उद्या कट्टा आहे....बाकीची माहिती खाली देत आहे....

लेखनविषय:
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार, मिपाकर मोदक (हे लायन सो-सो, श्री-अमुक-तमुक. अशा चालीवर वाचले तरी चालेल.), सध्या मुंबई परीसरात असून ते कट्टा करायला तयार आहेत असे समजले. जास्त पाल्हाळ न लावता, कट्ट्या संर्दभात माहिती देत आहे. तारीख - १५-०९-२०१५ वेळ - रात्रीचे ८ ठिकाण - ३८, बँकॉक स्ट्रीट, ठाणे.

या पाच गोष्टी कायम कराव्यात

लेखनविषय:
1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल. 2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील. 3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील. 4.

हरल्या आशांनी बघतो, तू मंत्री आगळा नाही

पेरणा आणि प्रेरणा जणू खिशांत नागर मर्जी, जग माझिया वाणीवरती पण अवखळ नागरवासी, मज संत म्हणाले नाही ....... किती काळ उलटला मंत्र्या, नित नवीन म्हणशी तूही ....... जरी रूप पालटले तुही, तू मंत्री आगळा नाही मी परतून आलो तरीही, माझे ना सरले काही दमलो मी घेऊन माला, मज संत म्हटले नाही ....... समजता मोल खातीचे आलेला परतून जाई .......

सच्चे वरण

लेखनविषय:
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले.

माज्या हातावरली चिम्नी

धन्याम्होरं ती लांब उडून जायची त्यो जाताच माज्या हातावर बसायची.. शेतावर फक्त तीच माजाशी बोलायची पावसात माज्या हाताआड हळूच लपायची.. आता लपण्याची गरजच राहिली नाय हातावरली जागा आजबी रिकामी हाय.. धनीनेबी चिम्नीवानिच मला रामराम ठोकला बायकापोरास्नी माग ठेऊन निगुन गेला.. मोठ्या गाडीतनं त्यो लोकनेता आला जाताना गाडीत दारुची बाटली उघडला.. सात दिवसानंतर छोटं धनी आलं ट्र्ाक्टरवर बसुन माझ्याकडं पाहून हसलं.. हातावरचं पाव्हण आता बिगीबिगी येईल.. पर धनीला परत कोणं आणिलं?

नात्यातले लुकडे जाडे

लेखनविषय:
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

मिपावर ट्रॉल वाढत आहेत

लेखनविषय:
आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या टोळांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील.

अन्नदाता सुखी भव: १ - PL 480

लेखनप्रकार
नुकतेच "Time" नियतकालिकात मागील ६०-७० वर्षातले "भारत आणि अमेरिकेचे संबंध" फक्त १२ छायाचित्रात मांडलेले पाहिले. एवढा लांबलचक काळ फक्त १२ छायाचित्रात पकडता येणे तसे कठीणच, त्यामुळे त्रुटी असणे अनिवार्य - पण काय काय राहून गेले याचा विचार करताना "P L 480" या एकेकाळच्या "भारत भाग्य विधात्या"ची आठवण नक्कीच झाली. लक्षांत नाही येत ? "पु. लं. च्या ४८० कथा" वगैरे काहीसे वाटते आहे?

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

लेखनविषय:
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...
Subscribe to अर्थकारण