((((((सहज मात्र))))))
पेरणा
https://www.misalpav.com/poem/54130
तू सहजच घालून येशी
लाल सदरा लाल तुमान
मी मौनात घुसमटते अन्
शोधत राहते शब्द मात्र...
सहज खाशी कुठे कुठेही
अन विचारशी "खाशील का गं"?
मनपाखरू झेपावतं पण ...
हायजीन पाहून थिजते मात्र...
सहज गाशी गाणे तेव्हा
भेसूर रेकून जाशी
त्या गर्दभ रुदना मध्ये मी
डोके दाबत राहते मात्र ...
सहज फेकिशी कपडे
खुर्ची न पलंगावर
मी आवरत राहते सारे
घर दिसतच नाही मात्र...
मिसळपाव
)
"कशाला मरतेस?