हत्ती गेला आणि शेपूट राह्यलं...
पूर्वा म्हणजे धमाल मस्ती, पूर्वा म्हणजे अखंड बडबड आणि चैतन्याचा धबधबा... पूर्वा म्हणजे आमचं एकुलतं एक कन्यारत्न. वय वर्ष साडेचार. तिला नाचायला आवडतं, गायला आवडतं. आई-बाबा जेवायला बसले की त्यांना जेवण वाढायला आवडतं, फोटोसाठी वेगवेगळ्या पोझेस द्यायला आवडतं... ही ‘आवडतं’ प्रकारातली यादी खूप मोठी लांबलचक आहे. त्यामुळे त्याविषयी अधनं-मधन बोलत राहूच.
तर अशी ही आमची कन्या बोलतेही भरपूर आणि अनेकदा अगदी सहज आमची विकेटही काढते.
परवा असेच आम्ही बाईकवरून चाललो होतो. मुलुंड ते शिवडी असा प्रवास. तिच्यासाठी तो सुद्धा तसा जास्तच.
मिसळपाव
निसर्गतः काही वैशिष्ठ्ये प्रत्येकाला मिळालेली आहेत. त्यात कोकिळा आपली अंडी इतर पक्षांच्या खोप्यात सोडून ती वाढवण्याची जबाबदारी परस्पर सोपवण्याच्या कृतीतून अगोचरपणाची झाक दिसते. मित्रांनो, सोबतच्या