Skip to main content

येल्लगिरीच्या टेकडीवरचा नरभक्षक बिबट्या - १

Published on शुक्रवार, 18/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
दक्षिण भारतातलं घनदाट अरण्यं होतं ते. दुपार कललेली होती. सकाळभर खाण्याच्या शोधात भटकणारे पक्षी आणि जनावरं सावलीला विसावली होती. असह्य उन्हाच्या तलखी मुळे डेरेदार वृक्षाच्या सावलीतही जीव नकोसा होत होता. वाराही साफ पडला होता. गवताची काडी देखील हलत नव्हती. जंगल अगदी शांत होतं. या शांततेचा भंग होत होता तो जंगलात चरण्यासाठी सोडण्यात आलेल्या गुरांच्या गळ्यात बांधलेल्या घंटांच्या आवाजाने. गुरांच्या गळ्यात घंटा बांधण्यामागे दोन उद्देश होते. एक म्हणजे आपली गुरं कुठे आहेत हे गुराख्याला कळावं आणि दुसरं म्हणजे वाघ-चित्त्यांसारख्या शिकारी प्राण्यांपासून गुरांचं संरक्षण व्हावं.
लेखनविषय:

याद्या 9263

चलती का नाम गाडी-२ गुंतागुंत

Published on शुक्रवार, 18/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल कार बनवणे आणि विकणे इतकं आव्हानात्मक आहे हे त्यावर काम करण्याआधी माहीत नव्हतं. यावेळी आपण कार बाजाराची गुंतागुंत ( Complexity) आणि ग्राहकाची निर्णय प्रक्रिया पाहूयात, म्हणजे नंतर त्याचा संदर्भ येईल तेव्हा पटकन लक्षात येईल. अर्थात दुचाकीला पण बऱ्याच प्रमाणात हे सगळं लागू होतं, पण दुचाकीसाठीची ही प्रक्रिया थोडीशी सोपी आहे. गिऱ्हाइकाच्या मनाचे खेळ वाहनाच्या उपलब्ध प्रकारात आणि पर्यायात थेट परावर्तित होतात. जगात कुणाला काय आवडेल हे अचूक कसं सांगणार? यासाठी मार्केटिंग- विपणन विभागात अनुभवी संशोधक काम करत असतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 14978

अंगठी अनामिकेत का ?

Published on गुरुवार, 17/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
विवाह निश्चित झाल्याची खूण म्हणून वाग्दत्त वधू आणि वर एकमेकांच्या अनामिकेत अंगठी घालतात.ही अंगठी अनामिकेतच का घालतात? दुसऱ्या बोटात का नाही घालत? . . एका तत्त्ववेत्त्याची ही एक सुरेख मांडणी पाहा. ......... . . त्याच्या मते, आपला हात म्हणजे दहा बोटे.
लेखनविषय:

याद्या 24058

कविता क्रमांक एक

Published on गुरुवार, 17/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
वारा शापित आत्म्यासारखं सैरावैरा इकडे तिकडे भटकतो , माझ्या गालांना , केसांना स्पर्शतो , तो स्पर्श तेवढा हलका नसतो , ती झुळूक नसते वाऱ्यामध्ये श्वास घेऊ शकत नाही इतका भन्नाट वारा. पावसाच्या मातीचा पहिले सुंगध एखाद्या काचेच्या नक्षीदार बाटलीमध्ये साठवून ठेवावा बाकी सर्व रुक्ष ऋतुंमध्ये ती बाटली उघडावी आणि हळू हळू तो सुंगंध माझ्या सर्वांगात मिसळवून टाकावा. अगदी ओल्या मातीसारख वाटायला हव मन तुझ्या पापण्या खाली गेल्यावरच तुझ्याकडे बघायचं धाडस पुन्हा याव माझ्या डोळ्यात पावसाच्या थेंबासारख्या कवितांची अक्षर तुझ्या विरहाच्या मेघातून बरसावीत. एकेक क्षण खूप जड चाललाय.
लेखनविषय:

याद्या 2207

निवडणूक २०१४: अनुभव ५: दिल्ली: मतदानानंतर

Published on गुरुवार, 17/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
अनुभव ४ दिल्लीत दहा एप्रिलला मतदान झालं आणि नंतर मी तिथं पोचले. नेहमीप्रमाणे पहिला संवाद 'मेरू' च्या चालकाशी. मग वेळ मिळेल तेव्हा आणि तसतसा रिक्षाचालक, सायकल रिक्षाचालक, ऑफिसातले सहकारी, मेट्रोतले सहप्रवासी ...

याद्या 17614

मतदारयाद्यांचा घोळ

Published on गुरुवार, 17/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
नेमेची येतो पावसाळा, तशा निवडणूका नेहमीच येत असतात. भारतीय लोकशाहीला आता अनेक वर्षे झाली. एवढ्या वर्षात तंत्रज्ञानाचा बराच विकास झाला. पण पुन्हा एकदा "मतदारयाद्यांचा घोळ" आणि "नियमीत मतदारासही मतदान करता आले नाही" याच्या बातम्या आल्याकी भारतीय लोकशाहीला किती वर्षे झाली ती मोजवत नाहीत. माझे मतदान व्यवस्थीत झाले. पण टिव्ही वृत्तपत्र पहातो तर पुन्हा या बातम्या आहेतच.

याद्या 24617

पोहे बटाटा कटलेट

Published on गुरुवार, 17/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
परवा कांदेपोहे करायला पोहे भिजवले होते...पण ते जरा जास्तच झाले मग थोडे पोहे वगळले. मग त्या उरलेल्या पोह्यांचे कटलेट्स करायचे ठरवले :) साहित्य:- तीन बटाटे ३ वाट्या जाड पोहे ४-५ ब्रेड स्लाइस चवीनुसार मीठ आले-लसूण-मिरची-कोथिंबीर पेस्ट तळण्यासाठी तेल बेसन कृती:- १. बटाटे उकडून घ्यावेत. २. पोहे चाळणीत भिजवून निथळत ठेवावेत. ३. ब्रेडचा बारीक चुरा करून घ्यावा. ४. भिजलेले पोहे, कुस्करलेले बटाटे, आले-लसूण-मिरची-कोथिंबीर पेस्ट, ब्रेडचा चुरा, मीठ असे सगळे चांगले मिक्स करुन घ्यावे. ५. आता ह्या मिश्रणाला हाताने किंवा साच्याने आकार देउन छान कटलेट्स करुन घ्यावे. ६. नॉनस्टीक पॅनमध्ये तेल गरम करत ठेवावे.

याद्या 17588

केलं की नाही?

Published on गुरुवार, 17/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
सध्या एक एक टप्प्यात निवडणू़का आटपत आहेत. राजकारणावर आणि राजकारण्यांवर बोलताना न थकणारे आपण मतदान हक्क मात्र बजावतो का ? या धाग्यावर तुमच्या भागातील मतदानाची तारीख, तुम्ही मतदान केले का, नसल्यास का नाही, असल्यास किती वेळ लागला इ. माहिती लिहिणे अपेक्षित आहे. बघुया कोण किती जबाबदारीने वागतंय ते! आपले मत आपले भविष्य... ढॅण ट डॅण!
लेखनप्रकार

याद्या 21175

मॅटरहॉर्न

Published on गुरुवार, 17/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
आल्प्स ! सुमारे १२०० किलोमीटर पसरलेल्या आल्प्स पर्वतराजीला युरोपात अनन्यसाधारण महत्व आहे. युरोपातील अनेक देशांतील नैसर्गीक सौंदर्याला ब-याच अंशी कारणीभूत असलेला आल्प्स हा गिर्यारोहकांच्या दृष्टीने आकर्षणाचा विषय नसला तरच नवल. पूर्वेला ऑस्ट्रीया आणि स्लोवानिया, पश्चिमेला फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि लिचेन्स्टाईन आणि दक्षिणेला इटली आणि मोनॅको या देशांमध्ये पसरलेला आल्प्स पर्वतात अनेक मनोहर सौंदर्यस्थळं आहेत तशीच आव्हानात्मक गिरीशिखरंही. आशिया खंडात जे हिमालयाचं स्थान तेच युरोपात आल्प्सचं ! आल्प्सच्या पश्चिम भागातील पर्वतरांग पेनीन आल्प्स म्हणून ओळखली जाते.

याद्या 5974

बीट सार

Published on बुधवार, 16/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
साहित्यः दोन मध्यम बीट, एका नारळाचे खोबरे, एक चमचा आमचूर, चार-पाच चमचे साखर, मीठ, दोन चमचे तूप, जीरे, हिंग, सात-आठ लसूण पाकळ्या बारीक करून, लाल तिखट चवीनुसार, कढीलिंबाची पाच-सहा पाने. कृती: बीट कुकरला शिजवून घ्या. सालं काढून बीट्चे तुकडे करून मिक्सरला गुळगुळीत वाटून घ्या. नारळाचे दूध काढून वाटलेल्या बीटमध्ये मिसळा. मीठ, साखर, आमचुर, तिखट चवीनुसार मिसळा. बारीक केलेली लसूण मिसळा. गरजे नुसार पाणी घाला. कढीलिंबाची पाने धुऊन थोडी कुस्करून मिश्रणात टाका. तुपाची जीरे, हिंग घालून खमंग फोडणी करा आणि साराला द्या.

याद्या 12842