पोहे बटाटा कटलेट
परवा कांदेपोहे करायला पोहे भिजवले होते...पण ते जरा जास्तच झाले मग थोडे पोहे वगळले.
मग त्या उरलेल्या पोह्यांचे कटलेट्स करायचे ठरवले :)
साहित्य:-
तीन बटाटे
३ वाट्या जाड पोहे
४-५ ब्रेड स्लाइस
चवीनुसार मीठ
आले-लसूण-मिरची-कोथिंबीर पेस्ट
तळण्यासाठी तेल
बेसन
कृती:-
१. बटाटे उकडून घ्यावेत.
२. पोहे चाळणीत भिजवून निथळत ठेवावेत.
३. ब्रेडचा बारीक चुरा करून घ्यावा.
४. भिजलेले पोहे, कुस्करलेले बटाटे, आले-लसूण-मिरची-कोथिंबीर पेस्ट, ब्रेडचा चुरा, मीठ असे सगळे चांगले मिक्स करुन घ्यावे.
५. आता ह्या मिश्रणाला हाताने किंवा साच्याने आकार देउन छान कटलेट्स करुन घ्यावे.
६. नॉनस्टीक पॅनमध्ये तेल गरम करत ठेवावे. दोन्ही बाजूने रवा लावून गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यावेत.
७. सॉस/ चिंचेची चटणी/ हिरव्या चटणी सोबत सर्व करावे.
तय्यार आहेत..पोहे-बटाटा कटलेट्स
P.S. पाकृ टाकण्याचा तसा पहिलाच प्रयत्न आहे..त्यामुळे सांभाळून घ्यावे :)
तय्यार आहेत..पोहे-बटाटा कटलेट्स
P.S. पाकृ टाकण्याचा तसा पहिलाच प्रयत्न आहे..त्यामुळे सांभाळून घ्यावे :)
वाचने
17586
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
हाय! हाय!!
मस्तच गं अस्मी!
मस्त....!
अरे वा
छान... नक्की करून बघणार .
झक्कास!
In reply to झक्कास! by पैसा
असेच म्हणते. आवड्ली पाकृ.
In reply to झक्कास! by पैसा
असेच म्हणतो.
In reply to झक्कास! by पैसा
यप्प... पोहे कधीच उरत नाही
In reply to झक्कास! by पैसा
बरोबर आहे गं पैसाताई, पण मला
In reply to बरोबर आहे गं पैसाताई, पण मला by अस्मी
हाहा!
आज सकाळी केले मस्त झाले.
मस्तं पाकृ
वॉव
मस्त !!
मस्त दिसताहेत कटलेट...!!!
चटपटीत मेनु!!
यातले पोहे वगळता अगदी हाच
फोटो जबरी आल आहे अस्मि.
बेसन सगळ्या मिश्रणातच घालायचे
In reply to बेसन सगळ्या मिश्रणातच घालायचे by रेवती
त्या स्लाइसेस पाठीचे पाहुणे
In reply to त्या स्लाइसेस पाठीचे पाहुणे by शुचि
हो ना! ते खपतील यात. लागल्यास
In reply to बेसन सगळ्या मिश्रणातच घालायचे by रेवती
हो अगं..पाकृत लिहायचं राहिलं.
In reply to हो अगं..पाकृत लिहायचं राहिलं. by अस्मी
ओक्के.
वाह अस्मी मस्त पाकॄ. आणि फोटो.
तीन बटाट्यांना तीन वाट्या
In reply to तीन बटाट्यांना तीन वाट्या by सूड
तू पावणेतीन वाट्या पोहे
ही़ पा.कृ. अंडे घालुन करता
In reply to ही़ पा.कृ. अंडे घालुन करता by ज्ञानोबाचे पैजार
संकष्टी नसेल तर घालायला हरकत
In reply to संकष्टी नसेल तर घालायला हरकत by तुमचा अभिषेक
पैजारब्वांचा प्रतिसाद कळलेला
पोहे फार च आवडीचे, बटाटे त्या
आज
सर्वांचे आभार!!
मस्त आणि झटपट पाकृ
तळणे?
In reply to तळणे? by कपिलमुनी
डीप फ्राय केले तर तेलात
मस्त...