सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. असे आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

बनलो असतो दादा, मज साहेब भेटला नाही

Primary tabs

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
7 Sep 2015 - 3:58 pm

पेरणा सांगायलाच पाहिजे का?

चहु दिशांत असे दु:कीर्ती, महाराष्ट्र टाचे खालती,
तो , बारामती रहीवासी, मज साहेब भेटला नाही
....... किती निवडणुका झाल्या येड्या , निवडूनी येई परी हाची,
....... जरी मतदारसंघ बदलले त्याचे, तो साहेब पडला नाही
तो परतून आला राज्यात, भुक न संपली त्याची
जाहले अनेक घोटाळे , पण साहेब अडकला नाही
....... उमगता मोल जीवाचे, गेलेला झक मारत येई
....... समजून तयाला घे तू , तो साहेब सरळसा नाही
सर्वस्व लुटले राज्याचे, काही ना बाकी उरले
किती स्वतःस हरवून बसले , पण साहेब बधला नाही,
.........इतुके न कुणाचे घ्यावे, की भार तयाचा व्हावा
........ बघ तुझ्यातही थोडा आहे, साहेब वेगळा नाही
या राज्यातील उपेक्षा, मी मूठ वळवली नाही
बनलो असतो दादा, मज साहेब भेटला नाही,
........ साहेबांची होता मेहेरबानी , कार्यकर्ता बने खंडणीस्वार
........ उघड्या नयनांनी बघ तू , महाराष्ट्राचा बनेल बिहार

पैजारबुवा,

अनर्थशास्त्रआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडनागद्वारफ्री स्टाइलभूछत्रीकरुणबालकथामुक्तकम्हणीऔषधोपचारकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

आमच्या वयोवृद्ध आनि ज्येष्ठ नेत्यावर जे आकख्या महाराष्ट्राचे भूशन आहेत त्यांच्यावर अशी हीन कविता केलेली वाकून आमच्या कोमल(आयडी नव्हे) हृदयावर याठिकानी हे जे घाव घातले गेले आहेत ते बघून त्याठिकानी जनता तुम्हाला तुमची जागा त्याठिकानी दाखवल्याशिवाय राहनार नाही याची खात्री ह्या किंवा त्याठिकानी आम्हाला आहे.
समस्त कार्यकर्त्यांनी ह्याठिकानी जास्त दंगा करु नये असं आव्वान जरी आमी केलेलें असलं तरी याठिकानी कार्यकर्ते नक्की काय भूमिका घेतली जाईल ते त्याठिकानी आम्ही सांगू शकत नाही.
जै हिन्द जै महाराष्ट्र

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Sep 2015 - 4:17 pm | ज्ञानोबाचे पैजार

हीण?
आमी तर मोठ्या कौतुकाने लिहिली होती.
तमाम म्हाराश्टाच्या जानत्या राजाबद्दल वंगाळ शबुद येईल का कोनाच्या थोबाडातुन?
दातच पाडुन टाकेल त्याचे
आहो आम्ही घरात साहेबाचा फोटु सुध्दा बारामती कडे तोंड करुन लावला आहे.
पैजारबुवा,

खेडूत's picture

7 Sep 2015 - 4:51 pm | खेडूत

___/\__

बाकी त्यांचे जुने सहकारी दु. दु. झालेत!

द-बाहुबली's picture

7 Sep 2015 - 4:22 pm | द-बाहुबली

कवितेतील ज्या ओळी अक्षराने सुरु होतात, ते कोणाचे मनोगत व ज्या ओळी टिंब टिंबने सुरु होतात ते कोणाचे मनोगत आहे ?

अभ्या..'s picture

7 Sep 2015 - 4:30 pm | अभ्या..

माऊली सर्वोत्तम विडंबन.
.
जाता जाता श्रीगुरुजींसाठी त्यांचा नेहमीचाच हिट्ट विषय.
बनलो असतो रागा, मज मम्मी भेटली नाही.
किंवा
बनलो असतो नमो, मज (लाल) कृष्ण भेटला नाही.

अभ्या..'s picture

7 Sep 2015 - 4:33 pm | अभ्या..

" बनलो असतो दादा, मज चाकू भेटला नाही " हा सब्जेक्ट मात्र कॉपीराईटेड आहे याची नोंद घ्यावी.

खास श्रीगुर्जींसाठी असेल तर इशयाचे टैटल असे पायजे: "बनले असते माई, मज "हे" भेटले नाहीत". =))

नाखु's picture

8 Sep 2015 - 3:45 pm | नाखु

फकस्त किरकोळ दुरुस्तीसह.

"बनले असते माई, मज "हे" आडून भेटले नाहीत". =))

नाखु बेडेकर
अभामिपातडकफलकदुरुस्तीसंघ

बॅटमॅन's picture

8 Sep 2015 - 4:24 pm | बॅटमॅन

सहीच!

जेपी's picture

7 Sep 2015 - 4:35 pm | जेपी

आवडल..

बहुगुणी's picture

7 Sep 2015 - 5:13 pm | बहुगुणी

स्वतंत्र कलाकृती म्हणून ही व्हॉट्सॅपवर व्हायरल व्हायच्या लायकीची रचना आहे.

दमामि's picture

7 Sep 2015 - 5:43 pm | दमामि

वा!!!! चपखल!!!

प्राची अश्विनी's picture

7 Sep 2015 - 5:55 pm | प्राची अश्विनी

झक्कास!

पैसा's picture

7 Sep 2015 - 7:12 pm | पैसा

लै भारी!

अजया's picture

7 Sep 2015 - 7:34 pm | अजया

=)) सही!

मित्रहो's picture

7 Sep 2015 - 7:43 pm | मित्रहो

एकदम झकास

dadadarekar's picture

7 Sep 2015 - 10:37 pm | dadadarekar

बनलोही असतो अकबर मज जोधा भेटली नाही.

संजय पाटिल's picture

7 Sep 2015 - 11:16 pm | संजय पाटिल

चहु दिशांत असे दु:कीर्ती, महाराष्ट्र टाचे खालती,
तो , बारामती रहीवासी, मज साहेब भेटला नाही
....... किती निवडणुका झाल्या येड्या , निवडूनी येई परी हाची,
यवडं उगडुन सांगायचं नसतं बुवा...

अत्रुप्त आत्मा's picture

7 Sep 2015 - 11:21 pm | अत्रुप्त आत्मा

ह्या ह्य ह्या ह्या ! =))

गुर्जी, ठसका आडकला जनु नरड्यत?

एस's picture

8 Sep 2015 - 12:44 am | एस

झालो असतो संपादक, मज कात्री (कातरी???) भेटली नाही.
झालो असतो कन्हैय्या, मज मयत्रि भेटली नाही.

बॅटमॅन's picture

8 Sep 2015 - 3:03 pm | बॅटमॅन

ह्या ह्या ह्या =)) =)) =))

नि३सोलपुरकर's picture

8 Sep 2015 - 4:14 pm | नि३सोलपुरकर

"उमगता मोल जीवाचे, गेलेला झक मारत येई"........ चपखल!!!

रेवती's picture

8 Sep 2015 - 4:59 pm | रेवती

भारी!
आता बिग्रेडी धावून येणार..........

हेमंत लाटकर's picture

9 Sep 2015 - 6:06 pm | हेमंत लाटकर

बनलो असतो पहिला बाजीराव मज मस्तानी भेटली नाही.

कावरे कोल्ड्रिन्क्समध्ये चौकशी करायची होती ना! गेला बाजार सुजातामध्येपण मिळते.

नाव आडनाव's picture

9 Sep 2015 - 6:13 pm | नाव आडनाव

चूक. ते "भेटली" नाही म्हणत आहेत, "मिळाली" नाही असं नाही. त्यामुळे तुम्ही दिलेले ऑप्शन चूक आहेत. आता त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे नवे ऑप्शन द्या त्यांना :)

अर्रर्र! मग काय माहीत नाय ब्वॉ! बुंदेलखंडाला जावे लागेल त्यासाठी.

बबन ताम्बे's picture

9 Sep 2015 - 6:23 pm | बबन ताम्बे

चहा भेटला नाही, कुठेच बियर भेटली नाही, पेट्रोल भेटले नाही वगैरे...

विशाल कुलकर्णी's picture

10 Sep 2015 - 11:30 am | विशाल कुलकर्णी

ए झक्कास्स ! याला म्हणतात विडंबन !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Sep 2015 - 7:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

एक लंबर इडंबण !

विवेकपटाईत's picture

11 Sep 2015 - 6:11 pm | विवेकपटाईत

आत्ताच मी चंदेरी आणि अशोक नगरला जाऊन आलो, आजच घरी परतलो आहे. चंदेरी आणि अशोक नगरच्या मधल्या भागात राहणाऱ्यांचे भयानक वास्तव पाहिल्यावर 'श्रीमंत' पेक्षा 'साहेब' बरेच म्हणता येईल.

अनन्त अवधुत's picture

13 Sep 2015 - 5:26 am | अनन्त अवधुत

चंदेरी,अशोक नगर आणि श्रीमंत हे तिन्ही नाही कळले.
थोडे अधिक सांगता का, प्लीज ?

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Sep 2015 - 5:45 am | कैलासवासी सोन्याबापु

पैजारबुआ ____/\_____