Skip to main content

रामबाण रामराज्य

लेखक आशु जोग यांनी सोमवार, 21/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
भारत हा सेक्यूलर देश आहे असे असतानाही आमचे अनेक नेते देवळात काय जातात, देवाचा आशीर्वाद काय घेतात... काही विचारू नका... . लक्ष्मणासारखा भाऊ, रामबाण उपाय, रामराज्य असे शब्दप्रयोग आमच्या देशात आजही केले जातात... आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसेल तर बिनधास्तपणे 'रामजाने' म्हटले जाते पण यामुळे हळव्या लोकांच्या भावना दुखावत असतील याची कुणालाच पर्वा नाही... असो... अशी रामबाण, रामराज्य सारखी आणखी काही उदाहरणे सांगता येतील का... .

अपघात

लेखक मालविका यांनी सोमवार, 21/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई पुणे एक्प्रेस हायवे वर होणार्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याच रस्त्यावर एके दिवशी माझ्या आतेभावाचा देखील अपघात झाला आणि त्यातच तो गेला . मागच्या डिसेंबर महिन्यात आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचा याच रस्त्यावर अपघात झाला ज्यात हे दोनही गुणी कलावंत प्राणास मुकले . त्यानंतर बरोबर एका महिन्याने अगदी त्याच पद्धतीने त्याच ठिकाणी झालेल्या अपघातात माझा भाऊ यज्ञेश्वर फाटक हाही गेला . अत्यंत दुर्दैवी अशी हि घटना झाली . आम्ही त्याला बंडू दादा म्हणायचो . तो LIC मध्ये कामाला होता .

व्यवहारज्ञान (३)

लेखक मनीषा यांनी सोमवार, 21/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ : http://misalpav.com/node/27627 भाग २ : http://misalpav.com/node/27650 ******** आता मी माझ्या चौकशीचा रोख परत एकदा 'मेरी हिल' कडे वळवला. मेरी हिल ही त्या हॉटेल मध्ये चेंबर मेड म्हणून अनेक वर्षे नोकरी करत होती. मिसेस ऱ्होडस ला जिवंत पाहणारी बहुदा खुनी व्यतिरिक्त, तिच शेवटची व्यक्ती असावी. मी तिला प्रश्न न विचारता त्या दिवशी काय काय घडले याचे सविस्तर वर्णन करण्यास सांगितले. मेरी हिल ही क्राऊन हॉटेल ची एक कर्मचारी, चेंबर मेड आहे.

माझी बायपोलर डिसॉर्डर

लेखक शुचि यांनी सोमवार, 21/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मी डॉक्टर नाही, हे एक प्रांजळ आत्मकथन आहे केवळ या २ हेतूनी केलेल (१) की जर कोणी अशी लक्षणे अनुभवत असेल तर त्यांना मदत व्हावी (२) माझ्या समाधानाकरता की माझे सत्य सांगीतले, माझी कथा सांगीतली या धाग्यावर अवांतर न केल्यास उपकार होतील ____________________________________________
"मी उद्याची अपॉईंट्मेन्ट घेतली आहे, एकतर तू सायकिअ‍ॅट्रीस्ट कडे चल किंवा मला घटस्फोट दे. या दोनांव्यतिरीक्त दुसरा पर्याय मी तुला देत नाही."
आजवरच्या आयुष्यात मी ऐकलेले सर्वात प्रभावी अन निर्वाणीचे वाक्य/संवाद.

<प्रवीण तोगडिया, बिल्डिंग आणि धमकी>

लेखक आजानुकर्ण यांनी सोमवार, 21/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
भारताचं नावडतं व्यक्तीमत्व आज पुन्हा "बोललं". मुस्लिमांचा 'प्रश्न' सोडवायचा आहे ना? मग मुस्लिमांना हिंदू वस्त्यांमध्ये घरं घेऊ देऊ नका. तसं नाही केलं तर सुरुवातीला एखादी मुस्लिम व्यक्ती जास्त किमतीने घर घेईल आणि आजूबाजूच्या परिसरात इतर मुस्लिम कमी किमतीची घरे घेऊन स्थायिक होतील. अशी धमकी प्रवीण तोगडिया यांनी दिल्याचं वृत्त आज 'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलं. बिहारी भाजपा नेते गिरीराज यांचा मोदीविरोधकांचे स्थान पाकिस्तानात आहे हा "विनोद" ताजा असतानाच तोगडियांच्या नवीन वाचाळतेमुळे भाजपा आणि संघाची पुन्हा एकदा दातखीळ बसली आहे. '४८ तासांत याने घर खाली ने केल्यास घरावर दगड, टायर आणि टोमॅटोचा मारा करा.

ब्रोकोली सॅलॅड

लेखक मस्त कलंदर यांनी सोमवार, 21/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
पिझ्झासोबत आणि पास्त्यामध्येही खाताना ब्रोकोली मला प्रचंड आवडली. पण सॅलॅडमध्ये कच्चीच खायची तर अगदी कसंसंच झालं. आधीच ब्रोकोलीचा उग्र वास आणि मग त्यासोबत काय काय एकत्र जाईल ही एक शंका होतीच.

जर मोदी पंतप्रधान झाले तर....

लेखक ऋषिकेश यांनी सोमवार, 21/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
जर मोदी पंतप्रधान झाले तर प्रत्येकाच्या काही ना काही अपेक्षा त्यांच्याकडून असतीलच. हा धागा त्या अपेक्षांचा अंदाज घेण्यासाठी काढतो आहे. मोदी असे करतील, तसे करतील वगैरे गप्पा आपण मारत असतो. तावातावाने त्यांच्या कार्याची स्तुती/निंदा चालु असते. पण हे सारे निवडणुकीपर्यंत. त्यानंतर काय? समजा बहुमताने मोदींना जनादेश दिला की त्यांचे सरकार स्थापन होईल.

किलर फ्रॉम हैद्राबाद - १

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 21/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आताचं आंध्र प्रदेश राज्यं जिथे आहे, त्याचा बराचसा भाग ब्रिटीश आमदानीच्या काळात ब्रिटीशांचा साथीदार असलेल्या निजामाच्या हैद्राबाद संस्थानाचा भाग होता. तत्कालीन म्हैसूर राज्याच्या उत्तरेला असलेले आणि हैद्राबाद च्या दक्षिणेचे अनंतपूर, कुर्नूल, नंदयाल हे तेलुगू भाषिक जिल्हे मात्र मद्रास प्रांतात मोडत होते. त्याकाळात हा सर्व भाग विकासापासून संपूर्णपणे वंचित होता. वर्षाचे दहा महिने उन्हाळा (आणि उरलेले दोन महिने असह्य भाजून काढणारा उन्हाळा!) आणि जेमतेम पडणारा पाऊस यामुळे इथलं आयुष्यं फारच खडतर होतं.

ऑरेंज कुकिज

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 21/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः अडीच वाट्या मैदा ३/४ वाटी साखर २२५ ग्राम बटर किंवा दोन स्टीकस बटर (रुम टेम्परेचरला असलेले) १ अंडे १ टेस्पून संत्र्याचा रस १ टेस्पून किसलेले संत्र्याचे साल १/२ टीस्पून किसलेले आले १/४ टीस्पून मीठ .

आज कुछ तुफानी करते है…

लेखक बोबो यांनी सोमवार, 21/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
------------------------------------------------- म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असं म्हणतात ते कदाचित खरं असावं. माणसं कधी कधी काही विचित्रच हट्ट करतात. निदान आबांच्या वागण्यावरून तरी मला तसं वाटलं खरं . परवाचाच अनुभव घ्या ना. आबा - म्हणजे दूरच्या नात्यातले आजोबा आमच्याकडे राहायला होते. ते नुसते रहात होते तिथपर्यंत ठीक होतं. एरव्ही त्यांचं वागणं नॉर्मल होतं, पण नंतर एके दिवशी मला जाणवलं त्यांना काहीतरी बोलावंसं वाटतंय. त्यांच्या मनात काही तरी आहे असं मला वाटलं.