मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बीट सार

अनन्न्या · · पाककृती
साहित्यः दोन मध्यम बीट, एका नारळाचे खोबरे, एक चमचा आमचूर, चार-पाच चमचे साखर, मीठ, दोन चमचे तूप, जीरे, हिंग, सात-आठ लसूण पाकळ्या बारीक करून, लाल तिखट चवीनुसार, कढीलिंबाची पाच-सहा पाने. कृती: बीट कुकरला शिजवून घ्या. सालं काढून बीट्चे तुकडे करून मिक्सरला गुळगुळीत वाटून घ्या. नारळाचे दूध काढून वाटलेल्या बीटमध्ये मिसळा. मीठ, साखर, आमचुर, तिखट चवीनुसार मिसळा. बारीक केलेली लसूण मिसळा. गरजे नुसार पाणी घाला. कढीलिंबाची पाने धुऊन थोडी कुस्करून मिश्रणात टाका. तुपाची जीरे, हिंग घालून खमंग फोडणी करा आणि साराला द्या. साराला उकळी काढा, गरमागरम सार भाताबरोबर वाढा. यात लाल तिखटाऐवजी ओली मिरची वापरायची असल्यास फोडणी करताना त्यात घालावी. लसूण नको असल्यास घालू नये, पण लसणीमुळे बीटचा उग्र वास येत नाही. नुसते प्यायलाही मस्त वाटते. sar

वाचने 12842 वाचनखूण प्रतिक्रिया 39

कवितानागेश 16/04/2014 - 18:30
ओके. पण लसणीमुळे बीटचा उग्र वास येत नाही.> मी आत्ता विचारणार होते, एवढा जास्त लसूण घातला तर सार उग्र होणार नाही का? बीटचा उग्रपणा हिंगानी कमी होईल ना?

अनन्न्या 16/04/2014 - 18:35
सात - आठ पाकळ्या जास्त नाही होत, दोन बीट आहेत ना! या प्रमाणात पंधरा माणसाना एक वेळ पुरेल एवढे सार होते.

दिपक.कुवेत 16/04/2014 - 18:43
पण आमचुर घालुन चव वेगळि लागेल ना? किंवा नाहि घातला तरी काहि विशेष फरक पडेल असं वाटत नाहि. तिखटाएवजी ओल्या हिरव्या मिरच्याच योग्य.

अनन्न्या 16/04/2014 - 18:49
बीट आणि नारळाचे दूध याला आमचुरामुळे जी थोडी आंबट्सर चव येते ती चांगली वाटते, आमच्याकडे हे आमचुराचे प्रमाण थोडे जास्त आवडते. ओल्या मिरच्या चांगल्या लागतात. लहान मुले घरात जास्त असल्याने मिरच्या कमी वापरते, मिरच्या कधी कधी खूप तिखट असतात, त्याचा अंदाज येत नाही.

ब़जरबट्टू 21/04/2014 - 09:22
घरी प्रयोग केला होता..मस्त जमला..खोबरे नव्हते, तरी चव व रंग छान मस्त.. सर्वात मस्त म्हणजे, बीटची उग्रता पुर्णपणे गेली होती, सर्वाना आवडली... :) आभार...