मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

या पाच गोष्टी कायम कराव्यात

श्रीगुरुजी · · जनातलं, मनातलं
1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल. 2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील. 3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील. 4. कोणी आपल्या वाहनाला डाव्या बाजूने ओव्हरटेक करून पुढे गेल्यास ही गोष्ट सार्वजनिक करू नये. हा वाहन संथ चालवितो अशी लोक आपली सगळीकडे जाहीरात करतील. 5. वाहनाच्या अपघात विम्याची मुदत संपली असेल तर ही गोष्ट सार्वजनिक करू नये. त्यामुळे आपलीच प्रतिष्ठा कमी होईल.

वाचने 5047 वाचनखूण प्रतिक्रिया 7

In reply to by हेमंत लाटकर

श्रीगुरुजी Mon, 09/14/2015 - 14:34
ते होणारच होतं. मूळ लेखच इतका जबरदस्त होता की तितका प्रतिभावान लेख लिहिण्याइतकी प्रतिभा आमच्यात बिलकुल नाही. त्यामुळे हे होणारच होतं.