Skip to main content

अर्थकारण

अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ; ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !! बरं का ! हॅप्पी न्यू यीअर !!

लेखक माहितगार यांनी बुधवार, 23/12/2015 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग स्वप्नात झाले होते पटाईत आमचे (पटाईतांची पटाईतपणे माफी मागून!) पंतप्रधान मोदींचे सचीव !! :) क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग त्यांनी विचारले गेले वर्ष भर काय केले ? ओबामां फोनु आला डू यु नो अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ओह मिपाकरांना आमचा निरोप द्या ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !!

घरचे आणि दारचे अर्थशास्त्र

लेखक विकास यांनी मंगळवार, 15/12/2015 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
गॅरी ट्रूमन यांच्या बुलेट ट्रेनचा अट्टाहास का? वर चालू असलेल्या चर्चेत ट्रेनच्या ऐवजी विषयालाचा (किमान माझ्याकडून) अधिक फाटे फुटू नयेत (पक्षी: विषयांतर होऊ नये) म्हणून येथे एक वेगळा लेख लिहीत आहे ज्यात "घरच्या-दारच्या अर्थशास्त्राची" एक एकत्रीत गोष्ट (केस स्टडी) लिहीत आहे...

बुलेट ट्रेनचा अट्टाहास का?

लेखक गॅरी ट्रुमन यांनी रविवार, 13/12/2015 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांच्या भारत दौऱ्यात कालच ९८,८०५ कोटी रूपयांच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन बांधायच्या करारावर सही झाली. ९८,८०५ कोटी रूपये म्हणजे सध्याच्या भावाने सुमारे १५ बिलिअन डॉलर होतात. अन्य एका बातमीप्रमाणे बुलेट ट्रेनचा खर्च १५ बिलिअन डॉलर आहे.

आयपीओ काही अलिबाबा काही चोर

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी रविवार, 06/12/2015 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणास्थान- इंग्रजाळलेल्या भाषेसाठी आगाऊ माफी. फार पूर्वी पासून आयपीओना खात्रीशीर पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून पाहिलं जातं. पण आधी घडलेल्या गोष्टींचा विदा काय सांगतो? या मागे काही डार्क सिक्रेट्स असू शकतात/आहेत? कोणत्याही व्यवसायाला कच्चामाला इतकीच किंबहुना त्याहून अधिक गरज पैशाची असते. पैशासाठी एक तर कर्ज घेता येऊ शकतं, किंवा व्यवस्थापन स्वतःकडचा काही हिस्सा तुमच्या आमच्यासारख्या काही गुंतवणूकदारांना विकून थोडा पैसा उभा करू शकतं.

सेवा कराचा प्रश्‍न सुटेल; पण…?

लेखक shawshanky यांनी रविवार, 06/12/2015 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
लोकशाहीत देशाचा गाडा चालवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक अशी दोन चाके लागतात. ती चाके समान असली तरच देशाचा गाडा सुरळित चालतो, हा राज्यशास्त्रातला नियम आहे. या नियमाची पंतप्रधान मोदी यांना प्रकर्षाने आठवण झाली असावी, म्हणूनच त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना चर्चेचे आमंत्रण दिले.

आला आला जिलबीवाला

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 23/11/2015 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
आला आला जिलबीवाला आला आला जिलब्यांचा धगधगता घाणा अन् पेटविला साधी जिलबी मावा जिलबी पण आहे पंजाबी की राजस्थानी देऊ बोला चांदनि चौकाची फेमस जिलबी सांगू पण भेसळमालाची देऊ खाण्याला आम्ही पाडू ती जिलबी गुपचुप खावी नाहीतर करता तुम्ही झिंगालाला जिलबीला माझ्या नावे ठेविति कोणी स्वादच नाही 'स्वामी' त्यांच्या जीभेला - स्वामी संकेतानंद जलेबीवाले
काव्यरस

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 14/11/2015 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
*ढिस्क्लेमर* १. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही. २. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी). ३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल. ४.

दयेच्या छावण्या

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 09/10/2015 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
पाणी पितो ती नदी आमची नाही अन्न गिळतो ती शेतं आमची नाहीत आकाश पक्षी चंद्र झाडं हे तर राहूच द्या ही कुत्री मांजरं बदकं कोंबड्या पण आमची नाहीत! युनिसेफची गुळगुळीत पुस्तकं अन तुळतुळीत मडमा WHO ची झटपट औषधं अन चाकपाक डॉक्टर्स RedCross चं जगभरातील वैविध्यपूर्ण एकच रक्त युनोने थाटलेले Waterproof तंबू अन मिनरल बाटल्या यातलं काहीच आमचं नाही! नाही हो, आमची माणसं इतकी दयावान नाहीत! ती रासवट आहेत, मारतात, मरतात तलवारीने गळे चिरतात, रक्ताच्या कुर्बान्या देतात महाहिंसक माणसं! त्यांच्या कर्तृत्वामुळेच तर आम्ही आज तुमच्यामध्ये आलो....... पण तुमच्यात आलो म्हणजे तुमचे नाही झालो, होऊ शकत नाही! एक काम कर

पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सोमवार, 05/10/2015 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की २४ सप्टेंबर २०१५ (ख्रिस्तपुर्व लिहायचा मोह आवरला) मिपावरचं एक भव्य (?) दिव्य (नमस्कार माझा तया दिव्यश्रीला) वॅक्टीमॅट्व श्री.स्त्री.दी.भव्यश्री ह्यांनी युरोपखंडे जर्मनदेशे नामक भुभागावरुन भारतामधल्या पुण्यभुमीमधे एक समस्तं मिपाकरांचा एक कट्टा व्हावा असा डाव्या पायातला बुट काढला.

पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 02/10/2015 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल. तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५ वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम. कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का? (संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको) धन्यवाद.