Skip to main content

अर्थकारण

डिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग २)

लेखक Anand More यांनी शुक्रवार, 18/11/2016 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
---------- भाग १ | भाग २ । भाग ३ । भाग ४ |भाग ५ ----------

RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न

समजा आपण आज देशाची अर्थव्यवस्था सुरु करतो आहोत. आपण RBI चे गव्हर्नर आहोत, म्हणजे या अर्थव्यवस्थेचे हृदय आहोत. आपल्या हातात देशभरातील बँकांचे जाळे आहे, म्हणजे अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या आहेत आणि आपल्याला देशाच्या अर्थव्यवस्थेत चलनरूपी रक्तपुरवठा करायचा आहे. पण तो मिळणार कुणाला? तर या देशातील नागरिकांना. मग आपली अपेक्षा काय असेल? आपली पहिली अपेक्षा असेल की प्रत्येक नागरिकाने त्याची संपत्ती जाहीर करावी.

डिमॉनेटायझेशन (भाग १)

लेखक Anand More यांनी गुरुवार, 17/11/2016 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
---------- भाग १ | भाग २ । भाग ३ । भाग ४ |भाग ५ ----------

प्रस्तावना

ही प्रस्तावना लिहिण्याचे कारण या लेखनावर येऊ शकणारे काही संभाव्य प्रतिसाद आहेत. संकल्पनांविषयी कुठलीही चर्चा सर्वांना मनपसंद होईल, पूर्णपणे पटेल अश्या स्वरूपात करणे अशक्य असते असा माझा शिक्षणक्षेत्रातील गेल्या २० वर्षांचा अनुभव सांगतो. प्रत्येकाचे पूर्वग्रह आणि आकलन निराळे असते. मी त्याचा आदर करतो. आणि माझी जबाबदारी, संकल्पना तिच्या शुद्ध स्वरूपात तिच्या योग्यायोग्यतेबाद्ल टिप्पणी न करता मांडण्याची आहे, असे मानून चालतो.

( काळा असे कुणाचा)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी गुरुवार, 17/11/2016 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
गेले दोन दिवस दोन कडव्यात अडकलो होतो, आता झटक्यात बाकीचे डोक्यात आले. =)) इथं पण सुचनांचं स्वागतच आहे. काळा असे कुणाचा आक्रंदतात कोणी मज पांढरा रुतावा हा दैवयोग आहे सांगू कसे कुणाला कळ आपल्या रुप्याची? चिल्लर कमावयाचा मज श्राप हाच आहे थांबू घरी पहातो, होती 'अनर्थ' नोटा रांगेत राहणेही विपरीत होत आहे ही बँक, पोस्ट ते की, काहीच आकळेना बंदीत सापडोनी मी 'रिक्तहस्त' आहे! - स्वामी संकेतानंद

...मग असे द्या पैसे!

लेखक निनाद यांनी मंगळवार, 15/11/2016 03:21 या दिवशी प्रकाशित केले.
कालच एकात्मिक भरणा पद्धती हा लेख मराठी विकिवर टाकला तोच येथे ही देत आहे. प्राप्त परिस्थितीत त्याचा उपयोग होईल असे वाटते. एकात्मिक भरणा पद्धती हे युनिफाईड पेमेंट इंटरफेस या इंग्रजी नावाचे भाषांतर आहे. यापेक्षा चपखल शब्द सुचत असतील तर जरूर द्या. तसेच या लेखात भर घालण्यासाठी स्वागत आहे!

ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 14/11/2016 03:22 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला. या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी : १. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच. २. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे. ३.

हम सब चोर हैं (आपण सर्व चोर)- एक जाणीव

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 13/11/2016 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशात ९४ टक्के आर्थिक व्यवहार रोख होतो. देशात फक्त १ टक्के लोक आयकर भारतात. त्यात हि ९० टक्के आयकर देणारे संगठीत क्षेत्रातले कर्मचारी आणि मजबूरी में इमानदार सरकारी बाबू आहेत. काय करणार सरकार न विचारता पगारातून आयकर कापून घेते. बाकी अधिकांश थोक आणि फुटकर व्यापारी आपला धंधा रोख करतात. मला आठवते, २०१३ मध्ये मुलीचे लग्न ठरले, चांदणी चौक येथे एका मित्राच्या ओळखीच्या दुकानात कपडे विकत घ्यायला गेलो. ज्या दुकानात रोज २५-३० लाखांचा व्यवहार होत होता, त्या दुकानदाराने डेबिट कार्ड नाकारले. ATM मधून पैशे काढून नगदी द्यावी लागली. निश्चितच हा दुकानदार आयकर भरत नसणार.

नोटा व्हाईट...दारु वाईट.....

लेखक अभ्या.. यांनी शनिवार, 12/11/2016 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
दि. ८ नोव्हेंबर २०१६ वेळ सं. ८.४५ मन्याचा व्हाटसपवर मेसेज ५०० आणि हजारच्या नोटा बंद झाल्या. मी: गप्पे कडू. फोटोशॉप आहे ते. . अर्ध्या तासात ५० मेसेज. वेगवेगळ्या चॅनेलचे. च्यायला एवढे फोटोशॉप कोण करणार नाही. खिशात पाहिले. ५०० च्या ४ आणि हजारची एक आहे फक्त. रात्री तर काही करता येणार नाही नोटाबाबत आपल्याला. जाउ द्या, जे सगळ्यांचे होईल ते आपले पण. जास्त विचार करण्यात अर्थ नाही. . रात्री कन्फर्म मिळाली बातमी. वाचून निवांत झोपलो विचार न करता. . दि. ९ नोव्हेंबर २०१६ वेळ सं. ७.०० पेपरमध्ये डिट्टेलच स्टोरी. आता कॉमेडी मेसेज येताहेत. बारामती मेन टार्गेट.

अपुले प्रधानमंत्री मोदी

लेखक सोहम कामत यांनी शुक्रवार, 11/11/2016 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
('जगण्याचे भान हे' गाण्याच्या चालीवर रचलेले काव्य) देशाचे प्रेम उसळले.. पाचशेचे नोटच गळले.. हजारला कीड लागली.. भ्रष्टांची गल्लत फसली.. मोदींचा निर्णय एकला.... भुरट्यांना केले कंगाल.. बॅंकांची भलती उलाढाल.. उधळून तो काळा पैसा शेठ मावळले.... अकलेचे झाड हे मोदी अपुले.. देशाचे हाड हे मोदी अपुले.. हम्म..

एक ऐतिहासिक ठेवा: मनोरंजन मासिक ( १९११ ) मधील मजेशीर जाहिराती

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 26/08/2016 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतील एका मित्राकडे १९११ सालचा मनोरंजन मासिकाचा 'दिल्ली दरबार विशेषांक' बघायला मिळाला. खूप इच्छा असूनही वेळेअभावी त्यातील काहीही वाचता आले नाही, फक्त त्यातल्या मनोरंजक जाहिरातींचे पटापट फोटो काढून घेण्यावरच समाधान मानावे लागले. मुखपृष्ठ : . माझ्या लहानपणी 'सार्सापारीला' हा शब्द अनेकदा कानावर आलेला होता, परंतु हे काय गौडबंगाल आहे, हे मात्र कधीच समजले नव्हते.