Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ३
मोदींची घोषणा केली आणि इकडे मी लोन कस करायचं याचाच विचार करत होती.
मी ऑफिस मध्ये काय कारण द्याच आणि कि जेणे करून मला ऑफिस मधून लोनसाठी आवश्यक पेपर देतील. मी एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलली या दरम्यान माझा नवरा घरी आला होता आणि मी त्याला या मीटिंग बद्दल सांगितलं. पहिले त्याने मला सांगितलं कि यापेक्षा तू स्वतःच चालू कर या ३. ५०लाखात तुझ स्वतःच आस्सेट्स असतील ज्या तुला दिसतील कॉम्पुटर खुर्ची टेबले वैगरे आणि जर तुझा व्यवसाय बंद झाला तर तू हे सगळं विकून काही प्रमाणात पैसे परत मिळवू शकतेस, पण ज्या गोष्टी दिसणार नाहीत त्यावर मी कसा विश्वास ठेऊ... बरोबरच होत त्याच पण मला करायचच होतच.
मिसळपाव