्यात घालावी. लसूण नको असल्यास घालू नये, पण लसणीमुळे बीटचा उग्र वास येत नाही. नुसते प्यायलाही मस्त वाटते.


याद्या
12842
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पैली. उद्याच करुन बघेन.
काय केलं पयला येउन?
In reply to मी पैली. उद्याच करुन बघेन. by त्रिवेणी
अग अपर्णा ताई आजकाल तसा
In reply to काय केलं पयला येउन? by स्पंदना
त्रिवेणी तै , वेलकम टु'मी
In reply to अग अपर्णा ताई आजकाल तसा by त्रिवेणी
थांकु थांकु जेपी.
In reply to त्रिवेणी तै , वेलकम टु'मी by जेपी
ओके.पण लसणीमुळे बीटचा उग्र
नाही होत उग्र!
>>>>नुसते प्यायलाही मस्त
वाह! छानच!
छान दिसतय
व्वा ...मस्त फोटू आणि पाककृती
खूप फरक पडतो चवीत...
अनन्न्या रेसिपी आवडली. रस्सम
मस्तं पाकृ
मस्त पा कृ. !
मी करुन बघणार आज किंवा
गरम गरम भातु अन अस कोणतही
मस्त ग अनन्या ..आवडली पाककृती
मस्त!
छान आहे गं पाकृ. पण घरात
असे कसे...
In reply to छान आहे गं पाकृ. पण घरात by Mrunalini
मला बीट आवडतं. गोड असतं.
In reply to असे कसे... by ब़जरबट्टू
छान दिसते आहे.
थंडीच्या दिवसात असे गरमागरम
थंडीच्या दिवसात असे गरमागरम
In reply to थंडीच्या दिवसात असे गरमागरम by मधुरा देशपांडे
धन्यवाद सगळ्यांना!
मस्त !
छान आहे पा.कृ.
आरोग्यदायी पाकृ !
जमले...
आजच केलं.
आजचा मेन्यू 'अनन्या बीट सार'.
अगदी अगदी
In reply to आजच केलं. by प्रभाकर पेठकर
आमच्याकडं पण असंच 'पिन्क'
In reply to आजच केलं. by प्रभाकर पेठकर
काका आपके सुप का रंग गुलाबी
In reply to आजच केलं. by प्रभाकर पेठकर
बीटची कमाल.
In reply to काका आपके सुप का रंग गुलाबी by त्रिवेणी
तयार सार परत उकळल्यामुळे असेल...
काका, मस्त आलाय रंग!
वेगळी पद्धत.
In reply to काका, मस्त आलाय रंग! by अनन्न्या
आजच करून पाहिले. थोडे औषधी