Skip to main content

अर्थकारण

अन्नदाता सुखी भव: १ - PL 480

लेखक शेखरमोघे यांनी गुरुवार, 27/08/2015 02:18 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच "Time" नियतकालिकात मागील ६०-७० वर्षातले "भारत आणि अमेरिकेचे संबंध" फक्त १२ छायाचित्रात मांडलेले पाहिले. एवढा लांबलचक काळ फक्त १२ छायाचित्रात पकडता येणे तसे कठीणच, त्यामुळे त्रुटी असणे अनिवार्य - पण काय काय राहून गेले याचा विचार करताना "P L 480" या एकेकाळच्या "भारत भाग्य विधात्या"ची आठवण नक्कीच झाली. लक्षांत नाही येत ? "पु. लं. च्या ४८० कथा" वगैरे काहीसे वाटते आहे?

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

लेखक एस यांनी मंगळवार, 04/08/2015 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

फ्रीलान्सिंग आणि भारतातील कर

लेखक आनन्दा यांनी गुरुवार, 23/07/2015 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
या धाग्यावरून स्फूर्ती घेऊन माझा पण एक प्रश्न डकवत आहे मी सध्या काही काळ भारतातून भारतबाहेरील कंपन्यांसाठी फ्रीलान्स डेव्हलपर म्हणून काम करतो.. कामाचा मोबदला अर्थात डॉलरमध्ये मिळतो, पण कोणतीही चांगली सोय नसल्यामुळे सध्या पायोनीअर या सर्व्हिसच्या माध्यमातून पैसे घेतो. आता प्रश्न असा आहे की या उत्पन्नाला कोणते कोणते कर लागू होतील? याबद्दल जालावर पाहिले असता वेगवेगळी मते दिसतात. काही जण म्हणतात की ही एक्स्पोर्ट ऑफ सर्व्हिस आहे, काही म्हणतात ही नाही म्हणून. त्यामुळे संभ्रमित झालो आहे.

शेअरबाजार- बस्स 02 मिनिट्स...आपण काय करावे??

लेखक प्रसाद भागवत यांनी बुधवार, 03/06/2015 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या गाजत असलेल्या 'मॅगी' प्रकरणामुळे आज नेस्ले ईडिया कंपनीच्या शेअरने जवळजवळ 10% ची गटांगळी खाल्ली. हे प्रकरण मिडियात आल्यापासुन म्हणजेच गेल्या पंधराएक् दिवसांत हा शेअर सधारण 1000 रुपयांनी (म्हणजे जवळजवळ 14% घसरला) आपण, एका सामान्य गुंतवणुकदाराने या बाबत काय करावयास हवे असे आपणास वाटते??.. कर्मधर्मसंयोगाने मी याच विषयावर् अर्थपुर्णच्या येत्या मासिकात एक लेख लिहिला आहे. जरुर वाचावा. आपल्या प्रतिक्रिया, सुचनांचे स्वागत आहे. - प्रसाद भागवत

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 30/05/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

काय दुखलंय...?

लेखक संदीप डांगे यांनी मंगळवार, 05/05/2015 06:38 या दिवशी प्रकाशित केले.
एका प्रश्नाचे उत्तरः प्रसंग एकः बांद्र्याचे जे जे होस्टेल. रात्रीचे २ वाजलेत. अगदी पाप्याचे पितर असलेला एक मुलगा लघुशंकेला गेला असता चक्कर येऊन तिथेच पडला. बेशुद्ध झाला नाही. पण अंगात उठण्याचे त्राण बिल्कुल नाही. त्याला उचलून रेक्टरच्या गाडीत घालून जवळच्या एकमेव उपलब्ध असलेल्या मल्टी-स्पेशॅलिटी हॉस्पीटल मधे नेले. निवासी डॉकने छातीला स्टेथो लावून तपासले. काही प्रश्न विचारले. ताबडतोब रक्त/लघवी तपासणी, छातीचा एक्स-रे वैगेरे काढायला लावला. आम्ही जाम टेंशनमधे.

एक "टवाळ" संध्याकाळ

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी रविवार, 03/05/2015 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

पैसोबा पुराण

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 29/04/2015 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या अल्प ज्ञानानुसार आणि अल्प अनुभवानुसार मी लिहिलेले पैसोबा पुराण- माणसे जिंका. माणसे जोडा. पण ती पैशांनी नव्हे! आपल्या चांगल्या कृत्यांनी. चांगल्या स्वभावाने! पैशांनी जोडल्यास पैसा संपल्यावर माणसे पण दूर जातील. पैसा जवळ असो किंवा नसो, काही लोक पैशांचा खोटा बडेजाव दाखवतात. एक उदाहरण द्यायचे तर एखादी वस्तू विकत घेतल्यावर न विचारता काहीजण त्याची किंमत सांगत सुटतात. असे जे करतात तेच पैशांना नकळत त्यांच्या जीवनात अवाजवी महत्व देत असतात, पण त्यांच्या मनात मात्र पैशांबद्दल द्वेष असतो. पैशांचा द्वेष करू नका. कारण पैसे निर्जीव आहेत. पैसे जवळ असणार्‍या माणसांचा द्वेष करू नका.