Skip to main content

माज्या हातावरली चिम्नी

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 06/09/2015 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
धन्याम्होरं ती लांब उडून जायची त्यो जाताच माज्या हातावर बसायची.. शेतावर फक्त तीच माजाशी बोलायची पावसात माज्या हाताआड हळूच लपायची.. आता लपण्याची गरजच राहिली नाय हातावरली जागा आजबी रिकामी हाय.. धनीनेबी चिम्नीवानिच मला रामराम ठोकला बायकापोरास्नी माग ठेऊन निगुन गेला.. मोठ्या गाडीतनं त्यो लोकनेता आला जाताना गाडीत दारुची बाटली उघडला.. सात दिवसानंतर छोटं धनी आलं ट्र्ाक्टरवर बसुन माझ्याकडं पाहून हसलं.. हातावरचं पाव्हण आता बिगीबिगी येईल.. पर धनीला परत कोणं आणिलं?

वाचने 1747
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

शंभर जणात कमीतकमी तुम्हाला तरी आवडली...

बुजगावणच बोलत आहे