Skip to main content

कविता माझी

जागतिक महिला दिन विशेष कविता: 'अक्षरांचे पंख'

लेखक श्वेता२४ यांनी शनिवार, 07/03/2026 21:12 या दिवशी प्रकाशित केले.

अक्षरांचे पंख 

होऊनी परकी मला मी प्रश्न आज विचारते

 बेहिशेबी जीवनाचा ताळमेळच मांडते

 

 का कला साहित्य सारे ठेविले वेशीवरी 

अन् कुणाची पत्नी होऊन माप हे ओलांडते 

 

त्या नळाचे गीत सोबत ताल साधे भाकरी

 तान्हुल्याचा गोड चेहरा चंद्र म्हणूनी पाहते 

 

चांदण्यांचे शब्दमोती विखुरले दारी सडा 

कल्पना सारूनीही घर लख्ख माझे झाडते 

 

सोडुनी मज अन्य सर्वांना इथे प्राधान्य पण

 मीच मजला उचलूनी मग अग्रस्थानी ठेवते! 

 

काही आठवणी शब्दांत अडकतात… ❤️ | Marathi Kavita | Truptis Kavita

लेखक तृप्ति २३ यांनी रविवार, 18/01/2026 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणी आठव्याला गेलं की खरंच खूप आठवणी आठवतात काही आठवणी गाण्यांमध्ये रमतात तर काही शब्दांमध्ये अडकतात काही आठवणी चेहऱ्यावर उगाच हसू आणतात तर काही आठवणी उगाच मनास छळू पाहतात काही आठवणी पुन्हा आठवणी मध्ये गुंतवतात तर काही आठवणी आठवणींचा गुंता सोडवू पाहतात काही आठवणी आयुष्य सुंदर बनवतात तर काही आठवणी आयुष्य जगायला शिकवतात. ही कविता तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाईल. ❤️ व्हिडिओला LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका! Written By: Trupti S. Tilloo https://www.youtube.com/@truptiskavita

नरो वा कुंजरो वा

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 14/01/2026 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
पोटाची खळगी भरणे कारणी स्वार्थें, वैऱ्याची हो मनधरणी हसणे होईल पातक घोर भवती मूर्खांचा वाढेल जोर सत्य नित्य नको ओठी वाचेत मुग्धतेची पराकोटी आणि... मती निकामी होय तेधवा म्हणावे, नरो वा कुंजरो वा - संदीप भानुदास चांदणे

सणासुदीची सफाई

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 17/10/2025 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
"नास्तिकांनी खायला कोंडा, उशाला धोंडाचं गाणं!" कितीही म्हटलं, तरी आपल्या देशाची पक्की जमीन धर्माच्या खाटेचीच सोय! पंथाच्या गादीची उब, सांस्कृतिक उशीसंगे अल्हाददायक झोप — आपलेसेपणा देणारी ही सोय बहुतेकांना हवीच असते, नाही का? सणांच्या आधी, माळ्यावरची समृद्ध अडगळ खाली उतरते, तेव्हा माळ्याचीही सफाई होते. तसंच काहीसं — मऊ मुलायम गादीसुद्धा, खूप दिवसांनी कडक होते. मग ती कारखान्यात जाऊन सासुफ-करून, पुन्हा मुलायम होते, स्वच्छ होते, दिवाळी अंकांनी वैचारीक कल्हई दिल्या सारखी. बेडही मधूनमधून हलवावा लागतो — कचरा, जळमटे बाजूला काढून पुन्हा नीट लावावा लागतो आपलच घर चकाचक दिसण्यासाठी . सणासुदीच्या निम

सहा कोवळे पाय

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 21/07/2025 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
नादमय सरसर कोवळ्याशा वाटेवर कोवळ्या सहा पायांची चाल होई भरभर एकामागे दुजा चाले पुढचे न पाहताना पुढच्याचे ध्यान नाही पुढे पुढे चालताना कधीतरी भांबावून पुढचा जागी थिजतो हरवल्या मागच्याला चार दिशांत शोधतो मागलाही नकळत गेलेला पुढे जरासा थबकून तोही टाके पुढच्यासाठी उसासा क्षणातच पुन्हा होई नजरेत त्यांची भेट हुश्श मनात करूनि चालू पुढे त्यांची वाट - संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, १५/०७/२०२५) (प्रेरणा)

गुरूंना वंदना

लेखक लाल गेंडा यांनी गुरुवार, 10/07/2025 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशातले चंद्र तारे, हे जगाचे गुरु सारे जमिनीवरचे पाणी वारे, हे जगाचे गुरु सारे || उंच पर्वत, खोल दरी हळू जोरात वाहणारी नदी हे म्हणती, मानवा शिका रे जितके श्रम तिथेच यश सारे || पक्षी, प्राणी, वृक्ष आणि कीटक ते शिकवती, आयुष्य बिकट चिकाटीने पुढती जाता होते सगळे सरळ सुलभ || हे सगळे मनुष्याचे गुरू जन्मास येता होई शिक्षण सुरू बालक असो वा वृद्ध जर्जर शिकणे त्याचे न संपते खरेतर || त्या शिक्षणा देती मूर्त आकार ते आपले गुरू साकार || अ पासून शिकवता बाराखडी कधी वापरावी लागते छडी || तसेच शिकता जीवन कळते तेव्हा उमगते परी नंतर वळते || मोठे झाल्यावर कळतो तो पाढा तेव्हा शिक्षक देतात जीवनाचा धडा || क
काव्यरस

जरासे दोन घोट घेऊन लिहावे .. ..

लेखक माहितगार यांनी शनिवार, 14/06/2025 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करावे. जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे पादावे पण मिसळपाव खाऊन नांदावे जरासे, दोन घोट घेऊन हवे ते लिहावे कवितांची प्रेर्ना नमुद करणे कविला अवघडावे असे लिहावे मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करत लिहावे जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे.

रात्रंदिन आम्हां ट्रॅफिकचा प्रसंग |

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 25/05/2025 05:52 या दिवशी प्रकाशित केले.
संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची क्षमा मागून. रात्रंदिन आम्हां ट्रॅफिकचा प्रसंग | हॉर्नचे आवाज आणि धूर ||१|| "रोड रेज" चे जीवा होतसे आघात | तरी दामटतो आपुले वाहन नित्य ||२|| मी म्हणे ह्या प्रदूषणाचिया बळे | अवघ्यांचे काळें केले तोंड ||३||
काव्यरस

स्त्रीत्वाचे शीलहरण!

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 22/03/2025 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रीत्वाचे शीलहरण!
 
स्त्रियाच करिती परस्परांचे 
शीलचारित्र्य हनन मस्त 
मातृत्वाचे वस्त्र फाडणे 
त्यांच्या लेखी दिसते स्वस्त
 
तारतम्य अन विवेकाचे
उरत नसते त्यांना  भान
कुस्करती मग एकमेकींचा 
स्त्रीयाच स्त्रीत्वाचा सन्मान
 
बघुनी नागड्या नालस्तीला
बीभत्सतेला येते ग्लानी
निती, सभ्यता, मानवताही
वितळून होती पाणी पाणी