Skip to main content

किंग, क्वीन नि आणखी काही.

लेखक प्यारे१ यांनी शनिवार, 12/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक स्त्रीच्या मनात एक क्वीन असते म्हणे. ती सापडण्याचा क्षण टिपणं आवश्यक असतं. पुरुष तरी का अपवाद असावेत? क्वीन सापडणं हा स्वत्व गवसण्याचा क्षण असावा असं तो चित्रपट पाहिलेल्या लोकांची मतं वाचताना जाणवलं. तसंच असेल! .................. सातवीच्या वर्गात असलेला पण वर्गात कधीच न बोलणारा मुलगा शिक्षकांच्या आग्रहामुळं एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतो. स्पर्धेवेळी सगळ्यांची भाषणं ऐकून हातपाय गळपटलेला, काय बोलायचं ते न आठवता जसं सुचेल तसं धाडकन बोलून खाली बसतो. नंतर स्पर्धेत तिसरा मिळालेला क्रमांक. इथं 'किंग' सापडत असेल का? ----------------- नुकताच दहावीला चांगले मार्क मिळवून कॉलेजला आलेला तो.

मल्हार महुडे

लेखक शरद यांनी शनिवार, 12/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
नाम्या आज निवांत बसला होता. काही दिवसांपूर्वी त्याची उठल्यापासूनच धावपळ चालू व्हावयाची. केव्हा सर्व आवरतो व देवळात विठूला भेटावयास जातो असे व्हावयाचे. त्याला डोळे भरून पहात बसावयाचे, त्याच्याशी घटकाघटका गुज बोलत बसावयाचे, वेळ कसा जायचा, कळतच नसे. घरची थोडी चरफड करावयाची, पण त्याची आता सवय झाली होती. देवळांत येणार्‍या लहानथोर भक्त मंडळीत वट वाढला होता. हा तर "देवाशी प्रत्यक्ष बोलणारा," मग येणारा जाणारा पायी लागत होता. मनातून सुखावत नाम्या त्यांना आशिर्वाद देत होता. एक दिवस आळंदीहून चार भावंडे आली. भावांनी चरणस्पर्श करून नमस्कार केला.

पुणे रनिंग

लेखक बाळ सप्रे यांनी शनिवार, 12/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे रनिंग धावण्याचं एवढं वेड लागु शकतं हे मला पुणे रनिंगशी संबंध येईपर्यंत कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पुणे रनिंग (https://www.facebook.com/PuneRunning) हा एक धावण्याची आवड असलेल्या पुण्यातील लोकांचा ग्रुप आहे. धावपटू घडवून भारताला ऑलिंपिक पदक मिळवून देणे वगैरे मोठी स्वप्न नाहीत, घटना नाही, पदाधिकारी नाहित, राजकीय पाठींबा नाही पण सामान्य लोकांना धावण्यासारखी आरोग्यदायी सवय लावणे हा साधा स्वच्छ हेतु. एकट्याने खूप वेळ धावणे बहुदा कंटाळवाणे होते म्हणून ग्रुपमधे धावले जाते.

पाप आणि पुण्य

लेखक sunrise यांनी शनिवार, 12/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
पाप-पुण्याचा अर्थ, काही लोक मजेशीर लावतात पाप धुऊन टाकायला, पुण्याला ओलीस ठेवतात पापाच्या पैशाचे दान करून, मन "प्युरीफाय" कसं होईल अरे, पाप आणि पुण्य कधी "नलिफाय" कसं होईल

फैसला

लेखक drsunilahirrao यांनी शनिवार, 12/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
फैसला जीवनाचा हाच साला घोर आहे येथला प्रत्येक मुर्दा थोर आहे भामटा असणार हा नक्कीच नेता ऐकतो, सर्वत्र त्याचा जोर आहे खेळतो पैसा भल्यामोठ्यांत आता हे कुणाचे माजलेले पोर आहे मांडतो प्रस्ताव आता एकतेचा कालचा तो हाच दंगेखोर आहे मी निघालो आणि तू आलीस राणी फैसला हा छान काटेकोर आहे डॉ.सुनील अहिरराव

एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - १

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 12/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
दूर अंतरावर दिसणा-या जपानी फ्राईटर्स पाहून टँगचा कमांडर रिचर्ड 'डिक' ओ'केन समाधानाने हसला. शिकार ! ओ'केनने आपल्यासमोरचा लाऊडस्पीकर ऑन केला. पाणबुडीत सर्वत्र पसरलेल्या त्याच्या सैनीकांना त्याच्या सूचना स्पष्टपणे ऐकू जाणार होत्या. ओ'केन पासून काही अंतरावरच एकवीस वर्षांचा फ्लॉईड 'फ्रायर ट्रक' कॅव्हर्ली कानाला हेडसेट लावून जहाजांचे येणारे आवाज टिपत होता. आपल्या इतर अधिका-यांसह ओ'केन कोनींग टॉवरच्या छोट्याशा जागेत उभा होता. " वेगात कोणताही बदल नाही कॅप्टन !" कॅव्हर्लीने ओ'केनला सांगीतलं. " पुढच्या बाजूची बाहेरील दारे उघडा. स्टँड बाय् फॉर फायनल बेअरींग.

हार्टब्लीड (Heartbleed) बग; आंतरजालावरील संस्थळावरील पासवर्ड बदलणे; काही शंका

लेखक माहितगार यांनी शनिवार, 12/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालाची २५ वर्षे झाली याचा आनंद साजरा होतो न होतो तोच मागोमाग फायरवॉल्स आणि अँटीव्हायरस आणि इतरही सुरक्षा वापरून निर्धास्त होऊ पहात असलेल्या सर्वांनाच हार्टब्लीड (Heartbleed) बग ही त्रुटी लक्षात येऊन मोठाच धक्का दिला आहे. जवळपास दोन तृतीयांश (२/३) वेबसाईट्सवर त्यात अगदी विश्वासार्ह समजल्या जाणार्‍या असंख्य वेबसाईट्स सहित अनेक ठिकाणी नोंदवलेले सदस्य नाव आणि पासवर्ड इतर व्यक्तीगत माहितीची गोपनीयता राखली न गेल्याची हादरवून टाकणारी शक्यता समोर आली आहे की ज्याबाबत सामान्य आंतरजाल उपयोगकर्ता काही म्हणजे काही करू शकत नाही.

विलक्षण कविता - असाध्य वीणा

लेखक शुचि यांनी शनिवार, 12/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
"अज्ञेय" नावाच्या कवीने हिंदी भाषेत लिहीलेली एक विलक्षण कविता "असाध्य वीणा" मध्यंतरी वाचनात आली. भारदस्त अन कसदार शब्दसौंदर्याचे बावनकशी लेणे ल्यालेली ही कविता माझ्या मनाला चिंब भिजवून, अतिशय आल्हाद देउन गेली. मी तर म्हणेन सर्वाधिक आवडलेल्या काही कवितांपैकी ही एक! ___________ कवितेचा गाभा हा आहे की - गुहावासी ऋषी प्रियंवदा हे राजाकडे आलेले आहेत अन राजाने त्यांना एका वीणा छेडून , वाजवून दाखविण्याची, वीणावादन करण्याची विनंती केलेली आहे.
काव्यरस

पडघम २०१४- भाग ५: बॅटलग्राऊंड स्टेट- राजस्थान

लेखक क्लिंटन यांनी शुक्रवार, 11/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे लेखन भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक भाग २: क्रिटिकल मास भाग ३: बॅटलग्राऊंड स्टेट- मध्य प्रदेश भाग ४: बॅटलग्राऊंड स्टेट-कर्नाटक सुरवातीला राजस्थानात २००८ च्या विधानसभा आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काय झाले हे बघू. तक्ता क्रमांक १ table.tableizer-table { border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif font-size: 12px; }

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

लेखक आयुर्हित यांनी शुक्रवार, 11/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
ही सत्यकथा आहे ओसाड व सर्व जंगलतोड झालेल्या व पाण्याचे सदैव दुर्भिक्ष असलेल्या एका दूरवर असणाऱ्या माळरानावरच्या एका पाड्याची, जेथे ५६ वर्षात स्वतंत्र भारत किंवा महाराष्ट्र शासनाचा कोणताही अधिकारी पोचला नसेल! ही सत्यकथा आहे एकट्या शिलेदाराची, जो आपल्या या छोट्याशा पाड्यातून सर्वात प्रथम उच्च शिक्षण घेवूनही सरकारी नोकरीच्या मागे न लागता आपल्या पाड्याला सुजलाम सुफलाम बनवणाऱ्या एका आदिवासी तरुणाची आणि त्याच्या उच्च ध्येयाची!